Maherachi maya books and stories free download online pdf in Marathi

माहेरची माया


माहेरची माया


आमची सारिका वहिनी अगदी पारंपारीक पद्धतीने लग्न करून आली... आणि बोहल्यावर चढली... निमूट सप्तपदी पूर्ण करून सुमित दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली.... सामावली...पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही....
सासरी जे घडेल त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असयाचच....
त्यामुळे बरेचदा संवाद खंडीत व्हायचा.. काहीही सांगितलं तरी मधेच अडवत ती म्हणणारच हे तर काहीच नाही.... आमच्या वाड्यात ना याहून....तरी वहिनीचं वागणं कुणाला खटकायचं नाही.... कारण एरव्ही तिचं वागणं अगदी सालस आणि समजुतदार होतं....
तिचं माहेरही होतच तसं तालेवार.... त्यानी अगदी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली ... ती केवळ माणसं बघूनच... त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी अगाऊपणा झाला नाही ... की अवमान झाला नाही...
हे आता आमच्या लहानपणापासून माहीत झालं होतं ... ती माहेराहून आली की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे दाखले ऐकावे लागायचे.. अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे त्यांचा भलामोठा वाडा.... त्यांची लांबचलांब पसरलेली बाग.... फुलांचा ढीग.... बागेशी खेळणारी फुलपाखरं .... सगळच स्वप्नवत वाटावं असं... म्हणजे मनमुराद वेगावर स्वार होणारी ही मुलगी.... दादाच्या सोबत इथल्या छोट्या घरात स्थिरावलीच कशी...? याचं आष्चर्य वाटतं....
मधे तिचे भाऊ अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून आ ला... आणि माहेरच्या गप्पा आणीकच वाढल्या... आम्हालाही ते ऐकायला आवडायचच.... कारण तो परिसर ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती....
मी दहावीत ची परीक्षा झाली तेंव्हा आईचं काही नं ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती....
म्हणाली आता चार दिवस माणसं येऊन उगीच भंडाऊन सोडतील...
चित्रपटात कसं पाहुणे आले की सरबराई असते... स्पेशल रूम... चांगली ठेप... आपले आवडते पदार्थ... खेळायला ऐसपैस जागा... भरपूर मुल आजूबाजूला...
घरही तसच चौसोपी होतं.. त्यात वहिनी माहेरची मोठी लेक.... त्यामुळे तिनेच त्या घराला एक शिस्त लावली होती... मी वहिनीचा पाहुणा.... म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास्त ठेवली गेली.... मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती...
म्हणजे एकूण काय अशी आमची सारिका वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्या साठी एक अप्रूपच होतं.. मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली... वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाही.... नाहीपण तरी त्याच्या परीने त्याने भरपूर मेहनतीने मोठं घर... गाडी.. सगळच घेतल होत... दहा पंधरा वर्षांत भरपूर बदल झाले होते....
पण वहिनी ची माहेर विषयी बोलणं कमी झालं कधी बोललीच तरी त्यात पहिल्या सारखा माहेर विषयी बोलण्याचा आग्रह राहिला नव्हता.... मी ही समजदार झालो होतो...
मधे तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून अलिशान बंगला बांधला गेला दोन्ही भावांची आँफीसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती... तेव्हापासून तीच माहेरी जाण... त्याविषयी भरभरून कौतुक करणं अगदी कमी झालं होतं...
आम्हा सगळ्यांनाच ती पूर्वीपासूनच भरपूर करत होती... माझ्या मामा मामी ची लाडकी सून होती... आहे... आणि असेल...
मला कल्याण ला जॉब लागला म्हणून मी जवळपास तीन वर्षे तिथे राहिलो होतो...
तिच्यामुळे घरात चैतन्य टिकून होत... मला एक भाचा आणि भाची पण आहे... आता दोघं ही शाळेत जातात.... ते ही तिच्यासारखी मनमिळावू...
शेवटी मी विचारायचं ठरवलं....
"वहिनी काय झालं... इतके दिवस झाले... तू एकदा ही माहेरचा उल्लेख ही केला नाही...." मी.
" काय बोलू...?" वहिनी.
" काय झालं...? इतके दिवस झाले... तू एकदा ही भरभरून माहेर विषयी बोलली नाही... जितक्यास तितकं बोलते... " मी विचारलं
ती म्हणाली..." तसं पाहिलं तर काहीच झालं नाही.. सगळं रीतीला धरून झालं...पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतो..."
क्षणभर गप्प राहून ती म्हणाली..." आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो ... आपण आता त्या घराला परके झालो... हे आमच्या लक्षातच येत नाही...आणि माहेरचे लेक परकी झाली हे गृहीतच धरून चलतात... खूप यातनामय आहे हे..."
" वहिनी नीट सांग ..." मी काकुळतीला येत म्हणालो..
तशी ती म्हणाली " काही नाही ... आधी वाडा होता त्यात माझी स्वत:ची खोली होती ...मला माझ्या खोलीचं कौतूक होतं..
घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे..."
" मग आता...?" मी नं राहवून विचारलं
" आता इतका अलिशान बंगला बांधला... एक मजला वाढवला पण.... त्यात मला कुठेच जागा नाही..." " म्हणजे शंतनू (धाकटा भाऊ) आता दहा बारा वर्षपासून अमेरिकेत... तरी त्याची रूम आहे ... आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे.... दादाच्या दोन्ही मुलाना वेगवेगळ्या रूम्स ...."
" पण ताईची जागा या घरात अबाधीत आहे.... असं कोणालाच वाटलं नाही... मी सहज विचारून गेले माझी रूम...? तर दादा म्हणाला गेस्टरूम आहे ना... शिवाय स्टडीरूम आहेच...."
" अगदी गेस्टरूमला जरी तो म्हणाला असता... की ती तुझी खोली तरी मी सुखावले असते .... मी थोडीच त्या खोलीवर हक्क सांगणार होते...? की बारा ही महिने मुक्काम ठोकणार होते...?" " इतकं होऊन ही माझ्या मनातल्या भावना चा अजूनच गळा दाबला अस काही घडाव... तर नवलच...
" अस काय घडलं..."
" तुला माहिती आहे... मी कधी काही मागितली नाही...माझे महेरच इतके प्रेम करतात... पण एकदा आई सोबत बोलत असताना ... आमचं आमचं बोलत असताना... वहिनी ने टोमणा मारला... की हो.. मग पैसे जसे झाडावरच येतात..."
" हे चुकीचं आहे... " मी.
" नाही... चूक तिची नाहीच... आमचं चुकल्यावर आम्हाला चांगल वळण लावल... आणि आज आई ने तीच्या लेकीला अस म्हणल तर थोडीफार समज द्यावी सुनेला... की ती कधी कुणाला बोलत नाही... कधी काही मागत नाही... मग तू अस का म्हणाली... पण आईने अस काहीच केलं नाही... म्हणून"
" आता मला सांगा... जागा होती... पण सामाऊन घेणं जे म्हणतात... ते त्यांच्या लक्षातही आलं नाही...त्यात ते काही वेगळं वागले नाहीत इथली रीतच अशी..."
" मग मी मनापासून या घराकडे वळले... या घरची होऊन गेले... पण ही रीत मी मोडेन... आपण जेंव्हा बंगला बांधू... मी छकुलीचं लग्न झालं... तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन... गेस्टरूम मधे फक्त पाहुणे उतरवायचे... आपल्या लेकीबाळी नाही त्या दुसर्‍या घरी गेल्या तरी...त्या आपल्याच असतात ... "
वहिनी भरभरून बोलत राहिली मी ऐकत राहिलो...

कधी तुम्हाला माहेर च्या आगळ्या वेगळ्या माये विषयी काही सांगायचंय.... बिन्धास्त बोला... कॉमेंट बॉक्स मध्ये....


इतर रसदार पर्याय