Prem he...Kadambari 1. books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे...(कादंबरी भाग १)

* प्रेम हे...
लेखक-शुभम कानडे

एक संपूर्ण हिरवागार झालेला डोंगर असतो त्यावरती काळपट रंगाचा मोठा दगड त्या दगडावरती श्रुतिका व नितीन बसलेले असतात पाठीमागून बघितलं तर नितीन उजव्या बाजूला आणि श्रुतिका डाव्या बाजूला बसलेली असते तिचा उजवा हात त्याच्या डाव्या खांद्यावरती असतो नितीन थोडा नाराज झालेला असतो आणि श्रुतिकाला म्हणतो 'आपण जुई ला इतकं शोधूनही ती आपल्याला सापडली नाही यांच्यातच खूप महिने निघून गेले आणि तिचा फोन पण बंदच काही करावं काहीच समजेना आता मला, मी तुझ्याशी इतके वाईट वागूनही तू मात्र कायम माझ्या सोबतच' श्रुतिका म्हणते 'पण का तू आता त्या क्षणांचाच विचार करतोयस,सर्व काही विसरून जाऊन आपण दोघेजण नवीन आयुष्याला सुरुवात करू' नितीन म्हणतो 'नाही ते आता शक्यच नाही,' ती म्हणते 'पण का,' तो म्हणतो 'माझ्या अश्या परिस्थितीमध्ये तू कधीच सुखी राहू शकणार नाहीस,आणि हेच मला नको आहे,मला तुला सुखी बघायचंय ' ती म्हणते तू जर माझ्याबरोबर असशील तर मी कायमच सुखी असेन,' आणि इतके सुख मला कुठेही मिळणार नाही, आणि परिस्थितीच म्हणायचं तर ही परिस्थितीही आपण दोघे मिळून नक्कीच बदलू, तो अंग पण ती पण वगैरे काही नाही आता मला तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल बघायची आहे,आणि तो नाराज असल्यामुळे त्याला फारशी चांगली स्माईल देता येत नाही तरीपण तो स्माईल देतो आणि म्हणतो ठीक आहे आणि तिचा खांद्यावरचा हात बाजूला करून हातात घेतो आणि ती तिचे डोके त्याच्या डाव्या खांद्यावरती ठेवते आणि तो म्हणतो, शेवट पर्यंत तू मला साथ देशील ना गं ती म्हणते हो रे...संपुर्ण सात जन्म मी तुझीच असेन त्याच्यानंतर नितीन आणि श्रुतिका लग्न करतात आणि नितीन च्या घरी जातात, त्यांच्याबरोबर ओंकार,रोहित आणि नेहा पण असतात आणि ओंकार हाक मारतो, नितीन च्या घराबाहेर उभा राहून, काकू अहो काकू म्हणून तो पर्यंत नितीन ची आई आतून येते आणि बघते तर श्रुतिकाने साडी नेसलेली असते आणि गळ्यात मंगळसूत्र असते आणि तिच्या सोबत नितीन तिला चिटकूनच उभा असतो हे बघून नितीन च्या आई ला काहीच समजत नाही तो पर्यंत नेहा म्हणते की काकू आपल्या नितीन आणि श्रुतिकाने लग्न केलं, नितीनची आई लगेच नितीनला नितीन खरंच तू माझ्या मनासारखं केलंस, त्यावेळेस कुठे सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल येते, आणि नितीन ची आई, थांबा थांबा हं...आणि ती नेहाला आत बोलावते आणि आरतीच ताट तयार करते तांदळाने मापटे भरते आणि भाकरीचा तुकडा उजव्या व डाव्या बाजूला ओवाळून टाकते नेहा आणि आरतीचे ताट नेहा काकूंकडे देते तो पर्यंत काकू श्रुतिकाला श्रुतिका उजव्या पायाने मापटे वलांडून आत ये म्हणून सांगते तो पर्यंत नेहा आधी नाव घ्यावं लागेल दोघांना मगच घरी प्रवेश श्रुतिका बरं बरं घेते थांबा,आठवल्यासारखी करते आणि म्हणते हं ऐका आता, वर्षा काळचे महिने बारा, नितीन या नावात समावलाय आनंद सारा,रोहित,ओंकार,नेहा वा वा वा वा! म्हणतात आणि नेहा म्हणते की आता श्रुतिका तू आमच्यासाठी हे नाव घेतलंस, आता नितीन साठी घे की श्रुतिका बरं घेते ऐका नितीन म्हणतो ऐकतोय घे तरी श्रुतिका नितीन ला हं! घेते थांब की आठवते बरं ऐका कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती नितीनराव माझे पती सांगा मी भाग्यवान किती,सर्वजण वा वा ! म्हणतात आता ओंकार आणि रोहित नितीन ला आता तू नाव घे की सर्वांसाठी नितीन म्हणतो हो घेतो पण एकच घेणार सर्वजण बरं घे बाबा म्हणतात आणि नितीन बरं ऐका लग्न या योगायोगाच्या गाठी श्रुतिकाने नाव घेतो तुमच्या सर्वांच्या आग्रहासाठी, सर्वजण वा वा ! म्हणतात मग श्रुतिका म्हणते अरे आम्हाला आत येऊ देता ना, तो पर्यंत नितीन ची आई,या आत या श्रुतिका उजव्या पायाने मापटे वलंडते आणि घरात येते, आणि सर्वजण आत येतात,नितीन आई ,थांबा आता सर्वजण जेवणासाठी जेऊनच जावा काहीतरी गोड करते आणि सर्वजण जेवणासाठी थांबतात खूप मज्या करतात आणि जेऊन जातात
दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन अजून झोपेत असतो आणि श्रुतिका किचन मध्ये भाजी बनवत असते नितीन चे घर एकदम साधे असते एक रूम हॉल आणि किचन असे त्याचे घर असते तो हॉल मध्ये झोपलेला असतो फारशी वरती गादी टाकून नितीन आणि श्रुतिका पहिल्या दिवशी हॉल मध्येच झोपतात आणि नितीन ची आई आत रूम मध्ये झोपलेली असते बेड वरती,नितीन उठतो आणि आई म्हणून हाक मारतो तर एक आवाज येतो की आई बाहेर गेलेत दूध आणायला मग नितीन लगेच उठतो तो अजून झोपेतच असतो आणि म्हणतो श्रुतिका तू कधी आलीस डोळे मिचकत मिचकत म्हणतो श्रुतिका म्हणते पहिल्यांदा फ्रेश हो त्या नंतर सांगते आणि नितीन फ्रेश होऊन येतो आणि श्रुतिकाला म्हणतो की,श्रुतिका सॉरी हं! मला एक चिमूट काढ गं मग ती चिमूट काढते,आणि तो लगेच म्हणतो अगं हळू काढ इतक्या मोठ्याने घेतात का,सॉरी हं श्रुतिका हे सर्व मला एका स्वप्ना प्रमाणेच वाटत होतं तोपर्यंत आई येते दूध घेऊन आणि ती म्हणते माझी सून आहेच स्वप्नातील परी सारखी त्याचमुळे तुला स्वप्न वाटले असेल आणि उद्यापासून तुम्ही माझ्या रूम मध्ये झोपा मी झोपेन हॉल मध्ये लगेच श्रुतिका नाही आई तुम्ही झोपा रूम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही झोपतो बाहेर हॉल मध्ये आई,अगं पण ,असुदे हो आई ,लगेच नितीन श्रुतिकाला श्रुतिका आपण आज थोडे बाहेर जाऊ या तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे,आणि ओंकार रोहित व नेहा पण येणार आहेत,श्रुतिका म्हणते पण जेवणतयार करून जाऊ तो पर्यंत आई म्हणते,मी जेवण बनवते तुम्ही जावा पण जेवायला लवकर घरी या,आणि श्रुतिका तुझ्या रूम वरच तुझं सर्व साहित्य घेऊन ये तिथे आता काहीच ठेऊ नकोस श्रुतिका म्हणते ठीक आहे आई बरं आवरा आणि जाऊन या लवकर तिने आज ड्रेस घातलेला असतो आई तिला म्हणते की श्रुतिका खरंच तुला हा ड्रेस खूपच छान दिसतो गं तुला साडी पेक्षा ड्रेसच खुप छान दिसतो गं नितीन लगेच श्रुतिकाला बरं श्रुतिका जा लवकर आवर जा जाऊया आपण, मग ते त्यांच्या रोजच्या जागी जातात नदीच्या किनारी त्या खोपे मध्ये कॉलेज लाईफ मध्ये हे सर्व जण इथेच भेटायचे कॉलेज लाईफ मध्ये यांच्या ग्रुप मध्ये अजून दोन मेंबर होते जुई आणि जोस्तना पण ते आता कुठे आहेत काय करतायत हे मात्र माहीत नाही तर तिथे अधिक ओंकार,रोहित आणि नेहा आलेले असतात मग काय हे पण तिथे जातात आणि त्यांच्या खूप काही गप्पा सुरु होतात,नेहा,श्रुतिकाला म्हणते की,काय मग श्रुतिका ,काय म्हणताय लग्नानंतरच आयुष्य कसं वाटतंय,श्रुतिका म्हणते,तू ना ओंकारशी लग्न कर म्हणजे समजेल,रोहित नितीन ला म्हणतो की काय मग नितीन म्हैस काय म्हणते,ओंकार लगेच अरे म्हशीला बोलायला तरी आलं पाहिजे ना,मगच काहीतरी म्हणेल ,मग,श्रुतिका म्हणते ,ए गप्प बसा रे...,इथे आता बोलणारीच म्हैस आहे,बरका,मलाच म्हैस म्हणत होतास नारे,रोहित लगेच तुला कसं समजलं गं,श्रुतिका लगेच बर ते जाऊ दे म्हणते आणि नितीन ला हाक मारते तर नितीन एकदम शांतच असतो,मग काय,श्रुतिका त्याच्या खांद्यावरती हात ठेवते मग तो अचानक म्हणतो,यार मला काहीतरी स्वतःची ओळख बनवायची आहे,आणि महत्वाच म्हणजे ही माझी परिस्थिती मला बदलायची आहे,मला काहीतरी बनून दाखवायचं आहे आता आपलं सर्वांच कॉलेज पूर्ण झालंय आपण आता जॉब शोधून जॉब केला पाहिजे,पण कदाचित मला या जॉब च्या कारणामुळे लांब जावं लागणार आणि श्रुतिका एकटीच पडेल तो पर्यंत श्रुतिका म्हणते नितीन एव्हडे टेन्शन घेऊ नकोस रे मी जे फॅशन डिजायनिंग च करते,तेच आपण दोघेजण मिळून करू,त्यानिमित्ताने तू मी आई आपण सर्व एकत्र ही असेन तुला लांब ही जायची गरज नाही आणि हा बिझनेस आपण दोघेजण मिळून करू की म्हणजे एकत्र ही राहता ही येईल आणि दोघे मिळून ही परिस्थिती ही बदलू आणि या बिझनेस मधून आपण खूप काही करू शकतो,रोहित आणि ओंकार म्हणतात,होय नितीन,श्रुतिका बरोबरच बोलते यार,नेहा म्हणते होय रे नितीन विचार कर,आणि मगच ठरवं,श्रुतिका म्हणते बघ मी सांगितलं,तुला पटलं तर करू नाहीतर तू जॉब करू शकतोस,माझी काहीच हरकत नाही,नितीन लगेच ठीक आहे,रोहित लगेच म्हणतो जॉब करणार!तू नितीन,नितीन म्हणतो नाही,माझ्या बायकोच्या बिझनेस पुढे वाढवणार,नेहा लगेच,बायको हं!,श्रुतिका लगेच म्हणते गप्प बस रे, आणि रोहित म्हणतो,या निमित्ताने पार्टी होऊन जाऊ दे,आणि रोहित त्याच्या कडे असलेली स्प्राईटची बाटली बाहेर काढतो आणि प्लास्टिक चे ग्लास बाहेर काढतो,नितीन म्हणतो अरे हे काय,रोहित म्हणतो स्प्राईट आहे तुला काही दुसरं पाहिजे काय, नितीन म्हणतो बरं चल ग्लास भर,मग रोहित ग्लास भरतो आणि हे सर्वजण चेस करून स्प्राईट पितात,आता सांगायचे तर स्प्राईट पिऊन झाल्यानंतर ओंकार म्हणतो चला आता मी नेहा आणि रोहित आम्ही एकदा जॉब शोधून जॉब करतो,आणि परत भेटूच,चला जाऊया आपण खुप उशीर होतोय,नितीन चला मग निघू सर्व जण आणि भेटत जा वरचेवर सर्वजण बाय चला,आणि इथून पुढे श्रुतिका व नितीन परिस्थिती बदलण्यासाठी त्यांचे कष्ट फॅशन डिजायनिंग चा त्यांचा बिझनेस वाढवायचे त्यांचे प्रयत्न आणि अखेर त्याच एक स्वतःच एक गारमेंट त्या गारमेंटच नाव मायावती गारमेंट हे नाव नितीन च्या आई चे असते या गारमेंट चे उद्घाटन पण नितीन ची आईच करते त्यानंतर नितीन घरी असताना नितीन ची आई नितीन ला म्हणते अरे नितीन लग्नाला अडीच वर्षे झाली पण तुम्ही अजून कुठेच फिरायला पण गेलेले नाहीसा,दोघेपण कुठेतरी जावा फिरायला,तेव्हढच चांगल वाटेल,श्रुतिका लगेच नितीनला म्हणते नितीन जाऊयाना कुठेतरी फिरायला,नितीन ठीक आहे म्हणतो,मग नितीन आता किचन मध्ये पाणी पिण्यास जातो आणि पाणी पिऊन येतो,आणि तो श्रुतिकाला व आई ला म्हणतो,पण फिरायला जायच्या आधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे,आणि चला जाऊया आवरा लवकर मग आणि नितीन त्यांना एका अपार्टमेंट मध्ये घेऊन जातो आणि त्याने अधिच एक 2BHK फ्लॅट खरेदी करून ठेवलेला असतो आणि या दोघांनी तो या दोघींना सांगतो की हा फ्लॅट आजपासून आपला आहे आणि आजच आपण इथे राहायला यायच आणि मग आईच्या डोळ्यातील आनंद अश्रू येतात,आणि श्रुतिकपण खूपच खुश होते आणि मग हे त्या फ्लॅट मध्ये राहायला येतात जुन्या घरातील सर्व काही पसारा या फ्लॅट मध्ये आणतात आणि इथे राहायला येतात समान वगैरे लावून घेतात,आणि नितीन आई ला म्हणतो,आई आता तू खुश आहेस ना,ती म्हणते ही रे...खरच खूपच खुश आहे,नितीन म्हणतो,आई आता मी आणि श्रुतिका उद्या सकाळी जातोय फिरायला आई म्हणते जावा,नितीन म्हणतो चार दिवसां नंतर परत येईन काळजी घे स्वतःची,आणि आमचा विचार करू नकोस हं सकाळी लवकर जाणार आहे आणि नितीन आत त्यांच्या रूम मध्ये जातो आता श्रुतिका आई नां म्हणते आई स्वतःची काळजी घ्या वेळेवर ओषधे व जेवण घेत जावा,आणि आम्ही काय फोन करूच,आई म्हणते जावा हं पण,काहीतरी गोड बातमी समजली पाहिजे,असे आई म्हणते,आणि श्रुतिका लाजून पळून आत रूम मध्ये जाते हसतच मग नितीन विचारतो की काय झालं हसायला,काय विनोद बाहेर झाला का ती नाही म्हणते,आणि हे बेडवरती झोपतात,नितीन झोपतो पण श्रुतिका अजून जागीच असते ती एक पुस्तक वाचत बसलेली असते अचानक नितीन श्रुतिका....श्रुतिका म्हणून जाबडतो, मग श्रुतिका त्याच्या डोक्यावरून हात फिरवते,आणि लाईट बंद करून झोपते

पुढील कादंबरी भाग २ मध्ये....

इतर रसदार पर्याय