निर्मनुष्य - भयकथा
By Sanjay Kamble.
एका जबरदस्त झटक्यासरशी सुनील खाडकन जागा झाला.. काही वेळापूर्वी बियर बार मधील एका टेबल ला बसुन लाईटच्या मंद प्रकाशात चाढवलेल्या तीन कॉर्टरची नशा एका झटक्यात उतरली होती... बाजूला पाहिलं तर ड्रायव्हर सीटवर बसलेला मनोज अगदी विस्फारलेल्या भयभीत नजरेने गाडीच्या समोरच्या काचेतून बाहेर पाहत होता... मुख्य रस्ता सोडून त्याची चारचाकी मोटार कच्या खडकाळ वाटेवर एका ठिकाणी थांबलेली... मोटारीच्या काचेतून बाहेर पाहील तर कच्च्या वाटेवरून उडालेली धुळ आजुबाजुला पसरत काळोखात त्यांच्या गाडीच्या सुरू असलेल्या हेडलाईटच्या प्रकाशात येऊन अधिकच गडद्द दिसू लागली..
" मन्या , काय झालं...? कोणी आडव आलेल की तुला डोळा लागलेला..? हे पाणी घे... तोंडावर मार..." बोलत सुनिलन पाण्याची बाटली त्याच्या समोर धरली...
सुनीलच्या बोलण्यान मनोज काहीसा भानावर आला.. गाडीतून खाली उतरत त्यान एक नजर गाडीच्या चाकांवर टाकली....सुनील ही पाठोपाठ उतरून त्याच्या मागे चालत त्याच्या हलचाली पाहायला सुरुवात केली... मनोज न मोबाईलचा टॉर्च सुरू करून चाकावर प्रकाश पाडला तर पण काहीच दिसत नव्हतं ......
घडलेल्या प्रकाराची जणू दोघांना सवयच झालेली... पोटात अल्कोहोलचे प्रमाण अधिक झालं की गाडी अशी रस्ता सोडून भरकटणारच.. पण आज गाडीचं रस्ता भरकटण पुढं घडणाऱ्या भयाण घटनांची सुरुवात होती.... मात्र या सगळ्यांपासून अनभिज्ञ ते काही वेळातच आपापल्या घरी पोहोचले... दारूचा अम्मल इतका होता की काही वेळातच मनोज झोपी गेला.
सुनिल आणी मनोज जिवाभावाचे म्हणण्यापेक्षा टेबलाचे मित्र म्हंटल तर वावग ठरणार नाही... सुनिलच्या घरची परिस्थिती बेताचीच पण परिस्थितीची जाण नसलेला भरकटलेला तरूण तर मनोज नुकताच इंजिनिअर झालेला, आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. बाबा सरकारी नोकरीत, तर आई बैंकेत मैनेजर. मुलाचे सगळे लाड पुरवलेले. हवी ती गोष्ट अगदी सहज मिळाल्यान मनोजला कसल्याच वस्तुची किंमत नव्हती... दुचाकी , चारचाकी वाहनं म्हणजे जसा कचरा होता त्याच्या साठी.. वाट्टेल तशी गाडी फिरवायची, त्यामुळ कितीतरी वेळा अपघात झालेला पण त्याल काही झालं नव्हतं... जणु त्याला आता एक आत्मविश्वासच आलेला की 'मला काही होणार नाही'...
त्याचा दिनक्रम पण ठरलेला... रोज 'गण्या'च्या वाईनशाॅपमधून दारू घ्यायची, कुठंतरी मित्रांसोबत प्यायची, मग 'रूचिरा' हाॅटेल मधे मटन ताट हाणायच , आणी रात्री बारा-एक नंतर निवांत घरी यायचं...
या दिनक्रमानंतर आजही तो निवांत झोपला होता पण एका हाकेसरशी त्याला हलकीशी जाग आली... अजुन बाहेर अंधारच होता... अंगावरच पांघरूण बाजुला सारत तो आपल्या खोलीतून बाहेर आला तशी हाक अधीक स्पष्ट ऐकू येऊ लागली... पण त्याला एक गोष्ट जाणवत होती की त्याच्या पोटात भुकेन आग पेटली आहे, एखाद्या राक्षसाप्रमाण पोटात चवतळलेली भुक जणु त्याच शरीर आतुन कुरतडत असल्यासारखं वाटू लागल.. दोन्ही हातांनी पोट गच्च आवळून तो त्या हाकेच्या मागे धावत सूटला आणी समोर मटनाच ताट वाढलेलं दिसल... इतकंच नाही तर बाजुलााच दारूची एक बाटली.... पोटातील भुकेने व्याकूळ झालेला मनोज जवळजवळ त्या जेवणावर तुटूनच पडला.... तेलकट मसाल्यात दिसणारी पिवळसर तांबूस मटनाच एक फोड दोनच बोटांनी अलगद ऊचलून तोंडांत टाकल, पण त्याला कसलीच चव लागत नव्हती... ताटातील इतर पदार्थ त्यान एक एक करून खायला सुरुवात केली पण सगळे पदार्थ बेेेचव .. ते जेवणच तााट तसाच ठेवून तो जागेवरून उठला तस त्याच्या लक्षात आलं की आपण एका अनोळखी ठिकाणी एका ओसाड टेकडीवर आहोत. काळोख असली तरी आजुबाजूचा परीसर त्याला काहीसा दिसत होता... पुन्हा जमीनीवर उगवलेल्या खुरट्या गवतावर नजर पडली तर काही अंतरावर तसंच एक जेवणाच ताट होत. पोटातील भुकेनं व्युकूळ झालेल्या मनोजला कसलीच फिकीर नव्हती ... जणु अनेक वर्षांपासून त्याच्या पोटातली भूक आज त्याच शरिर पोखरून सांपवणार त्या आधी ते ताट संपवाव असच त्यान ठरवलेलं. तो धावतच त्या जेवणाच्या ताटापाशी गेला आणी दोन्ही हातांनी त्यातील पदार्थाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली पण 'चव'..?
तोच कानात एक आवाज घुमला...
" भरलं का पोट...?"
त्यान समोर पाहील तर जेवणाच्या ताटाशेजारीच कोणीतरी उभं होतं.. उंच, धिप्पड अशी एक काळी धुरकट मानवी आकृती.. साधारण त्याच्यापेक्षा दुप्पट.. ताटातील घास उचलतच मनोजन वर पाहील तस त्या आकृतीन आपल्या हातातली कु-हाडीच धारधार पातं हवेत उंचावल आणि झपकन मनोजच्या कपाळत घुसलं...
एका आर्त किंकाळीन जवळ जवळ तो अंथरुणात उठून बसला... आजूबाजूला पाहिलं तर तो आपल्या रूम मध्ये होता..
'इतक भयंकर स्वप्न..?'
सर्वांग अगदी घामानं चिंब भिजलेल... भितीन काळजाचे वाढलेले ठोके अगदी त्याला स्पष्ट ऐकू येत होते.. समोरच्या भिंतीवर अडकवलेल्या घड्याळात पाहिलं तर साडेचार वाजून गेलेले.. पहाटेचे स्वप्न, ते ही इतकं विचित्र, भयंकर आणि कुठलाच अर्थ न गवसणारं... त्याची दारू तर केव्हाच उतरलेली... आपल्या बेडवरून उठून तो बाथरूमच्या दिशेने निघालाच होता इतक्यात कसल्याशा चाहुलीन त्याचं लक्ष वेधून घेतलं...जस कोणी तरी त्याच्या आजूबाजूला होतं... त्याच्या सोबत चालत होतं ... त्याच्यावर नजर ठेवून होतं.. पहाटे पडलेल्या त्या भयाण स्वप्नांना आधीच त्याच्या काळजात भीती दाटलेली ... आता तर आजूबाजूला कोणी तरी असल्याच जाणवत होतं... बाथरूम मध्ये न जाता तो पुन्हा आपल्या खोलीत परतला .. लाईटचे बटन सुरु केलं अन तसाच बेडवर बसून राहिला.... अगदी श्वास रोखून तो आजूबाजूच्या परिस्थितीत वर लक्ष ठेवून होता... कोणीतरी होत, जरी त्याला दिसत नसल, तरी अजून कोणीतरी त्याच्या खोलीत होतं.... भिंतीवरील घड्याळाचा टिक टिक टिक असा आवाज शांत वातावरणात अगदी स्पष्ट ऐकू येत होता... डाव्या बाजूच्या खिडकीवरील पडदा हवेच्या हलक्याशा झोक्यासरशी मंदपणे हेलकावे घेत होता.. पण त्याची नजर मात्र खिडकीतून बाहेर कुठेतरी खिळलेली...दूरवर पसरलेल्या अथांग समुद्र प्रमाण खोलीबाहेर दिसणाा-या भयाण लख्ख काळोत त्याची भयभीत नजर अक्षरश: बुडालेली.. एक भयान ...
झपाझप पावले टाकत येत असल्यासारखा त्याला जाणवू लागल... पण तो आवाज पावलांचा नव्हता ..... अतिशय वेगाने तो आवाज त्याच्या खोलीच्या अगदी जवळ पोहोचला होता इतक्यात सार काही शांत झालं.... आता त्याला कसलाच आवाज येत नव्हता.. एक गुढ नीरव शांतता आजुबाजुच्या परिसरात पसरलेली..भीतीने त्याच्या चेहऱ्यावर जमलेले घामाचेेे थेंब ओघळत मानेवर आले.. अंगावरची चादर ओढून त्यांना तोंडापर्यंत फक्त डोळे उघडे राहतील अशा पद्धतीने पांघरून घेतली ... घशाला कोरड पडलेली... आवंढा गिळत तो आपल्याा किलकिल्या डोळ्यांनी बााजूच खिडकीतून दिसणारा भयान काळोख न राहूूून पाहत होताा... आजूबाजूूला पसरलेली नीरव शांतता जीवघेणी वाटू लागली...
दुसऱ्याच क्षणी एक टीटवी आपल्या भरड्या कर्कश्श आवाजात पंखांची फडफड करत त्याच्या रूमजवळून आकाशात झेपावली... त्या कर्कश आवाजाने त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला... लाईट तसेच सुरू ठेवून तो आपल्या बेडवर बसून राहिला अगदी दिवस उजाडेपर्यंत.... पण दिवस उगवल्यानंतर मात्र त्याला चांगलीच झोप लागली...ती दुपार झाली तरी तो बेडवरच होता... रात्री झालेल्या जागरणामुळ त्याचा डोळा उघडता उघडत नव्हता...
आणी पुन्हा कोणीतरी झपकन कु-हाडीच धारधार पातं त्याच्या मस्तकात घुसवल.... झटकन जागा झाला..
पुन्हा तेच स्वप्न...! स्वताशी पुटपुटत तो बेडवरून उठला एव्हाना मोबाईल स्विच ऑफ झालेला...
क्रमशः