भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 2 Kuntal Chaudhari द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 2

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष भाग २

निपुण बसून होता त्याला तसच बसून एक टक पंख्याकडे बघता बघता तब्बल तासभाराच्या वर झाला होता,टेबल वर चहा ठेवला होता,निपुण च जेव्हा डोकं चालत नाही तेव्हा त्याला अगदी आलं टाकलेलं चहा हवा असतो.निपुण ला तर काही समजत नव्हतं,एकनाथ खरंच असेल करेल का किंवा करू शकतो का.
पण मग लहानपणा पासून एकनाथ च्या डोळ्यात त्याच्या आई वडीलांविषयी दिसणार प्रेम,ते खोट होत.कोणाला पचेल कि आपला जवळचा मित्राने खून केला असावा ते हि त्याच्याच वडिलांचा.कविता आली, निपुण हे बघ ना मला भेटलेच शेवटी नाटकाचे तिकीट , असं ती म्हणाली.निपुण चिडून म्हणाला" यार,तू पागल झाली आहेस का ,वेळ काळ चा भान तुला कधीतरी असतो".
तो असं बोलून तिथून निघून गेला.कविता ला खूप राग आला पण ती हट्टी होती, नाटक तर तिला पाहायचं होत.निपुण गाडी काढत होता, अचानक त्याला नाटकाने सुचलं कि जर एकनाथ ने काही केलं असेल नाहीतर लपवत असेल तर त्याच्या बरोबर वेळ घालवण्याने नक्की समजेल.त्याने नाटकाचे तिकीट घेतले,आणि एकनाथ ला घेऊन गेला, कविता हि तिथे नाटक पाहायला गेली होती,रागात ती एकटीच गेली होती. नाटक सुरु झालं,आणि मध्यस्थि झाली,कविता ने निपुण आणि एकनाथ ला पाहिलं.तिला प्रचंड राग आला,ती नाटक तसंच सोडून निघून गेली.

निपुण दुसऱ्या दिवशी त्याच केस मध्ये लागलेलं होता,तेव्हा अचानक त्याच्या लक्षात आलं,कि आज कविता च फोन नाही ती दिसली हि नाही.त्याला समजलं होत की नक्कीच काहीतरी बिनसलय.त्याने तिला फोन केला पण ती काही फोन उचलेच ना.निपुण ने विचार केला की नंतर पाहू,सध्या केस कडे लक्ष देणं गरजेचं आहे.एकनाथ पोलीस स्टेशन मध्ये आला,निपुण त्याने हाक मारली.
निपुण म्हणाला "इथे मी तुझा मित्र नाही तर मी जे हि विचारपूस करेल त्याच उत्तर नीट दे".एकनाथ म्हटला, "विचार मी सगळे उत्तर देईन".निपुण ने विचारलं"तुझ्या बाबांचं कोणाशी वैर होता, भांडण झालं होतं?!".एकनाथ"नाही,कोणाशीच नाही,ते उलटे उत्तर कोणाला द्यायचेच नाही". निपुण" ठीक आहे,तुला कोणावर सौंश्य आहे?!".एकनाथ"हो,मला माझ्या भविष्यवाणी वर सौंश्य आहे". निपुण" अरे, काय बोलतोस". एकनाथ " तेच तर जर असता सौंश्य तर सांगितलं नसत का".निपुण " ठीक आहे,जा मी तुला नंतर भेटतो".
निपुण ला धक्काच बसला,एकनाथ चे वडील वारले होते,पण त्यावर त्याच काहीच प्रभाव नाही,काल देखील नाटक पाहायला जाऊ म्हणून विचारलं तर हो म्हणाला एकदा हि नाही म्हणून बोला नाही,आणि आता तर हद्दच मजाक करून गेला.
एकनाथ च वागणूक काही निपुण ला समजत नाही होत.तिथे कविता हि रुसून बसली होती.निपुण च डोकं अगदी भेम्बारलं होत,त्याने हाक मारली,अरे छाव्या, तिथून आवाज आला,हो साहेब आलं घालून चहा आणतो,लगेच.
निपुण मनात म्हणाला,पहा हा एक आहे छाव्या,खरंच छावा आहे लगेच समजत त्याला सगळं.
निपुण घरी पोहचला,अभ्यंग शिर्के,त्याचे वडील म्हणाले,"काय साहेब या या आलात का".निपुण" नाही अजून यायचोय",काय प्रश्न विचारताय,काय मग आज कोणाला उल्लू बनवलं?!".अभ्यंग" हे असं बोलतोस ना तेच आवडत नाही मला,तुझा विश्वास नाही आहे तर काय लोकांचा हि नको".निपुण आडवं तोंड बनवून आत गेला.आत जे त्याने पाहिलं त्याला तर धक्काच बसला,तुम्ही काय करताय,कविता आणि एकनाथ दोघीही जेवणाची तयारी करत होते.एकनाथ म्हणाला"अरे तुझा वाढदिवस आहे आज विसरलास नेहमी सारखा".निपुण"अरे हो ".अभ्यंग-"नाही तर काय सगळं लक्षात राहत पण स्वतःचा वाढदिवस विसरतो".
निपुण वाढदिवसाच्या नादात हे विसरला होता की त्याच्या केस ची फाईल,त्याला पाहायची होती त्यात हे पुरावे सुद्धा होते की निरंजन साठे यांच्या अंगावर कोणाचे अवयव सापडले आहेत का.कविता,एकनाथ,सोबत निघून गेले.निपुण मोकळा झाला,केस ची फाईल शोदायला लागला पण ती गायब होती.निपुण ची शंका वाढू लागली,त्याने आता त्याची मित्रता बाजूला ठेवायचा निर्णय केला होता.कारण निपुण ला समजलं होत की एकनाथ मैत्रीचा वापर करून त्याचा फायदा शोधतोय.
दुसऱ्या दिवशी निपुण ने एकनाथ ला बोलावलं,"एकनाथ तुला हि माहित आहे आणि मला ही कि तू भविष्यवाणी खरी ठरवण्यासाठी काहीही करू शकतोस".एकनाथ-"अरे,तेव्हा आपण लहान होतो,म्हणून मी मारलं होत".निपुण-" हो,तू मारलं होत,तू सखाराम ला बोला होतास कि तुझी गाय,निमा,मरून जाईल,हे खरं ठरवायला तू तिला मारून दिल आणि मी ते पाहिलं होत म्हणून मला समजलं अजून तू काय केलंय हे मला काय माहित".एकनाथ-"ठीक आहे,तुला जे करायचं आहे कर".