भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 3 Kuntal Chaudhari द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 3

निपुण का तर आता काहीच सुचेनास झालं होतं। त्याने आपली गाडी घेतली आणि सरळ तिथून निघून गेला। त्याने मनात विचार केला की एकनाथ च्या आई ची भेट घेऊया, बघू तर बोलून काहीतरी नवीन माहितु मिळाली तर बरंच होईल। तो घरी पोहचला, "आहो काकू मी निपुण... दुर्वा म्हणाली अरे बाळ, एकनाथ नाही रे घरी। निपुण" हो हो काकू मला माहितीये या वेळी तो नसतोच घरी म्हणून मुद्दाम म्हटलं तुमची भेट घेऊ आहो भेटलोच नाही ना आपण म्हणून। दुर्वा " ये ये आत ये मी चहा टाकते" निपुण" राहुड्या हो काकू बसा ना थोडं बोलायचं होत। दुर्वा रडायला लागली, "आता काय बोलू मी मला खूप भित्ती वाटते,काहीच समजत नाही रे मला। निपुण" आहो काकू म्हणून आलोय मी ना, बरं मला सांगा एकनाथ बराय ना?" दुर्वा" काय समजत नाही, काही बोलत नाही रे तो म्हणतो बाबांना आता काय त्रास नसेल, मुक्ती मिळाली त्यांना मला आनंद आहे याच"। निपुण चा चेहरा तर असा शून्यासलेलं होता, काय बोलायचं काय नाही समजत न्हवतं त्याला। निपुण" काकू, काका वारले त्या आधी काय बोलणं झालं होतं तुमच्यात"। दुर्वा" काही नाही बोले होते निपुण ची भविष्यवाणी खरी ठरली तर म्हणून मी सगळं एकनाथ च्या नावावर करून देतो तुला हि ठेवतो काहीतरी म्हणजे मग मी जायला मोकळा"। निपुण आता दृढ विचारात रमला होता,जर निरंजन ने सगळं एकनाथ च्या नावावर केलंच होत तर मग तरीही एकनाथ ने का मारलं असेल। निपुण तिथून निघालो, जाता जाता त्याची नजर लिंबू आणि काळ्या बाहुल्या वर टोचतो तसा काही तरी विधी केलेली होती ती बाहुली अगदी निरंजन सारखी होती। तो पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि त्याने एकनाथ ला बोलवून घेतलं,निपुण-ये ये मित्रा, बाकी काय मग? एकनाथ- काय झालंय मला का बोलावलं इथे निपुण- अरे हो हो सांगतो, घाई कसली रे। निपुण- एकनाथ बघ माझ्याकडे सगळे पुरावे आहे आता तरी मी तुला एक चान्स देतो, मित्रा सांग आता तरी तू जर कबुली दिलीस तर मी प्रयत्न करेन कि तुला शिक्षा कमी होवो। एकनाथ- अरे मी खरंच नाही केलंय काय, सांगतोय तर। निपुण- टाका याला आत। निपुण ला असं करून अजिबात बरं नव्हतं वाटत, त्याला स्वतःच खूपच राग येऊ लागलं होता।तो घरी निघुुुन गेेला। अभ्यंग शिर्के त्याने जोरात हाक मारली। अभ्यंग- काय रे आता काय बापाला नावाने हाक मारतोस निपुण- मग काय अजून काय ठेवलंय तुम्ही माझ्यासाठी।अभ्यंग- म्हणजे? निपुण- काय गरज होती, त्यांना मारायची काय गरज होती। अभ्यंग-तुला समजलं म्हणजे, मी काही केलं नाही आहे निपुण काळाचा दोष होता तो, तो जाणता आहे। निपुण- तुमचे विधी चे सामान तिथे आहे साठेंकडे आणि निरंजन च्या शरीरावर एकनाथ चे अवयव आहेत तुम्ही त्याला हे सगळं करायला सांगितलं बरोबर ना। अभ्यंग- नाही तू चुकतोय भविष्यवाणी मी न्हवती केली आणि जरी केली होती तर ती काय तू सांग तर निपुण- कि निरंजन चे या गावात जास्त दिवस उरले नाही अभ्यंग- मग तो मरेल हे मी बोलोच नाही निपुण- तुम्ही आता शब्दांचं खेळ मांडू नका, खर काय हा सांगून टाका अभ्यंग- एकनाथ माझ्या कडे आलेलं कि मला तुमची विधी हविये काळाचा दोष टाळायला तर त्याला मी बोलो कि एकनाथ झोपी गेला की तू त्याचे हाथ पाय बांधून तोंड घट्ट बांधून काही वेळ ठेव जेव्हा तो कासरा विसरा होईल तेव्हा सोडून दे त्याच रक्ताचे थेंब त्या लिंबू वर टाकून घराच्या मागच्या दारावर ठेवून दे हे सगळं मी त्याला निरंजन वर करायला बोलो निपुण- आणि ती निरंजन सारखी दिसणारी बाहुली तीच काय? अभ्यंग- तीच मला नाही माहित ते मग एकनाथ ने केलं असावं कदाचित हे कळल्यावर कि निरंजन ने जिव सोडलाय त्यानी हि विधी केली असेल निपुण- याच अर्थ एकनाथ ची चूक नाही चूक आहे अंधश्रधेची आणि काळाची पण शिक्षा हि होणार आणि याच मुळ तुम्ही आहात चला पोलीस स्टेशन मध्ये आता तुम्ही दोघे तिथेच भविष्यवाणी करा।या कथेत आगळावेगळा ज्योतिष एकनाथ साठे नसून अभ्यंग शिर्के होता, त्याच्या शरणी जाऊन एकनाथ हि मोठी चूक करून बसला। कोणीहि कोणाचं भविष्य ठरवू शकत नाही,एकनाथ च्या वाईट विचारांनी त्याला कुठपर्यंत आणून सोडलं।