Shitole books and stories free download online pdf in Marathi

शितोळे

पुणे प्रांताचे शितोळे देशमुख ( " राजराजेंद्र राजा देशमुख " ) शितोळे देशमुख हे महाराष्ट्रातील एक जुने वतनदार देशमुख घराणे आहे . निजामशाही , आदिलशाही , मोगल तसेच मराठेशाहीच्या काळात या घराण्याकडे पुणे प्रांतातील देशमुखीचे हक्क होते . या घराण्याच्या नरसिंह शितोळे , नाईक शितोळे आणि सातभाई शितोळे अशा तीन शाखा आहेत . दसमोजी नाईक शितोळे हे या घराण्याचे मुळ पुरुष होत . दसमोजींचे नातू मालोजीराव पहिले हे छत्रपती । शिवाजी महाराजांसोबत आपल्या फौजेसोबत होते.शितोळे घराण्याचा पराक्रम छत्रपती शाहूंच्या कालखंडापासून दिसून येतो.मालोजीरावांचे नातू मालोजीराव दुसरे यांनी पुरंदरच्या लढाईत गाजविलेल्या पराक्रमाबद्दल छत्रपती शाहूंनी त्यांना पुण्याजवळील काही गावे इनाम म्हणून दिली तसेच त्यांच्या देशमुखी उत्पन्नावरील तिजाई करमाफ केला.मालोजीराव दुसरे पासन नरसिंह शाखा सुरू होते.मालोजीरावांचे पणतू सिघ्दोजीराव नरसिंह हे महादजींच्या पदरी होते . त्यांनी महादजींसोबत अनेक यशस्वी मोहिमा केल्या .सिध्दोजीराव शितोळे आणि महादजी शिंदे हे दोघे समकालीन योध्दे होते . सिध्दोजी उत्तरेतील अनेक मोहिमेमध्ये महादजींसोबत होते . सन १७७७ साली सिध्दोजीरावांचे पत्र लाडोजीराव आणि महादजी शिंदे यांची कन्या बाळाबाई यांचा विवाह झाला . महादजी शिंदेसोबत मोहिमेवर असताना सिध्दोजी लढाईत मारले गेले . त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र लाडोजीयांना सिध्दोजींच्या जहागिरीचा तसेच देशमुखीचा हक्क मिळाला . सिध्दोजीरावांचे पुत्र लाडोजीराव नरसिंह यांना महादजींच्या दरबारात प्रथम दर्जाच्या ताजीमदार सरदाराचा मान होता .त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना राजराजेंद्र राजादेशमुख ' , ' रस्तुम जंगबहादूर उमादत - उल - मुल्क ' असे किताब मिळाले . दिल्लीचा बादशहा शहाआलमने महादजीस दिल्लीस बोलाविल्यानंतर जून १७८३ मध्ये महादजी दिल्लीस निघाले . इ . स . २७ जुलै १७८३ रोजी त्यांची बादशहा शहाआलमने आग्रा येथे भेट घेतली ( संदर्भ : दिल्ली येथील । मराठ्यांची राजकारणे भाग १ लेख ९३ ) . याच दरम्यान महादजींनी डागेचा किल्ला जिंकून घेतला . महादजींनी बादशहा । अदालम याचा मुलगाअकबरशहायास आग्र्यावर तसेच आपले जावई लाडोजी देशमुख यांस आग्र्याचा कारभारी म्हणून नेमले .नजीबखान रोहिल्याचा पुत्र गुलाम कादीर व इस्माईल बेग यांनी इ . स . २९ जुलै १७८८ रोजी दिल्लीवर हल्ला करूनबादशहा शहाआलम यास कैद करून त्याच्या जनानखान्याची बेअब्रकेली . गलाम कादीरच्या अचानक हल्ल्यामुळे । लाडोजीना दिल्ली सोडून पळावे लागले . गुलाम कादीरने खजिना मिळविण्यासाठी बादशहाचे अतोनात हाल केले व । शेवटी त्याचे डोळे काढले . इस्माईल बेग कादीर या कृत्यामुळे महादजींना येऊन मिळाला . महादर्जीनी राणेखान , रामजी । पाटील , जियबादादा बक्षी , लाडोजी शितोळे या आपल्या सरदारांना दिल्लीवर पाठवले . गुलाम कादीर दिल्ली सोडून पळाला .महादजीच्या फौजेने रोहिल्याच्या मुलूखावर हल्ला केला . आपल्या मुलखाचे रक्षण करण्यासाठी गुलाम कादीर रोहिल्यास निघाला . मराठ्यांच्या तावडीतून निसटलेल्या गुलाम कादीर यास इ . स . १९ डिसेंबर १७८८ रोजी मेरठजवळच्या बामणोली येथे पकडले गेले . त्यासमहादींनी कैदेत ठेवून इ . स . ३ मार्च १७८९ रोजीठार मारले .बादशहाने दिल्ली दरबारातील उठाव मोडून काढल्याबद्दल महादजी तसेच त्यांच्या सेनानींना वेगवेगळे पद दिले . लाडोजींना सोनपत आणि पानिपत येथील १०६ गावे जहागीर म्हणून दिली . मध्यप्रदेशातील शिवपूरी जिल्ह्यामधील पोहरीची सरंजामी शितोळेंकडे होती . पोहरी येथील किल्ला , राजवाडा तसेच अनेक वास्तू शितोळेंच्या पराक्रमाच्या साक्षीदार आहेत .लाडोजीरावांचे सन १७९३ साली पुणे येथे निधन झाले . त्यांची समाधी मुळा - मुठा नदीच्या संगमावर आहे . शितोळे देशमुख घराण्याचा विस्तार पुणे , अंकली , बडोदा , देवास , पोहरी , पाटस , लवले , बाणेर , सांगवी , कुसेगाव , फुरतूंगी , आंबेवाडी , खडकी आदी अनेक ठिकाणी झाला

Reference from whats up post

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED