कादंबरी – प्रेमाची जादू
भाग-२ रा
-------------------------------------------------------------
मैत्री-नात्याला दुसरे कुठले लेबल लावणे , म्हणजे फ्रेंडशीपचा इन्सल्ट केल्यासारखं वाटते",
यशची ही फिलॉसफी काही जणींना पटते काहींना फिफ्टी -फिफ्टी पटते .
पण त्यांचे एकच म्हणणे असायचे -
यशला आम्ही इथे समोर बसवून आमची शापवणी ऐकवणार , त्याशिवाय
हमरे टूटे दिल को थंडक कैसे मिलेगी ?
यातल्या काही मैत्रिणींचे “गरम दिमाग थँडे होने का नाम नही ले रहे थे !
पोरं-पोरी जमलेले असतांना,
पोरींनी यशला म्हटले-
ए हिरो - ऐक जरा तू-
- ही आजची पार्टी म्हणजे -
आम्ही तुझ्यासाठी एरेंज केलेली "खुन्नस -पार्टी " आहे असे समज ,
आम्ही आज तुला सामुहिक शाप देणार आहोत.
तेव्हा हे बालक -
ले सून हमारी शापवणी-"
या पोरींनी शेवटी एकमताने यशला " सामूहिक शापवाणी " ऐकवली -
एकमताने या सगळ्या सुंदर ,देखण्या मुलींनी यशला म्हटले –
यश -तू आमच्या नाजूक मनाला दुखावले आहेस ,
आमचे दिल तोडले आहेस ..
याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे म्हणून
आम्ही तुला आज सामुहिक शाप देतो की,
हे पाषाण हृदयी माणसा,
तुझ्या नावात जरी "यश " असले तरी-
तुला तुझ्या प्रेमात कधीच यश मिळणार नाही.
एखादी पोरगी, कध्दी सुद्धा या दगडाच्या प्रेमात पडणार नाही,
आणि चुकून असे कधी झालेच तर ..
आम्ही त्यात अजून एका शापाची भर टाकतोय ..तो असा की -
तू तिचे प्रेम मिळवण्यासाठी लई तरसशील ,तिच्या मिनतवाऱ्या करशील
पण, ती अशी खमकी असेल की ..
तुला तुझे हे प्रेम इजिली बिलकुल मिळणार नाही, ...!!!!!!
तुझी जादू तिच्यावर अजिबात म्हणजे अजिबातच चालणार नाही ..!
शांतपणे यशने हे सगळं एकूण घेतले
ही शापवणी ऐकून घेतल्यावर यश त्यांना सरळ शरण येत , हात जोडीत म्हणाला
हे सुंदर तरुणींनो, तुमचे कोमल हृदय असे कठोर कसे होऊ शकते ?
असा शाप नका देऊ हो मला,
काही झालं तरी, कितीही केलं तरी तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात ,
फ्रेंड आहोत आपण .
इतक्या कठोरपणे वागू नका माझ्याशी .
तुम्ही शाप दिला मला ..पण, हे माहिती नाही का तुम्हाला की -
जे शाप देतात , त्यांनीच शाप दिला की लगेच एक उ:शाप देखील -फ्री-गिफ्ट म्हणून
द्यायचा असतो ,
तेव्हा , तुमचा उ:शाप, जो काही असेल तो पण लगेच देऊन टाका तर बरे होईल ..!
सगळ्या पोरींनी यशकडे मोठ्या प्रेमाच्या नजरेने पाहिले ..कारण
हा यश नावाचा आपला लाडका दोस्त आपल्या समोर
अगदी हात जोडून बसला आहे "हे पाहूनच खरे म्हणजे या पोरींचे भान हरपले होते,
त्यांना काहीच सुचत नव्हते ..
त्या सगळ्या कोमल मनाच्या सुंदरींना यशची दया येणे साहजिकच होते ,
किती झाले तरी या पोरींचा
"first Crush " होता हा यश .
मग लगेच त्यांनी उ:शाप देण्याची सामुहिक घोषणा केली –
त्या म्हणाल्या -
"हे यश , तुझी सत्कृत्ये इतकी आहेत की, तुझ्या या वजनदार पुण्याई समोर
आम्ही आमची ही किरकोळ शापवाणी " मागे घेतली पाहिजे असे आम्हां वाटते आहे ..!
म्हणून , तुला आम्ही असा उ:शाप देतो आहोत की -
हे यश .
तुझ्या नशिबात जेव्हा कधी "प्रेम योग येईल ,
प्रेम होईल , ते जुळेल , वगरे सगळं काही होईल
..पण,
त्यात यशला – या प्रेमाच्या खेळात सहजासहजी “यश " येणार नाही...हे नक्की ..!
मात्र –त्यासाठी जर तू आमच्या पैकी कुणाची मदत घेतली,
आम्हाला विनवणी केली , हात जोडून याचना केली तर मग मात्र
ती ..जी कुणी असेल ,त्या तुझ्या होणार्या प्रेयसीचा होकार ,तिचे प्रेम
तुला मिळावे यासाठी आम्ही सगळे मनापासून प्रयत्न करू
आणि तुझे प्रेम तुला नक्की मिळवून देऊ .”
थोडक्यात तुला आमच्या पासून काही ही लपवता येणार नाहीये ..समजले ?..
बोल -आहे का कबुल ?
हे ऐकून घेत यश म्हणाला -
हो बाबा हो , तुम्ही म्हणाल तसेच होईल ,आणि तुमच्याशिवाय माझे कोणतेच
काम पूर्ण होईलच कसे ?
तुमच्या सगळ्या अतीरेकी -अटी कबूल न करून सांगतो कुणाला ,
कारण आज मी म्हणजे ..
तुमच्या सामोर तुमचा एक अपराधी आहे ,अशी अवस्था केलीय तुम्ही माझी.
तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात ,हे मी कसे विसरू शकतो ? कधीच नाही ..
तेव्हा या मासूम माणसाला माफी करून टाका ..!
शेवटी यशला माफ करायचे , तो जसा सगळ्यांना कायम मदत करतो , तसे आपण सगळ्यांनी
मिळून नेहमी त्याला मदत करायची ,असा ठराव सगळ्या पोरींनी मंजूर करून टाकला .
आणि त्या दिवशीच्या हॉटेल मधल्या मेनूचा फडशा पाडला ..
आलेल्या बिलाचा आकडा ..पाहून ..यशचे डोळे पांढरे झाले ..!
बाप रे ..... किती मोठी शिक्षा केलीय या बदमाश पोरींनी , त्यापेक्षा एखादी बरोबर
प्रेम जमवले असते तर इतका मोठा फटका बसण्याचे वाचले असते ..!
यशला अशी टोपी घालून सगळ्या मैत्रिणींना मोठेच समाधान मिळाले आहे “
हे ओळखून ..यशचे मित्र म्हणाले ..
चला आता ..पुरे झाले ..तुमचे असे त्रास देणे ..!
पार्टी संपवून यशला घरी येण्यास बराच उशीर झाला होता .. आई-बाबांची बेडरूम ,
दादा –वहिनींची बेडरूम ..दोन्ही मधले लाईट ऑफ झालेले होते . आणि या सगळ्यांची
सकाळ तशी खूप लवकरच होत असते ..त्यामुळे उशिरा पर्यंत जागरणे ..सहसा टाळली
जातात .
खिशातल्या चाव्या काढीत ..एकेक दरवाजा उघडीत ..यश हॉल मध्ये येऊन बसला ..
लगेच काही झोप येणार नव्हती ..म्हणून ..तो त्याच्या रूम मध्ये न जाता ..हॉलमधल्या
सोप्फ्यावर लोळत पडला ..आणि त्याच्या नजर स्वताच्या घरात फिरत राहिली आणि मनात
अनेक विचार सुरु झाले ..
इतक्यात ..आई-बाबांच्या रूम मधला लाईट लागला आहे असे त्याला दिसले ..तसा यश उठून
बसला ..
त्याचे बाबा ..हॉलमध्ये येत त्याच्या बाजूला बसत म्हणाले ..
तुझीच वाट पहात ..आम्ही दोघे इतक्या वेळ जागत राहिली ..तुझ्या आईला आत्ताच झोप लागली
म्हणून मी एकटाच बाहेर आलो ..उगीच तिची झोपमोड व्हायला नको !
हो बाबा ..आज जरा उशीरच झाला मला ..सॉरी...!
यशने सॉरी म्हटल्यावर .बाबा म्हणाले ..
अरे ,तुला उशीर का झालाय ? हे विचारण्य साठी मी जाग्लेलो नाही ..
तुला एक महत्वाचा निरोप देण्यासाठी ..मी जागा राहिलो आहे ..
बाबांचे बोलणे ऐकून ..यश म्हणाला ..
इतका महत्वाचा निरोप आहे ? तुम्ही फोन करून ही सांगितला असता तर मी पार्टी
सोडून आलो असतो ना बाबा ..!
निरोप ..गंभीर वगेरे .नाहीये ना काही ?
यशचे शब्द ऐकून बाबा म्हणाले ..
अरे, असे काही नाही ...ऑल इज वेल आहे ..!
फक्त तुला सकाळी सकाळी एक काम करायचे आहे, त्याला उशीर होऊ नये म्हणून ..
इतका वेळ जागत बसलोय ..
हो का ..सांगा बाबा ..! मी वेळेवर करीन ..डोंट वरी ..!
होय यश – सांगितलेले काम तू करणार ..त्या बद्दल शंकाच नाही ..
यशने म्हटले .बाबा - काम काय आहे ,सांगा ..! झालेच म्हणून समजा ..!
अरे सकाळी –सकाळी म्हणे सहा वाजता तुला रेल्वे- स्टेशनला जायचे आहे ..
माझे आई-बाबा ..म्हणजे तुझी अम्मा –आजी – बापू आजोबा येत आहेत शताब्दी एक्स्प्रेस ने !
हे ऐकून ..यश आनंदाने म्हणाला ..
ग्रेट ..! यासाठी तर मी उद्या मारीत जाईन हो बाबा ..!
हे ऐकून..त्याचे बाबा म्हणाले ..
यस ,आय नो ..बेटा ..!
पण, तू उड्या मारीत जाऊ नको ..आपली कार घेऊन जा ..आणि सावकाश तुझ्या
आजी-आजोबांना घेऊन ये ..!
ओके बाबा ..तुम्ही आता शांतपणे झोपा ..
मी माझे काम करतो ..आजी –आजोबा आल्यावरच तुम्हाला सगळ्यांना उठवीन ..!
त्यावर बाबा म्हणाले ..
यश ..आपल्या घरातली सकाळ त्या अगोदरच सुरु झालेली असणार ..
तुम्ही याल तेव्हा . चहा रेडी असेल ..
सगळे मिळून गुड मोर्निंग चहा घेऊ या ..!
यश म्हणाला – यस बाबा , अगदी असेच होईल ..
तुम्ही झोपा आता शांतपणे ..बाय , गुड नाईट ...!
सगळ्या मित्र –मैत्रिणी सोबत मस्त पार्टी झाल्यामुळे यशचा मूड अगदी मस्त होता ,
त्यात बाबांनी अम्मा –आजी आणि बापू –आजोबा येणार हे सांगून आनंद वाढवला होता .
यश त्या आनंदात ..त्याच्या रूम मध्ये गेला ..पडल्या पडल्या त्याच्या मनात विचार
येऊ लागले ..
जवळपास सहा महिन्या नंतर आजी-आजोबा त्यांच्या या मुलाकडे ..म्हणजे यशच्या बाबांच्या
कडे आता चांगले ..सहा महिने राहण्यासाठी म्हणून येणार ..हे नक्की ..कारण बापू –आजोबा
त्यांच्या नियमा प्रमाणे ..त्यांच्या दोन्ही मुलाकडे ..सहा –सहा महिने येऊन राहत असत ..
हा मुक्काम कधी कमी होत नसे आणि त्यापेक्षा कधी जास्त झालेला नाहीये .हे यशला
नेहमीच जाणवत असायचे .
यशला एकच आत्या , ती आणि यशची बहिण असे हे दोन्ही परिवार परदेशात स्थायिक
झालेले ...
ज्या ठिकाणी .आजी-आजोबांचा मुकाम असेल ..त्या दिवसात ..या दोन लेकीनी
भारतात ..यायचे ..असा नियमच अम्मा –आजी आणि बापू आजोबांनी करून दिलेला होता .
हाच नियम ..मोठ्या काकांच्या लेकीसाठीचा होता ..त्यामुळे आजी-आजोबा जेव्हा यशच्या
बाबांच्या घरी मुक्कामास असत ..त्या दरम्यान ..यशच्या या चुलत बहिणीने ..-बागेश्रीने
या माहेरच्या घरी माहेरपणाला यायचे ..हे सर्वांनी मान्य केले होते ..
त्यामुळे आता येते सहा महिने ..यशची आत्या आणि परिवार ,यशची स्वप्ना –दीदी-आणि तिची
फमिली आणि बागेश्री –ताईचा परिवार ..एकाच वेळी किंवा ..त्यांच्या सोयीच्या वेळे प्रमाणे
येऊन राहून जाणार ..हे पक्के ..
म्हणजे .. हा बंगला ..हे घर ..ज्याचे नाव ..”गोकुळ “ आहे ..ते गजबजून जाणार ..!
घराचे नाव “ गोकुळ “असावे “अम्मा –आज्जीची ही इच्छा सर्वांनी पूर्ण केली होती .
अम्मा-आजी येणार ..म्हणजे ..
आता यशचे लग्न करून टाका बरं ..! हे शेवटचे काय आहे आपल्या घरातले
आमच्या डोळ्यासमोर होऊ द्या ..म्हणजे ..आम्ही आपले डोळे मिटायला मोकळे ..!
आज्जे असे काही बोलते ..आणि मग, सगळे तिच्यावर तुटून पडतात ..
काही पण नको बोलत जाऊ अशी ..!
अशा बोलण्यातून ..अम्मा आजीला .सगळ्यांच्या मनातल्या प्रेमाची ,मायेची जाणीव होते ,
हा स्पर्श मनाला झाला की आजीच्या चेहेर्यावर आनंद दिसतो “,
खरेच ..अम्मा –आजी नेहमी म्हणते ..
यश राजा – प्रेम ही अशी भावना आहे की ..कठोर माणूस ही या प्रेमाच्या शब्दाने विरघळून
जात असतो . सामन्य माणसाला पैशाची गरज नसते ..त्याला हवे असतात आधार देणारे
प्रेमाचे शब्द ..!
बरोबर आहे आजीचे ..म्हणूनच तर ..आपण आपल्या गरजू मित्रांना प्रेमाने मदत करतो ,
ते म्हणतात ..
यश , पैसे तर ..कर्ज घेऊन ही मिळतात ..
पण..प्रेम नाही मिळत ..म्हणून प्रेमासाठी ,ते मिळण्यासाठी माणसाचे मन कायम धडपडत
असते ..
आणि पैशाचे कर्ज एक वेळ फिटून जाते ..प्रेमाचे कर्ज कधीच फिटत नसते ..या कर्जाच्या
ओझ्याखाली रहाण्यास माणसे आनंदाने तयार असतात .
मित्र काय आणि मैत्रिणी काय ,नेहमी म्हणतात –
यश – तू तर सगळ्यांना प्रेमाची मदत करतो , प्रेमाने त्यांच्यासाठी करतो ..
देणार्याला कमी माहिती ..पण..या प्रेमाची जादू “ आम्हाला ..घेणार्याला माहित आहे.
मित्रांच्या बोलण्यातून ..वागण्यातून ..हे अनुभवतांना आपल्या मनाला खूप समाधान मिळते
हे मात्र खरे ..!
आजी म्हण्यची ..यश ..अरे काय हे..तुला अजून तुझी मैत्रीण सापडली नाहीये ,
कम्माल आहे ही तर ..!
पोरींना तू दिसत नाहीस की ..तुझ्या नजरेत कुणी भरली नाही अजून ..!
काळजी नको का करू ..कुणी तरी ..कुठे तरी असेलच ..
वाट पाहू या तिची ..
जिच्या प्रेमाची जादू ..तुझ्या मनावर होईल ...!
यश मनाशी म्हणला ..
आहे का अशी कुणी ? भेटेल का ..
जिला पाहून दिल मे..प्यार की घंटी ..बजेगी ...!
या विचारातच यशला केव्हातरी झोप लागली ..!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी वाचू या ..पुढील भागात ..
भाग – ३ रा , लवकरच येतो आहे ..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------