जीवन जगण्याची कला भाग - १ Maroti Donge द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जीवन जगण्याची कला भाग - १



जीवन कशाप्रकारे जगावे आणि कशी जगू नये. ही एक अशी कला आहेत. ती सहजासहजी समजत नाही, म्हणून मी काही बाबी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
माणूस हा प्राणी आज अशा रुपात दिसत आहे. त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आज प्रत्येक जण धावपळीचे जीवन जगताना दिसत आहे. ते कितपत योग्य आहे आहे, त्यांचा विचारही याभागात होणे आवश्यक आहे. माणूस हा इतका गुंतला आहे की, जीवनाची परिभाषाच बदलवून जगत आहे.
समाजशील प्राणी म्हणजे माणूस. पण त्याच समाजात वेळ देण्यात कमी पडत आहे, तो ही माणूसच आहे. म्हणूनच माणसाने आपले अधिकार ओळखले पाहिजे तेव्हाच तो समाजशिल प्राणी म्हणून गणला जाईल माणसाने माणुसकी सोबत मैत्री करायला पाहिजे .माणुसकी म्हणजे काय ? समाजातील व्यक्तीच्या हृदयाच्या समीत जाण्याचा प्रयत्न म्हणजेच माणुसकी सोबत मैत्री करणे होय.
आजची धावपळही कुणालाही शांतपणे जगू देत नाही. त्यातून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. ठीक आहे...! आपण आपल्या जीवनासाठी करत असलेली धावपळ हे कुटुंबाला आनंद देण्यासाठी असली तरी, पण आपण कुठेतरी कमी पडत आहोत. त्याची जाणीवही आपल्याला होणे आवश्यक आहे. कुटुंब म्हणून आपल्या जबाबदाऱ्या ओळखायला शिकले पाहिजे, पण त्याच कुटुंबात असलेल्या पाल्यांना विसरून चालणार नाही. कुटुंबात तर 'मी' म्हणजे कुटुंब होत नाही. हे आपण समजायला पाहिजे. आपण एका कुटुंबाच्या चार भिंतीतला एक खांब आहोत. याची जाणीव आपल्या हृदयाला होत नाही. तोपर्यंत आपण कच्चा असलेला भिंतीचा खांब असतो. तो केव्हा कोसळेल सांगता येत नाही.
जीवन हे एक अशी कला आहे. त्यात यश संपादन करण्यासाठी जबाबदारीची जाणीव होणे आवश्यक आहे. माणूस म्हणून आपण कुठे कमी पडत आहोत. त्यांची जाणीव होणे म्हणजेच जबाबदारीची कल्पना डोक्यात येण्यासारखे दिसते.
जीवन हे कशी शब्दकोडे आहेत. एक एक रकाना भरून काढण्यासाठी वाचनाची आणि अभ्यासाची आवश्यकता असते. त्याप्रकारे जीवनाच्या शाळेत व्यावहारिक शिक्षण व ज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.
आपली ओळख ही कशा पद्धतीने बनत जाते. ती समाजासाठी उपयुक्त बनते की, घातक परिधान करते. त्यावर माणसाचे जीवन अवलंबून असते. माणूस जेव्हा आपल्या मर्यादा ओलांडतो, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्यावर परिस्थिती निर्माण झाली असते. त्याची जिम्मेदारी घ्यायला समोर येतो आणि समाजाला आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याच खरा कुटुंबाचा मजबूत खांब असतो. ज्याने घातक कृत्य केलं तो तर जबाबदारीतून पळवाटा शोधतो. पण कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी तोच खांब पूर्ण करत असतो. त्यालाच जीवन जगण्याची कला आत्मसात केलेली असते.
माणसाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येत असतात. तो पोटात सामावून ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण कुटुंबाला त्रास झाला नाही पाहिजे या उद्दात हेतूने. मग ते संकट आर्थिक असो वा मानसिक पण तो संपूर्ण खचून जातो. पण चेहऱ्यावर त्याची छाया पडू देत नाही. असे व्यक्तिमहत्त्व निर्माण केले. या निर्मात्याने .
आज जे युग आलं आहे. त्यावरही विचार मांडणे आवश्यक आहे. सतत आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आपण काय नाव द्यायचे. हा ही प्रश्नच आहे. त्यांना जीवनात समाधान मिळाले नाही म्हणून असे पाहुल उचलले म्हणायचे की, कुठे तरी त्याच्या मनात येणाऱ्या अडचणी सोडवू शकलो नाही. म्हणून पश्चाताप करायचा. असे त्या व्यक्तीने नको करायला. पण त्यानेही मार्ग शोधण्याचा प्रयत्न तर केला असेल न. त्या अनुषंगाने आपण बाजू मांडली पाहिजे.
जीवनामध्ये तर असे कित्येक संकटे येतात त्याला भिऊन चालणार नाही. कारण जीवन त्या तीन शब्दावर उभे आहे. त्याला आपण वेगळं करू शकत नाही. आणि आपण आपल्या जबाबदाऱ्या पेलण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपण अर्धे युद्ध जिंकल्यासारखे वाटते. आपण हरेल म्हणून भ्यायच नाही. तर जिंकण्यासाठी मैदानात उतरायच...!