ti kojagruti pornima(bhag-tin) books and stories free download online pdf in Marathi

ती कोजागृती पौर्णिमा (भाग-तीन)

रात्रीची वेळ.…
सौरभच फार्महाऊस...
खोलीत विराजच शव बघुन सगळेच स्तब्ध होतात. वातावरणात एक प्रकारची शांतता पसरलेली असते. प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती पसरलेली असते. सगळेच विचारमग्न होतात. आणि तेवढ्यात सौरभला गतकाळात आपण केलेल्या कृत्याची आठवण होते.
भुतकाळात...
सकाळची वेळ...
कॉलेजचा पहिला दिवस..
कॉलेजमध्ये मुलांची वर्दळ असते. कुणी आपली बाईक पार्क करत असत तर कुणी आपल्या गृपबरोबर कॅम्पसमध्ये गप्पा मारत असत. सौरभचा गृप सिनिअर असतो. तो नवीन आलेल्या मुलांची ओळख परेड घ्यायला सुरुवात करतो. सगळे स्टाईलमध्ये उभे असतात त्यांच्या समोर काही मुलं मान खाली घालुन उभी असतात त्यांना सौरभ म्हणतो. "काय रे, तुमची नाव काय आहेत?" एक मुलगा घाबरून उत्तर देतो. "माणिक.. माझं नाव माणिक आहे." लगेच हसत रेवती विचारते. "हेहेहे... माणिक कुठला माणिक?" माणिक विचारतो. "मी समजलो नाही." लगेच सौरभ म्हणतो. "म्हणजे. हिरा, पाचु, तस कुठला माणिक?" माणिक भीत भीत बोलतो. "ते माझं नाव आहे." लगेच चिडलेल्या स्वरात विराज म्हणतो. "सिनिअरला उलट उत्तर देतोस? तुला माहितीये हे कोण आहेत? चल कान पकड आणि उठा बश्या काढ." माणिक भीत भीत बोलतो. "हे.. हे बघा रॅगिंग करणं गुन्हा आहे, तुम्हाला रस्टीगेट करू शकतात आम्ही प्रिन्सिपल सरांना तुमची तक्रार करूत." सौरभचा गृप हसु लागतो. लगेच सौरभ माणिकला हसत हसतच विचारतो. "कोण तक्रार करेल आमची? (एका मुलाला समोर करत) हा.. कि, (दुसऱ्या मुलाला समोर करत)हा. कोण तक्रार करेल? (माणिक जवळ जात) कि, तु आमची तक्रार करशील? बोल आहे एवढी हिम्मत तुझ्यात?" सौरभ माणिकला एक जोरात धक्का देऊन खाली पडतो. आणि म्हणतो. "चल करच आता आमची तक्रार तु." अस म्हणत सगळे माणिकला बेदम मारू लागतात. तेवढ्यात पौर्णिमा येते आणि त्यांना ओरडते. "स्टॉप इट, हे काय चाललंय तुमचं? तुम्हाला माहीत आहे न रॅगिंगवर बॅन आहे. तरी हे सगळं सुरू आहे तुमचं. बंद करा आधी हे सगळं" मीनल समोर येत बोलते. "तु इतकी ह्याच्या बाजुनी बोलत आहेस हा कुणी तुझा भाऊ आहे का? की, लवर आहे अं." पौर्णिमा चिडते आणि मिनलला बोलते. "डोकं बिक फिरलंय का तुझं तु काय बोलत आहेस हे कळतय का तुला?" लगेच मीनल बोलते. "अच्छा आता तु सांगणार आहेस मला मी कस बोलायचं ते." दोघी भांडु लागतात. माणिक आधीच घाबरलेला असतो दोघींचं भांडण बघुन तो आणखीनच घाबरतो त्याला चक्कर येते आणि तो खाली पडतो हे बघुन सगळे घाबरतात आणि तिथुन पळुन जातात. पौर्णिमा आणि तिचे काही फ्रेंड्स मिळुन माणिकला दवाखान्यात नेतात.
इकडे...
सौरभ आणि त्याचा गृप पोर्णिमावर खुप चिडलेला असतो ते सगळे आपल्या हरण्याचा बदला घेण्याचं ठरवतात. इकडे पौर्णिमा माणिकला घेऊन दवाखान्यात आलेली असते तेव्हा सगळे पोर्णिमाच्या क्लासमध्ये येतात आणि कुणी नसल्याचं बघुन माणिक आणि पोर्णिमाच फळ्यावर चित्र काढतात. आणि निघुन जातात काहीवेळानंतर क्लासमध्ये पौर्णिमा येते ती ते चित्र बघुन सौरभवर खुप चिडते आणि गृपशी भांडायला जाते. पण बाहेर पडताच तिला कॉलेजच्या प्रत्येक भिंतीवर त्या दोघांची चित्रे काढलेली दिसतात ते बघुन तिला खुपच वाईट वाटत. आणि ती कॉलेज मधुन निघुन जाते.
दोन दिवसा नंतर...
सकाळी माणिक भीत भीतच कॉलेजमध्ये येतो त्याला बघुन काही ज्युनियर्स त्याच्या जवळ येतात आणि त्याची विचारपुस करतात. "हाय, कसा आहेस मित्रा? अचानक काय झालं होतं एवढं? तु चक्कर येऊन पडला होतास आम्ही खुप घाबरलो होतो एका मुलीने तुला दवाखान्यात नेलं. आता कशी आहे तब्येत तुझी?" माणिक विचारतो. "मी बेशुध्द पडलो होतो? मला तर काहीच आठवत नाही. त्या मुली भांडत होत्या आणि एका मुलीने माझी बाजु घेतली मला इतकंच आठवतंय. कुठे आहे ती मुलगी? मला तिची माफी मागायची आहे यार माझ्यामुळे तिला खुप काही ऐकावं लागलंय." मुल त्याला समजावतात. "यार, बघ वाईट वाटुन घेऊ नकोस. पण तु इथे नसताना खुप काही घडलंय त्यामुळे सध्या तिला भेटु नकोस सोड सगळं चल कँटीनला जाऊत." सगळे कँटीनला जातात आणि अचानक त्यांना तिथे पौर्णिमा दिसते दोघ एकमेकांकडे बघतात माणिक तिला भेटायला जाणारच असतो तेवढ्यात सौरभ आणि त्याचा गृप दोघांवर हसु लागतात. माणिकला नेमकं काय झालंय हेच समजत नाही त्यांचं हसणं बघुन पौर्णिमा मात्र तिथुन निघुन जाते.
वर्तमान काळात...
सौरभ विचारमग्न असतो. अचानक त्याला काही तरी आठवत आणि तो भानावर येत गृपला सांगतो. "यार! तुम्हाला पौर्णिमा आठवतीये? मला वाटतंय पौर्णिमा परत आलीये किती त्रास दिला होता यार आपण तिला. अगदी कळस गाठला होता आपण. मला वाटतंय आज जे काही झालं ते तिनेच केलंय." मीनल म्हणते. "काय बोलतोएस सौरभ ती कशी काय परत येईल? तिला तर आपण.(मध्येच थांबते.)" भीत भीत विनम्र बोलतो. "तरी आम्ही सगळ्यांनी तुला सांगितलं होतं सौरभ तुला. त्यांना टॉर्चर करू नकोस पण तु आमचं ऐकल नाहीस ती परत आलीये." चिडुन रेवती बोलते. "काय चाललंय तुमचं गेलेली व्यक्ती परत येते का कधी? अस काही नसतं चला आपण बघुन येउत." सगळे काब्रिस्तानात जातात. खुप भयानक वातावरण असत वारा वहात असतो सगळे पौर्णिमेच्या कबरीकडे जातात आणि तिची कबर खोदु लागतात. त्यांना त्यांच्या मागे कुणीतरी असल्याचा भास होतो आणि अचानक सगळे मागे वळतात तेव्हा त्यांना फक्त अंधार दिसतो. किर्रर्र..अंधार बघुन सगळे एकदम घाबरतात...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED