Highway Quarantine - A run for Life - 1 books and stories free download online pdf in Marathi

हाईवे क्वारंटाइन - एक जीवघेणी धाव - Part 1

हाईवे क्वारंटाइन - एक जीवघेणी धाव

हाईवे क्वारंटाइन - एक जीवघेणी धाव

नमस्कार वाचकहो

कसे आहात !

स्वतःची व परिवाराची काळजी घेताय ना !

घायलाचा पहिजे कोविद -१९ आहे, ज्यात फ़क्त तुमची सावधानताच तुम्हाला वाचवु शकतो !

ह्या कथेबद्दल बोलायचे तर, ही कथा "हाईवे क्वारंटाइन-एक जीवघेणी धाव" मी कोविद-१९ लॉक डाउन च्या च्या काळात लिहली आहे. ज्यामधे एका साधारण फैमिली चा लॉक डाउन मद्धे गावाकडे परत जाण्याचा प्रवास व् त्यांना त्यादरम्यांन त्यांच्या जीवनावर ओढवलेले थरारक प्रसंग ह्यांचे वर्णन केलेले आहे. कृपया ही कथा शेवटपर्यंत वाचावी जेणेकरून तिचा पूर्ण आनंद घेता एईल ही नम्र विनंती.

ह्या कथा लेखनाचे श्रेया में माझ्या संपूर्ण परिवाराला देत आहे.

धंन्यवाद,

प्रशांत व्यवहारे

२०२० मार्च महीना पूर्ण भारताला एक जीवघेण्या पर्वतुन नेईल ह्याची कुणाला ही कल्पना न्हवती, जसा २२-मार्च-२०२० ला प्रधान मंत्र्यांनी "जनता कर्फु" लागु केला तशी दुसऱ्या दिवसापासून काही लोकांची ह्या रोगाची भयावह कल्पना मिळाली, आनी लोक मुंबई पुण्या सारख्या महाराष्ट्रातील मोठ्या शहरातून पलायन करायला लागले !

अंजली व समीर ह्यांना सुद्धा त्याची कल्पना आली!

अंजली आनी समीर चे कुटुंब काही वर्षापूर्वी मुंबई उपनगरात रहांयला आले होते. समीर एका कॉर्पोरेट कंपनीत अकाउंटेंट होता व अंजली एक गृहिणी, त्यांना अथर्वा नावाचा एक ७ वर्षा चा मुलगा होता !

समीर फ़ोन वर फ्लैट च्या बालकनी मधे उभा राहून कोणाशी तरी फ़ोन वर बोलत होता ! अचानक त्याचा स्वर तरतरला !

साहेब तुम्ही अस कस करू शकता, साहेब एवढ्या पगारामधे मुंबई मधे मी माझ्या फैमिली घेऊन कसा राहु शकणार ! २५% पगारा मधे तर घरा चे भाड़े सुद्धा मला देता येणार नाहीं !

साहेब तुम्ही अस कस करू शकता, साहेब एवढ्या पगारामधे मुंबई मधे मी माझ्या फैमिली घेऊन कसा राहु शकणार ! २५% पगारा मधे तर घरा चे भाड़े सुद्धा मला देता येणार नाहीं !

साहेब : समीर तू आभार मान आम्ही तुला २५% पगार देऊन घरुन काम करण्यास सांगत आहोत , अरे कंपनी ची इतकी वाइट् परिस्थिती आहे तुला तर माहित आहे !

समीर : पन साहेब हयात माझा काय दोष ! मोठ्या हुदयावरल्या लोकांचे पगार जास्त असतात त्यांना काही फरक नाहीं पडणार, पन माझ्या सारख्या कमी पगारावाल्याला तर जणू आभाळ फाटल्यासारखे आहे! तुम्ही प्लीज समजून घ्याना साहेब !

साहेब : हे बघ समीर तू एक चांगला मुलगा आहेस पन ! मी मैनेजमेंट चा आदेश तुला सांगतो आहे हयात मी वैयक्तिक पातळीवर सध्या तरी काही नाहीं करू शकत ! फार फार तर तुला घरुन काही महीने काम करायची मुभा देऊ शकतो !

समीर : साहेब ! घरुन काम करून माझे खर्चे कमी नाहीं होणार !

साहेब : समीर आई ऍम सॉरी पन मी ह्यापेक्षा जास्त काही नाहीं करू शकत !

समीर : आहो साहेब पन !

समीर चे अजुन काही ऐकण्याच्या आत तिकडून फ़ोन कट झाला !

समीर निराश मनाने जेव्हा घरात आला ते सगळे अंजली बघत होती, समीरने घरातील सोफ्या वर एक बाजूला फ़ोन आपटला आणी तो खिन्न मनाने एका कडेला डोके पकड़ून बसला !

अंजलि लगच त्याचे पुढे आली !

अंजली : समीर काय झाले, ऑफिस मधून फ़ोन होता का ! काही प्रॉब्लम.

समीर : के सांगू तुला कोरोना - १९ लॉक डाउन जाहिर होणार त्यामुळे मुळे कंपनी चे प्रोडक्शन थांबले, थोड़े प्रॉब्लम दिसताच कंपनी ने कामगार आणी पगार कपात आतापासूनच जाहिर केली आहे, फ़क्त २५% पगारच देणार आहेत पुढच्या महिन्या पासून!

आपले तर सगळे पगारासोबतच आहे ! काय करावे काही कळत नाहीं ! पुढचे काही महीने साहेब वर्क फ्रॉम होम फ़क्त देतो ऐसे म्हटले ! पन त्याने काय फरक पडणार आपला तर खर्चे वाढनार !

अंजली : मला पन आजकाल सोसायटी मधे लोक बोलत असतात की हा आजर अजुन वाढणार, मला वाटते जार तुम्हाला वर्क फ्रॉम होम असेल तर आपण काही महीने गावाकडे जाऊँन राहुया, ह्या घरचे भाड़े वाचेल आनी खर्चे ही कमी होईल !

समीर : हो तू म्हणतेस ते खरे आहे ! मी आजच घरमालकांना फ़ोन करूँन घर खाली करायचे सांगतो आनी जरा बाहेर जाऊँन गावी जायला गाड़ी मिलते का ते बघतो. आपण दोनच दिवसात सगळे सामान घेऊन गावाकडे शिफ्ट होवु ! आणी जेव्हा केंव्हा सगळे ठीक होईल तेव्हा परत मुंबईला येऊ ! ठीक आहे में येतो तर मग

अंजली : हो ठीक आहे , काही काळजी करू नका सगळे काही ठीक होईल !

समीर : हो तू आहेस सोबतीला मग कसली काळजी !

अंजली चे ऐकून आता समीर च्या मानवरचा ताण थोड़ा हलका झाला होता, समीर ने लगोलग घरमालकांना फ़ोन लावला.

समीर चे घरमालक माने काका मुंबई महापालिकेत इंजीनियर म्हणून रिटायर्ड होऊंन एक नीवंत आयुष्य जगत होते त्यांचा मुलगा अमेरिकेत इंजीनियर होता तिथले वातावरण न मानवल्याने माने कपल परत मुंबईत राहावयास आले होते !

समीर : नमस्कार माने काका में समीर बोलतोय 101 बी "पूर्वरंग"

माने काका : हो समीर , बोल बेटा कसा आहेस तू !

समीर : मी बरा आहे काका एक जरा अर्जेंट बोलायचे आहे !

माने काका : बोल, फ्लैट किवा सोसाइटी मधे काही अड़चन आहे का !

समीर : नहीं काका, तुम्हाला तर माहीत आहे सध्या कोविद-१९ लॉक डाउन मुळे बहुतेक काही महीने मला गावाकडे जायचे होते,म्हणून मी तुमचा फ्लैट खाली करत आहे !

माने काका : अरे पन समीर, आपल्या एग्रीमेंट प्रमाणे तू एक महीना आधी नोटिस दयाला पाहिजे होती !

समीर : काका माफ़ करा पन माझी सध्या अड़चन आहे त्यात पगार ही कापनार आमचा पुढील महिन्या पासून, मग मला तुमचे वीस हजार भाड़े कसे परवडणार, म्हणूनच गावी जायचा विचार मी करत आहे !

माने काका : अरे मग नको देउस भाड़े काही महीने मी तुला नहीं विचारणार ! गेले चार वर्षे तू वेळेवर घरभाड़े दिलेस त्याची बक्शीस समज हवा तर, आम्हाला ही महित आहे कोविद-१९ मुळे सगळ्यांची अड़चन होणार आहे !

समीर : हा तुमचा चांगलेपणा आहे काका ! पन माझी फारच अड़चन होणार आहे फक्त २५% पगारात मुंबईत माझे जमणार नाहीं आणी म्हणूनच मी गावी जायचा ठरवलय !

माने काका : बर तर मग, तुझ्या बैंक अकाउंट ची माहिती पाठव ते तुझे डिपाजिट चे ५०,००० परत करायचे आहेत ! आता तू नहीं राहायचे म्हणतोय तर ते घेऊन आम्ही काय करणार ! तुला गावाकडे कामी येतील या अडचणीच्या काळात !

समीर : माने काका , तुमचे मी आभार कसे मानावे ह्यकारिता माझ्या कड़े शब्दच अपुरे आहेत !

माने काका : अरे असू दे ! आता व्यवस्थित गावी जा स्वतःची व परीवाराची काळजी घे ठीक आहे !

समीर : ठीक आहे काका तुम्ही पन काळजी घ्या !

एवढे बोलूं समीर ने फ़ोन ठेवला, मैग त्याने त्याचा बैंक अकाउंट चा मैसेज माने काका ना पाठवला !

अंजली ला सामनाची बंधा बांध करण्यास सांगून तो गावाकडे जाण्यासाठी गाड़ी ठरवण्यास घराबाहेर पड़ला !

तसा त्यांचा परिसर सध्या तरी खुला होता म्हणून तो बाइक वर निघाला इतक्यात त्याला त्याचा मित्र निर्वाण भेटला !

समीर ने निर्वाण ला बघून त्याने त्याची गाड़ी थांबवली !

निर्वाण : काय भावा समीर इतक्या घाइत कुठे चाललायस !

समीर: अरे निर्वाण काय सांगू तुला यार, माझा कंपनी चा प्रॉब्लम झाला २५% पगार आणी वर्क फ्रॉम होम ची आर्डर दीली आहे यार साहेबांनी, अड़चन होईल यार म्हणून अर्जेन्ट गावाकडे निघालोय त्याकारिता गाड़ी पाहिजे होती ! तुझे कोई ओळखीचे आहे का बघ ना यार !

निर्वाण : गाड़ी विथ ड्राइवर च अवघड आहे, कारन लॉक डाउन मुळे आधीच बाहेरचे सगळे टैक्सी वाले मुंबई बाहेर पडले आहेत, आणी जे आहेत ते स्वताच्या जीवाच्या भीतीने घरातून बाहेर पडायला तयार नाही !

समीर : नहीं ना यार निर्वाण काही तरी जुगाड़ असेल तर बघ ना यार ! कस ही करूँन आता गांव गाठायच आहे बस:!

निर्वाण :आता उपाय एकच बघ तुला पटल तर! आपण तुला एकदी जूनी गुड्स केर्रियर गाड़ी मिळवून देऊ शकतो तू तिच्या मधे बसून संपूर्ण सामान घेऊन गावाकडे जायचे !

समीर : अरे पन इतक्या लवकार गाड़ी कशी मिळणार, ाणी गाड़ी तर महाग असेल माझ्या कड़े इतके पैसे नहीं आहेत !

निर्वाण : अरे तू टेंशन नको घेऊ मी बघतो !

आणी समीर अजुन कही बोलणार इतक्यात निर्वाण ने त्याच्या मोबाइल मधून कोणाला तरी फ़ोन केला !

निर्वाण : क्या असद भाई, कहा है तुम एक काम है भाई अपने एक बन्दे को ना एक गुड्स कर्रिएर गाड़ी मांगता है अर्जेंट में सस्ती और टिकाऊ कोई है तो बताओ !

निर्वाण : क्या बहुत बढ़िया ५०,००० में पिकअप जीप है , हां है चलगा बॉस कोई भी मॉडल हो बस गांव तक पहुंच जानी चाहिए ! अपने दोस्त को अर्जेंट है जरा ! ठीक है बावा तुमको मिलने अभिच आते हम लोग, बस गाड़ी टका टक तैयार रखना !

फ़ोन कट करूँ निर्वाण समीर च्या बाइक वर बसून जुन्या गाड़ी बाज़ारकडे निघाला !

दोघे एका गजबजलेल्या बदनाम वस्तीत आले ! तिथे असद भाई चे गेरेज होते ! तिथे बाहेर एक हाडकुला इसम बसला होता ! निर्वाण ला बघितल्याबरोबर तो हसत हसत पुढे आला !

असद भाई : और निर्वाण भाई कैसा है तुम, आओ आजकल तो तुम मानो गायब ही हो गए हो ! कोरोना से डर गए हो क्या !

निर्वाण : क्या करे असद भाई अब पहले वाला माहौल तो नहीं रहा, पुलिस वाले तो कोई सड़क पैर देखते ही कूट डालते है ! और उप्पर से ये बीमारी ! भला नन्ही सी ये जान क्या बचाये पुलिस की डंडे से अपनी पीठ बचाये या कोरोना की कहर से अपने जान बचाये !

असद भाई : बात तो तुम्हारी सही है ! बताओ तुम्हारे किसी दोस्त को गाड़ी चाहिए थी ना !

निर्वाण : हां असद भाई ! गाड़ी पाहिजे एक हा आपला दोस्त दोस्त समीर ! ह्याला गावी जायचय अर्जेंट त्याकारिता एक सस्ती ानी टिकाऊ गाड़ी पाहिजे होती !

असद भाई :अरे यार असद भाई आहे तो पर्यंत तुम चिंता नहीं करने का ! कलच आपल्या कड़े एक नयी पिक अप ट्रक आयेली है, माझ्या मागे या दाखवतो तुमच्या कामाची चीज़ !

दोघे ही निर्वाण आणी समीर असद भाई च्या मागे चालू लागले !

बारीक़ गली बोलतुन चालत ते शेवटी एका स्क्रैप च्या मैदानात पोहचले ! तिथे बरीच वाहने वाहन उभे होती !

तिथल्या एका पंटर ने असद भाई ला बघून गेट उघडले !

असद भाई : गफूर ये अपने दोस्त है इनको एक गाड़ी मांगता है !

गफूर ने एक नज़र निर्वाण आणी समीर कड़े टाकली,

गफूर : लेकिन असद भाई ये आदमी तर कोणी जेंटलमन दिसताय ! आमच्या गाड्या बिना पेपर च्या आहेत ! काही पुलिस चा चक्कर झाला तर ह्यांना सांग इथेच स्क्रैप यार्ड मधे दफना करेल ह्यांना !

त्याचे ऐसे बोलने ऐकून समीर तर गारच पड़ला, पन निर्वाण नहीं कारन त्याला असद सोबत राहून अशे बोलने ऐकण्याची सवय होती!

निर्वाण : नै हो गफ्फूर भाई ! कोई लफड़ा नहीं होगा हमको बस गांव जाने तक गाड़ी मांगता है ! आता अर्जेंट आहे इसे लिए तुम्हारी पनाह में आये है !

गफ्फूर : ठीक है !

आता गफ्फूर त्यांना तिथे उभ्या असलेल्या एका पिक अपट्रक कड़े घेऊन गेला !

गफ्फूर : तो मंडली ये देखो ! हा ट्रक कालच एका कस्टमर ने घाई मधे विकून गेलाय ! कंडीशन बरी आहे फ़क्त पेपर नाहीत कीमत फ़क्त पचास हज़ार !

ट्रक खरोखरच चांगला होता ! त्यावर जास्ती डेन्ट्स न्हवते ! टायर आणी इंजन पन बरे दिसत होते !

निर्वाण ने गाड़ी पूर्ण आत बाहेर बघून घेतली, आणी तो काहीतरी बोलण्याकरीता समीर ला एका बाजूला घेऊन गेला !

निर्वाण : सम्या बघ गाड़ी बरी आहे, आणी तुझी गरज फ़क्त गावाकडे जाण्यापुरती आहे ती भागून जाइल असे मला वाटते!

समीर : अरे पन ही गाड़ी विणा कागदपत्रांची आहे चोरीची बिरीची कुठल्या गुन्ह्यात वापरलेली असेल तर, आनी मधेच जर काही पुलिस बिलिस भानगड़ मागे लागली तर!

निर्वाण : अरे सम्या काळजी करू नको, हां आसिफ भाई आहे ना तो नकली कागदपत्रांची व्यवस्था करेल ह्याचे मी बघतो ! तू फ़क्त गावी जाण्याचा विचार कर !

समीर : ठीक आहे चल तर करू मैग डील फाइनल !

निर्वाण : तू फ़क्त बघ मी कशी डील करतो ते !

आता निर्वाण ने असद भाई कड़े बोलण्याकरिता वळला

निर्वाण : असद भाई चलो कोई और गाड़ी देखो ये सौदा नहीं जैम सकता

असद भाई : अरे क्यों निर्वाण भाई अरे ऐसे क्रीम गाड़ी इतने काम पैसे में नहीं मिलेगी !

निर्वाण : अरे असद भाई भला मंगलसूत्र के बिना कोई दुल्हन कैसे सज सकती है अब गाड़ी चे पेपर्स नहीं तर ही गाड़ी स्क्रैप च्या भावने पैन नहीं बिकनार !

असद भाई : गफूर क्या यार कुछ डिस्काउंट दो भाई ! कस्टमर्स नाराज हो रहे है !

गफ्फूर आता विचारात पड़ला कारण त्याला कसे ही करूँन लॉक डाउन च्या आधी त्याच्या कडील गाड्या विकायच्या होत्या !

गफ्फूर : चलो ठीक है चालीस हजार से में एक रूपया भी कम नहीं लूंगा !

निर्वाण : मगर फिर भी पेपर्स नहीं है तो कोई इसे बीस हजार में भी नहीं लेगा !

आता सौदा हुकला तर गफूर देत असलेले आपले चार हजार कमीशन जाणार या भीतेने आता असद भाई बोलला

असद भाई : अरे निर्वाण भाई कागज पत्तर की लिए इतना अच्छा सौदा मत छोड़ो यार, अगर तुम सौदा फाइनल करते हो तो गाड़ी की कागज में बनवा दूंगा !

निर्वाण ने समीर कड़े बघितले आणी मान डोलउन होकर भरला !

थोड्याच वेळात समीर ने चाळीस हजार गफ्फूर ला एटीएम मधुन काढून दीले, गफ्फूर ने त्याकडे असलेल्या डीजल ब्यरेल मधून गाड़ी मधे डीजल टाकले, असद ने एका पंटर ला फ़ोन करून गाड़ी चे डुप्लीकेट डाक्यूमेंट्स बनवून समीर च्या स्वाधीन केले.

थोडेच वेळात समीर आनी निर्वाण तो पिकअप जीप घेऊन निघाले , समीर ची बाइक गाड़ी च्या ट्राली मधे ठेवली होती!

निर्वाण ला होटेल मधे पार्टी देऊन आनी त्याचा निरोप घेऊन समीर घरी जायला निघाला !

दुसऱ्या दिवशी त्यांनी घरातील जेवढा घेता एईल तेवढ सामान गाडीत भरले. बाकी उरलेले वजनदार सामान माने काकानी बालकोनी मधे ठेवण्यास समीर ला परवानगी दीली.

माने काका व इतर शेजारयांचा निरोप घेऊन समीर अंजली आनी अथर्वा त्या गाड़ी मधे बसून मुंबई मधून त्यांच्या गावाकडे जायला निघाले.

पन त्यांच्या या सध्या मुंबई ते गावकडील प्रवासात त्यांच्या पुढे नशीबाने काय वादळ वाढून ठेवले होता याची त्यांनी कधी कल्पनाही नसेल !

To Be Continue..........

इतर रसदार पर्याय