gotya - 5 books and stories free download online pdf in Marathi

गोट्या - भाग ५

गोट्याचे शिक्षक होण्याचे स्वप्न

बारावीची परीक्षा दिल्यानंतर गोट्या आपल्या गावी परत आला. दोन वर्षे शहरात राहिल्याने त्याचे राहणीमान पूर्ण बदलून गेले होते. तो सहसा घराबाहेर पडत नव्हता. घरातील जुने वृत्तपत, पुस्तके, मासिके वाचत होता. दुपारच्या वेळी रेडिओवर विविधभारती लावून हिंदी गाणे ऐकण्याचा काम करायचा. सायंकाळच्या वेळी तळ्याच्या काठावर मित्रांसंगे फिरायला जात असे. असा त्याचा दिनक्रम चालू होता. बारावी पास झाल्यावर काय शिकावं याबाबत तो काही ठरवू शकत नव्हता. कारण मार्क कसे मिळतात ? यावरच त्याचे भविष्य अवलंबून होते. मार्क कसे ही मिळो त्याच्या सोबत शिकत असलेले सारेचजण इंजिनिअरिंग करण्याचा ठाम निर्धार केला होता. अखेर निकालाचा दिवस उजाडला. प्रेसच्या कार्यालयात एका रूपायाला निकाल सांगण्यात येत होते. प्रत्येक प्रेसवर मुलांची आणि त्यांच्या पालकांची प्रचंड गर्दी होती. त्याही गर्दीत त्याने व त्याच्या मित्राने निकाल बघितला. गोट्याला प्रथम श्रेणीचे मार्क मिळाले. त्याच्या सोबतीचे दोघे नापास झाले होते तर इतर मित्र विशेष श्रेणीत पास झाले होते. गोट्याला तसा खूप आनंद झाला. ज्या विषयाची भीती होती त्या विषयात काठावर पास झाला होता पण इतर विषयात चांगले मार्क मिळाल्याने सरासरी गुण चांगले मिळाले होते. इंजिनिअरिंग शिकावे अशी गोट्याची मनोमन इच्छा होती मात्र मनासारखे विषय न मिळाल्याने आणि इंजिनिअरिंग शिकण्यासाठी लागणारा खर्च झेपणार नाही म्हणून त्याने इंजिनिअरिंगचा नाद सोडून टाकला. वेटरनरी कोर्स, बी फॉर्मसी, बी. एस्सी. ऍग्री, आणि डी. एड. असे अनेक पर्याय त्याच्या समोर उभे होते. कोणत्या क्षेत्राकडे जावे हे त्याला सुचत नव्हते. शिक्षक होणे आपल्यासाठी सोईस्कर आहे म्हणून त्याने डी. एड. चा फॉर्म भरला आणि यादी लागण्याची वाट पाहू लागला. काही दिवसांनी डी एड ची पहिली यादी लागली पण त्यात गोट्याला प्रवेश मिळू शकला नाही, तशी दुसरी यादी ही प्रसिद्ध झाली त्यात देखील नाव नव्हते हे पाहून गोट्या खूपच दुःखी झाला होता. आपले गुरुजी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही अशी त्याला खात्री पटत होती. तोपर्यंत सगळीकडे प्रवेश प्रक्रिया संपली होती. त्याला आता डिग्री केल्याशिवाय गत्यंतर नव्हते म्हणून गप्प गुमान तो बी. एस्सी. ला प्रवेश घेतला. कॉलेजला जाण्यात व अभ्यास करण्यात त्याचा काही विशेष रस नव्हता. पण त्याच्यासमोर दुसरा काही पर्याय देखील नव्हता. त्याच्या सोबतीचे काही मित्र इंजिनिअरिंगला, वेटरनरीला, ऍग्रीला तर काही डी. एड. ला प्रवेश मिळविले होते. गोट्या मात्र एकटाच डिग्री कॉलेजला प्रवेश घेतला होता. शरीराने तो कॉलेजमध्ये होता मात्र मनाने तो कुठे तरी भटकत होता. त्याचा सारा जीव डी. एड. मध्ये घुटमळत होते. तो रोज जिल्हा कार्यालयात जाऊन तिसरी यादी लागणार का ? म्हणून विचारपूस करीत असे. कारण त्याला फक्त दोनच गुण कमी पडले होते दुसऱ्या यादीत नाव येण्यासाठी. गोट्या रोज जायचा फलकांवर यादी लागली का पाहायचा, बराच वेळ तेथेच घुटमळायचा आणि परत घरी यायचा. त्यामुळे त्याचे कुठेच लक्ष राहत नव्हते. जेवणावर देखील त्याचे लक्ष नव्हते. परत त्याला दहावीला असताना एक वर्ष ड्रॉप केल्याची वारंवार खंत वाटायची. दहाव्या वर्गात त्याच्या सोबत असलेले काही मित्र शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात देखील केली होती. गोट्या मात्र अजूनही संभ्रम अवस्थेत जीवन जगत होता. स्वतः च्या नशिबाला दोष देत होता. मित्र त्याला अनेक वेळा समजावून सांगत डी. एड. हेच काही सर्वस्व नाही. डिग्री शिकून देखील चांगली नोकरी मिळविता येऊ शकते, असे त्याचे मित्र त्याला सांगत असत. पण त्याचे मन मानत नव्हते. त्याची आर्थिक परिस्थिती त्याला माहित होतं. पाच ते सहा वर्षे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीची शाश्वती नाही. पण डी. एड. केले की लगेच नोकरी मिळेल आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक प्रश्न सुटेल असे त्याला वाटत होते. आज ही तो सकाळी जिल्हा कार्यालयात यादी लागेल का म्हणून पाहण्यासाठी गेला. पण आज ही यादी लावण्यात आली नव्हती. अधिक चौकशी केल्यावर कळाले की, आज सायंकाळी चार वाजेपर्यंत तिसरी यादी लागणार आहे असे कळाले. गोट्याला खूप आनंद झाला. तिसरी यादी लागली तर त्यात आपला नंबर नक्की लागणार याची त्याला खात्री होती. सायंकाळचे चार वाजले, पाच वाजले, सहा वाजले पण यादी प्रसिद्ध झाले नाही. ऑफिस बंद करून सारे कर्मचारी बाहेर पडू लागले त्यावेळी एका अधिकाऱ्याची जीप कार्यालयासमोर येऊन उभी राहिली. सर्वांनी त्या साहेबाला नमस्कार केले, बंद केले कार्यालय उघडले गेले आणि दहा मिनिटात बाहेर फलकांवर तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात गोट्याचे नाव दहाव्या क्रमांकावर होते. जागा आठच होते आणि गोट्याच्या क्रमांक दहाव्या क्रमांकावर होते. ती प्रतीक्षा यादी होती. आपला नंबर लागेल की नाही ? याच्या काळजीने त्याला रात्रभर झोप लागली नाही. मुलाखतीचा दिवस उजाडला. गोट्या सकाळीच कार्यालयात जाऊन पोहोचला. अनेक मुलं आणि त्याचे पालक तेथे आले होते. गोट्याच्या मनात उत्सुकता लागली होती. अखेर मुलाखतीला सुरुवात झाली. एकेक जण आत जात होते आणि येताना आनंदात येत होते. शेवटी गोट्याच्या क्रमांक लागला. तो मुलाखतीसाठी आत गेला. त्याची सर्व कागदपत्रे दाखविला. अधिकाऱ्यांनी त्याला म्हटले एकच जागा शिल्लक आहे, ते ही आदिवासी भागात आणि पेमेंट सीट आहे. तयारी असेल तर हो म्हणा नाहीतर जाऊ शकता. गोट्याने आपल्या मनाला तयार करून हो म्हणाला जे काही फीस असेल ते भरता येईल. जम्मू-काश्मीरमध्ये जरी असेल तरी त्याची तयारी होती. आदिवासी भागातील कॉलेजमध्ये गोट्याला ती जागा मिळाली. तो खुशी खुशी बाहेर आला. बाहेर आल्यावर एक मोठा उच्छ्वास टाकला आणि मनोमन खुओ आनंदी झाला. त्याच्या नंतर अजून सात मुलं होती. त्यांना कोणती जागा मिळेल ? याची उत्सुकता लागली होती. त्या सात जणांना वेगवेगळ्या तालुक्यात जागा मिळाली होती. नंतर कळाले की, यांनी आदिवासी भागात जाऊ नये यासाठी फिल्डिंग लावली होती. गोट्याला ते उशिरा समजले. काही का असेना आपले गुरुजी होण्याचे स्वप्न पूर्ण होतांना पाहून गोट्या आनंदात आपल्या गावी परतला, काही दिवसात त्याला आदिवासी भागातील डी. एड. कॉलेजला शिकण्यासाठी जायचे होते.

- नासा येवतीकर, धर्माबाद

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED