That Kojagruti Pournima (Part-IV) books and stories free download online pdf in Marathi

ती कोजागृती पौर्णिमा (भाग-चार)

पानांची सळसळ होत असते. सगळीकडे दाट अंधार पसरलेला असतो. आणि अचानक वारा सुटू लागतो. इकडे सौरभचा गृप कब्रस्तानातील पौर्णिमाची कब्र खोदत असतात. तेवढ्यात बाजूच्याच कब्रितुन एक हात बाहेर येतो. ते सगळे अजुन घाबरतात आणि एक फूट मागे सरकतात तेवढ्यात त्यांना आपल्या मागे कुणीतरी असल्याची चाहुल लागते. आणि ते परत मागे वळतात. आता मात्र मिनलला ही खुप भीती वाटत असते. ती सगळ्यांना उद्देशुन बोलते. "यार मला वाटतंय आपण इथे नको होतं यायला. ह्या रेवतीच आपण ऐकल आणि आपला जीव धोक्यात घातला आहे. यार तु का सगळ्यांना इथं आणलस? मला वाटतंय इथे नक्कीच
काहीतरी गडबड आहे आपण इथुन निघायला हवं सोडा ते सगळं." ती निघायला लागते तेवढ्यात रागाच्या भरात रेवती मिनलला बोलते. "मिनु हे तु बोलत आहेस? तुमच्या मनातली भीती जावी म्हणून आणलं न मी तुम्हाला इथे. आता इथे हे असं होईल हे कुठं माहीत होतं मला." लगेच सौरभ मध्यस्थी करत. बोलतो. "इथे ही तुमची भांडणं सुरू झाली का रे? आता इथुन जरा बाहेर पडायचं बघा." सगळे बोलता बोलता रस्त्याकडे निघतात आणि अचानक काब्रिस्तानचा दरवाजा लागतो आणि जोरात वादळ सुरू होते. इकडे रेवतीच्या अंगात पोर्णिमाचा आत्मा शिरलेला असतो. कब्रिस्तानचा बंद झालेला दरवाजा बघुन सगळे घाबरतात मागे सरकतात त्याक्षणी रेवती पोर्णिमाच्या आवाजात बोलु लागते. "मी सांगितलं होतं न कुणालाही सोडणार नाही मी माझा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही जे केलय त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल ही तर सुरुवात आहे पण लवकरच तुमचेही नंबर येतील." एवढं बोलुन पौर्णिमा अचानक रेवतीला खेचुन घेऊन जाते. आणि त्या किर्रर शांततेत एकच भयावह आवाज घुमतो. आणि परत सगळीकडे किर्रर शांतता पसरते. सगळे त्या दिशेने फक्त बघत राहतात. अचानक विनम्र भानावर येतो आणि भीत भीत बोलतो. "इथुन पळा आता आपलं काही खर नाही आधी विराज गेला आता रेवती गेली मला पुर्ण खात्री पटली आहे त्या दिवशी आपल्या हातुन जे घडलंय त्याची शिक्षा आपल्याला मिळाल्या शिवाय राहणार नाही आणि मला मारायचं नाहीये फ्रेंड्स मला जगायचं आहे चला इथुन." लगेच सगळे भानावर येतात. सौरभ त्याला धीर देत बोलतो. "कम डाऊन विन्या अस घाबरू नकोस यार भीती मला ही वाटतीये पण तु हे कसं बोलु शकतोस रेवती देखील आपल्यात नाहीये. ती आहे इथेच आहे कुठेतरी आपण शोधायला हवं तिला. तिला खुप भीती वाटत असणार यार." सगळे त्याच्याकडे रागाने बघतात मीनल बोलते. "सौरभ अचानक तुला तिचा एवढा पुळका का येऊ लागलाय. तो तुच होतास न काही वेळापूर्वी तिच्याशी भांडणार. गेलीये ती आता. आणि आता तु फक्त तुझा विचार कर आणि आमच्या बरोबर चल. आणि जर नाही चलायच असेल तर आम्हाला यात ओढु नकोस आम्ही जातोय आम्हाला आमचा जीव प्यारा आहे. गुड बाय." एवढं बोलुन मिनु बरोबर सगळे निघतात तेव्हा टाळ्या वाजवत रागात सौरभ मिनुला बोलतो. "वा! वा! वा! छान मैत्री निभवतीयेस. अरे मरण तर एक न एक दिवस येणारच आहे पण तु अशी वागशील अस नव्हतं वाटलं मला. मी ज्या व्यक्तीशी भांडतो न त्या व्यक्तीला आपलं फ्रेंड सुद्धा मानतो. कारण भांडणारे देखील फ्रेंड्स असतात आणि फ्रेंड्स कुणाचं वाईट करत नाही. जा तुम्ही सगळे मी समर्थ आहे तिला शोधायला(चिडुन) जस्ट गो." सगळे पळत कब्रस्तानच्या बाहेर पडतात आणि गाडीत बसुन निघुन जातात. इकडे सौरभ रेवतीला शोधु लागतो. जिथे पहावं तिथे नुसती थडगी असतात तरी सुद्धा सौरभ रेवतीला आवाज देत चालत राहतो गडद अंधार असल्याने मोबाईलच्या प्रकाशातही त्याला काहीच दिसत नाही तरी तो चालत राहातो चालत राहातो. मध्येच त्याला कुणाचे हात लागतात तर कुणाचे पाय. भीतीच एक सावट पसरलेलं असत. सौरभ भीतीने गर्भगळीत झालेला असतो. त्याला दरदरून घाम फुटतो तरी त्याचा शोध सुरूच असतो. आणि अशातच सकाळ होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED