वायुत्सोनात ( मीशन गगनयान ) - 1 Ravi sawarkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वायुत्सोनात ( मीशन गगनयान ) - 1


मीशन गगनयान

✍ रवि सावरकर, नागपूर

"खुरररsss! .....घुऊssप! ... बीssप बीssप बिप!"

"हॅलो sss! ....हॅलो... हॅलो ssss मिस्टर अभिअंश हॅलो!"

"अभिsssअंश ...चेक साऊंड!...चेक!! आवाज येतोय का?"

त्यातील एक ऑपरेटींग इंजिनिअर अभिअंश शी संवाद साधत होता.

"एस.एस. येssतोय !".....अभिअंश उदगारला.

"पल्स ओके! ,हार्ट बीट ओके!" ... एक दुसरा ऑपरेटर जो अभिअंशच्या शारीरिक हालचाली वर लक्ष ठेवून होता म्हणाला

"चेक फुयल लेवल!".. ... ओके !

"चेक ऑक्सीजन लेवल!".... "ओके!"

"आॅल सेंसर!",.... "ओके!"

"चेक जायरोस्कोप!"......." ओके!”

एव्हरीथींग इज ऑल-राईट!"

त्या आज्ञात बेटावर जवळपास दोन बाय दोन किलोमिटरचे औरस चौरस सपाट मैदानाच्या मधोमध जी.एस.एल. व्ही. एम. के. ३ सोबत ते गगनयान (इसरोने त्या स्पेसशटल ला गगनयान हेच नाव दिले होते) जोडलेले होते. आणि तो पे -लोड जवळपास पन्नास मीटर उंचीच्या लॉन्च पॅड सोबत उभे होते.
गगनयानाच्या त्या कॉकपिटमध्ये चार बाय सहा च्या स्क्रीन वर चारीहि बाजूचे फुटेज दिसत होते. स्क्रीनच्या खालील पॅनल वर म्याॅनुअल ऑपरेटिंग साठी पुष्कळशा स्विचेस व इंडिकेशन लॅम्प सोबत स्पीडोमीटर, एक्स लो मिटर ,टेंपरेचर गेज ,प्रेशर गेज, ईनिग्मा मशीन, रडार , एच एम आय स्क्रीन, अशा विविध यंत्रांनी परिपूर्ण होत. आणि ऑपरेटिंग खुर्चीवर कानात हेडफोन घालून बसलेला अभीअंश
ऑपरेटिंग रूम मधून मिळालेल्या प्रत्येक सूचनेला त्याच्या पुढ्यात असलेल्या स्क्रीन व पॅनलवर चेक करून सगळं ठीक असल्याच्या सूचना देत होता. त्यासरशी संबंधित असलेला ऑपरेटिंग इंजिनियर तिकडे आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर क्राॅसचेक करत होते.

तो ह्या दिवसाची कित्तेक वर्षा पासन वाट बघतोय, आणी आज तो दिवस उजाडला . आज ईसरो पुन्हा एक नवीन कीर्तिमान स्थापित करणार होते. भारतीय स्पेस स्टेशन स्थापित होऊन एक वर्ष होऊन गेल आणि त्यातच नवीन विक्रम म्हणजे आज अंतराळात मानवाला पाठवण्यात येणार होते आणि त्याची वायुत्सोनात (ज्याप्रकारे अमेरिकेचे एस्ट्रोनॉट, रशियाचे कॉस्मोनॉट) म्हणून निवड झाली होती.

इसरो च्या त्या गुप्त बेटावर हो त्याला गुप्तच म्हणावं लागेल कारण या बेटाची गुगल मॅप लाच काय तर संपूर्ण जगाला माहिती नव्हती. माहीती होती ती फक्त नाविक ला (भारतीय नेवीगेशन सिस्टम ) त्याला कारणही तसंच होतं एक तर ते मानव निर्मित होत आणि हे मिशन यशस्वी झाल्याशिवाय याची माहिती कोणालाही मिळणार नाही एवढी गुप्तता बाळगली होती विषेश करून यु.एस.ऐ.च्या गुप्तहेर विभागा पासुन कारण सन १९९४ ला डा. नारायण जे क्रायोजनिक प्रोजेक्ट चे प्रमुख होते. त्यांना अति महत्त्वाच्या दस्तावेजाची पाकिस्तानसोबत हेरफेर केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती पुढे दहा वर्षाच्या खटल्या नंतर त्यांना निर्दोष घोषित करण्यात आले. पण या दहा वर्षात त्यांना पुष्कळसा मानसिक त्रास सहन करावा लागला आणि आपण आपला एक महत्त्वाचा वैज्ञानिक गमावून बसलो आणि हा सगळ्यात यु.एस.ए. चा हात होता. म्हणूनच आपल्या मंगळ यान मिशन सारख्या कित्येक प्रयोगाला उशीर झाला. आणि या मंगळ यान मिशन नंतर ईसरो एकापाठोपाठ एक कीर्तिमान स्थापित करत होते. आणि कदाचित गगनयान मिशन हे ईसरो च आखरी गुप्त मिशन राहणार होतं कारण या नंतर भारत देश एक महासत्ता म्हणून उदयास येणार होता.

इकडे त्या लाँच पॅड पासून दूर दोन किलोमीटर अंतरावरील ऑपरेटिंग स्टेशन मध्ये एकशे त्रेपन्न इंच स्क्रीनच्या अर्ध्या भागाला गगनयान दिसत होते व अर्ध्या भागात गगन यानाच्या काॅकपीट मधील दृश्य दिसत होते.
आणि त्या स्क्रीन पासून जवळपास वीस फूट अंतरावर एका सरळ रेषेत ज्याप्रकारे चित्रपटगृहातील खुर्च्या असतात तसे लांबचलांब टेबल होत त्यावरील वीसेक संगणकाच्या पुढे ऑपरेटिंग इंजिनियर बसलेले होते त्यांच्या मागील रोममध्ये भारतीय शास्त्रज्ञ भारताचे प्रधानमंत्री आपले रक्षा मंत्री या प्रकारचे विशिष्ट खात्यातले अतिमहत्‍वाचे व्यक्ती बसलेले होते.
तिथे बसलेले सगळे व्यक्ती उत्साहित व चिंतेत होते कारण प्रथमच आपण स्वनिर्मित स्पेस शटलमध्ये मानवाला पाठवत होतो.
या गगनयान मिशनसाठी पाच लोकांची वायुत्सोनात म्हणून निवड करण्यात आली होती. पण हे मिशन जर कुठल्याही परिस्थितीत असफल झाले तर मनुष्यहानी ना होवो. म्हणून फक्त एकालाच सध्या पाठवणार होते आणि तो परत आल्यानंतर पुन्हा ह्या पाच जणांना पाठवणार होते. तसे या पूर्वी गगनयान मानवरहित अंतराळात पाठवून यशस्वीरित्या जमिनीवर आणले होते. पण ते यान आपल्या भारतीय स्पेस स्टेशनला जोडायचे असल्यामुळे तिथे मानवाची आवश्यकता होती म्हणून अभिअंशची निवड करण्यात आली.
संगणका समोर बसलेला प्रत्येक ऑपरेटिंग इंजिनियर त्याच्याशी संबंधित असलेल्या गगनयानाच्या विविध यंत्रनावर लक्ष ठेवून होते.

"ओके गाईज .....लेट्स स्टार्ट द मिशन! ""काउंट डाऊन सुरू करा" ...गगनयान मिशनचे हेड श्रीरामाकृष्णंन म्हणाले.

"वेईट वेईट वेssट!" .....त्या ऑपरेटिंग रूम मध्ये आवाज घुमला.

"व्हॉट..? काय झालं अभिअंश?" श्री रामाकृष्णान चिंतेच्या स्वरात उद्गारले

"मला वाटते जायरोस्कोप मध्ये काहीतरी गडबड आहे. एच. एम. आय .स्क्रीनवर जे. आर. एस. ए. आर. सी. १००४ मेसेज ब्लींक झाला"...... अभीअंश काळजीच्या सुरात.

"हाऊस्ज द् याट ? हाऊ इट्स पॉसिबल?.... चेक अगेन!"

"ओके!!!..इस इट स्टील ब्लींकिंग?" काही विचार करून रमाकृष्णन ने विचारले.

"नाही .....पण मी बघितलं!".... तो म्हणाला.

"ओके ! चिंतेची काही बाब नाही.... चला सुरू करूया..!"
रामकृष्ण म्हणाले.

त्यातल्या एका ऑपरेटिंग इंजिनीयर ने कि ऑपरेटेड स्वीच ऑन करून स्टार्ट बटन दाबताच काउंटडाऊन सुरू झाले.
दहा .....नऊ......आठ......सात .....सहा .....पाच .....चार...तीन .....दोन ......ऐक .....शुन्य .....

तिकडे त्या रॉकेट इंजन मधील स्टार्ट चेंबर मधील प्रेशराईज गॅस ने टरबाइन ला फिरवल व लिक्विड फॉर्ममध्ये असलेल्या हायड्रोजन व ऑक्सिजन ने बुष्टपंम्पाद्वारे मिक्सिंग चेंबरमध्ये यायला सुरुवात केली व एकमेकाच्या संपर्कात येताच थोडासा ठिणगीने प्रेशराइज्ड गॅस थ्रोट मधून नोझल द्वारे बाहेर पडायला लागली सोनिक स्पीड चे सुपर सुपर सोनिक स्पीड मध्ये रूपांतर झाले व हळूहळू गगनयान जमिनीपासून वरती उठुन एका दमात आकाशात झेपावले मागे धुराचा लोड सोडून आगीची ज्योत घेऊन ......
क्रमशः.....
*********
✍ रवि सावरकर (नागपुर)
8121129889
www.savarkarstory.com

नमस्कार मित्रांनो 🙏😊
कथा वाचुन झाल्यावर अभिप्राय नक्की द्या....कथा जर नाही आवडली तर स्पष्ट सांगा.....पण काहीतरी लीहीत चला जेणेकरून माझ्यात लिहीण्याचा उत्साह कायम राहील...धन्यवाद 🙏