Breakupnantar - 1 books and stories free download online pdf in Marathi

ब्रेकअपनंतर - १

प्रेम.... जेव्हा प्रेम होतं ना तेव्हा आयुष्य किती सुंदर वाटत नाही...!
जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमासारखी दुसरी गोष्ट या जगात नाही. प्रेमातून नात फुलत जात आणि पुढे जाऊन दोन वेक्ती एकरूप होऊन जातात. एवढी ताकत त्या प्रेमाच्या जादूत आहे.
प्रेमात सर्वकाही सुंदर दिसत. नेहमी कंटाळा देणारा पाऊस प्रेमात असताना मात्र रोमँटिक वाटू लागतो. कधी स्वतःसाठी जगणारी वेक्ती दुसऱ्याचा विचार करू लागते. दुसऱ्यासाठी जगु लागते.



तसच काही माझंही. तो माझ्या बाजूच्या ऑफिसमध्ये काम करायचा. आमची पार्किंगमध्ये ओळख झाली. मग काय रोजच भेटन व्हायच. तो आला आणि सगळं काही बदललं. नव्याने सुरुवात झाली प्रेमाची. तसा मला पाऊस नेहमीच आवडायचा पण त्याला जरा जास्तच. आम्ही जायचो सोबत पावसात. कधी कधी सर्वांची नजर चुकवून ऑफिस नंतर जायचो सीसीडी मध्ये. गरमा- गरम कॉफी घ्यायला. कॉफीचा एक घोट आणि सोबत मुसळधार पाऊस. काय रोमॅंटिक वाटायच ते. खुप सुंदर क्षण होते ते. कधी कधी उगाचच ट्रेन ने जायचो. बाहेर पाऊस त्या ट्रेन मधली गर्दी आणि आम्ही. केसांतून गळणार पाणी बटांवर रेंगाळत यायच आणि तो अलगद ती बट बाजूला करत ते पाणी आपल्या हाताने पुसायचा. मग माझे लाजून होणारे लाल गाल त्याला खूप आवडायचे आणि तो चक्क खेचायचा आणि अजून लाल करायचा.
जेव्हा प्रेम होत ना आणि ज्या वेक्तीवर होत, तीच वेक्ती आपल्यावर ही तेवढच प्रेम करते याच्या सारख दुसर भाग्य नाही.



त्या दिवशी ठरवून आम्ही सुट्टी घेऊन दोघे बाहेर गेलो. फक्त भिजायला म्हणून की काय पावसाचे नामोनिशाण नाही. गेलो आणि गार्डनमध्ये वाट बघत बसलो. कधी येणार पासून म्हणून, मी मात्र कंटाळले पण तो नाही. त्याला पक्क म्हाहित होत की येणार जस काय पावसाने त्याला फोन करून सांगून ठेवल होत की आज बरसणार आहे. मग काय बघत बसलो वाट आणि बघता बघता तो आला. मोठं मोठे ढगांचे वर्तुळे बनत गेली आणि त्यातून पाण्याचे मोठे मोठे थेंब बरसु लागले. आम्ही तर चक्क तय्यारी करूनच बसलो होतो. सॅंडल, शुज घड्याळ, मोबाईल सगळं बॅगेत भरून आम्ही सज्ज झालो त्या पावसात भिजायला. पाऊस आला सोबत आनंद घेऊन. सर्वजण इकडे तिकडे आडोशासाठी मिळेल तिथे पळत होते.



पण माझ्यासाठी ते क्षण तिथेच थांबले. तो त्या पावसात एखाद्या लहानमुला सारखा भिजत होता आणि मी त्याला बघत होती. मग काय मला ही घेतलं त्याने सोबत. खूप भिजलो. पाऊस जवळुन अनुभवत होतो की अचानक एक जोराची वीज कडकडली आणि मी त्याला बिलगली. त्याने ही त्याची मिठी घट्ट केली. काही क्षण, मग मात्र मी गप्प जाऊन बसले. परत भिजलो खुप. बाहेर गेलो गरम चहा आणि वडा खाल्ला. त्याने घरी सोडले अन तो ही गेला.



असेच आम्ही भिजायचो, फिरायचो. एक दिवशी त्याने कॉल करून मला बोलावले. काही काम आहे सांगुन. मग मी ही काही जास्त न विचारता सरळ भेटायला गेली. नेहमीच्या गार्डनमध्ये आम्ही भेटलो. तो शांत बसला होता बाकड्यावर मी ही शेजारी जाऊन बसली. त्याने माझ्याकडे बघितलं मी एक छानशी स्माईल दिली त्याने ही दिली आणि तो बोलू लागला.


"जर बोलायच होत. खर तर आधीच बोलला पाहिजे होत पण आज नाही बोललो तर कधीच नाही बोलू शकणार म्हणून बोलतोय. अग कस सांगु पण... ते मला.." मी घाबरली. स्पष्ट बोलणारा आज शब्द शोधतोय. मग मीच त्याला 'काय' म्हणून सरळ विचारले आणि तो बोलू लागला.



"माझं एक मुली वर प्रेम आहे. म्हणजे आधी पासून नाही पण आता झालाय. तुला कस सांगू कळत नव्हतं. तु रागावशील म्हणून बोललो नाही पण आज नाही सांगितल तर खूप उशीर होईन." मी रागावली. खरतर वाईट वाटलं मनाला. अचानक डोळे भरू लागले आणि गालावर आलेच मी कितीही नाही दाखवायचे ठरवून ही. मी उठली आणि निघू लागली. तो आला मागे आणि माझा हात ठरत थांबवल त्याने. राग, रडू सगळं येत होतं पण शब्द तोंडातून फुटत नव्हते.



पुढे बोलला की, आज भेटवायला घेऊन आलोय आणि तू न भेटताच जातेस. काय होणार माणुसाचे या अशा प्रसंगी. मी शांत मग तोच मागे गेला आणि त्याने मला मागे फिरायला सांगितल कारण ती आलेली. मी मागे वळली तर हा खाली आपल्या घुडग्यान वर हातात रिंग घेऊन बसला होता. सर्वजण बघत होते. पण मला कोणाची फिकीर नव्हती. मी गेले आणि त्याला बिलगत होकार दिला. सोबत चार रपाते ही. मग घट्ट मिठीत बिलगले.



To be continued

इतर रसदार पर्याय