पार्ट १
कोणीतरी सोबती हा हवाच ?
तो मानस जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हंटल जात , की ते सोबत आहेत
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर त्यांची पाऊल सोबत पडले तर ते सोबत आहे ,
जेव्हा त्या पाऊल मध्ये अंतर येईल तेव्हा त्या सोबत असण्याला / दिसण्याला देखील अंतर येईल
आपण घाबरलो , आपण डगमगलो तेव्हा पाऊल हे थांबत , डडमगत त्याच वेळी जोडीदार ने
हातात हात घेऊन थांबलेलं पाऊल ला गति द्यावी
आणि हो मी सोबत आहे तुझ्या हा विश्वास द्यावा
हीच नाही का ती खरी सोबत
वृषाली
...............................................................................................................
पार्ट २
ना"ती" खरी ठरली
ना"तो" खोटा ठरला
क्षणांचा विलंब न
होता
सारा खेळच इथे मांडला
खेळता खेळता
ना"ती" जिंकली
ना"तो" हरला
भावनेचा गुंता हा वाढतच गेला
फुलांची ती बाग
त्या बागेत , उमलावी प्रेमाची माला
सुंगध दाटुनी दरळवला
श्वास रोखूनी क्षणभर
तो स्वप्नाचा पुन्हा भास मज झाला
डोळे उघडूनी पुन्हा
मागे वळून बघता
ना"तो" तिथे दिसला
ना"ती" कुठे गेली
परतून पुन्हा पुन्हा
आठवणी बहरून आल्या
वृषाली
...................................................................................
पार्ट ३
नात
नाते म्हंटले म्हणजे त्यात
प्रेम जिव्हाळा काळजी हे आलंच
मात्र नात्याच्या काही काळाच्या सहवासानंतर
त्या गोष्टी दिसेनासे होतात
आणि आपल्या जोडीदाराचे प्रेम कमी
पण त्याचे दोष काढण्यात आपण
जास्त प्रयन्त करत राहतो
त्यातून होणारे वाद मतभेद तंटा
ह्या रोजच्या दिनक्रमात
नात्यात दुरावा कधी निर्माण झाला हे देखील
कळत नाही ,ह्या गोष्टी इतक्या टोकाला जातात
की ह्याचा शेवट नाते तुटणे हाच होतो
जशी गाडीची दोन्ही चाक नीट ,असली की गाडी व्यस्थीत पळते,
तसच नात्यात समोर आलेल्या ,नाजूक गोष्टी प्रश्न समस्या ह्या ,
ह्या मिळून सोडवाव्यात ,त्यात दोघांचा समावेश हा मापक असावा ,
काही असलं तर नात्यातील ओलावा,घालवून देऊ नका
वृषाली
...............................................................................................
एकवेळ सगळं सहन होत
पण भावनिक गुंता
त्याचा असर जरा जास्तच असतो नाही का
त्यांचा एकदा कोंडमारा झाला
की शेवट हा एकटेपणा च असतो
सगळ्यांचे प्रश्न सोडवता सोडवता
स्वतःला पडलेल्या प्रश्नाचं काय
त्याची उत्तर शोधायला
निघाले खर
तरीही समाधान मात्र साथ देत नाय
प्रॉब्लेम छोटे असो किंवा मोठे
समोरच व्यक्ती जवळच असो किंवा परका
पण शेवटी स्वतःच्या अस्तित्वापुढे
तो कोणीच नाही
हा धीर ,हाच जप ,हाच संयम
ठेवून पाऊल टाकण्यात
स्वतःचीच जबाबदारी जास्त वाटते
शेवटी काय
दिलासा द्यायचा
Balance ठेवायचा
आयुष्याच्या या रंगमंचावर
एकपात्री नाटकाचा आनंद घ्यायचा
वृषाली
........................................................................................
कधी कधी वाटत की हे
सगळं सोडून कुठेतरी दूर निघुन जावं
इथे कोणीच समजून घेणार नाही
कोणी फरक पाडून जाणवून देणार नाही
आपण खुश आहोत , दुःखी आहोत
ज्याला जितकं जवळ करावं
तो तितकंच दूर लोटतो
ज्याला जितक आपलं मानावं
तो तितकंच परक करतो
ज्याच्याकडून जितक्या अपेक्षा करतो
तो तितकंच भंग करतो
किती पण प्रयन्त करा
पण मी समाधानी आहे
अशी भावना हृदयातून येत नाही
सगळं सगळ्यांसाठी करावं
मग वाटत आपणच कुठं कमी पडतो का
मग नक्की कुठं चुकत
कोणाचं चुकत
आणि
काय चुकत
ह्याच उत्तर मात्र मिळत नाही
अस नात हवंय
जे जुळेल
कायमस्वरूपी
त्या नात्याला कधीच गाठ लागू नये
वृषाली
..............................................................................
डोळ्यांची उघडझाप
सोबत होते
पण तरीही ते
आयुष्यभर एकमेकांना
बघू शकत नाही
तसेच
काही मानस क्षणिक
सोबत असतात
जे आयुष्यभर कधीच
एकमेकांची साथ देऊ शकत नाही
# आहेत ना असे सोबती
वृषाली
................................................................................................................
हि वाट खडतर आहे
स्वप्न माझी मनात आहे
ती सत्यात लवकर उतरणार आहे
सोबत तू आहेस
म्हणूनच का कदाचित CHE
मी आशेच्या प्रतीक्षेत आहे
वृषाली
...................................................
# little Thing
वृषाली महाकाळ