Paar - ek bhaykatha - 5 - last part books and stories free download online pdf in Marathi

पार - एक भयकथा - 5 - अंतिम भाग

पार - एक भयकथा

भाग ५

ते घरा जवळ पोहचले,घर रिकामे होते ती शेजारच्या घरी रामन्ना कडे गेली आणि तिला धक्का बसला कारण कामगारांच्या घराचे दरवाजे उभे आडवे लाकूड ठोकून बंद करण्यात आले होते आणि ते लोक चिंतातूर होऊन खिडकीत येऊन थांबले होते.

“वैनी.... अहो साहेब झपाटलेत... वाचवा आम्हास्नी ” मनीषाला बघून शिर्पाद खिडकीत येऊन गया वया करू लागला.

“त्यांच्या अंगात बारा हत्तीच बळ आलय हातात कुऱ्हाड घेऊन आम्हा सगळ्यांना दांडाळत इथे आणून आत कोंडलय पळून जाणाऱ्या हनम्याच्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातलाय ” तो सांगू लागला.

“रामन्ना पोर कुठ आहेत ” मुलांच्या चिंतेने मनीषाच्या पोटात गोळा आला.

“वैनी, घाई करा पोरांना घेऊन साहेब रानात गेल्यात आधी छोटी शिकार मग मोठी शिकार असे काही तरी बडबडत होते ” रामन्ना बोलला.

क्षणाचाहि विलंब न करता मनीषा वेगाने धावत सुटली.रस्त्यात तिची चप्पल तुटली ती तिने भिरकावून लावली काट्याची वाट कचाकचा तुडवताना पाय रक्ताळले होते पण तिला मुलांच्या चिंतेने त्याची जाणीव पण होत न्हवती. ती रानात पोह्चाली. तिला धाप लागली होती. समोरच दृश्य पाहून तीच भान हरपला.

“अरविंद..... सोड त्यांना ” ती धाप देता देता जोरात किंचाळी आणि पारापाशी धावत सुटली. कारण अरविंद मुलांना झाडावर चढवत होता. आईला आलेली पाहून भेदरलेल्या मुलांनी एकच टाहो फोडला. मनीषा जाऊन मुलांना बिलगली. तितक्यात मालती मावशी आल्या. तिने मुलांना मालती मावशी कडे दिले. तिने केली कृती पाहून अरविंद खवळला त्याचे डोळे लाल झाले जवळ पडलेला दगड त्याने उचलला आणि त्याचे हाताने दोन तुकडे केले.

“मावशी तुम्ही मुलांना घेऊन गावात जा मी इथलं सांभाळते ” असे म्हणत तिने मावशींना जाण्यासाठी ढकलले.

अरविंद त्यांच्या जवळ त्वेषाने येऊ लागला,.

“पर तू एकलीच ” मालती मावशी तिला एकटे सोडण्यास तैय्यार न्हवत्या. अरविंद आणखीन जवळ आला.

“तुम्हाला माझी शप्पत मुलांच्या जीवासाठी तुम्हाला कराव लागेल ” मनीषा बोलली. मालती मावशी कडे काही पर्याय न्हवता त्यांनी काळजावर दगड ठेवला उजव्याहाताने अर्याचा हात आणि डाव्या हाताने ध्रुव चा हात धरून त्या धावू लागल्या.

त्यांना जाताना पाहून चिडलेल्या अरविंदने पुन्हा एक दगड उचलला त्यांना मारण्या साठी. मनीषाने जाऊन त्याचा हात धरला त्याच्या समोर तिची टाकत लागणे अशक्य होते. पण तेवढ्या वेळेत मालती मावशी आणि मुले फार पुढे निघून गेली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. फसलेला डाव पाहून अरविंद खवळला त्याने. दगड बाजूला टाकला आणि मनीषाला उचलले आणि पारा जवळ नेले.

“तू माझं डाव उधळून लावलास आता माझ्याशी एक डाव सूर पारंब्याचा खेळून दाव....” अरविंदचा आवाज बदलला होता कारण बगडा त्याच्या तोंडातून बोलत होती.

“ठीक आहे मी तैयार आहे बघू कोण जिंकतंय ” मनीषा बोलली, तिच्या ताकदी समोर मनीषाच काही चालणार न्हवतातिला डोक्याने डाव जिंकायचा होता.तिच्या प्रतीउत्ताराने चिडून अरविंद नाकपुड्यातून जोर जोरात स्वास सोडू लागला. तो जनावर प्रमाणे हालचाली करू लागला. त्याने तिला एका हातात उचलले दुसऱ्या हाताने झाडाची फांदी धरली आणि जोर लाऊन तिच्यासकट फांदीवर चढला.

“आता पळ... मी धरते अन तुझा डाव संपवते ” अरविंदच्या तोंडातून बगडा बोलत होती.

“अशी तर तू सहज जिंकशील तू झाडाच्या शेंड्यावर जाऊन राज्य घे मग बघू कोण जिंकतंय ” मनीषाने तिला मुद्दाम पेटवले.

आज पर्यंत धरल्यावर जीवाची गयावया करणारे बरेच बगडाने पहिले पण तिला खंबीरपणे प्रतिउत्तर देणारी मनीषा पाहून तिला पण चेव आला आणि अरविंद शेंड्यावर जाऊ लागला. तो शेंड्यावर पोहोचताच मनीषाने झाडावरून खाली उडी मारली. आणि धावत सुटली तिच्याकडे दोन पर्याय होते. पहिला, जर अरविंदच्या हाती लागलो नाही तर थेट गावात पळत जाऊन स्वताचा जीव वाचवायचा दुसरा. तिथे थांबून लढायचं आणि बगडला मुक्त करून अरविंदचा जीव मुक्त करायचा आणि अर्थातच तिने दुसरा पर्याय निवडला. ती थेट घरात गेली आणि दुसऱ्या क्षणाला अरविंद घरात हजार होता त्याच्या हातात धारदार कुऱ्हाड होती.

“पळतेस काय ” असे म्हणत एका हाताने त्याने तिचे मनगट पिरगळून पाठीला धरले आणि उजव्या हाताने कुऱ्हाड मानेला लावली. मनीषाने मनात देवाचे नाव घेतले आणि चाणाक तिला काही तरी आठवले.

“अरविंद अरे ती खुर्ची बघ तिथे बसून तूच म्हणाला होतास ना की काही झालं तरी तुझं आमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून आठव आठव ” मनीषा बोलली अरविंद खुर्ची कडे पाहू लागला. क्षण भरासाठी अरविंदच्या प्रेमासमोर बगडा कमजोर पडली त्याने मनीषाला सोडले हातातली कुऱ्हाड खाली टाकली आणि खुर्चीकडे जाऊ लागला. आणि मनीषाने संधी साधली, ती कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पळाली. बाहेरून कडी लाऊन तिने त्याला हातातला धागा बांधला. तिची हि कृती पाहून बगडा पुन्हा संचारली आणि आतून जोर जोरात दरवाजा ठोठावू लागली मनीषा रानात पळत गेली. काही वेळासाठी तरी बगडा आता कैद होती. रात्रीचे दहा वाजले. पोर्णिमेमुळे रानात चांदण पडलं होतं.

झाडापाशी पोहाचातातच मनीषाने खोडावर कुऱ्हाडीचे घाव घालायाला सुरवात केली.कुऱ्हाड चालवण्याची सवय नसल्याने दोनदा कुऱ्हाड हातातून निसटली.इतका मोठा खोड कुऱ्हाडीने तोडणे हे एका पुरषाला पण अशक्य होते. तिच्या नाजूक घावाने फक्त झाडाचे साल निघाले. मनीषा हतबल झाली. तिने दोन मिनिट डोळे मिटले. तिच्या डोळ्या समोर अरविंद आणि त्याला बिलगलेली मुले दिसली.तिच्यातली आई, तिच्यातली प्रेयसी तिला लढण्यासाठी प्रवृत्त करू लागले आणि तिच्या मनगटाताली ताकद दहापटीने वाढली. तिने संपूर्ण ताकदीनिशी कुऱ्हाडीचा दांडा धरला आणि एक जोरात किंचाळी फोडली आणि सपासप घाव घालायला सुरुवात केली. पहिलाच वाद खोडात बऱ्याच आत शिरला. ती त्वेषाने ओरडत घाव घालत गेली.कुऱ्हाड झाडाला टेकताच दरवेळी तिच्या हाताचे सालपट थोडे थोडे निघत होते. थोड्याच वेळात तिचे पंजे राक्तालळे. पण हात अविरत चालू होते. पाउन तासात खोड अर्ध्यापेक्षा तुटले आणि झाड कमजोर होऊन हळू लागले. इकडे धाग्याचा असर संपला अरविंद रानाकडे येऊ लागला.

“मनीषा” तिला झाड तोडताना पाहून तो जोरात ओरडला आणि तिच्याकडे धावत येऊ लागला.

त्याला पाहताच तिने तिचा वेग आणखी वाढवला झाड जवळ जवळ तुटलेच होते तो तिच्या जवळ पोहचला तिने शेवटचा घाव घातला न घातला तोच त्याने तिच्यावर हल्ला हल्ला केला.शारीरिक ताण आणि झालेल्या हल्ल्याने मनीषा जमिनीवर कोसळली, दुसरीकडे झाडही कोसळले बगडा मुक्त झाली, डोळे मिटायच्या आधी तिला अरविंदचा निरागस चेहरा दिसला आणि तिने समाधानाने डोळे मिटले.

मनीषाला जाग आली तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती. दोन्ही हातांना बँडेज बांधले होते. अरविंद उशालाच बसला होता.

ती शुद्धूवर आलेली पाहून त्याने तिला मिठी मारली आणि रडू लागला.

“इतकं प्रेम करतेस माझ्यावर ” त्याने भारावून तिला विचारले.

“खूप जास्त मी तुला कधीच गमावू शकत नाही ”

“मला माफ कर मी खूप त्रास दिला तुम्हाला माझं प्रेम खोट ठरला ”

“स्टुपिड तुला आपल्या प्रेमाची आठवण करून दिली तेव्हा त्या समोर ती शक्ती पण एक क्षणा पुरती कमजोर पडली ”

“आय लव्ह यु strong woman ” असे म्हणत त्याने तिच्या बँडेज लावलेल्या हाताला कीस केले.

“म्हणाला न वेळ आली की ह्या हाताने दगड्पण फोडेल ”

“हमम ” अरविंदने पाणावलेल्या डोळ्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तितक्यात मुले देखील मालती मावशी सोबत आत आली. आणि त्यांच्या आईला बिलगली. मालती मावशी कडे बघून मनीषा समाधानाने हसली.आता सगळ सुरळीत झालं होत. अरविंदच्या पुण्याईने म्हणा की त्यांच्या एकमेकांवरच्या प्रेमाने इतक्या वर्ष न हरता अनेक जीव घेणाऱ्या वडाच्या पाराला त्यांनी हरवले होते.

****समाप्त ****

© धनश्री साळुंके

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED