चाय कट्टा - भाग पहिला shabd_premi म श्री द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चाय कट्टा - भाग पहिला

भाग एक :- नशीब
पावसाळा सुरू होणार होता. आणि पावसाचा चांगला आनंद लुटायचा असेल तर पुण्याहून चांगले ठिकाणचं नाही. थंड हवेचे वारे त्यात ढगाळ वातावरण प्रत्येक संध्याकाळ रमणीय करण्याची ताकत ठेवतात, आणि अशा वातावरणात हाती चहाचा कप आणि बाल्कनीत खुर्ची टाकुन समोरचं चित्र न्याहाळत बसणं मग आणखी कशाला सुख म्हणावं!
मंदारला पुण्यात राहून सहा-सात वर्ष झाली होती. इथे आल्यापासून त्याला निसर्गासोबतत्याला वेगळीच आपुलकी वाटायला लागली. तो निसर्गप्रेमी झाला. सुट्टी असली की कुठं फिरू आणि कुठं नको असं व्हायचं. तो आणि त्याचे तीन-चार मित्र मिळून एका फ्लॅट मध्ये राहायचे. मंदार हा डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याचे चारही मित्र व तो एकाच कॉलेजात होते.
असाच एक दिवस उजाडतो. नेहमीं प्रमाणे सकाळचा टपरीवरचा चहा होती. त्याच्या आयुष्यात आजवर कितीतरी मुली आल्या असतील,असा तो देखणा मुलगा होता. दिवसभराच कॉलेज संपल्यावर. चहा च्या कट्ट्यावर जाऊन मस्त एक चहाचा सुरका मारायचा हा जणू त्यांचा नित्यक्रमच. चाय कट्टा त्याच्या फ्लॅट पासून काही अंतरावर होता. गाडी फ्लॅट वर लावून पाय मोकळे करत ते कट्ट्यावर जायचे. कट्टा चांगला मोठ्या हॉल एवढा होता. सुरुवातीला महत्वाची गोष्ट म्हणजे कॅश काउंटर होतं.
पुढे गेलं की चहा पिणाऱ्यांचे आणि कॉफी पिणाऱ्यांचे बाक होते. मग उजवीकडे वळायचं आणि डाव्या कोपऱ्यात एक झोका होता. जास्त उंच न उडू शकणारा! उजव्या बाजूची जी जागा बाहेरच्या काचेतून दिसेल अशी, तिथे एक मोठा बाक होता ज्यावर काही जण आपला अभ्यास करताना दिसायचे. एकंदरीत व्यवस्था आणि सजावट बघून त्या कटट्यावर जायला मना आधी पायच आपोआप वळत होते.
आजही वातावरण अगदी मोहून टाकेल असे होते.मंद वारा, अधूनमधून जोरात धडक मारणारी हवा, ढगाळ वातावरण, समोर उतरणारा सूर्यही ढगाआड लपला होता. अश्यात चहा पिण्याची मज्जा औरच.....!!!

मंदार आणि त्याचे मित्र कटट्यावर जायला निघाले, पोहोचताच आपआपली फर्माईश काउंटर वर सांगितली, आणि टेबलवर जाऊन बसले. ऑर्डर यायला वेळ होता तोवर आजूबाजूला नजर फिरवण्यापेक्षा काही काम नसतं किंवा मोबाईल मध्ये तोंड घालून बसणे एवढाच उद्योग. एवढ्यात मंदारची नजर फिरून संपता संपता दरवाज्यातून आत येणाऱ्या त्या सुरेख, देखण्या देहावर गेली.चेहऱ्यावर स्टोल बांधून ती आली आणि कोल्ड कॉफी ची ऑर्डर देऊन अभ्यास करतो त्या बाकावर जाऊन बसली. त्या बाकावर काही पुस्तकं ठेऊन ती पुस्तकं वाचण्यात गुंग झाली.
मंदारची तिच्याहुन नजर काही हटत नव्हती! सागरने कॉफी चहाची ऑर्डर आणून जी टेबलावर आदळली. तेव्हा मंदारची तपस्याभंग झाली, सगळयांनी आपापली आवड उचलली. मंदार मुली कडे बघता सागर आणि इतरांना उद्देशून म्हणतो....

मंदार:- ऐ सागऱ्या ती मुलगी बघ ना किती सुंदर दिसतीये!
सागर:- मंदया बस कर की, किती मुली कटवशील,काही आमच्या सारख्या एकट्या सदाशिवांसाठी तरी सोड निदान.
मंदार:- अरे तस नाही ती किती वेगळी दिसतीये सर्वांपेक्षा, तिच्या पायांपासून डोक्यापर्यंत ती किती निराळं भासतीये.
सागर:- झालं सुरू याच निरीक्षण अरे ती पेशंट नाहीये तुझी इतकं निरखून पहायला. जरा चहाकडे बघ निवून जातोय तो.
मंदार:- चेष्टा वैगरे करत नाहीये रे मी. तिला पाहताच क्षणी कोणीही तिच्या मोहाच्या जाळ्यात अडकेल एवढी सुंदर आहे ती बघ.
विकी:- मंदया आटोपतो का आता, आमचं झाला. चहा घे नाहीतर त्याची बासुंदी होईल आता.

मंदार आणि मित्र आपला चहा संपवतात आणि कटट्याच्या बाहेर पाऊलं टाकतात. बाहेरच्या काचेतून ती स्पष्ट दिसत होती. मंदार तिला सारखा पाहत होत आणि दोन, तीन पावले पुढे जाताच तिची आणि मंदारची नजर एक होते. मंदार तिच्याकडे पाहून स्मित करतो आणि ती पाहिल्या न पहिल्यासारखं खाली पुस्तकात पाहते. मंदार एकदम त्याच्या मित्रांना सांगतो. मित्र त्याची मस्करी करतात आणि सर्वजण फ्लॅटकडे जातात. रात्रभर मंडरच्या डोळ्यासमोर तो चेहरा येत राहतो आणि विचार करण्यास भाग पडतो.

सकाळ होते नेहमीप्रमाणे सगळे काँलेजला जातात. दिवसभर त्याचे मन भरकटुन जाते. मंदारचे मन कशातच लागत नाही. त्याचे मित्र हे सगळं पाहत असतात. मिलिंदला विचारुन पाहतातही पण मंदार त्याच्या विचारात पार बुडालेला असतो. संध्याकाळ होते सगळे कॉलेजच्या बाहेर निघतात आणि आपापली गाडी काढून फ्लॅटकडे निघतात. मंदार फ्लॅटपाशी आल्यावर सगळ्यांना चाय कट्ट्यावर यायला सांगतो आणि स्वतःपुढे निघतो, त्याचे हे वागणे कुणाच्याच पचनी पडत नाही.
मंदारला ती मुलगी खूप आवडलेली असते. मनोमनी आज तिच्याशी बोलण्याचे तो ठरवुन घेतो. ऑर्डर देऊन तो नेहमीच्याच टेबल वर बसतो, आणि थोड्याच वेळात सगळे मित्र तिथे जमतात, आणि गप्पा गोष्टी सुरु होतात.
सागर:- बरं मंदया आज काही नवीन विशेष आहे का ? लवकर यायला हा ?
मंदार:- नाही रे असंच...!
सागर:- हा म्हणजे आम्हाला जे दिसतय त्याचा काहीच अर्थ नाही का ?
विकी:- अरे साग्या कालची पोरगी आवडली असणार त्याला म्हणून लवकर आलाय तो समजून घेत जा जरा.
सागर:- अरं हा लगा, तेच म्हटलं काल पासून मुक्यासारखं वागत होतं तर. सकाळपर्यंत तर कळतच नव्हत ह्याला बोलता येत नाहीये की मुका झालाय हा कायमचा म्हणून.

एकदम हश्या पिकतो आणि तेवढ्यात ती मंदारला समोरून जाताना दिसते. त्याच्या हातातला कॉफीचा कप जश्याचा तसाच राहून जातो. त्याची तिच्याहून नजर काही निघत नाही आणि ती ऑर्डर देऊन आपल्या नेहमीच्या टेबल वर जाऊन बसते. इकडे एकदम सगळे मित्र मंदार ला पाहून जोरजोरात हसू लागतात. मंदार ही त्याच्याकडे लाजल्यासारखे करत बारीक हसतो. सगळ्यांच मनसोक्त हसून झाल्यावर सगळे शांत होत आपल्या चहा कॉफी कडे लक्ष केंद्रीत करतात. आणि इकडे मंदार मनात एका प्रश्नाचं उत्तर शोधत असतो, तिच्याशी काय म्ह्णून बोलता येईल आणि तिच्या जवळ कसे जाता येईल याचे. इतक्यात त्याला वेटर तिची ऑर्डर घेऊन जाताना दिसतो, तो वेटरला मधेच थांबवुन लेट let me serve म्हणत ट्रे आपल्या हाती घेतो. मंदारचे मित्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात. तो काय करतोय हे कोणालाही कळतं नसतं.
मंदार आपल्या हाथी ट्रे घेऊन तिच्या टेबल पाशी जातो. ती वाचण्यात गुंग असते. शेजारच्या पुस्तकावर "पूजास सप्रेम भेट" असे लिहीलेले असते. मंदार ते वाचतो आणि तिला आवाज देतो.
पूजा Your Order
(त्याला ती उत्तर देते...)

पूजा:- ओहह थँक्स....!!!
(पण मंदार तिला वेटर वाटत नव्हता करण वेटर चा पोशाख वेगळा होता. ती त्याच्याकडे वळून पाहत त्याला विचारते.)
पूजा:- तुम्ही वेटर तर वाटतं नाही ,मग तुमच्या हातात ऑर्डर कशी??
मंदार:- Hi My Name Is Mandar!
(आणि दोघेही हात मिळवतात)
मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. म्हणून मी वेटर कडून ट्रे घेतला. मी बसू का इथे...?
पूजा:- हा हा बस ना by the way माझं नाव....
मंदार:- पूजा, हा मी वाचलं पुस्तकावर.
पूजा:- ohh nice..!!
मंदार:-तुज पुस्तक वाचन बऱ्यापैकी चांगला दिसतंय
पूजा :- हो वेळ घालवण्यासाठी पुस्तकाचा छंद बरा असतो. By the way..तू काय करतो?
मंदार:- MS final year, BGS कॉलेज ला.
पूजा:- ohh nice Future Doctor हा..!!!
मंदार:- can I get your number(चाचरत)
पूजा:- ohh direct number..But for what?
मंदार:- नाही just तुझी company मिळावी म्हणून..
पूजा:- okay take this note.

मंदार दिलेली note घेऊन परत आपल्या टेबल वर येतो. तोवर सगळ्यांची कॉफी संपलेली असते. मंदारच्या हातात note बघून सगळे आश्चर्यचकित झालेले असतात. आणि थोडी मस्करी करत सारे जण कटट्याच्या बाहेर निघतात. बाहेरच्या काचेतुन मंदार तिच्याकडे पाहत असतो आणि ती ही त्याच्याकडे पाहून स्मित करते. हे सर्व त्याचे मित्र पाहतात आणि मंदार ला गंमती गमतीत मारतात. अश्या प्रकारे त्याच्या अबोलपणाचा, मुकेपणाचा दिवस अस्ताला जातो. त्याला जे हवं असतं त्यानी ते मिळवलेलं असतं. मंदारच्या मित्रांच त्याला चिडवणं थेट झोपेपर्यंत चालत. आणि तो ही त्या चिडवण्याला साथ देत त्यांच्यात सामील होतो.
आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा विरुद्ध असतो. कुठे विरह होता तर कुठे आनंद. चित्र पालटून गेले होते. मंदार आणि त्याच्या मित्राचा चहा कट्टा आणि वेळ ही कायमची ठरली. न चुकता काँलेजमधून निघून आधी काँलेज कट्टा गाठायचा. आता मंदार ती आली की मित्रांमधुन उठून थेट रजा घेत पूजा पाशी जाऊन बसायचा. मित्र तिकडे चहा, काँफी संपवत. मंदारला बाहेरून दिसणाऱ्या काचेतून हात वर करुन त्याला निरोप देत आणि निघून जायचे. मंदार आणि पूजाची चांगलीच गट्टी जमू लागली होती. मंदारही पूजाने आपल्यात इंटरेस्ट घ्यावा म्हणून प्रयत्न करत होता. ती कट्यावर येऊन पुस्तके वाचायची , मग मंदारनेही काही दोन एक लेखकाची नावे पाठ करून आणली होती. तिच्यावर इम्प्रेशन जमवण्यासाठी त्याने ती वापरात घेतली. मंदार तिच्या समोर आपली पूर्ण ओळख देऊन बसला होता आणि तिची ओळख घेण्याची गरज त्याला फारशी वाटत नव्हती. दिवस जात होते तसे त्यांच्या मैत्रीचे नाते घट्ट होत होते. रोज संध्याकाळी येऊन भेटण्याचे कायम झाले. अधून मधून मंदार तिच्या Coffee चे पैसे भरत होता तर कधी पूजाही भरायची.
मंदार आणि पूजा आता दर Weekend ला फिरायला निघू लागले होते. महिना दीड महिना फिरण्यात एकमेजांना चांगलं ओळखण्यात निघून गेला. मंदारने आपल्या सगळ्या मित्रांशी तिची ओळख करून दिली. कधी कधी सर्व मिळून फिरायला जाऊ लागले. त्या दोघांची घट्ट मैत्री बघून मंदारचे सगळे मित्र त्याला Propose करण्याबद्दल त्याला चुकवू लागले. मंदारच्या मनातही तसे तिला विचारावे म्हणून चाललेच होते. तो आता योग्य वेळेची वाट पाहत होता. त्यानुसार Plan ठरला, मंदारने तिला एकट्यात विचारायचे ठरवले. बहारलेला निसर्ग बघुन त्याने एक रविवार काढला. मंदारने तिला ठरवलेल्या ठिकाणी घेऊन जायचा बेत आखला.

मंदार ने आपल्या Plan बद्दल कोणाला काहीच कळू दिले नव्हते. आणि कदाचित Plan बद्दल ऐकल्यावर तीला त्याचा अंदाजही आला असावा.
तो दिवस उगवला. ठरल्याप्रमाणे एका उंच मोकळ्या टेकडीवर, जिथे नुकताच पाऊस पडला होता. आणि संध्याकाळचे पाच वाजले होते. मंदार आणि पूजाचे त्या टेकडीवर थोडे फिरून झाले होते. आणि अचानक मंदार ने तिच्या समोर येऊन एक गुडगा जमिनीला टेकव ,तिला आपल्या प्रेमाची मागणी घातली. पूजाने गोड स्मित करत मंदारच्या हातून गुलाबाचे फुल घेत,मंदार चे Proposal स्वीकारले. मंदार आणि पूजा आज पासून प्रेमाच्या गोड बंधनात अडकडतात. एक नवी सुरुवात होते. मंदारला दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो याचे काहीच भान राहत नाही. दिवस मजेत चालले होते. मंदारचे आता मित्रांवर कमी आणि पूजावर जास्त लक्ष लागून असायचे. कॉलेज अर्धवट सोडून तो कधी कधी पूजाला भेटायलाही जायचा.
महिने दोन महिने उलटले आणि एकदा मंदार कॉलेजला असताना पूजाचा अचानक call येतो. पूजा त्याला काही तातडीच काम आहे आणि 40 हजाराची गरज आहे म्हणून सांगते. 40 हजाराची गोष्ट आहे म्हंटल्यावर मंदार थोडा आश्चर्य वाटतं. त्याला धक्काही बसतो. मंदार तिला परत परत विचारतो एवढे पैसे का हवे आहेत. तर पूजा त्याला कारण सांगायला टाळाटाळ करते, पण शेवटी ममदार त्या वर्षणावर असून बसतो तेव्हा त्याला सांगते की माझ्या काकांचा अपघात झाला आहे.त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ICU मध्ये भरती केलंय आणि Operation साठी 80 हजार रुपये हवेत. त्यातले 40 हजार जमले आहेत आणि 40 हजार रुपये आणखी हवे आहेत. एवढं ऐकून मंदार मी हॉस्पिटला येऊ का? असं विचारतो. पण पूजा इथे घरचे सगळे जण आहेत Problem होईल म्हणून मंदार ला येण्याबद्द्ल नाही सांगते आणि पैसे ही जर होत असतील तर Account Number वर पाठव असं म्हणत ती कॉल कर करते.
मंदारच्या मोबाईल वर थोड्यावेळात Account No. चा Msg येतो. सगळं काही एकदम घाई-घाई होतं. मंदारचा तिच्यावर पूर्ण विश्वास असतो म्हणून कुणी काही बोलत नाही. मंदार आपल्या Savings मधून पैसे काढतो, इकडून तिकडून गोळा करतो. त्याचे मित्रही त्याला पैसे गोळा करून देतात आणि 40 हजार रुपये कसे बसे जमतात. मंदार दिलेल्या Account No. वर पैसे पाठवतो आणि पूजाला कॉल करून पैसे पाठवले आहेत, एकदा चेक करून घे असे म्हणतो. पूजा त्याला हो म्हणत थोडी घाईत आहे. तुला मी नंतर कॉल करते असे म्हणत कॉल कट करते. मंदार तीला परत स्वतःहून कॉल करत नाही.सगळं शांत झाल्यावर ती आपल्याला कॉल करेल या आशेवर तो तीच्या कॉल ची वाट बघतो. असेच तीन - चार दिवस उलटतात. पण तीचा कॉल येत नाही. म्हणून मग मंदार तिच्या नंबरवर कॉल करतो. रिंग जाते पण कुणी उचलायला तयार नसतं. तो परत परत प्रयत्न करतो. सात-आठ वेळा प्रयत्न करतो आणि नवव्या प्रयत्नावर कुणी कॉल उचलतं. समोरून अनोळखी आवाज कानावर पडतो.

मंदार:- हॅलो पूजा! पूजा आहे का तिथे?
समोरून:- कोण पूजा? इथे कोणी पूजा राहत नाही.
मंदार:- पूजा सरवते नाव तिचं.
समोरून:- नाही इथे ह्या नावाचं कुणी राहत नाही. आणि ह्या नंबरवर पुन्हा पुन्हा कॉल करू नका.

कॉल कट होतो.मंदार समोर मोठा प्रश्न उभा राहतो मंदारकडे पूजाचा हाच नंबर असतो आणि समोरून आता दुसरच कुणी बोलत असत. मंदारला चांगलच टेंशन येतं. पूजा कुठे गेली असेल तिचं काय झालं असेल..? पुढचा एक एक दिवस दिवस असाच टेंशन आणि विचारांत जातो. पण त्या नंबरहुन पूजाचा कॉल कधीच येत नाही..
मंदार ला कळेनासं होतं. समोर मोटग वर्षण उभा असतो

पूजा गेली तर नेमकी गेली कुठे........