Shitole - 3 books and stories free download online pdf in Marathi

शितोळे - 3

पौराणिक इतिहास - शितोळे हे रघुवंशी व सुर्य वंशी आहेत. प्रभू रामचंद्र यांचा थोरला मुलगा लव्ह, त्याला अपत्ते नव्हते. त्याने शेषनागाची आराधना केली, शेषनाग लव्ह या राजावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने पुञप्रात्पी झाली. त्यांच्या वंशज यांना सेसू दिया या नावाने ओळखलं जाऊ लागला. सेसू दिया असे संबोधनात आले. सिसो दिया यांचा धर्म हिंदू जात ९६ कुळी, मराठा, वंश-सुर्यवंशी, कुळ-सिसोदिया, निशाण-पिवळे-सूर्यफुल, खांडा यंञ तारक श्रीराम मंञ मुद्रा खेचर, आश्र-पिवळे वेद- राजूर कुलदैवत (दौंड तालुका) श्री रोटमलनाथ (श्री रोटोबा) आणि देवी जोगेश्वरी (रेणुका मातेचा अवतार), कुळदेवी-मौजे कुरकुंभ येथील फिरंगाई माता, आराध्य दैवत- मोरेश्वर गणपती (मोरगाव), खंडोबा जेजुरी मल्हार, यमाई देवी शिवरी येथील रेणुका मातेचा अवतार, सिसोदियां या वंशात राणा हापसेन रोहिल हा मूळ पुरुष त्यांच्या वंशाचा मोठा विस्तार झाला. अयोध्या सोडून प्रथम राजस्थानात आले. सन इ.स. ४०० च्या सुमारास राज्य स्थापन केले. सिसोदियां या नावातून पुढे विविध ठिकाणच्या वास्तव्य, बोली भाषा यावरुन सिसोदियां हे शितोळे नावाने ओळखले जावू लागले.

ऐतिहासिक-राजा हापसेन याच्या घराण्यात अयोध्या सोडल्यानंतर हिमाचल, नेपाळ इ. वर राज्य करु लागले. सिसोदिया नावाचे पुढे सिसोदिया, सितोला, सितोळे आणि अखेरीस शितोळे हे नाव प्रचलित आहे. सिंधखेड, मथुरा ते परळी अंबेजोगाई त्यापुढे दौंड येथे बस्तान बसविले पुढे शितोळे परिवाराचा फार मोठा विस्तार झाला. पुढे मावळ,हवेली,भिमथडी,पुरंदर,शिरुर,दौंड आणि बारामती सर्वच तालूक्यामधून खडकी, कुरकुंभ,पाटस, रोटी, कुसेगाव, पडवी, देऊळगावगाडा, पिंपळगाव, केडगाव, ऊरुळी कांचन,फुरसुंगी, पुणे, कोरेगाव इ.स. ८०० ते ८५० वर्षामध्ये शितोळे या मंडळीचा प्रांतात विस्तार झाला. महाराष्ट्रात येथे दक्षिणेत २९० गावे वसावली. शितोळे यांच्याकडे नाईक, देशमुखी अफाट होती. १२०० वर्षाच्या देशात अनेक घटना घडल्या या प्रचंड कालखंडामध्ये स्वातंञ्यकाळापर्यंत आदिलशाही ते इंग्रज अशी अनेक सत्तांतरे झाली. परंतु शितोळे मंडळींवर कोणताही परिणाम झाला नाही. रोटी गावातील काही शितोळे देशमुख काही वर्षांपूर्वी भानगाव ता श्रीगोंदा या गावी वतनावर गेल्यामुळे तिथेच स्थायिक झाले आहे अशी अधिक माहिती मिळाली.

शितोळे_घराण्याचा_जावळ_विधी

रोटी ह्या गावात श्री रोटमलनाथ व जोगेश्वरी हे शितोळे घराण्याचे कुलदैवत आहे. या ठिकाणी शितोळे घराण्याचा अत्यंत महत्वाचा विधी म्हणजे जावळ विधी आहे. कुटुंबातील थोरल्या मुलाचे व त्याच्या आईचे जावळ या मंदिरात कासवावर बसवून करण्याची पद्धत व परंपरा आहे. शितोळे घराण्याची ही जवळपास १००० वर्षाची परंपरा आहे. परिसरातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून देशाच्या विविध प्रांतातील एवढेच नव्हे तर परदेशातील विविध देशातील शितोळे मंडळी जावळ विधी करण्यासाठी रोटी येथे येत असतात. विधी हा लग्नासारखा सोहळा असतो मुलगा व त्याची आई यांना विशिष्ठ ठिकाणी स्नान करुन, हळद लाऊन डोळ्यांना मंडवळ्या बांधून घोड्यावर बसवून ताश्या, ढोल, सनई या वांद्यासह देवळापर्यंत मिरवणूक काढून कासवावर बसवून मूलाच्या मामाच्या मांडीवर बसवून केस काढले जातात. त्यावेळी त्या कुटुंबाचे सहकारी, भाऊबंद, आप्तेष्ट, मिञमंडळी, सगेसोयरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पढत असतो. मुलाच्या जावळाच्यावेळी नाथाच्या मंदिरात बाहेर जे रक्षक असतात त्यांच्यापुढे ७ बकर्‍याचे बलिदान करण्याची जुनी पद्धत आहे. ते सर्व मटण एकञित शिजवून उपस्थित लोकांना जेवन घालतात. श्री रोटमलनाथ देवाला गोड नैवेद्य असतो. मालकाला शाकाहारी व मांसाहरी असे २ स्वयंपाक करावे लागतात. या विधीकरीता कितीही खर्च आला तरी जावळ विधी करणारी व्यक्ती आनंदाने खर्च करते. जावळ विधी सुद्धा विशिष्ठ मुहुर्तावर जावळ काढले जाते त्यामुळे ऐके दिवशी कमीत कमी ५ ते १० जावळाचा विधी असतो. श्री रोटमलनाथ सोहळ्यामध्ये मोरगावचे तावरे मंडळींना मान असतो आजपर्यंत ही प्रथा चालू आहे. शितोळे घराण्याचे कुलदैवत श्री रोटमलनाथाचे दक्षिणमुखी सुंदर मंदिर आहे या मंदिराचा सभामंडप पांडवकालीन असून भैरवनाथाचा अवतार म्हणजे श्री रोटमलनाथ व जोगेश्वरी नयनरम्य मूर्ती पहावयास मिळाली. या गावच्या ग्रामदैवताची याञा हि चैञ पोर्णिमेला उत्साहात साजरी केली जाते यामध्ये अभिषेक व विधीवत पूजा, सर्व भाविक दंडवत घालत असतात याञेदिवशी सायंकाळी ग्रामदैवत श्री रोटमलनाथ व जोगेश्वरी पालखी सोहळा गावाला प्रदक्षिणा घालून याञा साजरी केली जाते. दुसर्‍या दिवशी सकाळी पै-पाहुण्यांसाठी तमाशाचे व सायंकाळी कुस्तीच्या आखाड्याचे नियोजन गावकरी करीत असतात तसेच या ग्रामदैवताचे गुरव गाडे असून याञेत बकरी पडतात यावेळी मोरगावचे तावरे यांना मान आहे अश्या प्रकारे याञा साजरी होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED