Bhavishyavani - 1 books and stories free download online pdf in Marathi

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 1

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष भाग १

ज्योतिषविद्या शिकायला खूप लोककाना आवडत.आपल्याला तर लहानपणी दुसऱ्याचा हाथ वाचायला किती आवडायचा बरोबर ना. आणि जरी ज्योतिषविद्या शिकायची नसेल तरी आपला भविष्य जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतो.एकनाथ साठे याला लहानपणा पासूनच ज्योतिषविद्या मध्ये खूप आवड होती.
एकनाथ जे काही भविष्य सांगायचा ते खरं ठारायचं. त्याच्या वर देवाची खास कृपा होती.एकनाथ चे आई वडील अगदी साधे भोळे होते,कदाचित म्हणून त्यांचा लोक गैरफायदा घेत असे.एकनाथ लहानपणा पासून त्यांना पाहायचा, त्याला खूप वाईट वाटायचं.तो जेव्हाही त्याच्या आई ला विचारायचा कि आई आपल्या बरोबरच असं का होत,बाबा मनापासून काम करतात तरी सुद्धा लोकं त्यांचा गैरफायदा घेतात.

तर या वर एकनाथ ची आई म्हणायची कि बघ एकनाथ, आपण कोणाचं भविष्य सांगू शकत नाही ज्याच्या नशिबात जे आहे तेच होत.एकनाथ चे वडील कचरा उचलायचं काम करायचे.या कामासाठी पैसे दिले तर घ्यायचे नाहीतर नाही त्यात त्याची आई घराघरात भांडे धुवायची. त्या बिचारीला पैसे मिळायचे पण लोकांची वाईट नजर तिच्यावर असायची.कितीदा तिच्यावर जबरदस्ती सुद्धा झालेली आहे,पण जसा एकनाथ मोठा झाला तसं लोकांनी तिला त्रास द्यायला कमी केले.

पण एकनाथ वर याचा खूप वाईट प्रभाव पडत होता.म्हणून त्याने तेव्हापासून ठरवलं होतं की तो ज्योतिष होणार.त्याच्या या इच्छाशक्तीने तो ज्योतिष हि झाला,आणि आज त्याला लोकं महान ज्योतिष म्हणून ओळखतात.एका छोट्याशा गावात राहत असणारा एकनाथ पुढे जाऊन असं काही करेल याची कल्पना कोणालाच नव्हती.काही लोकं तर त्याला भेटायला एवढे उत्सुक असत कि जणू लग्नासाठी कोणती तरी पोरगी बघायला जाताय.

एकनाथ भविष्य लहानपणा पासूनच सांगत असे,जेव्हा तो ८वित होता.त्या साठी त्याने वेगळे शिक्षण घेतले नाही.जसा जसा एकनाथ मोठा झाला लोकं त्याला मान द्यायला लागले त्यालाच नाही तर त्याच्या आई वडिलांना सुद्धा.आता एकनाथ प्रचंड आनंदी होता,सगळं काही त्याच्या हिशोबाने होत होतं.अखेर त्याच्या आई च म्हणणं त्याने चुकीचं ठरवलं होतं.चला बघूया कि ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली.एकनाथ ४तीत असताना त्याची आई दुर्वा साठे हि पोटोशी होती,अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं.एकनाथ ला तर काही उमजेना,त्यात निरंजन साठे,त्याचे वडील हि घरी नव्हते.

निरंजन पैसे घेऊन येत असताना काही माणसांनी त्याला धरलं,आणि त्याच्या कडून सगळे साठवलेले पैसे घेऊन घेतले.तो तिथे रस्त्याच्या मधोमध रडत बसला होता.बायको पोटोशी होती त्यात तिला ८ महिने झाले होते.खायला हि घरात काहीच नाही होत,तो किराणा आणायला जाईल तेवढ्यात हे सगळं झालं.एकनाथ घरून पळत निघाला,त्याच्या वडिलांना शोधत ,आणि त्याने पाहिलं की त्याचे वडील रडत बसले होते.तो पळत त्यांच्या कडे गेला,तो म्हणाला "बाबा,चला ना घरी आई ला त्रास होतोय".निरंजन उठला,ते दोघेही पळत गेले.घरी पोहचले,समोर त्याची आई बेशुद्ध पडली होती.नाही तिला फक्त पोटोशी चा त्रास नाही तर त्या त्रासात सुद्धा तिच्या गावातल्या काही लोकांनी जबरदस्ती केली होती.

कारण ती निर्वस्त्र पडली होती.या सगळ्याच खूप वाईट परिणाम एकनाथ वर होत होता.त्याचे बाबा आणि त्याची आई हे अशे,शेवटी हे कमी नव्हतं त्याला अजून राग तेव्हा आला जेव्हा त्याने त्याच्या चिमुरडी लहान बहिणीला पाहिलं,खूप सुंदर,पण तिच्यात जीव नव्हता.तिने कधीच जीव सोडून दिला होता.त्याने ठरवलं की हे लोक जर त्यांच भविष्य ठरवू शकतात तर तो का नाही.एवढं वाईट झाल्या नंतर मग निरंजन आणि दुर्वा ने परत मुल होऊ द्यायचं नाही हे ठरवलं.आता एकटा एकनाथ,आणि त्याचा वाढता क्रोध.एकनाथ ला ७वित निपुण शिर्के भेटला,आणि कमी वेळात तो त्याचा जिवलग मित्र झाला.

निपुण ला तर पोलीस इन्स्पेक्टर बनायचं होत.त्याचे बाबा अभ्यंग शिर्के ज्योतिष होते,त्यांना बघूनच एकनाथ ला हि प्रेरणा मिळाली होती.*काही वर्षांनी* निपुण मोठा इन्स्पेक्टर झाला होता,आणि गावात आता वेगळच वातावरण निर्माण होत होतं. एकनाथ च्या वडिलांचा खून झाला होता,आणि हि केस निपुण बघत होता.कोणीतरी निरंजन ला मारून त्याच्या शरीराचे तुकडे करून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते.

निपुण पूर्ण केस ची तपशील घेत होता तेव्हा त्याला समजलं की एकनाथ ने हि भविष्यवाणी केली होती की त्याच्या वाडीलांचे जास्त दिवस उरले नाही आहे या गावात.पण निपुण ला हे पचतच नव्हतं.खरंच एकनाथ ने निरंजन काकांना मारलं नसेल ना हा प्रश्न त्याने कविताला विचारला.कविता दिनकर त्याची प्रेमिका,त्याच गावात राहणारी,एकनाथ नंतर कोण जवळ असेल तर तीच.एकनाथ खूप उत्कट होता,त्याच स्वप्न होत खूप मोठा ज्योतिष बनायचं.पण कधी कधी अति उत्कट असणं हि बरे नाही.याच उधारण म्हणजे एकनाथ साठे .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED