पोलिसांकडे काहीच पुरावा नसल्यामुळे त्या रूम मध्ये सापडलेली आई हीच काय ते खर सर्व सांगू शकत होती. पण तिला काही विचारलं तर ती एकच वाक्य सारखं-सारखं बडबडत होती की, "माझ्या सुयशने खूप हालाखीचे दिवस काढलेत, खूप कष्ट सहन केलय त्याने...त्याला कोणीच कधी समजू शकल नाही...." आणि मग पुन्हा एकटक फक्त भिंतीकडे पाहत बसायची...त्यामुळे पोलिंसांच काम पण खूप कठीण झालं होत त्यांच्या हाती काहीच विशेष असं लागत न्हवत..
आता जवळपास ३ दिवस होऊन गेले होते या गोष्टीला पोलिंसांचा तपास चालू होता.. आणि ती बाई अजूनही फक्त तेच बडबडत होती जे ती या आधी बडबडत होती... नेमकं काळात न्हवत कि ती मुद्दाम अशी करतेय की तिला मुलांच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का लागल्यामुळे तीच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार आता हे तर स्पष्ट झालं कि त्या मुलांचा मृत्यू हा गाजरचा हलवा खाल्ल्यामुळे झाला होता जो मर्डर स्पॉट वर टेबले वर होता. आजूबाजूला पुन्हा चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांकुटुंबाच गाव कोणत आहे हे कळलं... पोलिसांनी लगेच एक पथक त्यांच्या गावी पाठवून दिल आणि सुयश चा तपास पण चालूच होता... कुठलीच लिंक मुळात कामी येत न्हवती...
आणि त्यातच एक बातमी पोलिसांना लागली, ती किती महत्त्वाची होती हे माहित नाही पण हो यामुळे या केस मध्ये पुढे जाण्याचा मार्ग नक्कीच सापडला होता. जंगलामध्ये काही मोठ्या नारळाच्या झावळीखाली लपवलेली सुयश ची बाईक पोलिसांच्या हाती लागली.. याचा अर्थ सुयश या जंगलात आला होता पण तो इकडे का आला होता आणि यानंतर कुठे गेला याचा काहीच पत्ता लागला नाही.
संपूर्ण जंगल पोलिसांनी हाय अलर्ट वर राहून चेक केलं... त्या गाडीच्याच बाजूने काही रक्ताचे सुकलेल डाग निदर्शनास आले... पोलिसांनी त्या डागांचा पाठलाग केला.. पण थोड्या पुढे गेल्यावर ते डाग दिसेनासे झाले.. पण पोलिसांना कळलं होत की नक्कीच काहीतरी विचित्र इकडे घडलं आहे..
गावी गेलेलं पथक हि आपली कामगिरी बजावत होती..
गावाला आजी आणि एक चुलत काका राहत होता.. त्यांच्याकडून कळलं की जवळपास १५ वर्षांपूर्वी हे कुटुंब अहमदनगरला राहायला गेलं होत. सुनंदा म्हणजे त्या मुलांची आई तिला गावामध्ये मुलांची शिक्षण करायची न्हवती आणि त्यासाठी तिने मोठ्या हिमतीने सर्वांचा द्वेष स्वीकारून, भांडण करून ते घर सोडलं होत. त्यामुळे त्यांना याबद्दल काहीच माहित न्हवत..कारण खूप वर्ष अगोदरच त्यांनी त्यालोकांशी संबंध तोडले होते.. त्यांचं बोलणंच पूर्णपणे बंद झालं होत आणि ह्या लोकांचं कधी तिकडे येन-जाण पण होत नसे, त्यामुळे नंतर कधीच त्यांच्याशी संबंध आला न्हवता.
यासगळ्या गडबडीत एक साक्षीदार जो दुर्लक्ष झाला होता तो पोलिसांनाआठवली आणि ती होती त्या मुलाची आई ज्याच्या मृतदेह त्या मूलांसोबत घरात सापडला होता. सर्व सूत्र पोलिसांनी आता तिकडे लावली आणि तिला पोलिस स्टेशनला आणण्यात आलं. पोलिसांनी तिच्याकडे या कुटुंबाविषयी चौकशी करायला चालू केली. तिने एक-एक करून सर्व सांगायला सुरुवात केली..
हे कुटुंब अहमदनगरला राहायला आलं... आमच्यासोबत खूप चांगले संबध झाले होते, काही वर्ष सर्व काही सुरळीत चालू होत पण.. मोठा मुलगा सुयश ह्याला कॉलेजच्या मुलांकडून वाईट सवयी लागल्या तो दारू पिऊ लागला...आणि त्याने ठरवलं कि तो दारूचं दुकान टाकणार होता हि गोष्ट जेव्हा घरी कळली तेव्हा बाबानी त्याला जराही मदत केली नाही त्यालाओरड्ले त्याला मारलही. कारण बाकी दोन मुलं अभ्यासात खूप छान प्रगती करत होती आणि सुयश हा हळू हळू आऊटलाईनला जात होता.
पण काही केल्या तो या सवयींमधून बाहेर येऊच शकला नाही आणि त्याचाच धक्का घेऊन त्याच्या बाबांनी या जगाचा निरोप घेतला..बाबा गेल्यानंतर सर्व जबाबदारीही आईवर आली तिने सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या.. सर्व मुलांचं नीट संगोपन केलं.. सुयशला दुकान चालू करायला मदत केली..बाकी दोघांची शिक्षण केली पण तिचा जास्त जीव वर होता असं त्या बाईने सांगितलं.. तिचा तपास थांबवण्यात आला. आता पुन्हा पोलिसांनी आपली सूत्र सुनंदाकडे वळवली कारण आता सुयश हा तिचा होता असं तपासात पुढे आलं होत ... आणि पुन्हा पोलीस सुनंदाला विचारणा करू लागले..