22 वा मजला Sanjeev द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

22 वा मजला

22 वा मजला
आज पंचवटी चुकली होती ऑफिस मधून निघताना उशीर झालेला होता. राज्यराणी, विदर्भ एक्सप्रेस आदी सगळ्या गाड्या मी सोडून दिल्या होत्या, सरळ मुंबई CSTM ला आलो, गरम गरम सामोसे खाल्ले, 2 कप कॉफी प्यायलो आणि सरळ पंजाब पकडली, नासिक मुंबई नाशिक अंतर फारसं नसल्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या कुठल्या गाड्या मला चालायच्या व आज ही चालतात, पंजाब ला तशी गर्दी होती परंतु पंजाब मेल नाशिक कोटा असतो त्या III TIRE कोच मध्ये मी जाऊन बसलो.
योगायोगाने TC शुक्लजी पण ओळखीचे होते ते नेहमी या रूट वरती असायचे माझ्याकडे बघून हसले
"या वेळेला पंजाब...!!!!"
"हो ना ऑफिस मधून निघायला उशीर झाला"
मुंबई CSTM हुन गाडी सुटली. मी लॅपटॉप काढला एक-दोन अर्जंट मेल मला पाठवायच्या होत्या, त्यामुळे लॅपटॉप उघडून मी कामाला सुरुवात केली.
लॅपटॉप काढताना लॅपटॉपच्या बॅगमध्ये माझ्या जवळच शंकर महाराजांचा एक फोटो होता तो फोटो खाली पडला. माझ्या शेजारी एक पंजाबी माणूस बसलेला होता त्या माणसाने तो पडलेला फोटो उचलला मग फोटो हातात घेतला, एकदाचे त्या फोटोकडे बघत असे तर एकदा माझ्याकडे. . . .!, असं दोन तीन वेळा झालं, मला जरा विचित्र वाटलं, पुढचं सगळं संभाषण हिंदीत न असलं तरी इथे मी मराठीमधील दिल आहे.
त्यांन मला विचारलं,"तुम्ही यांना ओळखता का ?".
"हो, का काय झालं ???".
"नाही माझी आणि यांची एकदा भेट इथे मुंबईत झाली" "तुमची पण भेट झालेले आहे का..?"
म्हटलं "हो एकदाच, पण ती सुद्धा गिरनार च्या पायथ्याशी"
"पण हे राहायला कुठे असतात...?"
एकंदर त्यांच्या प्रश्नांवर असं दिसत होतं की त्याला शंकर महाराजांची माहिती नसावी.
मी त्याला म्हटलं "त्यांचा राहण्याच मी तरी काय सांगणार आहो ते सगळीकडे राहतात"
तो म्हणाला "पण कुठेतरी एखादी त्यांची स्वतः ची जागा तर असेल ना....?"
म्हटलं, "हो आहे ना, तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर पुण्याला धनकवडीला शंकर महाराज यांचा मठ कुठे आहे असे विचारायचं".
"तुम्हाला रिक्षा-टॅक्सी कोणीही सोडून देईल...".
"अच्छा म्हणजे यांचा मठ आहे".
मी पुढे त्यांना म्हणालो ते मठात आणि सगळीकडे असतात"
"ते कधी कोणाला भेटतील याचा काही नेम नसतो" "कोणास ठाऊक कदाचित आत्ता ह्या पंजाब मेल मध्ये असतील".
माझ्या मेल लिहून झाल्या होत्या, सहज मी त्या पंजाबी माणसाला विचारलं की "हे तुम्हाला कुठे भेटले..?"
त्यानं सांगण्यास सुरुवात केली
"मी मूळचा दिल्लीचा, आर्मी मध्ये आहे, मुंबईला किंवा कधीकधी पुण्याला मला कामासाठी यावं लागत, मागच्या ३ ४ वर्षा पूर्वी मी मुंबईला आलो होतो तेव्हा मी माझी ऑफिसची सगळी काम आटपून माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो, तो गोरेगावला राहतो हरमिंदर त्याचा मोठा business आहे, बिल्डिंग च नाव आता एकदम लक्षात नाही पण असेच पंचवीस-तीस माळ्याची बिल्डिंग". "बावीसाव्या मजल्यावरती तो राहतो, खूप दिवसांनी आम्ही भेटलो गप्पा मारल्या नंतर बिल्डिंगच्या टेरेस वरती गेलो वरन एकूण मुंबई च दृश्य फार सुंदर दिसत होत, मी मोबाईल घेऊन panoramik फोटो काढत होतो, मला फक्त हे आठवत नाही की मी तोल जाऊन कसा काय पडलो, मी खुप आठवण्याचा प्रयत्न करून पहायला तरी अगदी आज ही मला काहीच आठवत नाही, माझ्या मित्राचे "सुखविंदर.S...SS.,...? सुखविंदर...", एवढे
शब्द आठवतात, अतिशय वेगात खाली पडलो दोन मिनिट आजूबाजूचे जग वाकडे तिकडे फिरलेला जे काय मला दिसला असेल तेवढं पुढचं काही आठवत नाही, नंतरच जाणीव होती ती फक्त वेदनांची एखाद्या पोत्यांमध्ये खच्चून वाळू भरावी तसा माझ्या सगळ्या शरीरामध्ये असंख्य वेदना होत होत्या असह्य वेदना जीवाच्या आकांताने मी ओरडत असावा, हळू हळू डोळ्यापुढे अंधाराचा पडदा पसरत गेला मला एवढंच कळलं की सगळं संपलं होतं. खरंच मला मरायची अजिबात इच्छा नव्हती पण त्या क्षणी सुद्धा मला असं वाटलं की जगलं पाहिजे, मध्ये किती काळ गेला कुणास ठाऊक जाग आली तेव्हा बाजूला दुपारी बारा वाजता सूर्य ढगांनी झाकलेला असेल तर तर कसं प्रकाश पडलेला असतो तसा प्रकाश सगळीकडे पडलेला होता आजू बाजू च धुकं बाजूला करत मी गर्दीच्या दिशेने निघालो, खूप गर्दी जमलेली होती आणि माझं मलाच नवल वाटलं मीच होतो, मी जमिनीवर ते सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होतो. . . आणि गर्दीत मीच मला बघत होतो, मी माझ्या शरीराचा जवळ जावून शरीरात शिरण्याचा प्रयत्न करून पाहिला पण तसं काही झालं नाही. लोकांची कुजबुज चाललेले होते माझा मित्र माझ्या कानापाशी ओरडत होता...
"ॲम्बुलन्स...."
"ॲम्बुलन्स आली, बॉडी अँब्युलन्स, मग डायरेक्ट हॉस्पिटल कडे नेण्यात आली, मी तरंगत गेलो की अँब्युलन्स मध्ये बसून गेलो हे मात्र मला अजूनही आठवत नाही मला हाय इन्टेन्सिव्ह केअर युनिट मध्ये हलवण्यात आलं होतं डॉक्टरांनी हृदय बघितले पण ते बहुतेक बंद असाव, किंवा काय माहीत नाही, शरीराला लावलेले निरनिराळ्या मशिनरी सलाईन छातीत देण्यात आलेली इंजेक्शन सगळे मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो आणि विशेष म्हणजे मला काही दुखत नव्हत. HICU मध्ये कोणालाच प्रवेश नव्हता, त्याच्या बाहेर मी जेव्हा आलो त्या वेळेला अचानक हा जो हाताचा तुमचा फोटो आहे ना त्या फोटो मधले बाबा पांढरा सदरा आणि लेंगा काळेभोर दाट केस वाढलेली दाढी आणि काळेभोर डोळे त्यांनी एकदम माझा हात धरला आणि मला म्हणाले "चलो" मी माझा हात सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर होतो गोष्ट माझ्या लक्षात आली होती ती त्यांच्याशी झालेल्या सगळे संभाषण हे शब्दरूपाने नव्हतं ही विचारांची देवाणघेवाण होती हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर मी त्यांना म्हटलं की "मला क्षमा करा, माझ्याकडून खूप चुका झाल्या पण मला एवढ्यात मरायचं नाहीये, मला परत माझ्या शरीरात जायचे तुम्ही मला मदत करा त्यांच्या डोळ्यांमध्ये वात्सल्य होत, अतिशय करुणा होती ते म्हणाले "थोडा वक्त" मला त्याचा अर्थ काहीच लागला नाही माझ्या शरीरामध्ये कुठलीही वेदना नव्हती, आजूबाजूस वातावरण अतिशय प्रसन्न होत आणि त्या एका माणसाशिवाय मला बाकी सगळं दृश्य आहे तास दिसत होतच पण आम्ही दोघे काही कोणास दिसलो नव्हतो.
मी परत एकदा त्यांना विनंती केली की "मी मला बघून येऊ का तेव्हा त्यांनी होकार दर्शक मान हलवली मी आयसीयूमध्ये येऊन बघितला मी तसाच पडलेलो होतो डॉक्टर साहेब बोलत होते "सगळ्यात मला विशेष वाटतं एवढ्या 22 व्या मजल्यावरुन खाली पडला तरी मल्टिपल fractures फक्त हातात खांद्यात आणि उजव्या हातात एवढे झालेत आणि कपाळावरती खोच पडलीत एवढीच, स्पायनल ला अजिबात धक्का बसलेला नाहीये हार्ड बीट मिसिंग आहेत पण अधून मधून पडतात"
तोपर्यंत माझे आई-बाबा पण दिल्लीहून येऊन पोहोचले होते हे सगळं मला दिसत होतं पण मी कोणाशी बोलू शकत नव्हतो मी परत बाहेर आलो कारण माझ्या शरीरात जाण्याकरता मला मदत फक्त हाच माणूस करू शकणार होतो एवढे मात्र माझी खात्री होती म्हणून मी बाहेर आलो आता जर का हा माणूस भेटला नाही तर काय या विचाराने मी अतिशय बेचैन झालेलो होतो मनातल्या मनात देवाचे सारखे प्रार्थना करत होतो मी सगळं सोडून देईन आत्तापर्यंत माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल मी माफी मागतो पण मला एवढ्यात मारायचं नाही मला तूम्ही काही करून वाचवा, असं म्हणून मी हॉस्पिटलच्या बाहेर आलो त्या वेळेला कंपाउंड लगतच्या एका बाकावर ती हे बसलेले होते, मी त्यांच्याजवळ गेलो त्यांना वाकून नमस्कार केला त्यांनि मला प्रेमाने माझ्याजवळ बसवून घेतल, त्यांच्या स्पर्शामध्ये एक अवर्णनीय प्रेम होतं,एक प्रकारची शांती होती अश्वस्थपणा होता, आश्वासन होतो एकदा त्यांनी माझ्याकडे बघितलं माझ्या पाठिवरून हात फिरवला मला म्हणाले की "चल तुझी, जायची वेळ झाली..." आजूबाजूचा प्रकाश मात्र तसाच होता मी घड्याळात बघितलं तेव्हा संध्याकाळ होत आली होती पण मी बिल्डिंग वरून पडलो तेव्हा प्रकाश होता तो प्रकाश तसाच होता मी माझ्या शरीराला पाशी आलो डॉक्टर होते काहीतरी चेक करत होते मात्र माझ्या शरीरामध्ये मी कसा काय शिरलो हे मात्र मला कळलं नाही जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या अंगातून खांद्यातून असह्य वेदना होत होत्या पायामध्ये असह्य वेदना होत होत्या, आता मात्र मी पलंगावर , माझ्या सगळ्या शरीरात घातलेल्या नळ्या, सलाईन, प्लास्टर त्यांचा स्पर्श मला जाणवत होता आजूबाजूला उभ्या असलेल्या सिस्टर डॉक्टर मशिनरी सगळे मला धुसर दुसर दिसत. पुढे जवळ जवळ दोन महिने हॉस्पिटलमध्ये होतो ह्या गोष्टीला तीन-चार वर्ष होऊन गेली पण ही गोष्ट मी कधीच कोणाला सांगितले नाही कारण एक तर लोकांनी मला वेड्यात काढला असत, पण हा फोटो बघितला आणि मला एकदा हे सगळं आठवलं, हात जोडून वाहे गुरू म्हणत सरदारजीने त्या फोटोला नमस्कार केला आणि मला म्हणाला की
"पुढच्या वेळेला मुंबईला आलो की मी पुण्याला नक्की जाईन आणि धनकवडीला जाऊन यांना तर नक्कीच भेटून येईन"
मनोमन मी शंकर महाराजांना नमस्कार केला म्हटलं महाराज सुखविंदर सिंग पुण्याला आले की त्यांना नक्की भेटा बरं.......!!!!!!!!
माझ्या डोळ्याच्या ओलावलेल्या कडा मी सुखविंदर च्या लक्षात येणार नाही अशा बेताने पुसून टाकल्या...!!! घड्याळ बघितलं अजून पाच ते दहा मिनिटात नाशिक रोड स्टेशन येणार होत.
मी तो फोटो त्याच्या जवळ दिला आणि त्याला म्हणालो "माझी अशी विनंती आहे की ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका.... आणि हा फोटो तर कोणालाच.... दाखवू नका जेव्हा केव्हा तुम्हाला जमेल तेव्हा धनकवडी ला जाऊन याल तेव्हा ह्याना। नक्की यांना भेटून या...
आणि हा फोटो ह्यांनीच मला गिरनार पर्वताच्या पायथ्याशी दिला होता तो फक्त हरवू नका....!!!

घरी आलो स्वामी महाराजांच्या फोटोला नमस्कार केला.
अनंतकोटी ब्रम्हांनायक स्वामीं च शंकरमहाराजवर अतोनात। प्रेम होतं, अगदी लहान पणा पासून शंकर महाराजांना स्वामींचा सहवास लाभला, स्वामी कृपेची खूण म्हणजे शंकर महाराजांची अनुभूती.....!!!