कादंबरी - प्रेमाची जादू भाग - ७ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाची जादू भाग - ७ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग- ७ वा

------------------------------------------------------

यशचे कार-शॉप म्हणजे एखाद्या ब्रांडेड कंपनीच्या शो -रूम सारखेच अगदी कॉर्पोरेट डिझाईनचे होते .

ऑफिस-स्टाफ , आणि आलेल्या कस्टमर साठीचा वेटिंगहॉल, बसण्यासाठीची लक्झरी सिटींग सिस्टीम

आत येणारा नवखा कस्टमर पुरता इम्प्रेस होऊन जातो . गेल्या पाच-सहा वर्षात यशच्या या कार-शॉपीने

टू-व्हीलर –फोर व्हीलर वाहनसाठी लागणाऱ्या बारीक-सारीक गोष्टी उपलब्ध करून दिल्याने ,

कार-कंपनी देखील काही प्रोब्लेम आला तर कस्टमरला यशच्या शो-रूमला जाण्याचा सल्ला देऊ लागले.

यशची केबिन मध्ये गेल्यावर मात्र.आतले दृश्य एकदम वेगळे आहे..

एकदम साधे ..एक मोठा टेबल यशला बसण्यासाठी असलेली खुर्ची ..फार भारीची वगेरे नव्हती ,

यशच्या खुर्चीच्या मागे जी भिंत होती ..त्यवर आजकाल पहायला मिळतात तसे चित्र ,पोस्टर असे काही

नव्हते ..तर ..एक लोखंडी सिंगल दरवाजा होता ..तो पण..अर्धा उघडा असलेला ..

समोरच्या खुर्चीत बसलेल्या कस्टमरला त्या दरवाज्यातून मागे असलेल्या ग्यारेज्चा भला मोठा एरिया

दिसायचा ..नव्या जुन्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर फोर व्हीलर तसेच , भंगार झालेल्या टू-व्हीलर ,

अर्धवट स्थितीत असलेल्या जुनाट कार ..असा सगळा भला मोठा कारखाना नजरेत भरायचा .

या ठिकाणी काम करणारे पाच-पन्नास कारागीर पाहून..यश म्हणजे साधासुधा माणूस नाहीये ,हे लक्षात

यायचे.

बहुतेक वेळा यश केबिन मध्ये न बसता ..आत आपल्या कामगारांच्या बरोबरीने कोणत्या तरी गाडीच्या

दुरुस्तीच्या कामात गढून गेलेला दिसत असे.

स्वतहा मालक असणारा यश , त्याला असे काम करतांना पाहणे.. आलेल्यांच्या सवयीचे नसायचे ..

कारण ..त्यांच्या नजरेस जे लोक पडलेले असतात ते ”स्वतःला सेठ” म्हणवून घेण्यात त्यांचा वेळ जात असतो ,

प्रत्यक्ष काम करणे “ ही गोष्ट त्यांना कमीपणाची वाटत असते.

यशला भेटण्यासाठी आलेल्या ..मिस मोनिका देशमुख ..यांनी आत प्रवेश केला ,तेव्हा

आतले छानदार स्वरूप पाहून ..गुड .नाईस ..!असे रिमार्क त्यांनी मनातल्या मनात देले . समोर बसलेल्या

स्वागतिकेने मोठ्या अदबीने त्यांचे स्वागत करीत ..समोरच्या सोफ्यात बसण्याची विनंती केली ,

आणि त्यांच्या शेजारी बसत..विचारले ..

यस मैडम ..बोलावे ..काय करावे आम्ही तुमच्यासाठी ?

मोनिकाकडे पाहूनच कळत होते की..या कंपनी जॉब मध्ये असलेल्या कुणी हाय-प्रोफाईल वूमन आहेत.

मोनिका सांगू लागली ..

माझे काम पर्सनल आहे आणि तुमच्या या शॉप-आणि शो रूमशी पण संबंधित आहे.

त्यासाठी मला ..मिस्टर यश देसाई यांची भेट आवश्यक आहे. आणि .वेळ “ही गोष्ट माझ्या साठी

अत्यंत महत्वाची आहे.

आता अकरा वाजत आहेत ..मिस्टर यश ..यांनी मला लगेच..वेळ दिला आणि आमची भेट झाली तर

फार बरे होईल .कारण साडेबारा वाजता माझ्या कंपनीत बोर्ड मिटिंग आहे,जी मी अरेंज करते आहे.

मला वाटते ,माझ्याबद्दल इतके सांगणे पुरेसे आहे..

मिस मोनिकाचे हे बोलणे अगदी हसतमुख चेहऱ्याने ऐकत असलेल्या मुलीसाठी हे सो-कॉल हाय-प्रोफाईल

कस्टमर नेहमीचे होते , म्हणूनच की काय ..तिने अगदी सराईतपणे आणि सफाईदारपणे

मिस.मोनिका देशमुख यांना अटेंड केले होते ..अर्थात या झोकदार स्वागताने मिस.मोनिका मनातून खूपच

सुखावल्या होत्या .

मागे ग्यारेज मध्ये असलेल्या ..यशला बाहेर वेटींग करीत असलेल्या मोनिकाबद्दल निरोप मिळाला ..

तसे तर त्याने त्याच्या ऑफिसच्या दिशेने येतांना मिस.मोनिकाला पाहिले होते पण त्यांचे आपल्याशी थेट काम

असेल असा अंदाज त्याला नव्हता आला.

तो त्याच्या ऑफिसमध्ये आला, खुचीत बसला आहे ,याची खात्री करून घेत रिसेपशन –स्टाफ मधील

त्या मुलीने ..केबिनचा ..दरवाजा उघडीत मिस.मोनिकाला आत जाण्याची विनंती केली.

खुर्चीत येऊन बसलेला यश मिस.मोनिकाची वाटपाहत होता ,कारण त्याच्या स्टाफने या कस्टमरला

असलेल्या घाईबद्दल कल्पना दिली होती.

आत आलेल्या मोनिकाचे वेलकम करीत .यश ने बसण्याची विनंती करीत म्हटले ..

मैडम –तुम्ही फार घाईत आहात ,असे मला स्टाफने सांगितले ,

त्यामुळे वेळ न घालवता तुमच्या आजच्या कामा बद्दल सांगावे ,

खुर्चीत बसलेली मोनिका यशकडे पहात होती ..त्याच्या शब्दाकडे तिचे लक्ष नव्हते..

तिला इथे येण्यागोदर तिच्या मावशीने सांगितलेले आठवत होते.

यशबद्दल तिला तिच्या मावशीच्या मैत्रिणीकडून ..कळाले होते ..आणि योगायोगाने ही मैत्रीण यशची

अंजली वाहिनी , त्यामुळे मोनिकाच्या मावशीने मोनिकाला मोठ्या मुश्किलीने यश हे किती छान आणि योग्य

स्थळ आहे हे पटवून दिले होते.

“हे बघ मोनिका –

तुझ्याच फील्डमध्ये काम करणार्या या वाहिनांचा दीर .असणारा .यश ,

ज्याचा मोठा भाऊ तो देखील एका कंपनीत मोठ्या पोस्टवर आहे. हे घर, हा मुलगा

त्यांचे घर,घरातील माणसे , सिटी मध्ये त्यांना असलेला सोशल –रिस्पेक्ट “

याचा विचार् करावा मग..मोनिकाने त्याच्या कामाचे स्वरूप याबद्दल फारसा विचार करू नये.

.तसे म्हटले तर ,

यशला सोसायटीमध्ये त्याच्या सोशल कार्यामुळे खूप रिस्पेक्ट आहे “ .त्याच्या बिझ्नेस्सचा वार्षिक

टर्न ओव्हर पाहिलास तर ..कदाचित तो तुझ्यापेक्षा जास्त असेल.

त्यामुळे ..गाड्या रेपेअर करणार म्हणून “ त्याची टिंगल करून ,त्याला हसून ..नाकारले तर .त्यात तुझे

नुकसान असेल “. कारण यश क्वालिफ़ाइड इंजिनियर आहे, आता तर तो शहरातील एक तरबेज असा

कारचा –डॉक्टर म्हणून ओळखला जातो.

मावशीने इतके स्पष्ट सुनावल्यावर ..निदान .या यश नावाच्या इसमाला भेटायला काही हरकत नाही.

समक्ष भेटीत पुढच्या स्टेप्स बद्दल विचार करू.

" ओ मिस मोनिका – कसला विचार करताय तुम्ही ?

तुम्हालाच वेळ नाहीये ..म्हणून मी घाईघाईने हातावरचे काम सोडून आलोय ..

आणि तुम्ही बोलायचे सोडून बघत बसलात .

यशचे शब्द ऐकून भानावर आलेली मोनिका म्हणाली ..

सोरी ,मी माझ्याच विचारात अडकून गेले होते .

बाय –द –वे ..माझ्या कामा बद्दल स्पष्ट ,काही आड-पडा न ठेवता बोलते आहे.

कारण..इथे येणाचा माझा मूळ उद्देश लपवून ठेवणे ..मलाच आवडणारे नाही..

आपण आपले मत ,हेतू आणि विचार समोरच्याला स्पष्टपणे बोलून दाखवले पाहिजे .

काय बरोबर आहे ना माझा attitude ?

यश म्हणाला -

यास ,अगदी छान आहे तुमचा हा attitude

इतक्या वर्षाच्या या बिझनेस मध्ये .समोरच्या माणसाला ओळखण्याची कला “यशला आता साधलेली होती.

मोनिकाच्या एकूणच बोलण्यावरून ..यशला तिचा येण्याचा हेतू काय असणार ?

याचा अंदाज थोडा थोडा आलेला होता .

मोनिका म्हणाली -

यश ..आपण एकमेकांना अहो-जाहो म्हणून अवघडून टाकू नये असे मला वाटते .

तर ..माझ्या आजच्या इथे येण्याचे कारण म्हणजे ..

माझ्या घरच्या माणसांनी माझ्यासाठी .वर-संशोधन मोहीम सुरु केली आहे”, आणि अलीकडे मलाही

आतुन वाटायला लागलाय की .. लग्न करावे ..आणि छान असे पारिवारिक आयुष्य जगून पाहावे.

आणि तुझी अंजलीवाहिनी .माझ्या मावशीची फास्ट- फ्रेंड आहे.. तिनेच तुझे स्थळ ..माझ्या मावशीला

सुचवले ..मी सध्या याच मावशीकडे राहते आहे, सो,

तिने सांगितलेले मी टाळू शकत नाही “ हे तिला माहिती आहे . यामुळे तिने मला आग्रह केला की

कागदोपत्री जुळवणी करण्यापेक्षा ..समक्ष भेटून तुमचे कितपत जुळू शकेल हे पाहावे.

आणि हे काही एकच एक असे एकमेव स्थळ आहे “असे मुळीच नाही. तुझ्या विचाराने तू निर्णय घ्यावास

आमच्यात असा समजूतदारपणाचा संवाद झाल्यामुळे ..मी आज इकडे आली आहे.

यशने मोनिकाचे पूर्णपणे ऐकून घेत म्हटले ..

असे एका भेटीने ..आणि एका पाहण्याने .आपण एकमेकांना समजून घेऊ शकुत असे मला वाटत नाही.

तुझा अंतिम निर्णय होई पर्यंत आपण भेटू शकतो .

तुझा घरची माणसे जितकी अधीर झाली आहेत .अगदी अशीच तर्हा माझ्या घरातील माणसांची झाली आहे.

मोनिका – तू एक काम कर ..

शनिवार –रविवार ..अंजली वाहिनी फुल टू घरी असते , तिच्या सहवासात ..तू काही तास आमच्या घरात

पाहुणी म्हणून ये..

यामुळे एक होईल ..काही तासात आमच्या घरातील माणसांच्या बरोबर तुला शेअर करता येईल तुझे विचार , तुझ्या कल्पना .

माझ्या अपेक्षा ..काय आहेत , त्या का आहेत ?

याबद्दल माझ्यापेक्षा अंजली वाहिनी कडून तुला क्लियर समजतील.

कसे आहे मोनिका .. किती केलं तरी हे माझे ऑफिस ,आणि ही कामाची वेळ आहे..

तुला अपेक्षित असेल तितक्या मोकळेपणाने नाही बोलू शकत मी .

एक सांगतो मोनिका ..

तू आल्या आल्या मला विचारलेस ..की ..

कसा आहे तुझा attitude ?

आता मी तुला विचारतो की..

मोनिका ..माझा हा attitude कसा वाटला तुला ?

यशच्या या विचारण्यावर मोनिकाला वाटले ..आपलाच प्रश्न ..

यशने हा चेंडू आपल्याच कोर्टात जोरदार परतवलेला शॉट आहे.

चेहेरा हसरा ठेवीत ..मोनिका म्हणाली ..

ऑफकोर्स यश ..तुझा attitude मला आवडला ..

भीडभाड न ठेवता असेच स्पष्ट बोलण्याची आवड -
आपल्यातली कॉमन गोष्ट असणे .. मला वाटते ..पहिल्या भेटीची छान सुरुवात आहे.

घड्याळाकडे पाहत ती म्हणली ..

यश ,मला वेळ दिलास आणि छान वाटावी अशी भेट होऊ दिलीस ..थांक्यू सो मच.

तुझ्या घरी एका रविवारी सकाळी ८ ते रात्री डिनर पर्यंत राहण्यासाठी मी कधी येईन ,

हे लवकरच कळवीन .

यश , अरे ,येऊ ना नक्की ?

यश म्हणाला – मोनिका ..मीच तुला सुचवले आहे ..तू असे कर म्हणून ..

मग, मी नाही कसा म्हणेन. ?

आणि माझी एक आग्रही खोड या निमिताने सांगून टाकतो – लक्षात असू दे..

मी एकदा जे शब्द बोललो ..त्यात बदल होत नाही .

मोनिका म्हणाली - तुझ्या घरी येण्याआधी

अगोदर अंजली वाहिनिना कल्पना देईनच मी .

कारण या प्रोसेस मध्ये त्याची मदत माझ्यासाठी फार महत्वाची असणार आहे .

खुर्चीतून उठून मोनिकाने दिलखुलास हसत ..

तिचा गोरापान ..नाजूक हात ..पुढे करीत म्हटले –

यश ,आज से अपनी दोस्ती शुरू ..

यशने तिचा हात हातात घेतला ..तो नाजूक ,सुखद स्पर्श .

मनावर मोर पीस फिरल्यासारखे वाटून गेले .

मोनिका रूपसुंदर ,बुद्धिमान आहे हे तर मान्य करायलाच हवे “ त्याचे मन त्याला सांगून गेले.

मोनिकाच्या नाजूक हाताच्या तळव्याला यशच्या भक्कम हाताचा स्पर्श होताच .

.तिचे मन एका भक्कम आधाराच्या भावनेने थरारून गेले .

त्याच्या मेहनती हाताचा दमदार कणखर स्पर्श ..

असा पुरुषी स्पर्श आज पहिल्यांदाच मोनिकाच्या मनात आत खूप खोलवर पोंचला होता.

मोनिका बाहेर जाण्यासाठी उठत म्हणाली ..

माझ्या कारपर्यंत बाय करायला ये ना यश , प्लीज ?

मोनिकाच्या मागोमाग यश देखील बाहेर आला आहे , तिला बाय करण्यासाठी तिच्या कारपर्यंत

जातो आहे ,

त्याचा स्टाफ पहिल्यांदा हे दृश्य पाहत होता . सगळ्यांना कल्पना आली..की या आलेल्या मैडम

आपल्या बॉसला भेटण्यासाठी कोणत्या कामासाठी आल्या असाव्यात

मोनिका तिच्या गाडीत बसली ..यश बाय करीत होता ..मोनिकाने गाडी स्टार्ट केली होती ,

त्याच वेळी एक टू-व्हीलर यशच्या अगदी जवळ येऊन थांबली ..

सुरेख गुलाबी नक्षीदार लखनवी कुर्ता , डार्क निळी जीन ..चेहेर्यावर आलेल्या काळीभोर रेशमी बटा,

टोकदार नाकावर घसरून खाली आलेला गोगल आणि त्या आडचे काळेभोर टपोरे डोळे ..

स्कुतीवरच्या त्या सावळ्या- तरतरीत मुलीने ..खेळकर आवाजात यशला विचारले ..

असे काय पाहता आहात ?

नाही ना ओळखले मला ? वाटलेच ..आणि ओळखणार कसे ?

आपण एकदा भेटलो त्यानातर पुन्हा आजच.

तरी पण ..ट्राय तर करा ..कोण असेल बरे मी ?..

या ओव्हर –स्मार्त आणि आगाऊ वाटणार्या मुलीचे नेमके या वेळी येणे ,मोनिकाला आवडलेले नाही

हे यशला जाणवले.

मोनिका यश कडे पाहत होती ..तो अजूनही कन्फ्युज नजरेने त्या थांबलेल्या मुलीकडे पाहत होता.

मोनिका मनात म्हणत होती ..

म्हणजे ..याला तर काहीच आठवत नाहीये ,,आणि ही पोरगी .बळेच मागे लागली आहे..

ओळखले का ,ओक्ळा बरे , काय फालतूपणा लाव्य्लाय शीट !

यशच्या मागे अशा अनेक पोरी असतील तर..?

नको रे बा, आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे.

मोनिका त्या दोघाकडे पाहत होती .

यशला काहीच आठवत नाहीये हे पाहून ती मुलगी म्हणाली म्हणाली ..

मुलींचे चेहेरे लक्षात न ठेवणारे ..म्हणून तुम्हीच माझ्या लक्षात राहाल नेहमी.

यश.. मी ..मधुरा ,

तुमच्या अम्माआजी आणि बापुआजोबा सोबत आलेली त्यांच्या गावाकडची शेजारी मुलगी ..

आले का आता लक्षात ?

मोनिकाकडे पाहत ती म्हणाली ..

यश ,ही तुमची मैत्रीण..खूप सुंदर आणि छान वटते आहे.

गुड ..आवडली मला तुमची मैत्रीण.

मोनिकाने रागानेच कार सुरु केली .असे यशला जाणवले . दूर जाणाऱ्या तिच्या कारकडे

तो पाहतच राहिला .

यश , आज्जीनं सांगा .मधुराने आठवण केलीय ,

असे करा न तुम्ही ..आजींना घेऊन या ,

मला कॉल करा , मी लगेच इथेपर्यंत येते .आणि त्यांना घेऊन जाते .

चलो बाय ..असे म्हणून .मधुरा भुर्रकन निघून गेली..

यश विचार करू लागला ..या मधुराला कसे काय साफ विसरून गेलोत आपण..?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग-८ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------