Kuthe jaaychany saheb ? books and stories free download online pdf in Marathi

कुठे जायचंय साहेब...?

उद्या महिन्याचा दुसरा शनिवार, परवा रविवार सरकारी सुट्टी आणि सोमवार, मंगळवार पर्सनल सुट्टी. असा चार दिवसाच्या सुट्टीत, सहपरिवार कोकणचा भाग फिरायचा प्लॅन रवीचा होता. पुढील कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याला आज जरा जास्त उशीर झाला. रोजची रेल्वे निघून गेली, रवीला ऑफिसमध्येच 8 वाजले. सर्व काम आटोपून तो प्युन च्या गाडीवरून रेल्वे स्टेशनकडे निघाला, बोलता बोलता स्टेशन आले. तेवढ्यात गाडी सुटण्याचा भोंगा वाजला.
रवी गाडी वरून गडबडीत उतरत प्युन ला धन्यवाद देत स्टेशन च्या दिशेने पळत सुटला, " साहेब दम्मानी जा,आज अमवस्या आहे" असा ओरडत निरोप प्युन ने दिला.रवी " हो हो" म्हणत पळत निघाला.रवी स्टेशनवर येऊन धडकला पण बॅड लक् रेल्वेने स्पीड घेत स्टेशन सोडलं होत. "ओ~~ह् शीट यार" म्हणत रवी हताश उभा राहिला. पुढची रेल्वे 9:45ची, तासभर वाट बघणे हाच पर्याय असल्याने तो जवळच्या बाकावर बसला.
थोडं रिल्याक्स झाल्यावर त्याला प्युन चे शब्द आठवले "आज अमवस्या आहे" तो मनोमन हसला भुतावर त्याचा विश्वास नव्हता.
तेव्हड्यात ओळखीतला एक फेरीवाला आला "क्या साब,आज देर हो गयी लागता".
"हम्म" रवी त्याचा कडे बघत म्हणाला,
"रूक जाणा था आज गेस्ट हाऊस पे, अम्मास है नां आज" अस
म्हणत तो निघून गेला रवी थोडा गंभीर झाला. त्याला घरी जाण्यासाठी ३ तास लागणार होते. त्याच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. शहरातल्या स्टेशन ते घरा कडे जाणाऱ्या रस्त्यावर चे किस्से तो ऐकून होता, वडा च्या झाडा खालचे, पुलावरचे, त्याच्या पुढच्या वळणा वरचे. त्याच्या ऐकण्यात आलेले सर्व किस्से डोक्यात फिरत होते. तेव्हड्यात मोठ्याने रेल्वेचा भोंगा वाजला, रवी दचकून जागेवरच उडाला. तसा भानावर आला ,बोगीत जाऊन त्याने पटकन विंडो सीट धरले.
घरी कॉल करून झाला प्रकार सांगितला. बॅट्री लो आहे मी पोहोचतो म्हणतं फोन कट केला.गाडी निघाली थोड्याच वेळात गार वाऱ्याने रवी झोपी गेला, तो उठला तेव्हा गाडीत तो एकटाच होता. त्याने बाहेर पाहिले, त्याचा स्टॉप हा रेल्वेचा मुक्कामी स्टॉप असल्याने तो योग्य तिथेच उतरला होता. दीर्घ श्वास सोडत त्याने समोरच्या घड्याळात वेळ पाहिला १:३५ भुवया उंचावित, घाबर्या नजरेने रवीने आजूबाजूला पाहिले. सोबतिला कोणीच नव्हतं. स्टेशन बाहेर पडताच भटक्या कुत्र्याचं एक टोळकं भो~~ भो ~~ करत एका जागेवर जाऊन मोठमोठ्या ने ऐका सुरात युवळू लागलं.
सम्पूर्ण काळोख, दूर इन्ट्री गेटवर एक लाईट टीमटीमत होता. हिम्मत करून रवी गेट कडे निघाला. गडद्द काळोख, मधेच उडणारे मोठे किडे, टक टक असा स्वतःच्याच बुटाच आवाज, या वातावरणामूळ रवी चांगलाच घामाघूम झाला. कसाबसा तो गेट पर्यंत आला,
घराकडे जाण्यासाठी तो इकडे तीकडे वाहन बघू लागला. तर त्याचे लक्ष त्या वडाच्या झाडकडे गेले, रवी आणखीनच घाबरला. वडाच्या लोम्बणार्या पारंब्या, मधेच वडाला गोल गोल फिरणारे दोन चार वटवाघूळ. मंद लाईटच्या प्रकाशात दिसत होते. तिकडून नजर चुकवत तो पुढे निघणार, तेवढ्यात त्याला घोगऱ्या आवाजात कोणी तरी विचारले
" कुठं जाणार साहेब " त्याची छातीची धडधड वाढली, आवाजाच्या दिशेने त्याने पाहिलं. रुंद कपाळ, डोक्यावर बारीकसारीक केस चेहरा जरगट, कसल्यातरी माराने फाटून कपाळावर,गालावर,डोक्यावर पडलेल्या जाडजाड टाक्याचे निशाण ठळक दिसत होते.त्याचा अवतार पाहून रवीची तर बोबडीच वळली.
"न...ना...नाssही कुठं नाही जायचं" रवि घाबरलेल्या स्वरात.
"मंग एव्हड्या रातच इथं काय भूतं बघायला आलात का?" त्याने विचारल.
त्या प्रश्नाने रवी पूर्ण घायाळ झाला.
छातीतल्या वाढत्या ठोक्यासह
" नाही ओ, मंजे मला घरीच जायचंय म्हणून रिक्षा टॅक्सी बघत होतो" रवी पार घाबरत त्याला बोलला.
"मी सोडतो ना मग,कुठं जायचं"
" विजय नगर" रवी
"थांबा इथंच मी रिक्षा आणतो" अस म्हणत तो वडाच्या झाड कड गेला.
समोर अंधक पिवळा लाईट, मागून भरपूर असा पांढरा धूर सोडत रवीच्या
समोर येऊन त्याने रिक्षा थांबवली.
"बसा" त्याच भेसूर आवाजात तो म्हणाला. मजबुरीत रवी आत बसला तोच "साडे चारशे रुपय भाडं लागल, या टाइमाला कोणी जात नाही तिकडं " अस म्हणत त्याने रिक्षा झटक्या सरशी रोडवर घेतली. काही बोलायच्या आत त्याने रिक्षाला वेग दिला.

"जाऊ दे मरू दे पैशे जिवा पेक्षा जास्त थोडी आहे नशिबानं भेटली रिक्षा,नाही तर काय झालं असत देव जाणे" रवी मनातच बोलत होता.
"नशीबाचाच खेळ साहेब"
आतला आरसा रवी कड वळवत तो म्हणाला. आरशातले त्याचे लाल भडक
रक्ताळलेले डोळे, आणि मनातला ओळ्खलेल्या विचारा मुळे
रवीच सर्वांग लटलट होत.
नजर चुकवत रवीने
"हम्म" असा प्रतिसाद दिला.
"थोड फास्ट चला घ्या" रवी
"फास्ट...? मरायचं का फास्ट चालून.
आधीच आमोष्या, गपकन एखाद पलीत गिलीत समोर आलं म्हणजे....!" अस म्हणत तो आपल्या घोगऱ्या आवाजात हाSSSsss हा... हा... करून मोठ्यानं खिदळू लागला.
तेव्हड्यात समोर रस्त्यावर एक बाई चालतांना दोघांना दिसली, डोक्यावर पदर होता चमकणारी राखाडी रंगाची साडी. तिने रिक्षाला थांबण्यासाठी हात दिला. आता तर रवी खूप म्हणजे खूपच घाबरला होता.रवीने पाहिलं की रिक्षा वाला स्पीड कमी करतोय थांबण्यासाठी.
"चला ओ दादा नका थांबू शंभर शिल्लक देतो" रवि
" ओ साहेब अडचणीत असेलं ती , पैशासाठी थांबवत नाही मी"
अस म्हणत त्याने रिक्षा थांबवली.
त्या भंगार रिक्षाचा आवाज इतका होता, की दोघे काय बोलत होते काहीच कळलं नाही. आणि ती रवीच्या बाजूला बसली.
रवीने तिच्या कडे न बघणेच योग्य अस ठरवलं. रवी जीव मुठीत घेऊन बसला होता. ती बसता क्षणी कुजट, सडका आणि तीव्र उग्र वास घुमू लागला.
तिच्या बांगडया पदर आवरताना मधेच खळखळ आवाज करत.
थोडं पुढं गेल्यावर आणखी एक माणूस झपझप चालताना दिसला.
रिक्षा पाहून तो पाठीमागे वळाला आणि
हात दाखवत "थांबा...थांबा... "
"कुठं जाणार '" रिक्षा थांबवत विचारलं.
"वसंत नगर "
"250₹ लागतील"
"ठीक आहे चाललं"
स्वतः बाजूला सरकत रिक्षा वाल्याने त्याला जागा दिली. तो व्यक्ती उजव्या हाताला बसला.प्रवास सुरु झाला
रवीला आश्चर्य वाटत होतं की रिक्षाचा एवढाच आवाज होता, या दोघांचं बोलणं मी एकल या माणसाचा चेहरा पण दिसला , मग हिचा आवाज ऐकू का नाही आला...?
तो सडका उग्र घाण वास खूपच येत होता
रवीच घर जवळजवळ येत होतं. किती वाजले बघण्यासाठी रवीने मोबाईल काढला. आणि रिक्षाच ब्रेक खाचकन लागलं अचानक पुला जवळ रिक्षा थांबली तसा त्याचा मोबाईल निसटून रिक्षातच खाली पडला, ती बाई तिथे उतरली. उतरतांना तिची साडी थोडी वर गेली, अचानक रवीच्या मोबाईलची टॉर्च लागली आणि त्याने पाहिलं की त्या बाई चे पाय पुर्ण सडलेले त्यातून पु येत होता. त्यात आळ्या पण पडल्या होत्या. आणि तिचे पाय उलटे होते.जशी ती उतरली आणि सरळ पुलाचा खालच्या दिशेने निघून गेली.रवीची दातखीळ बसली, त्याला मळमळ आणि ओकारी आल्या सारख झालं. तो प्रकार पाहून डोकं गरगरत होत.
काळजातल पाणी निघून पायकड चाललं होतं. सर्वांगातून निघणाऱ्या घामाच्या धारा त्याला जाणवत होत्या. घसा कोरडा पडला. रिक्षा निघाली शुद्ध आणि गार वार लागल्यानं रवीला बर वाटल.
थोडं पुढं गेलो तोच एका वळणावर लिंब्बाच्या झाडा खाली रिक्षा थांबली.
डावीकडे वसंत नगर होत, तसा तो माणूस खाली उतरला. पैसे दिले आणी
रिक्षा च्या डाव्या बाजूला येऊन ड्रायव्हरला धन्यवाद म्हणत त्याने माझ्या कडे पाहिलं. त्याने आsss वासून डोळे मोठे केले, त्याचा श्वास फुलाला डावा हात छातीला लावत तो माग सरकला आणि वळून पळू लागला. तोच झाडाला धडकून खाली आपटला. त्या ड्रायव्हरला हे कळण्याआधीच रिक्षा निघाली.
रवीने नेमकं काय झालं हे बघण्यासाठी एक हात रिक्षच्या सिटावर टेकून मागे रिक्षा बाहेर डोकावलं अंधारात तो आडवा पडेल दिसला. ते बघून त्याचा थरकाप उडाला आणि त्याच्या हाताला काही तरी चिकट पदार्थ लागल्याच जाणवलं त्याने टॉर्च मध्ये पाहिलं तर घाण दुर्गंधी पु आणि त्यात आळ्या बघत तो किंचाळला.
त्याच स्टॉप विजय नगर आलं होतं
"काय झालं साहेब" तो जरगट आवाज त्याचा कानात घुमला
"उतरा स्टॉप आला तुमचा "
रवी उतरला रुमलाला हात पुसत तो फेकून म्हणाला "वाचलोssss"
"का काय झालं?" रिक्षावाला
"आहो ती बाई नव्हती हडळ,चेटकीण होती चेटकीण, सडलेली कुजलेली" रवी
"कशा वरून साहेब" रिक्षावाला
"आहो तिचे पाय उलटे होते आणि सर्वांगातून घाण पु आणि आळ्या बाहेर गळत होत्या " रवी
"पाय उलटे असले म्हजें भूत असत का कोणी, आता हे बघा माझे पण पाय उलटेच आहे ना" अस म्हणत त्याने दोन्ही पाय रिक्षा बाहेर काढले.
रवीला झटकच बसला.
तसा तो पुढे झाला आणि म्हणाला हो ना
आता माझे पाय बघा,
रवी चे पाय पण उलटेच होते.....!
त्याचे ही डोळे लालबुंद झाले,
चेहरा बदलला, आवाजा घोगरा झाला
दोघे पण एकमेकांना टाळी देत जोरजोरात हसू लागले...!
चल रवी आज एक नवीन जोडीदार भेटला आपल्याला, लिंबाच्या झाडाजवळच असेल तो.....!
दोघे हसत रिक्षात बसले रिक्षा वळवली,
ती वळणांवरच्या
लिंबाच्या झाडा कडे....!

दुसऱ्या दिवशी पेपरात...
" सावित्री पुला समोरच्या वळणावर मागच्या अमावस्येला, रवी नामक तरुणाचा गुढात्मक मृत्यू ची ताजी वार्ता सुरू असता याच वळणावर शहरातला चौथा बळी.....!"
आमवस्येच्या रात्री चे चारही मृत्यूचे गूढ कायम .....!

(वरील कथा ही संपूर्ण स्वलिखित आणि काल्पनिक आहे)

लेखक
योगेश जोजारे...
माझी ही भयकथा आवडल्यास कमेंट्स, लाईक आणि शेअर नक्की करा.

इतर रसदार पर्याय