एक निर्णय - २ (अंतिम भाग) Hemangi Sawant द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक निर्णय - २ (अंतिम भाग)

नाही.... ते नाही करत विचार. मुली या नेहमी स्वतःच्या घरच्यांचा आधी आणि मग स्वतःचा विचार करणाऱ्या असतात. त्यांचं ही असत प्रेम त्या मुलावर. कधी कधी तर ठरवतात की पळुन जाऊन लग्न करूया. होईल ठीक पुढे जाऊन. पण दुसर मन नाही होत तय्यार, यासाठी की पुढे जाऊन समाज आणि नातेवाईक आपल्या आई- बाबांना जगू नाही देणार. म्हणुन त्या स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतात.



कधी कधी काही जणी करतात मुद्दामहून. पण काही जणी या फक्त आपल्या घरच्यांना, आई- बाबांना कोणी काही बोलु नये म्हणुन गप्प राहतात.

जेव्हा मुलीचा जन्म घ्याल तेव्हा कळेल तुम्हाला ही. मुलीच जगण म्हणजे काय ते..



फ्रेंड्स मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, तिने नकार दिला किव्हा तिने तिच्या घरच्यांच्या विरुद्ध जायचं नाही असं ठरवलं असेल, तर तिला सपोर्ट करा. अस नका ठरवू की तीच प्रेम नाहीये. प्रेम हे असत, पण काही वेळा मुलींना खुप वाईट प्रसंगातुन जावं लागतं. त्या अशा ठिकाणी उभ्या असतात जिथे दोन रस्ते असतात. एक घरच्यांकडे जाण्याचा तर दुसरा प्रियकराकडे. घरचा रस्ता निवडला तर प्रेम नाही आणि प्रेम निवडलं तर घरचे नाही. मध्ये फसते ती मुलगी. जिला दोन्ही हवं असत. घरचे ही आणि प्रियकर ही.



काही वेळा गोष्टी या देवावर सोडुन द्यायच्या. जर आपल्या नशिबात नसेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ते तुम्हाला नाहीच मिळणार. पण जर का ते तुमच्यासाठीच आहे तर या जगातल कोणीच ते तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ती वेळ येऊद्या. त्या बाप्पा वर विश्वास ठेवा.


म्हणचे अस नाही की प्रयत्न करू नका. प्रयत्न करा पण एक लक्षात ठेवा. प्रेम, पैसा, सगळं काही मिळवता येतो. पण आई- बाबांच्या चेहऱ्यावरची ती स्माईल आहे ना ती मिळवायला आयुष्य कमी पडत.


आणि खर तर लग्न हे दोन कुटुंबातील लोकांना जोडणारा दुवा आहे. तो अस पळुन जाऊन त्यातली मज्जा नका घालवू. कारण आपल्या घरच्यांना दुखावून आपण आपलं नवीन आयुष्य कधीच सुखी ठेवु शकत नाही.


पुढे काही तरी वाढुन ठेवलंय त्या विधात्याने म्हणुन आज तुम्ही एक नाही होऊ शकलात. काय म्हाहित पुढे जाऊन घरच्यांनीच तुम्हच लग्न लावुन दिल तर. म्हणुन आधी आपलं शिक्षण पूर्ण करा. स्वतःच्या पायावर उभे रहा.


मुलींसाठी सांगायचं तर. प्रेम आणि आकर्षक यातील फरक समजा. आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्यासोबत आपण आपल पुर्ण आयुष्य घालवु शकतो का..? याचा आधी नीट विचार करा. प्रॅक्टिकल विचार करणे आजच्या काळाची गरज आहे. नाही तर पुढे जाऊन स्वतःला कोसत बसाल की आई- बाबांचं ऐकल असत तर आज हे आयुष्य नसते जगत.



चार- पाच वर्षांच्या प्रेमासाठी लहानपणापासून आतापर्यंत वाढवलेल्या आई- बाबांचा एकदा तरी नक्कीच विचार करा.

आणि मुलांनी मुलींना पळुन जाण्याची ची ऑफर दिली जाते ना. तीच स्वतःच्या मुलीला किव्हा बहिणीला कोणत्या मुलाने दिली तर तुम्हाला चालेल का...? याचा आधी विचार करा. स्वतःला मुलीच्या बापाच्या जागेवर ठेवुन विचार कराल तर नक्कीच तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल.



आयुष्य खुप सुंदर आहे. प्रेम करा पण सोबत विचार ही करा. आयुष्य खुप सुंदर आहे. प्रेम करा पण सोबत विचार ही करा. प्रेम ही आनंद देणारी भावना आहे. त्याचा आदर करायला आधी शिकल पाहिजे. जगात प्रेमासारखी दुसरी गोष्ट नाही, मग ते प्रेम आई-वडिलांचं असो किव्हा मैत्रीचं. किव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीवर. प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असत.
पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा वापर करू नये.


आयुष्य खुप सुंदर आहे. प्रेम करा पण सोबत विचार ही करा. प्रेम ही आनंद देणारी भावना आहे. त्याचा आदर करायला आधी शिकल पाहिजे. जगात प्रेमासारखी दुसरी गोष्ट नाही, मग ते प्रेम आई-वडिलांचं असो किव्हा मैत्रीचं. किव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीवर. प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असत.
पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा वापर करू नये.


◆◆समाप्त◆◆




★★■★★

प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा, प्रेम म्हणजे त्याग,

प्रेम म्हणजे अव्यक्त भावना, प्रेम म्हणजे जिव्हाळा.

तु माझा श्वास, तू माझ्या वेदना,

तु नेहमी रहा सुखात हीच देवा चरणी प्रार्थना.
★★■★★