Adhikamas Katha - 1 books and stories free download online pdf in Marathi

अधिकमास कथा - 1

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः...


अधिक मास कथा भाग 1..


एकदा श्री विष्णु भगवान व माता लक्ष्मी यांचे चर्चासत्र चालू असताना माता लक्ष्मी ने श्री विष्णू ना अधिक मासाच्या व्रताचे महत्त्व विचारले..


भगवान विष्णू जवळ त्यांनी कथा सांगण्याचा हट्ट धरला ..आता बाल हट्ट आणि स्त्री हट्ट हा पूरवावाच लागतो... नाही का !!!म्हणूनच श्रीविष्णूंनी माता लक्ष्मीला अधिक मासाचे महत्त्व सांगणारा एक दृष्टांत सांगितला तो पुढीलप्रमाणे...


नर्मदा नदीच्या काठावर माहिष्मती नावाच्या नगरात एक स्त्री jराहत होती.. ती विधवा चंद्रिका नावाची एक महिला होती.. चंद्रिका आपल्या सत्कर्मनी आपल्या दुर्दैवा वर मात करत होती.. ती नेहमी भगवत भक्ती करत होती.. अधिक महिन्यात ही तिने स्नान दान धर्म इत्यादी करणे कटाक्षाने पाळली होती.. मोठ्या निष्ठेने ती अधिक मासाचे व्रत करत होती.. ती अधिक महिना अतिशय कडकआणि कठोरतेने निष्ठापूर्वक करत होती.. मात्र ह्या वर्षीचा आलेला अधिक महिना तिच्या शरीरास सहन होईना.. ती इतकी थकली होती की तिला धड चालताही येत नव्हतं.. याचा परिणाम म्हणूनच की काय अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी ती नर्मदा नदीवर स्नान करून येत असताना रस्त्यावरच कोसळली..


पडता पडता तिने "हे प्रभू, हे देवा ,नारायणा !!!"अशी हाक मारली..


तो आवाज ऐकून जवळच्याच झोपडीत राहात असलेली म्हातारी पळतच चंद्रिका कडे आली.. तिने चंद्रिकेला आधार दिला उठुन बसवले आणि पाणी पाजले.. तिच्या चेहऱ्याकडे पहात ती म्हातारी म्हणाली ;चंद्रिका बाई, कशा आहात तुम्ही??? मला ओळखलं का??तेव्हा त्या म्हातारीच्या सुरकतकलेल्या चेहऱ्याकडे पाहून चंद्रिके नी कबुली दिली.."नाही ग, आजीबाई... कोण तुम्ही?? मी नाही ओळखलं तुम्हाला !!!तुमची ओळख तुम्हीच करून द्या आता!!!"..तेव्हा ती म्हातारी म्हणाली, की चंद्रिका बाई फार फार दिवसांची गोष्ट आहे ..तेव्हा तुमचे मालक असताना मी तुमच्या घरी धुणीभांडी करायला येत होते .. तेव्हापासूनच तुमचा धार्मिक स्वभाव मला आवडायचा आणि मलाही वाटायचं की आपल्या संपूर्ण आयुष्यात येऊन आपण कधीच धर्माचरण केलं नाही... तुमच्याकडून मी मोठी असतानादेखील खूप काही शिकले आहे तुम्ही तेव्हा नवीन होता...आतातरी पटली का ओळख.. आणि तुमची ही अवस्था कशाने झाली....!!! तुम्हाला काही खायला प्यायला नाहीये का?? काही अडचण आहे का??.


.तेव्हा चंद्रिका म्हणाली," अगं नाही ,तसं काहीही नाही ..खायला प्यायला भरपूर आहे.. पण मीच जेवत नाही .."तेव्हा म्हातारी म्हणाली असं का??..तेव्हा चंद्रिका आपले स्पष्टीकरण देत म्हणाली, अगं सध्या अधिक मास चालू आहे ना!! तर मी त्याचेच व्रत करीत आहे. या महिन्यात मी कडक उपवास धरून एकही अन्नाचा कण ग्रहण केलेला नाही म्हणूनच माझी अशी अवस्था झाली आहे ..असा थकवाही जाणवत आहे..


"अग बाई, वेडी का खुळी तू?? असं उपवास धरून आणि आपल्या पोटाला चिमटा घेऊन कधी देव पावतो का??ते काही नाही तू माझ्याबरोबर माझ्या झोपडीत चल आणि दोन घास खाऊन घे तेव्हा तुला बरं वाटेल..!! म्हातारी म्हणाली ..."


नको आजीबाई... आज माझ्या व्रताचा शेवटचा दिवस आहे.. मी हे व्रत असे भंग करू शकत नाही !!ते मी मोठ्या निष्ठेने निभावला आहे.. मी हा व्रतभंग कसा करू?? मी जर हे व्रत मोडलं तर देव नाराज होतील आणि मला माझ्या व्रताचे फळ मिळणार नाही.. सारे कष्ट सारी पुण्याई वायाला जाईल "..चंद्रिका पुढे म्हणाली..


"


बाई तुझं पुण्य वाया जाऊ नये असं तुला वाटतं ना.. मग असं कर तू तुझं पुण्य मला दान कर.. नाहीतरी माझ्या हातून कसलाच जप-तप दान धर्म कधीच झालेला नाही.. कधीच पुण्यकर्म आणि धर्मकार्य घडलं नाही.. तेव्हा तू मला या तुझ्या पुण्याचे दान करून मला पावन कर.. तुझा पुण्य तु मला दे"... म्हातारी असं काही म्हणेल असं चंद्रिका ला अजिबात वाटले नव्हते....


.पण तिने मनोमन विचार केला की उपवासाचं पुण्यात तर आपल्याला मिळेलच पण हेच पुण्य जर आपण दान केलं तर त्या विशेष पुण्यही आपल्याला प्राप्त होईल.. "अधिकस्य अधिक फलम "अधिक मासामध्ये दानाचे अधिकच फळ मला प्राप्त होईल..


तिने स्वतःला सावरले.. उभी राहिली तिने म्हातारीचा जवळच्या पाण्याचा तांब्या हातात घेतला.. हातात पाणी घेतलं आणि" घे तुळसा घे.. मी महिनाभर केलेल्या उपवासाच्या व्रताच्या पुण्यातील एका दिवसाचे पुण्य मी तुला अर्पण करीत आहे... भगवान पुरुषोत्तमा चा साक्षीला घे.. हात पुढे कर" असे म्हणताच तिने ते पाणी म्हातारीच्या हातावर सोडलं.. आणि त्याच क्षणी तिचे वार्धक्य दूर झाले.. एका नव्या तेजाने तिची काया उजळून निघाली.. तुलसा ला आश्चर्य वाटले ..अधिक मासाच्या एका दिवसाची जर एवढे पुण्य असेल तर मीही अधिक मास नक्कीच करायला हवा होता ,असा विचार त्याच्या मनात येऊन गेला... खरोखरच चंद्रिका बाई खूप पुण्यवान आहेत आणि म्हणूनच हा चमत्कार झाला.. भगवत भक्तीच्या प्रेरणेने भगवंतांनी हा चमत्कार घडून आणला होता... तोच आणखी एक आश्चर्य घडले.. स्वर्गातून पुष्पक विमान घेऊन काही देवदुत धरणीवर आले.. त्यांनी तुळसाला वंदन केले आणि तिला सन्मानपूर्वक त्या विमानात बसवले.. मग देव दूतांनी चंद्रिकेला नमस्कार करत म्हटले; बाई तुम्ही खरंच पुण्यवान आहात.. आज केवळ तुमच्या एका दिवसाच्या पुण्याइने ह्या तुळसा च्या जीवनाचा उद्धार झाला . तुमच्या दाना नेच हे सर्व घडू शकले.. देवांनी तिला न्यायला स्वर्गलोकहूं विमान पाठवले.. धन्य धन्य तुम्ही, धन्या अधिक मास...

जर अधिक मासातील एका दिवसाच्या पुण्याइने एवढी फळ प्राप्त होऊ शकते तर तुम्ही विचार करू शकता की या संपूर्ण अधिकमासाचे किती महत्त्व असेल .. नक्कीच तुम्हीसुद्धा या अधिक मासात महिनाभर नसेल जमत कदाचित त्याहून कमी काळातही तुम्हाला शक्य नसेल तरीही कमीत कमी तीन दिवस किंवा एका दिवसाच्या अधिक मासाचे व्रत करायला आपणास काहीच हरकत नाही ...नाही का!!!,✍️✍️💞Archu💞


इतर रसदार पर्याय