कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - १० वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - १० वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग- १० वा

------------------------------------

रविवारची सुट्टी ,उगवणारी सकाळ सगळ्यांना खूप छान वाटणारी असते , आठवडाभर

ऑफिस एके ऑफिस करणार्यांना ,एक तर आराम करायचा असतो किंवा ..पेंडिंग

कामे अगदी निपटून टाकीत मनावरचे ओझे कमी करायचे असते .

थोडक्यात काय तर, जो तो आपल्या आपल्या मनाप्रमाणे रविवारच्या सुट्टीचा आनंद घेणार असतो.

आजचा रविवार ..यशच्या फामिलीसाठी तर खूपच बिझी असणारा आहे..

आज पहिल्यांदा त्यांच्या घरी -यशला भेटायला म्हणून ..सगळ्या परिवारासोबत राहायला मिळावे म्हणून एक मुलगी

–पाहुणी म्हणून येणार ..त्यामुळे सगळेजण तिच्या येण्याची वाट पाहत होते.

तसे तर सकाळचे कोवळे –उबदार ऊन, बागेत खुर्च्या टाकून ..पेपर वाचीत चहा , मध्येच गप्पा ,दुसरा चहा ,फराळ असे करीत

आनंद घेणे ही या घरातील माणसांची कॉमन आवड . त्यामळे आजच्या सकाळी देखील ..मोकळ्या हवेत सकाळचे ऊन घेत .

.जणू प्रभात कालीन मैफिल रंगलीआहे ..असेच आलेल्या कुणाला ही वाटावे अस सीन होता .

सकाळचे नऊ वाजले..साडेनऊला मोनिका सोबत ब्रेकफास्ट करायचा असे ठरले होते ..

बरोबर सवानऊ वाजता बाहेर गेट समोर एक पॉश, नवी कोरी गाडी येऊन थांबली .

बागेत माळीकाका काम करीत होते ..त्यांनी पुढे होऊन गेट उघडले .

आत येणारी सुंदर तरुणी ..मोनिका होती ..

गोरीपान ,उंच आणि सडपातळ बांधा ,लालरंगाची सिल्क साडी , काळ्या रेशमी केसांचा स्टायलिश कट ,

सरळ –टोकदार नाकावरचा भारी –महागडा गॉगल ,

तिच्या एकूणच व्यक्तीमत्वात .. मोठ्या पदावर काम करणार्या व्यक्तीत असणार डामडौल ठळकपणे दिसत होता .

मोनिकाने तिच्या डोळ्यावरचा गॉगल काढीत ..समोर बसलेल्या सगळ्यांना गोड स्मित करीत हाय ,गुड मोर्निंग केले ,

आपल्याला पाहून या क्षणी सगळ्यांचे डोळे अक्षरशा दिपून गेले आहे “ याची खात्री मोनिकाला होती ,

कारण ती जाते त्या ठिकाणी तिचे असे दिल-खलास करणारे आगमन होतांना ,तिला पाहणार्यांची

अवस्था अशीच झालेली पाहणे तिला मनापासून आवडते ..आणि हे सगळ मनापसून एन्जोय करायचं असते.

अंजलीवहिनी तिला रिसीव्ह करण्यासाठी खुर्चीतून उठत तिच्याकडे येत म्हणाल्या ..

वेलकम मोनिका ..आमच्या घरी तुझे स्वागत आहे .

मोनिका दिलेल्या खुर्चीवर न बसता ..अगोदर ..

आजोबांच्या समोर उभे राहत त्यांना दोन्ही हात जुळवत अभिवादन करीत म्हणाली ..

गुड मोर्निंग आजोबा –

तुम्हाला भेटायला मिळते आहे ..याचा मला खूप आनंद होतो आहे .

असेच ती अम्माआजींना देखील म्हणाली .

मोनिकाला पाहून आजी खूप इम्प्रेस झाल्या आहेत ,

हे समोरच्या सगळ्यांना जाणवले होते.

अंजलीवहिनी मोनिकाच्या बाजूला उभे राहत म्हणाल्या ..

मोनिका – हे यशचे बाबा , या यशच्या आई ,

हे माझे मिस्टर –आणि यशचे बिग ब्रो- सुधीर ..ज्यांना सगळेजण सुधीरभाऊ या नावाने बोलतात .

आणि माझ्या बद्दल तर तुला माहिती आहेच .

सेंटरला बसले की सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे सहज जमत असते .

आणि असे प्रयोग करण्यात मोनिका माहीर होती.

त्यामुळे इथे देखील मध्यभागी मोनिका आणि सभोवती यशच्या घरातली माणसे ..अशा गप्पा सुरु झाल्या

अंजली वाहिनी म्हणाल्या –

मोनिका ..आपली पाहुणी आलेलीच आहे .आपण अगोदर ब्रेकफास्ट करू या ..

त्यासरशी ..मोनिकाला एकदम आठवले ..आणि ती यशला म्हणाली ..!

ओ माय god..! मी तर पार विसरूनच गेले ..

की आज मी स्वतहा गाडी चालवत आले ..

त्यामुळे गाडी बंद केली आणि सरळ आत आले ,गडबडीत सोबत आणलेले तसेच राहिले गाडीत .

ड्रायव्हरला सुट्टी दिली हे लक्षातच नाहीये ..

यश,एक कर न माझ्यासाठी ..प्लीज्ज ...! ...,मी जाम टायर्ड झाले आहे, गाडी पर्यंत जायचा

कंटाळा आलाय बघ मला ..

ही घे चावी ..समोरच्या सीटवर मोठी बैग आहे, ती घेऊन येशील प्लीज .

आपल्या ब्रेकफास्ट करतांना घेता येईल असे खास घेऊन आले आहे मी ..

यशला क्षणभर सुचेना ..मोनिकाच्या ऑर्डर सोडण्याच्या पोजकडे पाहून तो थक्क झाला होता.

यशचा बदलेला चेहरा आणि सगळ्यांच्या नजरेतले भाव पाहून .

.मोनिकाला लगेच जाणवले ..

.अरे..बाप रे ..काही तरी मोठी चूक केली आहे आपण..

तिने स्वतःला सावरले ..आणि..म्हणाली ..

यश .सोरी ..तुला काम सांगण्याचा अजिबात हेतू नाही ..अगदी सहज म्हणाले ,टेक इट इझ्झी ..!

आजोबांनी माळीकाकांना आवाज दिला .

.आणि मोनिकाला म्हटले ..यांना चावी दे ,ते आणतील .

बेटा ..आमच्याकडे माणसे आहेत काम करणारी .

यशवर वेळ येत नाही असे करण्याची .

माळीकाका लगेच आले ..यशने मोनिकाच्या गाडीची चावी देत म्हटले ..बाहेरच्या गाडीतून यांचे

सामान घेऊन या काका .

मोनिकाने शांतपणे बसून पाहत होती ..

आजोबांना प्रतिउत्तर देण्याचे टाळले आणि हसत म्हणाली ..

सोरी, आजोबा .मी थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि थोड्या वेगळ्या जगात राहणारी आहे,

जरा नवीन वाटेल तुम्हाला माझे वागणे बोलणे ,पण मी प्रयत्न करीन बदलण्याचा

आणि अशा वातावरणाची ओळख करून घेण्यासाठी तर आज आले आहे मी .

माळीकाकानी मोनिकाच्या गाडीतून मिठाई आणि ड्राय –फ्रुटचे मोठ मोठे बॉक्स आणले आणि तिच्यासमोर

ठेवले .

मोनिकाने ते बॉक्सेस यशच्या आईंच्या हातात देत म्हटले ..

माझ्या आई-बाबांच्या कडून ही भेट स्वीकारावी ..!

माळीकाका ते सगळे बॉक्सेस घेऊन वर घरात गेले ..

अंजलीवाहिनी जवळ देत म्हटले ,,

आज आलेल्या बाईसाहेबांनी आणलाय , आता नाश्त्यात द्या सगळ्यांना असा आपल्या आईसाहेबांचा

निरोप आहे.

अंजलीवहिनींची अपेक्षा होती की ..

स्वतः मोनिका आत येईल ..काही बोलेल , कामात स्वतः होऊन काही मदत करील ..

पण असे झाले नव्हते ..

किचन मध्ये कामवाल्या काकू रोजच्याप्रमाणे आलेल्या होत्या ..

सवयीने त्या अंजलीवहिनींना मदत करू लागल्या .

प्लेट्स भरता भरता ,काकू म्हणाल्या ..

अंजलीवाहिनी ..कोण आल्या आहेत हो या ..पाहूण्या ?

भारी आणि बडी असामी दिसतेय ..

आणि सगळ्यांशी गप्पा मारताय त्या ..

कोण आहेत ? या ?

काकूंना सांगावे तरी पंचाईत आणि न सांगावे तरी पंचाईत ..

तरी काही तरी सांगून त्यांचे समाधान करावे लागणार

म्हणून अंजली वाहिनी सांगू लागल्या

काकू ..आपल्या यशच्या वधू –संशोधन मोहिमेला आपण सुरुवात केलीय ना ..

त्यात या मुलीने तिचा इंटरेस्ट सगळ्यात आधी कळवला ..आणि आली ना आज भेटायला .

काकूंना हे नवलाचे वाटले ..

नवीनच पद्धत म्हण्यची ही.. !

अंजलीवहिनीनी सगळ्यांना वर हॉलमध्ये येण्यास आवाज दिला ,

तसे सगळे ..हॉलमध्ये आले.

डायनिंग –टेबलवर सगळे मांडून ठेवले होते ..

इथे सुद्धा बसण्याची सेम पद्धत ..

सेंटर –चेअर मोनिका ..आणि डाव्या उजव्या बाजूला सगळे ..

अगदी थेट समोर असलेली खुची देखील मोनिकाने बाजूला ठेवून दिली .

अंजली –वहिनी आणि कामवाल्या काकू दोघी सगळ्यांना प्लेट्स देऊ लागल्या ..

पण ..मोनिकाला

स्वतहा बसून राहिलोत ..हे चुकीचे आहे असे वाटण्याचे कारण नव्हते ..

हे जाणवले तसे ..

यशच्या आजी म्हणाल्या ..

मोनिका ..अंजली तर काल म्हणत होती की..

तुला आमच्या सगळ्या दिवसभर सोबत राहून पहायचे आहे ..माहिती करून घायचे आहे..

पण,तू तर आमच्या समोर डायनिंग टेबलवर मिटींगच्या थाटात बसून राहिली आहेस .

मोनिका – एक सिनियर लेडी म्हणून मी तुला सांगते ..

आता तू अंजली वाहिनीच्या ..मागे –पुढे रहात .त्या काय करतात ,कसे करतात ..हे पहात पहात ..

त्यांना थोडी फार मदत केली तरच तुला..इथे येऊन राहिल्याचे चीज झाल्या सारखे वाटेल . आणि या घराबद्दल कळू शकेल ..!

हे सांगतांना अम्माआज्जी यश कडे पाहत होत्या . यशने नजरेने सांगितले ..एकदम बरोबर !

हे ऐकून घेतल्यावर आता इथून निमुटपणे उठून जाण्यात शहाणपणा आहे” , हे मोनिकाला समजले .

अंजली वाहिनीनी तिला एकेक गोष्ट करायला लावली ..पण सवय नसलेल्या हातांना ,ही न केलेली

काम करतांना ..कमीपणा वाटत असतो ..तसे मनातून मोनिका चडफडत होती ..

पण..चेहेर्यावर काही दिसणार नाही “ही कसरत करण्यात ती परफेक्ट आहे ..हे यश ला दिसत होते .

ब्रेकफास्ट झाला ,सगळेजण आपापल्या कामासाठी रूम मध्ये गेले ..खाली होल मध्ये .अंजलीवाहिनी

आणि मोनिका दोघीच बसल्या होत्या ...

मोनिका म्हणाली –

मी तुम्हाला भाबी म्हणते ..हे वाहिनी ..नको..

सो टिपिकल मिडल क्लास ..!

त्यावर वाहिनी म्हणाल्या ..

हे बघ मोनिका ..आम्ही आहोतच मिडल क्लास , याचा विचार आम्ही नाही, तू करायचा आहेस.

तुझ्या मावशीला मी आमच्या यशचे स्थळ सुचवले आहे हे खरे ..

पण.. तुझ्या मावशीने ..नेमके तुलाच हे स्थळ का सुचवले ? हा प्रश्न मला पडलाय .

कारण ..तुझ्याबद्दल मला सगळी डिटेल माहिती आहे ..आणि तुझ्या प्रोफाईलला

यशने पाहिले नाही , इंटरेस्ट दाखवला नाही ..आणि ..तू तुझा इंटरेस्ट सेंड केलास ,

लगेच परस्पर ..यशला जाऊन भेटलीस ..

आणि माझ्या मागे लागून ..इकडे येण्याचे निमंत्रण द्यायला लावून ..इकडे आलीस सुद्धा ..

मोनिका ..तुझ्या मनात नेमके काय आहे ? मला इतक्यात तर नाही समजू शकणार ..

पण ,तुझ्या सारखी मुलगी ..यशचा विचार का करते आहे ?

याचे मला आश्चर्य वाटते आहे.

मोनिका मनात म्हणाली ..

आपल्या फील्ड मध्ये काम करणारी ही भाबी ..इतकी स्मार्त असेल ?

हा विचार आपण केलाच नाही .बच के रेहना होगा भाबी से ..

ती म्हणाली ..

भाबी ..माझे आयुष्य मला अचानकच नीरस ,कंटाळून टाकणारे वाटू लागले आहे ..

माझ्या बाबांची इंडस्ट्री , त्याची इस्टेट ..हे पाहून उबग आलाय मला ..

आणि अशावेळी मावशीना वाटले की

मी - तुमच्या यश च्या स्थळाचा विचार करावा .खूप छान बदल होईल माझ्या आयुष्यात .

अंजलीभाबी ..मोनिकाकडे पाहत ..तिचे शब्द ऐकून घेत होत्या .पण.त्यांचे अंतर्मन ,ते अजून ही

अस्थिर होते .

मोनिकाने मग त्यांना इतर विषयावर बोलण्यात गुंतवून ठेवले , थोडावेळ त्यांची आणि सुधीर भाऊंची

तारीफ केली ..मोनिकाची ही मात्रा लागू पडली ..

अंजली भाबिंच्या बोलण्याचा टोन नॉर्मल होत गेला ..तशी मोनिका मनातून हसू लागली ..

ती मनात म्हणाली ..भाबी ..ये मोनिका बडी खिलाडी ही ..तुम देखो बस ...

या अशा बोलण्यात ..दुपारच्या किचन ड्युटीची वेळ झाली ..कामवाल्या काकू नेहमीच्या वेळेवर

आल्या होत्या ..एक- दीड च्या सुमारस जेवणे होत असत.

यशच्या आई , आणि आज्जी ..या दोघी पण खाली होल मध्ये येऊन बसल्या .अंजलीवाहिनी त्यांच्या

समोर येऊन बसल्या ..बाजूच्या खुर्चीवर मोनिका येऊन बसली ..तिने एकदम साधा -सिम्पल ड्रेस घातला आहे

हे सगळ्यांना दिसले.

सकाळच्या आणि आताच्या मोनिकाच्या वागण्यातला फरक आजीच्या आणि यशच्या आईच्या नजरेतून

सुटलेला नव्हता .

त्याच वेळी ..गेट उघडून ..आत येत असलेली मधुरा या सगळ्यांना दिसली ..

अंजलीवाहिनी तिकडे पाहून म्हणाल्या ..ही कोण आली बाबा ?

यशच्या आई म्हणाल्या ..

आज काय अनोळखी पाहुणे येण्याचा दिवस आहे की काय ?

अंजलीने मात्र क्षणात ओळखले ..

अरेच्या ..ही तर त्या दिवशीची टू व्हीलरवाली चिपकू पोरगी ..

इथे कशी काय आली ? मोनिकाचा मूड पार बिघडून गेला ..

आजी हसत म्हणाल्या ..

हिला तुम्ही कसे ओळखणार ?

ही मधुरा , मागच्या महिन्यात आमच्या सोबत गाव्कडून इथे आलेली .

आज आजोबांनी तिला बोलावले आहे पाहुणी म्हणून ..आपल्या सोबत जेवणासाठी.

खाली हॉल मध्ये येणाऱ्या यशला मधुरा येतांना दिसली ..

तो विचारात पडला ..अरेच्च्या ..ही कशी काय आली बुवा ?

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग – ११ वा लवकरच येतो आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------