कादंबरी - प्रेमाची जादू भाग-१४ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाची जादू भाग-१४ वा

प्रेमाची जादू कादंबरी

भाग -१४ वा

--------------------------------------------------------------

यश आणि त्याच्या सोबत मागे बसून जाणारी मधुरा ..मोनिकाच्या डोक्यातच गेली होती ..

सगळ्या मुडचा पार कचरा करून टाकला होता तिच्या ,या गावावाल्या पोरीने . त्यात भर

म्हणजे.. यशच्या घरातल्या मोठी माणसांचा ,आजी आणि आजोबा यांचा तर तिला जणू पाठिंबाच

आहे असे वाटत होते .

हा यश पण ना ..त्या फालतू मुलीला तिच्या घरी सोडायला लगेच तयार झाला .

काय म्हणावे या मुलाला ..इतका मंदबुद्धी कसा काय असेल हा ?

या मोनिकासारखी हॉट मुलगी सोबत आहे , समोर आहे दिवसभर ..पण..माणूस आपल्या दोघात सोशल

अन्तर पाळत होता की काय ?असेच वाटतंय , एकूण आज दिवसच एकदम भंकस आणि बेकार गेलाय...

हा यश नेहमीच असा थंडा –थंडा कुल-कुल वागणारा असेल तर “ आपल्या काही -काही उपयोगाचा नाही ..

याला आपल्या मोहक –मादक जाळ्यात फसवून ..पुढे याचा खूप उपयोग करून घायचा आहे ..

आपल्या सगळ्या फ्रेंड –सर्कल मधल्या लेडीज फ्रेंड्सना खुश करण्यासाठी .गोल्डन कॉईन सारखा युज जराय्चा आहे या यशचा

पण..आपल्याला अनुभव तर एकदम उलटा येतोय .

गेल्या भेटीत आणि आजच्या भेटीत याच्यासोबत राहून तर वाटायला लागलाय ..

या यश मध्ये आपण गुंतवणूक करणे ..म्हणजे फेल इन्व्हेस्टमेंट ठरणार का ?

मग हे , काही चुकीचे तर नाही न करत मी ?मोनिकाला मोठाच प्रश्न पडला होता ..

या विचाराने तिची झोप उडून गेली होती ..

यशला आपल्या प्रेमात पडायचे , भूल पाडायची , उल्लू बनवायचे .. एखद्या खेळण्यासारखा त्याला वापरून घायचा ..”

यातलं काही जमेल असे दिसत नाही ..यार , शीट...!

हा यश फक्त वरूनवरून छान छान वाटला ,छान दिसला आणि आपल्याला ..वाटले...

मस्त भोळे सावज गवसले आहे आपल्याला , सहज शिकार करू याची ...!

पण ..हाय रे , नशीबच बेकार आहे आपले ..हा यश आपल्या कामासाठी मुळीच कामाचा नाहीये,

आपले पापा .यशचे आणि त्याच्या फ्यामिलीचे नाव ऐकूनच म्हणाले होते ते अगदी बरोबर आहे.

आपले पापा कधीच चुकत नाहीत माणसाना ओळखण्यात ..

आपण यशला त्यांचा घर-जवाई म्हणून आणायचा प्रयत्न करणार आहोत ..हे सांगितल्यवर ..

ते आपल्याला हसले ..मग, म्हणाले ..

मोनिका ..गलत जगे जा राही हो तुम.....

तुझ्या मनासारखे करशील असे जे वाटते आहे न तुला ..ते सरासर चुकीचे आहे .

या यश नावाच्या मुलाची फ्यामिली खूप छान आहे, सोशलीसर्कल मध्ये त्यांना खूप रिस्पेक्ट आहे ..

अशा परिवारातला मुलगा ..तुझ्या सारख्या मुलीच्या कल्चर मध्ये मिक्स होणे कधीच शक्य नाही ..

त्याचा नाद सोड ..!

इतके स्पष्ट सांगून आपण आपल्याच मग्रुरीत होतो ..त्यात मावशीने थोडे बळ देत म्हटले ..

मोनिका .तू फक्त ट्राय करायचा अवकाश .हा यश तुझ्या जाळ्यात अगदी सहज अडकेल ..

फक्त त्याला तुझ्या प्रेमाच्या मागे असलेला तुझा खुफिया –राज कळू देऊ नकोस .

त्याच बरोबर मावशीच्या ओळखीच्या असलेल्या आणि आपल्याच फील्ड मध्यल्या .अंजलीवाहिनी

यांच्या बद्दल आपल्याला ..किती होप्स होत्या ..त्यांचा फुल सपोर्ट मिळेल याची खात्री होती ..

पण ..इथे ही आपला अंदाज साफ हुकला ..उलट ..अंजलीवहिनींना आपला डाउट येतोय ,

ही मोनिका ..एकतर्फी वाटावे असा इंटरेस्ट ..यशमध्ये का दाखवत आहे ?

मोनिका ..अपसेट होऊन गेली होती ..

आज पहिल्यांदा ..तिच्या वाट्याला ..या यशमुळे..सक्सेस तर दूरच फक्त निराशा आली होती .

आणि मोनिका अशी अनसक्सेस होऊन वापस येण्याची सवय नव्हती .

काय करावे ? नव्याने काही खेळ खेळावा का ?

पण तिचे मन ..लगेच म्हणाले -

मोनिका ..तू तुझ्या पपांच्या अनुभवावरून काही शिकत का नाहीस ?

हा यश तुझ्यासाठी युजलेस आहे” हे कळून जर तू पुन्हा काही करायला गेलीस ..

तर तुझ्या पदरात फक्त निराशा पडेल .

त्यापेक्षा पापांचे ऐक ..त्यांनी शोधलेला एखादा मुलगा मिळाला तर त्यालाच तू हो म्हणावेस

कारण तुझ्या पापांनी ..त्या मुलाला अगदी पारखून ..निरखून घेतलेला असेल ..

पापांनी तुझ्यासाठी ठरवलेला मुलगा हा नक्कीच यशसारख्या साधारण मुलापेक्षा ..लाखोपटीने ..तुझ्यासाठी योग्य असेल

..जो त्यांचा घरजावई होण्यात स्वतःला धन्य समजेल .

तुझे पप्पा ..त्यंच्या लाडक्या मुलीसाठी तिचा “जोरु का गुलाम नक्कीच आणतील.

त्यामुळे तू आता या यशचा नाद सोडून दे ..तू सुरु केलेला तुझा खेळ थांबव .

मोनिकाच्या मनाची अशी डिंग-डॉंग अवस्था झाली ..

यातून तिलाच एक जाणवले ..की

या यशवर आपले प्रेमबीम काही नाहीये ..हे एका दृष्टीने बरे झाले ..

आपल्याबद्दल या यशला आकर्षण नक्कीच वाटले आहे ..ज्याज्या वेळी आपण त्याच्या अगदी जवळ

गेलो ..तेव्हा त्याच्या मनातली खळबळ जाणवत होती ..बट धीस इज नॉट लव्ह ...!

आणि समजा ..इतक्यावर ही ..आपण ठरवले ..की या यशला सोडायचे नाही ..

पण ..,यात एक गोष्ट पुन्हा आडवी येते आहे – ती म्हणजे -

त्याच्या घरातल्या माणसांच्या मनात आपल्याबद्दल सोफ्ट- कॉर्नर नाहीये ..

हे पण आपल्याला दिवसभर राहून दिसले आहे ,जाणवले आहे.

अंजलीवाहिनी , आजी-आजोबा , यशचे आई –बाबा ..आणि स्वतहा यश ..इतके स्पीड ब्रेकर

आहेत आपल्या रस्त्यात ..आणि ती महामाया आहेच ..मधुरा ...! फालतू आणि फडतूस मुलगी ..

कशी काय आवडली या लोकांना .....एकदम बेकार चोइस..!

आजच्या भेटीत अंजलीभाबी आपल्या बाजूने बोलतील ..हा अंदाज पार चुकला ..आता तर असे

वाटते आहे की ..ही बाई..आपल्या मावशीकडून खरी गोष्ट काढून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ..

आपले बिंग फुटल्यावर तर ही फ्यामिली समोर उभे करणार नाही ..मग कसला आलाय यश ..!

काय करावे ? काय ठरवावे ..?

मोनिका स्वतःवरच चिडली ..आपला अंदाज इतका चूक कसा काय ठरला ?

जे ठरवले ..ते होणार नाहीये ..आपली ही हार नाहीतर काय आहे ?

स्वतःवर जाम संतापून गेली मोनिका , तिचे डोके चालेनासे झाले.

ती उठून बसली ..थंडगार पाणी पिल्यावर तिला बरे वाटले ..टेरेसवर थोडा वेळ फिरत राहिली ,

डोके शांत झाले ..मन स्थिर झाले ..घड्याळात पहाटेचे चार वाजत आलेले होते ...

मोनिकाने laptop सुरु केला ..विवाहमंडळाची साईट ओपन केली ..

यशचे प्रोफाईल दिसले ..त्याच्या हसऱ्यावर स्मार्ट फोटो कडे पहात म्हणाली..

यु फूलीश बोय ..! गेलास उडत , तुझी लायकीच नाहीये बावळट मुला ,

मोनिकासारखी अप्सरा मिळायला नशीब तितकाच जोरात असावे लागते .

कधीच कळणार नाहीत तुला अशा या गोष्टी .

आणि यशच्या प्रोफाईलला दिलेला ..तिचा इंटरेस्ट “ “ मोनिकाने सरळ सरळ डिलीट..करून टाकला ..

त्यानंतर ..मोनिकाला पलंगावर पडल्या पडल्या झोप लागली होती ...

**********

२.....

यशच्या घरची पहाट रोजच्यासारखी सुरु झाली होती ..हॉलमध्ये चहासाठी सारे जमले होते ..

आठवड्याचा पहिला दिवस त्यामुळे ..अंजली वहिनी आणि सुधीरभाऊ ..दोघे ऑफिसला जाण्याच्या

घाईत होते ..

आजोबा म्हणाले ..अंजली ..कालचा दिवस .कायम लक्षात राहील ..

ती मोनिका ..आणि ही मधुरा ..दोन टोकाच्या पोरी..

पण दोघीत किती फरक रे रामा ..!

बरे ते जाऊ दे ..जरा यशचे प्रोफाईल ओपन कर ..

त्या मोनिकाच्या स्थळाला ..रिप्लाय देऊन टाक ..नो इंटरेस्टचा ..,

तिचा इंटरेस्ट आलाय न कधीचा ?

हे ऐकून अंजलीवहिनीने यशलाच सरळ विचारले ..

काय रे यश ..देऊ ना असाच रिप्लाय ?

तो म्हणाला ..वहिनी ..!तसे तर मोनिकाने या आधी काय नि कालच्या भेटीत काय ..तिच्या बोलण्यातून

एक प्रपोजल म्हणून माझ्यात इंटरेस्ट दाखवला , त्यात .तिचा काय उद्देश आहे हे कळलेले नाही ..

आजोबा म्हणाले ..अरे .यश ,म्हणूनच तुला सांगतो

या मुलीचे काही खरे नाही ..तू उगीच काही विचार नको करू .

अंजलीवहिनीनी laptopसुरु केला ..वेबसाईटवर जाऊन प्रोफाईल ओपन केले ,

त्यांनी पाहिले आणि ..

आश्चर्याने आणि आनंदाने मोठ्याने त्या म्हणाल्या ..

अहो आजोबा ..आजी - बघा ना !

चमत्कार झालाय इथे तर ..

मोनिकानेच तिचा इंटरेस्ट ..डिलीट करून टाकला आहे ..

आजी म्हणाल्या ..देवा परमेश्वरा ..सुंठीवाचून खोकला गेला म्हणयचा ..

मोनिकाच्या या माघार घेण्याने .घरातील सगळे खुश झाले आहेत हे यशला जाणवले ..

आणि आपल्या मनात कुठे तरी खोलवर ..एक सुटकेची भावना डोके वर काढीत आहे..हे जाणवले .

म्हणजे ..आपण इच्छा नसतांना ..मोनिकाला प्रतिसाद देत होतो की काय ?

यशच्या आई म्हणाल्या ..

अंजली ..मोनिकाला समक्ष पाहून, तिचे वागणे पाहून तुझा बदलेला मूड लक्षात आला होता माझ्या .

मला या मोनिकाच्या हेतू बद्दलच शंका येत होती , आणि तू ही शंका निरसन करणार याची खात्री होती ..

सुधीरभाऊ म्हणाले .. जे होते ते चांगल्यासाठीच होते .

मोनिकाच्या मायावी जाळ्यातून आपली अनपेक्षित सुटका झालीय हे मात्र खरे ..!

***********

३...

मोनिका प्रकरण अचानकपणे समाप्त झाल्यामुळे ..यशच्या घरातले वातावरण आठ-पंधरा दिवसात

नॉर्मल झाले.

स्वतहा मोनिकासुद्धा यश नावाच्या ordinary मुलाला आपण भेटलो,त्याच्याशी जवळीक साधली होती ,

हे कधीच विसरून गेली होती .तिच्या जगात असे फ्रेंड –चेंज करण्याचा ट्रेंड होताच ,

त्यामुळे ..तिला काडीमात्र फरक पडला नाही.

यशला वाटले दोन दिवस.. ही मोनिका नावाची मुलगी विनाकारण डोकावून गेली आपल्या साध्या आयुष्यात .

हळूहळू तो ही आपल्या रुटीन मध्ये सेटल झाला .

नेहमी प्रमाणे यश नुकताच त्याच्या ऑफिस मध्ये येऊन बसला होता ,

मागे असलेल्या ग्यारेज मध्ये आज कामावर कोण आलाय ,कोण नाही आले ? याची पाहणी करीत होता ,

हातावर खूप काम असणार आहे..आठवडाभर ..रिपेअरसाठी ,सर्विसिंग साठी,

सजावटीसाठी नव्या गाड्या ..सगळी लिस्ट खूप मोठी होती .

मागच्या विभगात काम करायला पुष्कळ लेबर –मेकेनिक असायचे ,

पण ऑफिस वर्क ,अकौंटंसेक्शन , आलेल्या क्लायंटशी बोलणे ..या कामासाठी

यशला नेहमीच माणसांचा तुटवडा असतो ..या कामात टिकून राहणारीमाणसे मिळत नसायची .

एक तर काम खूप ..पण..मिळणारा पगार त्या मनाने कमी अशी हे तक्रार करणारे जास्त ..

कोलेज जाणारे , क्लास करणारे , शिकता शिकता काही कमवता आले तर बरे ..या हिशोबाने

हा असा जॉब करण्यासाठी जास्त करून येत.

त्यामुळे ..ऑफिस म्यानेजमेंटची बाजू जरा ..लंगडी आहे ..

असे सध्या ऑफिसमध्ये असलेले त्याचेदोन्ही स्टाफ ..यशला सांगत असत .

चार माणसांचे काम.. दोन माणसांना करावे लागणे म्हणजे ..लोड येतो “अशीच भावना काम करणार्याच्या मनात येणार “..

काय करावे ? मोठाच प्रश्न यशच्या समोर होता .

या विचारात तो आपल्या खुर्चीवर बसून बाहेर पहात होता ..स्कूटीवर न येता ..पाय चालत येणारी मधुरा

त्याच्या ऑफिस मध्ये येत आहे हे त्याला दिसले ..

काय काम असावे ? काही प्रोब्लेम तर नसेल ना ? तिला ?

********************************************************************

बाकी वाचू या पुढील भागात

भाग – १५ वा लवकरच येतो आहे..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------