chaai katta - 2 books and stories free download online pdf in Marathi

चाय कट्टा - भाग दुसरा

पूजा कायमचीच निघून जाते आणि हळूहळू चार महिनेही त्या पाठोठापाठ निघून जातात. मित्रांच्या प्रयत्नांमुळे मंदार पूजाच्या विराहातून बाहेर पडतो. डॉक्टरकीची परीक्षा देऊन ती पास होतो. मंदार हळूहळू स्थिर होत जातो. पूजाचा परत कधीच कॉल येत नाही. मंदार वाट पाहून थकलेला असतो. पण पूजा काही परतत नाही. पुढे मंदार आपल्या डॉक्टरकीची Practice सुरू करतो. चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याला Practice करायची संधी मिळते. सोबत सागरही त्याच हॉस्पिटलमध्ये रुजू होतो.
मंदार कामात चांगलाच व्यस्त होतो. मंदार आणि त्याच्या मित्रांनी चहाचा कट्टा परत कधीच पाहत नाहीत. त्यांनी त्यांचा Flat बदलून आता हॉस्पिटल जवळ विकत घेतलेला असतो. सकाळी 9 ला जाणे संध्याकाळी जेव्हा होईल तेव्हा Flat वर परतने. एखादी टपरी बघून चहा मारत सिगारेट चे झुरके घेत दिवसभराचा क्षीण नाहीसा करत, Flat कडे वळणे हा रोजचा दिनक्रम झाला होता. तरीही मंदार दारू आणि सिगारेट च्या सानिध्यात कितीतरी रात्र काढायचा. कधी कधी सकाळचे ६ वाजायचे पण मंदारचे पिणे काही संपत नसायचे. सकाळी उठून सागर मंदार ला त्याच्या धुंदीतून जाग करून bed वर झोपवायचा. कशी बशी एक दीड तासाची झोप घेऊन मंदार आणि सागर हॉस्पिटलला पोहचायचे. रात्रीचा नशा उतरला नसला तरी कामात चुकत नसायचा. कधी कधी समोरून येणाऱ्या मुलीला(Sister) तो अचानक पूजा म्हणून हाक मारायचा. थोडा गोंधळायचा आणि सॉरी म्हणून माघारी बसायचा. दिवसातल्या सिगारेटस ची संख्या ही आता जवळपास १३-१४ पर्यंत गेली होती. रविवार त्याला आता नकोसाच वाटायचा. कधी कधी न सांगता तो अचानक निघूनही जायचा. मंदारच असं वागणं आता नेहमीचच झालं होतं. सागर ला तो कुठे असेल याचा अंदाज असायचा. त्याच्या नेहमीच्या ३ जागा ठरलेल्या असत. एक म्हणजे हॉस्पिटल समोरच्या गार्डन मधली बाक, तर कधी सिगारेट चे झुरके घेत टेकडीवर तो बसलेला असायचा, नाहीतर Flat च्या गच्चीवर कोपऱ्यात बसून असायचा. मंदारसाठी आता इतर गोष्टींपेक्षा सिगरेट आणि दारूची बाटली जास्त प्रिय होती. तो गेला म्हणजे सागर त्याला परत घेऊन Flat वर यायचा. मंदारच्या सुट्टीचा रविवार असाच जायचा. मग सागर ने त्याला रविवार ची सुट्टी न घेता सोमवार ते शुक्रवार दरम्यान घेण्याचे सुचवले. जेणेकरून रविवार तो कामात घालवले आणि त्याला भूतकाळ विसरण्यास मदत होईल.आणि ही Idea काम करायला लागली. मंदारचे दिवस आता परत स्थिर व्हायला लागले होते.
मंदार कामात जास्त मन लावू लागला. थोडा वेळ हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंट सोबत घालवायचा त्यामुळे दोघांचा ही दिवस मजेत निघून जायचा. सागरलाही सुटकेचा श्वास घेता येई. मंदारच्या चेहऱ्यावर हास्य रेषा उमटल्या म्हणजे त्याला बरे वाटायचे. हळूहळू दिवस निघत होते. आणि एक दिवस हॉस्पीटल मध्ये अपघाताची एक केस आली. हॉस्पिटल वेळेवर मंदार असल्यामुळे मंदार पेशंटला बघायला गेला. पेशंट च्या चेहऱ्यावरून रक्त ओघळत असतं. पेशंट एक मुलगी असते. चेहरा पूर्ण रक्ताने माखून गेलेला असतो. तिला ताबडतोब Operation Theater मध्ये घेऊन जातात. तिच्या डोकयला मागून आणि गुडघ्याला दुखापत झालेली असते. त्या मुलीसोबत आणखी एक मुलगी हॉस्पीटल मध्ये येते आणि Reception वर जाऊन Form भरते. मंदार तिच्यावर ओझरती नजर टाकून Operation Threater मध्ये जातो. Nurses मंदार येण्या आधीच तिचा चेहरा पुसून तिचा शरीर पालथं करून ठेवतात. मंदार येतो आणि डोक्याला टाके मारतो, आणि पायाला फ्रॅक्चर बांधुन Operation संपवतो. मंदार तासाभराने बाहेर येतो आणि आपल्या Cabin मध्ये जाऊन बसतो. सागर थोडाच वेळाने त्या पेशंट ची File घेऊन मंदार समोर येऊन बसतो. मंदार रिलॅक्स होऊन File उघडतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. File वर फोटो पूजाचा असतो. फोटो पाहताच मंदारचावं चेहऱ्यावरचा रंग उडतो, सागरला म्हणतो "अरे ही पूजा आहे बघ!" अस म्हणत तो त्याच्या समोर File फिरवून ठेवतो. सागर त्या फोटोतल्या मुलीला
निरखून बघतो आणि त्यालाही धक्का बसतो, म्हणतो,
सागर:- अरे हा!! पण नाव तर मानसी वावटळे दिसतं रे!
मंदार:- सागर सिस्टर ला बोलव आणि तिला सांग सोबत आलेल्या त्या मुलीला आत पाठव म्हणून.
सागर:-आवाज देतो आणि सिस्टर त्या मुलीला आत पाठवते. सागर मंदार च्या पाठीशी येऊन उभा राहतो.आणि तिला बसायला सांगतो.
मंदार:-तूम्ही जस्ट ज्या पेशंटचा अपघात झालाय त्यांच्याछ सोबत आलाय ना ?
मुलगी:-हो,कशी तब्बेत आहे तीची आता?
मंदार:-सध्या सगळं नॉर्मल आहे. डोक्याला टाके पडलेत आणि पायालाही फ्रॅक्चर आहे. शुद्धीवर येई पर्यंत आपण वाट बघू, अम तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक विचारू का ?
मुलगा:-हो विचाराना काही हरकत नाही.
मंदार:- आत जी मुलगी आहे तीच नाव पूजा आहे ना, पूजा सरवटे?
मुलगी:- Actually तुमचा थोडा गोंधळ झालेला दिसतोय. ती जी आत आहे ती मानसी वावटळे आहे.आणि पूजा सरवटे मी आहे.
(मंदार दचकून सागरकडे वळून बघतो. दोघांनाही जब्बर धक्का बसतो.)
मंदार:- काय!!!! एक मिनिट, ती पूजा नसून मानसी आहे आणि तुम्ही पूजा आहात कसं काय?
मुलगी:-कस काय म्हणजे..? जे खरं आहे तेच सांगतीये मी तुम्हाला.
मंदार:- पण ह्या फोटोत जी मुलगी आहे तिला मी ओळखतो, आमची जुनी ओळख आहे. हे मीच नाही माझा मित्र सुद्धा सांगू शकतो.
(सागर त्याला मधूनच अडवतो आणि हळू आवाजात त्याला म्हणतो.)
सागर:- मंदार, मंदार ऐैक; ती खरंच मानसी असू शकते, कदाचीत आपल्याकडून ओळखण्यात काही चूक झाली असावी.
मंदार:- अरे सागर पण तुलाही माहितीये ती पूजाच आहे तरी पण.
सागर:-हो पण ती काय सांगतीये ते तर बघ !
(आणि मंदार सागर दोघेही तिच्याकडे बघतात)
मंदार:- एक विचारू तुम्हाला ?
मुलगी:-हो विचारा ना!
मंदार :- तसं तुमचा आणि तिचा नातं...काय?
मुलगी:- आम्ही दोघी मैत्रीणी आहोत आणि पाच सहा वर्षांपासून सोबत आहोत.
(मंदार विचार करू लागतो आणि तिला विचारतो)
मंदार:- अच्छा...मला एक सांगा, ह्या गेल्या पाच-सहा महिन्यांत तिने कधी मंदार नावाचा उल्लेख केलाय..?
(मुलगी थोडी सावध होते आणि काही वेळ शांत बसून ती उत्तरते.)
मुलगी:- मंदार.......नाही कधी एेैकले नाही. का बरं?
मंदार:- नाही काही नाही.
(मंदार सागरकडे पाहत उत्तरतो.)

मंदार:- Okay Thanks. काही मदत लागली तर बोलावू आम्ही.
पूजा:- एक शेवटचं विचारायचं होतं, मानसीला किती वेळ लागेल बर व्हायला?
मंदार:- तिच्या डोक्याला आणि पायाला मार बसलाय,सध्या बेशुद्ध आहे. शुद्धीवर आल्यावर बघू पुढचे आणि हो काउंटर वर उरलेल्या Formalities पूर्ण करून घ्या.

पूजा हो म्हणत कॅबिन मधून बाहेर जाते.
मंदार आणि सागर सुद्धा केबिन मधून बाहेर निघतात आणि चहाच्या टपरीवर चहा आणि सिगारेट मारायला सुरवात करतात. शांत झालेल्या वातावरणात मंदार एकदम प्रश्न टाकतो.
मंदार:- सागर खरचं वाटतं तुला ती पूजा नसून मानसी असेल म्हणून?
सागर:-हे बघ मंदार ती पूजा आहे हे मी शंभर टक्के तुला सांगू शकतो, पण सध्या ज्या गोष्टी आपल्या पुढे उभ्या आहेत, त्यावरून ती मानसी आहे, हेच आपल्याला मानून चालावं लागेल.
मंदार:-म्हणजे, सात महिन्यात नाव बदलून जाऊ शकतं असं कसं?
सागर:- मंदार शांत हो. काय असेल ते होईल Clear. तू का टेंशन घेत आहेस बरं.

मंदार आणि सागर तिथून हॉस्पीटलकडे परत वळतात. तिथुन संध्याकाळ होते मंदार आणि सागर फ्लॅट वर येतात आणि परत भूतकाळात डोकावून पाहण्याचा खेळ सुरू होतो.

थेट सकाळी हॉस्पिटलला जाईपर्यंत मंदार त्याच्याच विचारात असतो. सागर त्याला बोलकं करण्याचा प्रयत्न करतो, पण मंदार त्याला काहीच उत्तर देत नाही. सकाळी ९ ला दोघेही हॉस्पीटला पोहचतात, सिस्टर कडून त्याला मानसी शुद्धीवर आल्याच कळतं. मंदार आणि सागर दोघेही तिला ठेवलेल्या वॉर्ड मध्ये जातात. मंदार दार उघडतो तेव्हा ती झोपलेली असते. मंदार आणि सागर दोघेही बेड च्या आजूबाजूने जाऊन उभे राहतात. मंदारच्या हाती File असते. मंदार तिला पाहून ती आपली पूजाच आहे हे नजरेने सागरशी बोलून देतो .सिस्टर तीला थोडं हलवून जागं करते. हळूच ती डोळे उघडले आणि समोर मंदारला पाहून चांगलीच दचकते. मंदार तीला पाहून स्वतःला सावरत आपण हॉस्पीटल मध्ये आहोत, हे लक्षात घेऊन तो तिची विचारपूस सुरू करतो "कसं वाटतंय?" हा प्रश्न मंदार जेव्हा तिला विचारतो, तरीही ती अजून धक्क्यातून बाहेर आलेली नसते. मंदार सोबत घालवलेले ते दिवसं एक एक करून तिच्या डोळयांसमोरून जात होते. मंदार तिचा हात हलवून परत प्रश्न विचारतो. तेव्हा ती घाबरत घाबरतच त्याला हो म्हणते आणि मंदार तीची विचारपूस तिथेच थांबवतो. सिस्टर ला Medicines वेळेवर देण्याबद्दल सांगून तिथून निघून जातो. मंदार आणि सागर दोघेही कॅबिन मध्ये येऊन बसतात.

मंदार:- सागऱ्या, तिच्याशी बोलू का मी एकदा?
सागर:- हो पण लक्षात असू दे ती आधी पेशंट आहे नंतर बाकीचं.
मंदार:- हो तू ही सोबत चलशीलच!

दुपार होते.तिच्या सोबतची मुलगी Reception वर बोलताना पाहून मंदार आणि सागर वॉर्ड कडे जातात.
मंदार तिच्या बेड पाशी जाऊन खुर्ची घेऊन बसतो. सागर दरवाज्यापाशीच उभा राहतो. आणि मंदार तिच्याशी बोलायला सुरुवात करतो.

मंदार:- पूजा
(मंदारच्या हाकेने ती थोडी जागी होते.)
मंदार:- पूजा बरं वाटतंय ना आता.?
मानसी:- हो थोडा दुखतोय पाय पण थोडं बरही वाटतंय.
मंदार:- पूजा एक विचारायचं होता?
मानसी:- हो विचार ना,पण मंदार तुला एक गोष्ट सांगू का, माझं नाव पूजा नाही मानसी आहे.
मंदार:- हो ना! खऱ्या पूजाने खोट्या पूजाचे खरे नाव सांगितले मला, पण मला वाटलं मी जिला ओळखतो ती माझी पूजाच असेल, पण मी ही ओळखू शकलो नाही.
मानसी:- मंदार ऐक ना! तुझ्याशी मी खोटे बोललेच नाही. मी तुला माझे खरे नाव सांगणार होते पण नंतर मला तशी गरज वाटली नाही.
मंदार:- हो, कारण खोट्या नावाने तुझं काम मस्तपणे चाललं होतं.
मानसी:- नाही मंदार तसं नाही. मी माझं नाव सांगणारच की त्या आधी तू पूजा म्ह्णून मला हाक मारली होतीस. त्यादिवशी ज्या पुस्तकावरचे तू नाव वाचलेस ते माझ्या मैत्रीणीचे पुस्तक होते. तिला ते Gift मिळालेलं आणि तूला तेच पूजा नाव माझं वाटलं. मी तूला नंतर सांगणार होतेही पण ते कायमच राहून गेलं
मंदार:- आणि Operation ती ही एक कथाक होती की खरंच अपघात होता हं ?
(मंदारचा पारा वाढताना पाहून त्याला सागर हळू आवाजात बोलायला सांगतो.)

मानसी:- मंदार त्या गोष्टी होण्यामागे काही कारणं आहेत. आणि ते मी तुला नाही सांगू शकणार.
मंदार:- नाही तुला आज सारं काही सांगावाच लागेल.
मानसी:- मंदार जे झालयं ते चुकीचं झालय, पण त्या मागे एक मोठं कारण होतं.
मंदार:- आणि ते कारण आज तूला सांगायचंच आहे.
मानसी:- ठीक आहे एेैक, ह्या साऱ्या गोष्टी मी तुझ्या सोबत मुद्दाम कधीच केलेल्या नाहीत. सर्व गोष्टी ठरवून केल्या जात होत्या.
मंदार:- म्हणजे
(सागरही दरवाज्यातून लक्ष देऊन ऐकत होता.)
मानसी:- म्हणजे तुझी माझी भेट होण्या आधीपासूनच मी तुला ओळखत होते. आमच्या सोबत विनय करमे म्हणून काका आहेत. ते सांगतात आम्ही त्याच व्यक्ती सोबत संबंध तयार करतो.आणि तू तुझ्या घरचाही चांगला होतास. म्हणून काकांनी तुला निवडलेलं, त्यानुसार मग तुझ्याशी पुढे चांगली ओळख होत गेलीं. मलाही तू आवडत होतास पण मला माझ्या काही गोष्टींपुढे जाता येत नव्हतं. मी बांधील होते. तुझ्यासोबत घालवलेल्या तीन चसर महिन्यांत तू जितका जवळ आलास तेवढी मी पण आले होते. पण काही दिवसांनी तुला सोडावेच लागणार हे मला माहीत होते. त्यामुळे तुझ्यावर मन लावून अर्थ नव्हता. तुला फसवल्यावर त्यातली दहा टक्के रक्कम घेऊन विनय करमेनी मला हे शहर सोडायला सांगितले होते. आणि मी त्या नुसार काल निघालेही. पण ज्या रिक्षाने मी जात होते त्याचा अपघात होऊन. मी आज तुझ्यासमोर आले.

त्या तीन-चार महिन्यात मी देवाकडे मागणं घातलं होतं. माझी एकदा तरी परत मंदारशी भेट घडवून दे म्हणून .जेणेकरून मी त्याला खरं सांगू शकेल आणि बघ देवाने ऐकलं ही. मंदार मला माफ कर जे काही झाला त्याला एक कारण होत. त्या व्यतिरिक्त तू मला आवडतोस मंदार. आज देवाची इच्छा झाली म्हणून मी तुला आज परत भेटू शकले. तू म्हणशील तर मी हे सगळं सोडून तुझ्यासोबत यायला तयार आहे. मंदार मी खोटं बोलत नाहीये. खरंतर मलाच ह्या सर्व गोष्टी पासून दूर जायचे आहे. कंटाळा आला आहे ह्या सर्व गोष्टींचा. दर महिन्याला कोणाला ना कोणाला फसवायचं, पैसे उकळायचे आणि फरार व्हायचं.

एका अपघातामुले मला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागत आहेत मंदार. चार वर्ष आधीची गोष्ट आहे.सात आठ जण मिळून आम्ही पुण्याच्या जवळ एका शहरात ट्रीप करायला आलो होतो. मला कधीच वाटलं नव्हतं ती माझी शेवटची ट्रीप असेल म्हणून, ह्या लोकांनी तिथून माझे अपहरण केले आणि जवळपास दोन-तीन महिने एका खोलीत डांबून ठेवले. तिथे एक समीक्षा नावाची मुलगी होती जी मला प्रेमाने समजवायची. पण कधी कधी खूप मारायचीही. रोज माझ्या नावाची बातमी पेपरला असायची. ती मला रोज दाखवून त्रास द्यायची. त्यांनी मला सगळं काही शिकवलं , कुणाला कसं फसवायचं ते, कस बोलायचं कस रहायचं, मंदार तीन-चार वर्षे झाली, मी माझ्या आई वडिलांशी बोलले नाही त्यांना पाहिले नाहीये. मंदार मला त्यांना भेटायचं आहे. प्लीज मला ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर जायचंय. आणि तूच मला सोडवू शकतोस मंदार.
(मानसी रडत रडत त्याच्याशी बोलतेच की तेवढ्यात पूजा आत येते.)

पूजा:- मानसी काय झाला का राडतीयेस ?
(मानसी रडणं थांबवते आणि मंदार ही उठून उभा राहतो.)
मंदार:- काही नाही चेकअप साठी आलेलो. उद्या संध्याकाळी तुम्हाला डिस्चार्ज मिळून जाईल. तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता.
पूजा:- ठिकेय, थँक्यू डॉक्टर!
मंदार ला जाताना पाहून मानसी ओरडते
मंदार मी तुझी वाट बघतीये मंदार..!!
(पूजा प्रश्नार्थक नजरेने दोघांकडे बघते.)

मंदार आणि सागर दरवाज्यातून बाहेर जातात. दरवाजा ओलांडताच मानसीच्या रडण्याचा आवाज दोघांनाही येतो. पण मंदार कठोर पावलांनी आपल्या कॅबिन कडे वळतो. मंदार समोर आता मनासीच्या दोन कथा समोर असतात. कुठल्या कथेवर विश्वास ठेवू आणि कुठल्या नाही ह्या संभ्रमात तो असतो. रात्रभर मंदार त्या कथांच्या जाळात रात्र काढतो.

दुसरा दिवस उलटतो, मानसीच्या डिस्चार्जची वेळ झालेली असते. पण तिला मंदार कुठेच दिसत नाही. सागरलाही ती विचारते, पण सागरही त्यानी सुट्टी घेतलीये आज आणि तो कुठे आहे ते मलाही माहीती नाही असे सांगतो. म्हणजे मंदारचा सकाळ पासून कुणालाच पत्ता नसतो. मग मानसीला न भेटता मंदार कुठे जातो ?


सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...


मयुर श्री बेलोकार
9503664664
Insta@shabd_premiइतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED