चाय कट्टा - भाग तिसरा shabd_premi म श्री द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

चाय कट्टा - भाग तिसरा

मानसी ने तिची दाहकता मंदार आणि सागर समोर व्यक्त केली. मंदार समोर आता तिच्या दोन कथा होत्या. त्यातली खरी कोणती आणि खोटी कोणती ह्या संभ्रमात तो अडकला होता. दुसऱ्या दिवशीची मंदार ने तातडीची सुट्टी घेतली. त्या दिवशी मानसीचा Discharge आहे हे माहीत असून सुद्धा. विनय करमे कोण आहे हे त्याला ठाऊक असतं आणि खऱ्या खोट्याचा छडा लावण्याचा तो निर्णय घेतो. विनय करमे हे त्याचे मामा असतात. पण काही वर्षांपासून ते त्याच्या संपर्कात नसतात. कौटुंबिक वादांमुळे विनय त्यांच्याशी सर्व सबंध तोडून टाकतो.
मंदार त्यांच्या मागावर जातो. काही कारण सांगून घरून त्यांचा नंबर मिळवतो. आणि त्यांना कॉल करून त्यांना त्यांचा पत्ता विचारतो. काही कारणास्तव भेटायचं आहे असं सांगत मंदार पत्ता मिळवतो. पत्ता बराच लांबचा असतो. कारण मंदारला फसवून त्यांनी पळ काढलेला असतो. विनयला आपण कशासाठी भेटतोय त्याचे कारण कळू देत नाही. अनेक वर्षांच्या अंतरा मुळे मंदारला मामा बद्दल काहीच माहीत नसतं. एक साधारण माणूस आणि आपण त्याला खरं काय आणि खोटा काय एवढेच विचारायला जातोय एवढंच त्याला माहीत असतं. आणि मंदारचा खरा प्रवास सुरु होतो.
सकाळी निघालेला मंदार सांगितलेल्या ठिकाणी संध्याकाळी चार- पाच च्या जवळपास पोहोचतो. विनयही मंदार चे चांगले स्वागत करतो. घराच्या आत शिरण्याआधी शेजारच्या गोडाऊन सारख्या दिसणाऱ्या जागेवर काही लोक जमलेले दिसतात. काहींच्या हाती लहान मोठी हत्यारं असतात. मंदार आत जातो. पण आतल्या सर्व गोष्टी पाहून त्या घराला घराचा आकार नाहीये अस त्याला वाटतं. जणु इथं विनय अधून मधून येत असावा. असा मंदार ने अंदाज घेतला. एका प्रशस्थ हॉल मध्ये मंदार आणि विनय एका सोफ्या वर बसलेले असतात. विनय आतून मंदार साठी पाणी आणायला सांगतो.
आतून पाणी आणणाऱ्या व्यक्तीला पाहून मंदार थोडा चक्रवतो. कारण तो व्यक्ती एक २५- २६ वर्ष असलेला एक तरूण असतो. आणि पाणी देताना त्याची रागीट नजर, त्याच्या हातातली बाँटल घेताना
मंदारच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होतो आणि तो विनयला विचारतो.
मंदार:- मामा घरी मामी नाहीयेत का?
विनय:- नाही,अरे ती माहेरी गेली आहे, त्यामुळे घरी कोणी नव्हते, म्हणून तुला इकडेच बोलवले.
मंदार पाण्याचे दोन तीन घोट घेऊन बाँटल परत त्याच्या हाती देतो.
मंदार:- अच्छा आणि जे लोक बाहेर शेजारच्या गोडाऊन वर आहेत त्यांना ओळखता का तुम्ही??
विनय:- कोण कुठे, आपल्या शेजारच्या प्लॉट वर, नाही रे आपले लोक नाही ते.
मंदार:- ओह अच्छा. तेच म्हटलं त्याच्या कपड्याहून आणि वागण्याहून त्यांचा आपल्याशी संबंध आहे असं वाटत नव्हतच मला.
विनय:- हो, जाऊ दे सोड ते, कसा काय आलास आणि इतक्या वर्षांनी बरी तुला मामाची आठवण आली.
मंदार:- नाही मामा असं काही नाही तुम्ही गेलात आणि नंतर तुमच्याशी कधी बोलणच झाले नाही. तुमचा नंबर नाही तुमचा पत्ता नाही आणि त्यात डॉक्टरकीचा अभ्यास ह्या गोष्टींमुळे कधी वेळ मिळालाच नाही .
विनय:- हो का, मग आता कसा काय भेटायला आलास थेट.
मंदार :- तुम्हाला एक विचारायचे होते.
विनय:- हो हो विचार काय त्यात.
मंदार:- मामा तुम्ही मानसी वावटळे ला ओळखता का?

आपल्यासाठी काम करणाऱ्या मुक्तीची कोणी चौकशी करायला येईल असा अंदाज विनय नव्हता. कारण आजवर विनय चे सर्वच Plan यशस्वी ठरले होते. कुणी आड आलं तर त्याला संपवून पुढे जायचं असं ठरलेलं असायचं. पण आज मंदार त्याचा भाचा त्याच्या Plan च्या आड आला होता.

विनय:- नाहीतर अश्या कुठल्याचं मुलीला मी ओळखत नाही. आणि वरून माझं लग्न झालेलं असताना माझा मुलींशी कसा संबंध येईल.

मंदार थोडं मोठ्यानेच विनय ला विचारतो
मंदार:- नाही !! तुम्ही खरचं नाही ओळखत ?
विनय:- नाही! का काय झालं.
मंदार:- काल तिने तुमचं नाव घेतलं माझ्यापुढे आणि मला तिच्यावर विश्वास बसत नव्हता. म्हणून ती खोटं बोलत आहे की खरं हे शोधायलाचं मी तुमच्याजवळ आलो आहे.
विनय:- तो विनय करमे कुणी दुसरं असू शकतं रे By the way ती मुलगी कुठं भेटली तुला ?
मंदार:- तसा तिला मी सात - आठ महीन्यापासुन ओळखतो. पण ति कल हॉस्पिटलमध्ये admit होती. तिने तुमचं नाव काल घेतलं कल म्हणून तुम्हाला आज थेट गाठलं.

तेवढ्यात एक मुलगा मागच्या दरवाजातून आत येतो, आणि मंदार कडे लक्ष न देताच विनय शी बोलतो.
तो:- भाई ती एक मुलगी पळून गेली, काय करू तीन-चार पोरांना पाठवू का तिच्या मागे ?

त्यांचे शब्द ऐकताच मंदार एकदम डचकतो. त्याला कळून चुकतं की बाहेरची सगळी जमलेली लोकं ही मामांचीच माणसं आहेत. विनय ताडकन ऊठून त्या मुलांसोबत बाहेर जातो. आणि दरवाजा बंद करतो. विनय गेल्याचं पाहताच मंदार उठून खिडकीतून बाहेर पाहतो.ओट्यावर विनय आणि तो मुलगा बोलत असतो. विनय त्याला काहीतरी रागात बोलतोय हे त्यांच्या हावभावावरून कळून येत होतं. समोरच्या गर्दीत आता गोंधळ उडाला होता. विनय त्यांना जवळ आणून काहीतरी उपदेश देत होता. मंदारला आता विश्वासबसला होता की मामा आपल्यापासून काहीतरी लापवतोय. मंदार मामांना आत येतांना पाहतो आणि सोफ्यावर येऊन बसतो. विनय आत मध्ये येऊन सोफ्यावर बसतो आणि मंदारशी बोलतात.
विनय:- बोल मंदार पटकन मला आणखी कामं आहेत.
(मंदार आपला मोबाइल काढून तिचा फोटो दाखवत म्हणतो)
मंदार:- मामा हीच ती मुलगी मानसी वावटळे. आणि मला कळलंय तुम्ही काय करता ते त्यामुळे खोटं बोलू नकाच.
विनय:- मंदार तूझी इच्छा असली तरीही तू माझं काही बिघडवू शकत नाहीस. पण तरीही तू कोणीतरी माझा लागतोस म्हणून सांगतोय. तू जी मुलगी दाखवली आहेस तिचं नाव ह्या धंद्यात आली तेव्हाच नाव मानसी वावटळे आहे.पण तिचं खरं नाव वैभवी शिरपाक्षे होतं. हो आणि तिला आम्हीचं Kidnap केलं होत, त्याच बरोबर तुझ्या सोबत घडणाऱ्या साऱ्या गोष्टींची गोष्टींची मला खबर असायचीच.
तुला सांगायची तशी गरज वाटत नाही पण! पण मला तुझ्या वाटे माझा बदला पूर्ण करायचा होता. तो घेणारच होतो की या वैभवीने घोळ केला आधीच तुझ्या प्रेमात ती पडलेली. तिला किती वेळा बजावलं की प्रेमाचा फक्त दिखावा करायचा आहे. पण तिच्या डोक्यातून तू निघत नव्हताच. तुझ्याकडून जी रक्कम काढायची होती ती सुद्धा काढता आली नव्हती, त्याला कारणही तीच होती आयुष्यातल्या आजवरच्या सर्व Plans मधला हा एकमेव फसत जाणारा Plan होता पण तरीही तिला धमकावून तुझ्या जीवाचं बर वाईट करू असे बजावल्यावर तिने तुझ्याकडून पैसे काढले. पण किती 40 हजार काय होत ह्यात. अरे एवढयात बाहेर देशातील मुलगी सुध्दा विकत घेता येत नाही
(मंदारच अचानक लक्ष विनयच्या चेहऱ्यावर जातं, विनय त्याच्याच तोंडून आपल्या आणखी एका कारस्थानाबद्दल बोलून जातो.)
मंदार :- काय तुम्ही मुलींची खरेदी-विक्री करता?
विनय :- हो करतो, घरात जर ती भांडणं झाली नसती ना तर ह्या गोष्टी करायची गरज भासली नसती मला आणि ती एक मूर्ख मुलगी जी माझ्या आयुष्यातपहिल्यांदा पहिली असावी, काम सोडून प्रेम करत बसली, साला प्रेम नावाची चीजना चांगल्या चांगल्या गोष्टींना घोडे लावून जाते आणि एवढं तुला तिच्या डोक्यातून काढूनही शेवटी जाऊन तुझ्याच हॉस्पिटल मध्ये पडली.आणि सगळ्या Plan चा सत्यानाश झाला ती अजून काही घोळ घालते का म्हणून तिच्या सोबत मी पूजालाही ठेवलं पण ती कसली थांबायची शेवटी तिने तुला सर्व काही सांगूनच टाकलं. आणि आलास तू तिने सांगितलेल्या नावाचा शोध घेत इथं पर्यंत. आज तुलाही इथे बोलवण्या मागे कारण होतंच, तुला माहीत झाल्यावर तू सहजासहजी पळता कामा नये म्हणून तुला चांगल्या दूरवरच्या पत्त्यावर बोलवून घेतलं.
हे सगळं ऐकूनही मंदार स्वस्थ बसून होता. आता त्याच्या डोक्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अशी समोरून मिळाली होती. मानसीच्या खऱ्या नावापासून तिचं आपल्यावरच्या खऱ्या प्रेमापासून ते पूजा आपल्या मामाची पाठवलेली हेर आहे पर्यंत सगळ्या गोष्टी मंदार समोर खुल्या झाल्या.
आता मंदार समोर यक्षप्रश्न उभा असतो. त्याला इथून पळ काढून सागरला फोन करून कळवणे गरजेचे होते , पण मामांनी त्याला बोलण्या बोलण्यातच त्याला सुचवले होते की आता सुटका होणे शक्य नाही. मामा समोर बसून त्याच्याकडे हसत पाहत असतात, कारण शिकार जणू स्वतःहुन पिंजऱ्यात येऊन असलेलं असतं.
मंदारची उठून पळण्याची तयारी दिसताच विनय आत मध्ये आवाज देतात "शेफर जल्दी बाहर आ इसकी तलाशी ले और अंदर डाल दे इसको."
मंदार तडकन उठतो आणि घाई गडबडीत खिशातला मोबाईल काढतो, फोन लावण्याच्या प्रयत्न करतो पण Call Not Reachable येतो. मग मंदार Whatsapp वरून लोकेशन पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण तोवर रुम मध्ये सैरावैरा पळणाऱ्या मंदारला शेफर पकडतो, मंदारच्या हातून मोबाईल जाण्याच्या शेवटच्या क्षणी मनदारला कळतं की आपण लोकेशन Send तर केलंय पण तो गेलं नाहीये कारण मोबाईल चा Data off होता.

शेफर त्याची पूर्ण तलाशी घेतो त्याच्या खिशातलं त्याचं Wallet त्याच्या इतर गोष्टी टेबल वर ठेवतो. विनय त्याचा मोबाइल घेतो आणि Switch off करून ठेऊन देतो. नंतर wallet घेतो आणि ते उघडतो आत मानसीचा फोटो असतो तो काढतो आणि मंदार कडे पाहून हसतो, सोबतच शेफर ही हसण्याला साथ देतो आणि विनय तो फोटो त्याच्यासमोर फाडून टाकतो. शेफर मंदारला आत घेऊन जाण्यास सांगतो आणि विनय त्याचं Wallet आणि मोबाईल अलमारीत ठेऊन बाहेर निघून जातो. मंदारला शेफर एका खुर्चीला बांधून ठेवतो आणि समोरच्या खुर्चीवर सिगारेटचे झुरके घेत बसतो.
मंदारने स्वतः भोवतीच फास ओवळून घेतलेला असतो. त्याचा मामा त्याचे मनसुबे पार पडावे म्हणून कुणाचंही बरं वाईट करू शकतो, हे त्याला कळून चुकतं. हळू हळू संध्याकाळ होऊ लागते सागरला जोवर Location मिळत नाही तोवर ते आपला शोध घेऊच शकत नाहीहे मंदार जाणून असतो, शेफर अजूनही समोरच्या हललेला नसतो, एक मागे एक सिगारेट मारणं त्याचं चालूच असतं, थोडया वेळात तिथं एक मुलगी येते शेफर सोबत तीच बोलण सुरू होतं.
ती :- क्या इसे किसने पकडा अब, लड़कियों को छोड़ लड़को का भी धंदा शुरू किया लगता विनय भाई ने
शेफर :- नही, इसका मैटर थोडा अलग है।
ती :- अच्छा तो, विनय भाई गये या है।
शेफर :- वो तो कब के चले गय।
ती :- ठीक है ध्यान रख इसका.
शेफर:- हाँ।
मंदार वर एक नजर फिरवून ती निघून जाते. एकवेळ साठी मंदारला ती ओळखीची वाटत होती. हो मानसीने बोलताना समीक्षाचा उल्लेख केला होता कदाचित ती हीच असावी असं मंदारला एकदम वाटून जातं.

ती जाते आणि शेफरचं परत सिगरेट सोबत खेळणं सुरू होतं. रात्रीचे 12 वाजतात मंदारला अजून तरी झोप लागलेली नसते. पण शेफर आता डुलक्या मारत असतो. एकदम मंदार त्याला आवाज देतो.
मंदार:- Oyee शेफर!
शेफर:- क्या बे चेन से सोने देना, दिनभर इसके पिछे भागो, उसके पिछे भागो और रात मको तेरे जैसे पर नजर रखो।चुपचाप सो ले और मुझे भी सोने दे|
मंदार:- भाई सिर्फ एक सिगरेट देना, सिर्फ एक फिर तुझे नहीं तंग करुंगा।
मंदार सारखा सारखा सिगरेट मागतो, मग शेवटी कंटाळून तो त्याला द्यायला तयार होतो. मंदारच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू असतो. शेफर त्याला सिगरेट आणून देतो पण मंदारचे हात बांधलेले असतात. त्याला एक हात सोडायला सांगतो. तो ही आजूबाजूला पाहत " शाणपट्टी करने का नहीं समजा ना",म्हणत त्याचा एक हात सोडतो. आणि सिगरेट पेटवून देत खुर्चीवर बसतो. तिथुन त्याच निरीक्षण चालूच असतं. मंदारला संधी काही मिळताच नव्हती. ह्याच्यावर हल्ला केला तरी इतर गुंड इथे असतीलच म्हणून शांत बसने भाग होते. थोड्यावेळात सिगरेट संपते. सिगरेटच थोटक जमिनीवर पडताच शेफर उठतो आणि त्याचे हात बांधतो
त्याला आलेली झोप, त्याला काही सुचू देत नव्हती. मंदारच्या हाताची गाठ त्याला पक्की बांधता आली नाही. आणि स्वतः खुर्चीवर जाऊन बसला. मंदारला संधी मिळाली. तो शेफर चांगला झोपी जायची वाट पाहत थांबला. रात्रीचे दोन झाले तेव्हा मंदार ने हाताची गाठ सोडतो आणि मोकळा होतो. शेफर गाढ झोपी गेल्याचं पाहताच मंदार आधीच्या हॉल मध्ये गेला. मोबाईल शोधला आणि on करून कॉल करण्याचा प्रयत्न करतो, कॉल तरीही Not Reachable येत होता, मग तो data on करून Location परत पाठवतो. आणि सागरला कॉल करून पाहतो. पण तो उचलत नाही कदाचीत तो झोपलेला असावा. मग मंदार मानसीला फोन try करतो आणि ती तो कॉल उचलते. मंदार पुढचं वाक्य बोलणार तेवढ्यात आवाजाने शेफर उठतो. तो उठल्याच पाहताच मंदार गडबडतो. शेफर मंदारला हाका मारत मारत हॉल मध्ये येतो. त्याचा मोबाईल हिसकावत, त्याला परत खुर्चीला बांधून ठेवतो.मंदारच एक काम झालेलंच असतं. शेफर त्याला बांधता बांधता चांगलाच मार देतो. आता मंदार आणि शेफर दोघेही झोपी जातात. मंदार आता सागर कधी येईल याची वाट पाहत असतो.
सकाळ होते आणि तिकडे मंदारचा मेसेज सागरला मिळतो. सागर मानसीला सांगतो आणि पूजालाही कळतं. पण सागरला पूजा विनयची हेर आहे हे माहीत नसतं. त्यामुळे सागरला त्याच्या समोर काय वाढवून ठेवलं असाव याचा अंदाज नसतो...



सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...

मयुर श्री बेलोकार

9503664664

Insta@shabd_premi