Shikkas aabhar patra books and stories free download online pdf in Marathi

शिक्षकास आभार पत्र

आदरणीय शिव्हरे सर,
नमस्कार सर मी तुमचा एक विदयार्थी कदाचित तुम्हाला आठवत असेल इतकं मला माहीत नाही पण तुमच्या हातचा खलेल्ला मार मात्र मी अजुनही विसरलो नाही. खरं तर मला नेमकं तेव्हा कळ लच नाही की तुम्ही विनाकारण का बर आम्हाला बदडत होता. तेही शुल्लक केस वाढलेले दिसले की त्याची त शामत यायची तुमच्या हस्ते. खरंच सर जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या बद्दल ऐकलं होत मला फार नवल वाटायचं की संपुर्ण शाळा तुमचा आवाज आयकुनच चिडी चूप बसुन जायची. तसा दरारा होताच तुमचा की मोठं मोठे धडधाकट मुल ही तुमच्या नावानेच घाम सोडत होते.
जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला बघितले तेव्हा मला वाटल की इतर शिक्षका सारखे तुम्ही पण एक शिक्षक च आहात पण लवकरच माझी ही धारणा धुमिल झाली. जेव्हा तुम्ही मागच्या बाका वरच्या ढोक्या ले मरत वरी धुतला तेही फक्त त्याने केस वाढवले म्हणुन. खरं तर त्या दिवशी पासून माझ्या नजरेत तुमची छ वी एक घमंडी अकडू आणि काळीज नसलेल्या माणसामध्ये मोडू लागली होती.
त्यानंतर तर मी हा निश्चय केला होता की काही पण असो तुमच्या नजरेत यायचं नाही तो प्रसंग न येण्यासाठी मी हवे ते प्रयत्न केले. आणि बरेच वेळा यशस्वी पण झालो. माझ्या जवळ असलेल्या प्रत्येकाने काही ना काही कारणाने तुमचा मार आतापर्यंत खाल्लेला होता. माझ्या मनात आता बंड उठले होते की तुमची तक्रार मुख्यद्यापक कडे एकदा तरी करावी जेणे करून तुमचा आम्हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवता येईल. पण हिम्मत नाही होत होती. कारण मी एकटाच उरलो होतो ज्याने आतापर्यंत तुमचा मार नव्हता खाल्ला म्हणुन आगीत हात टाकण्यात मलाही थोडी भीती होती.
शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी अनायास तूमची नजर माझ्या वाढलेल्या केसांवर गेली. जसा एखादा फरार कैदी खुप दिवस नंतर पोलिस शोधुन काढतात तसा तुम्ही मला त्या दिवशी शोधुन काढला आणि तितकाच कातवून मला धुतला. हा अपमान मला सहन होत नव्हता मी मनात ठानले होते की बस झाले तुमचे हे धोरण. आता तुमची ही मोनोपली बंद करायची त्या रात्री मी एक पत्र मुख्याध्यापक करिता लिहिले जेणेकरून मी तुम्हाला धडा शिकवू शकेल.
दुसऱ्या दिवशी ते पत्र घेवुन आत जाणारच होतो तेच तुम्हाला पहिल्यांदा देसाई मॅडम सोबत बोलताना बघितलं. त्यांच्या बद्दल मला खुप आदर होता त्यांचा सर्वात लाडका विद्यार्थी होतो मी. आता मला वाटलं की तुम्ही इथे पण माझी इज्जत काढणार तोच मॅडम नी आवाज दिला नाईलाजाने यावं लागलं. तेव्हा मायेच्या ममतेने ठेवलेला मॅडमचा तो उबदार हात आजही मला आठवतो.
जेव्हा मॅडम ने माझ्या बद्दल तुम्हाला सांगितले की मी त्यांचा खुप हुशार आणि आवडता विदयार्थी आहे. तेव्हा मला वाटले की तुम्ही माझी नुस्क काढाल पण मला आश्चर्य वाटले की पहिल्यांदा तुम्ही माझी पाठ थोपटली आणि मला अजुन मेहनत घेण्यास प्रेरणा दिली. तो क्षण माझ्या साठी अविस्मरणीय होता.
इतक्या कठोर माणसाचे ते दुसरे रुप पाहून मला खुप आश्चर्य वाटले. त्यानंतर तर मला कधीच तुमची भिती वाटली नाही. आणि मी ही कधि तुमचा नियम मोडला नाही. आमच्या सहली मध्ये जेव्हा कानाला हेडफोन्स लावुन तुम्ही आमची जी करमणुक केली ते खरंच कमालीची होती.
आज जेव्हा मी या 21 व्या शतकात जीवनाचे चटके खात आहो तेव्हा मला कळत आहे सर तुम्ही मला तेव्हा मारले नसते तर कदाचित आज मी हा जीवनाचा मारा सहन नसतो करु शकलो. तुम्ही मला तेव्हा बदडले नसते तर आज जीवनाच्या कसोटीने मला पार बदडून टाकले असते तुमच्या मुळेच आज माझ्यात परिस्थितीशी झुंज देण्याची ताकत आहे
तुम्ही जे आम्हाला आतुन कणखर बनवले त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार .
तुमचा विद्यार्थी
पंकज माकोडे

इतर रसदार पर्याय