बहिण-भावाचे नाते हा अनमोल ठेवा आहे. तो सहजा सहजी मिळत नाही. आज बहिण भावाच्या नात्याबद्दल मनात आलेले बोल मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
रक्षाबंधन विशेष लेख
ज्यावेळेस एखाद्या कुटुंबात नना राजकुमार जन्माला येतो. त्यावेळेस बहिणीचा आनंद गगनात मावेनसा होतो. त्या बाळाभोवती फिरणे, आई-बाबांना सतत आपल्या बापू बद्दल कुतूहल सांगणे, त्या बाळाला नाव काय ठेवायचे, कोणते ठेवायचे, इथपासून तयारी अगोदरच करते. ही बहीणच....!
ज्यावेळेस मैत्रिणीसोबत बहिण खेळत असते. तेव्हा ती सतत आपल्या बापू साठी मी हे करीन, मी ते करीन, बापूला हा ड्रेस घेऊन देईल, तो देईन. ही डॉल बापूची होय. कुणी त्याला हात लावू नका. अशी आपल्या मैत्रिणीसोबत बोलत असते. ती प्रेमळ बहीणच....!
ज्यावेळेस तो बाळ वाकडे तिकडे बोलण्यास सुरुवात करते. त्यावेळेस बहिण अवतीभोवती त्या बाळाशी खेळत असते. त्या बाळाचे स्वर ऐकून बहिणी इतकी आनंदित होते की, आजी आजोबा पाशी जाते. आई पाशी धावत घरात जाते. बाबा येण्याची वाट पाहत असते. बापू बोलायला लागला म्हणून सांगण्यासाठी. तिची धावपळ पाहून किती आनंद होतो त्या बहिणीलाच माहिती....!
ती बहिणी आईपाशी बसून बाळाला वरण-भात चारताना पाहते. त्या वेळेस त्या बाळाला आपल्या मांडीवर बसवून आई तो घास भरते. तसा घाल मी भरवतो म्हणून विनवणी करते. ती मायाच बहिणीची असते. त्या बाळासाठी....!
ज्या वेळेस चॉकलेट खात असते. तेव्हा तो बापू बहिणीच्या तोंडाकडे पाहत असते, तेव्हा ती आईकडे विनंती करते बापूला चारू का ग म्हणून. चॉकलेट तोडून थोडा चॉकलेट चा तुकडा त्या बाळाच्या तोंडात टाकते ती बहीण असते.
ज्यावेळेस बाळ खेळता-खेळता जमिनीवर पडते. त्या वेळेस त्या निरागस बाळाकडे पाहून बहिणीच्या मनात कितीही दुःख होते ते तिच्या अश्रूतूनच दिसत असते. आई मला मारणार या भीतीने ती रडत नसते. माझा छोटासा भाऊ रडत आहे. त्याला किती लागले, काय होणार, तो रडता रडता कधी थांबणार, त्याला दवाखान्यात न्यावे लागणार नाही ना. या भीतीने तिचा कंप भरून येतो.ती माया नाही तर काय आहे. या बहिणीची....!
ज्यावेळेस बाळाला अंगणवाडीत घेऊन जाण्यास आई त्या बहिणीला सांगते. त्यावेळेस हात धरून त्याला घेऊन जाते. त्यावेळेस संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी ती सांभाळत असते. आपल्या लहानशा भावाची. बापू माझा हात सोडू नको. गाड्या येतात, रस्त्याच्या बाजुला नाली आहे. म्हणून सतत आठवण करून देत असते. त्या भावाबद्दल ते प्रेम नाही तर काय समजायचे....!
ज्यावेळेस भाऊ हळूहळू मोठा होत जातो. त्यावेळेस तोच भाऊ बहिणी बद्दल खाण्या पिण्या बद्दल भांडण करतो. पैशासाठी झगडतो. त्यावेळेस ती मुकाटपणे सहन करते. त्या नात्याला आपण काय उपमा द्यायची....!
ज्यावेळेस बहीण मोठी होत जाते. भाऊ लहानच असतो. भाऊ कपडे लत्यासाठी रडतो, रागा येतो, घरच्या सोबत भांडतो. पण बहीण आपल्या भावासाठी चिक्कार शब्दही काढत नाही. कारण मी कपडे मागायचे कसे. आपली परिस्थिती कशी आहे याची जाण त्या बहिणीला आहे. भाऊ तर खूप लहान आहे. त्या बहिणीसाठी....!
बहिणीसाठी भाऊ केव्हाच मोठा होत नाही, तो लहानच असतो. तोच निरागस आपल्या मांडीवर बसणारा. माझ्या कडेवर फिरणारा, माझ्या ताटातला घास घेणारा, तोच असतो भाऊ. वयाने मोठा होत असला तरीही आपण त्याला टोपण नावानेच हाक मारतो. ती बहीणच असते बरं....!
बहिणीची माया निराळी असते, आई जोपर्यंत आपल्यासोबत आहे. तोपर्यंत बहिणीची माया कळते पण वळत नाही. अशी परिस्थिती असते भावाची....!
पण कालांतराने बहिणीची मायाच आपल्या ममतेचा पाझर देत असते. तेव्हाच कळत असते. बहिण काय असते ती आपल्यासाठी....!
रक्षा बंधन दिनानिमित्त विशेष लेख लिहिण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल वाचकांचे धन्यवाद.....!
रक्षाबंधनाचे हार्दिक अभिनंदन......!
लेखन कर्ता:- मारोती बाबाराव डोंगे
मु.पो. कोरपना त. कोरपना
जि. चंद्रपूर
9765015508