Kaliyuga and she books and stories free download online pdf in Marathi

कलियुग आणि ती

एक भारतीय नागरिक म्हणून मला नेहमीच आपल्या भारत देशाचा आभिमान वाटतो ,१९४७ साली म्हणजेच जेव्हा भारत देश परकियांच्या सत्तेपासून मुक्त झाला तेंव्हापासून आणि त्याआधी पासूनही भारत देश हा एक सामाजिक ,आर्थिक ,वैदिक ,आणि नैसर्गिक दृष्ट्या समृध्द देश मानला जातो , तसे भारतीय लोक हे सर्वच क्षेत्रात अचाट बुद्धिमत्ता असणारे यात काही अपवादच नाही, याचा परिचय हा इतिहास आणि वर्तमान पाहून येतोच आहे.अमेरिकेसारख्या आर्थिक आणि तांत्रिदृष्ट्या विकसित देशांबरोबर अल्प भांडवलात स्पर्धा करणे हे केवळ तल्लख विचारशक्तीच्या बळावरच. स्वातंत्र्य काळानंतर भारताने वैज्ञानिक , तांत्रिक , शैक्षणिक क्षेत्रातही खूप मोठे यश मिळवले. खरंच भारत देश हा अनेक उज्वल यशाची शिखरं पादाक्रांत करताना पाहून आनंद होत आहे परंतू एका बाजूला माझ्या या देशात आज स्त्रीचं स्थान नक्की काय हा प्रश्न माझ्या मनाला नेहमीच भेडसावत असतो.पूर्वी समृद्धीच्या काळात भारतीय स्त्री ही एक उत्तम गृहलक्ष्मी म्हणून कार्यरत होती .शेतातील वाङयावस्त्यांवरची घरं आणि निसर्गपूरक व्यवसाय यामुळे ती आपली जबाबदारी चोख बजावत होती आणि हो मला तर वाटतं यातदेखील ती खूप सुखी होती निदान आजच्या स्त्रीच्या तुलनेत तरी नक्कीच.आजची स्त्री शिक्षण घेत आहे ,पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम करत आहे हे नवलच अगदी व्यवसाय ,शेती ,राजकारण , समाजकारण, शिक्षण प्रत्येकच गोष्टीत ती अव्वल आहे .या समाजात तिला काही प्रमाणात स्वातंत्र्य तर दिलं पण यामध्ये तीच आस्तित्व भरडल जातंय की काय याचा विचार कोणी केला आहे का ? हो मान्य आहे तिला नोकरीची ,शिक्षणाची ,व्यवसायाची संधी दिली जात आहे पण एक कमावता पुरुष आणि स्त्री यांच्या जबाबदार्या आणि सामजिक नियम यांमध्ये समानता आहे काय? स्त्रीचं स्वातंत्र्य सुद्धा तेवढच महत्त्वाचं आहे जेवढं पुरुषाचं आहे ,मग कमावणाऱ्या स्त्रीवर पुरुषांपेक्षा जास्त घराच्या ,मुलांच्या जबाबदार्या का? तुम्ही मुलींना उच्च शिक्षण देत आहात मग त्यांना त्यांची आवड जपण्याची मोकळीत दिली आहे का ? मुलाला खेळ आवडला तर त्याने त्या क्षेत्रात करियर करायचं मग मुलीला का सांगितलं जातं की फक्त अभ्यास करायचा आणि नाही जमल तर शिक्षण बंद .आज जेवढ्या मोकळे पणे पुरुष समाजात वावरतात तेवढ्या मोकळेपणे स्त्री का नाही? खरंच समाजाची मानसिकता बदलायला हवी नाही का?. स्त्री ही केवळ नाजुकच असते ती सौंदर्याचं प्रतीक असते ,तीने नेहमी खालच्या पायरीवर उभ राहाव ती पायातली वाहन आहे ही ,पुरुषांची बरोबरी करू नये ही मानसिकता ठेवणारे स्त्रीची विवेकशील बुध्दी नाकारत आहेत का . ,तिचा हुंड्यासाठी केला जाणारा छळ ,मुलीला जन्म दिला म्हणून होणारा छळ ,अजूनही कोणत्याही बाबतीत तिज मत विचारात न घेणं हे खरंच एकविसाव्या शतकात स्त्रीला मिळालेलं स्वातंत्र्य आहे का? एका प्राध्यापक मुलीला लग्नानंतर , माहेराहून गाडी आणण्यासाठी जिवंत जाळण, उच्च शिक्षित डॉक्टर मुलीवर जाणीवपूर्वक सामूहिक आत्यचार करणं, ह्या घटना त्याच देशात होत आहेत जिथे जिजाऊंचे ,झाशीच्या राणीचे अलौकीक धडे आपण घेतले ,होय ही तीच माती आहे जिथे सावित्रीने मुलींच्या शिक्षणाला सुरुवात केली जिथे पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई घडल्या ,महाराणी येसूबाई ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची ही पवित्र भूमी .जिथे जिजाऊंच्या संस्कारातून घडलेले शिवाजीराजे राजे स्त्रीचा मातेसमान आदर करत मग ही आमुची जन्मभूमी आज या घटना घडूच कशी देते , हा आधुनिक ,आत्याधूनिक समाज या गोष्टी कशा विसरू शकतो मी स्त्रीवादी नक्कीच नाही परंतू या गोष्टी कुठे तरी बंद होणं गरजेचं वाटतं ,म्हणून व्यथा मांडते 'कलियुगातील "ती " 'या विषयावर , होय भारत आधुनिक होत आहे समाजही बदलत आहे आणि महिला सबलीकरण सुद्धा होत आहे याविषयी दुमत नाही , परंतू काही प्रमाणात स्त्रियांवर जो अन्याय होत आहे हे थांबणे मात्र गरजेचे वाटते .

इतर रसदार पर्याय