अनुत्तरित मैत्री.....??? - ०१ Khushi Dhoke..️️️ द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुत्तरित मैत्री.....??? - ०१

ही कथा मालिका आहे दोन जिवलग मैत्रिणींची, त्यांच्यात येणाऱ्या दूराव्याची...... एका अश्या व्यक्तीमुळे आलेला दुरावा, जो त्यांना वेगळं करू पहातो...पहिल्या प्रयत्नात खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे कृपया सहकार्य करावे.✍️🤗🙏...
.
.
.
.
"का..... का तू अस केलंस? तुला कुणी दुसरा मिळाला...... तुझ्या आयुष्याचा जिवलग..... म्हणून, तू आपली मैत्री विसरून....... त्याच्या सोबत गेलीस......😒😒 आणि गेलीस तर गेलीस माझ्यावर खोटे आरोप ठेवलेस? की, मला तुझं सुख बघवत नाही.... अरे बोलली तर असतीस, मी स्वतः तुझ्या आयुष्यातून निघून गेले असते...."

असा विचार करत प्रतीक्षा हरवली.. तिच्या जवळची मैत्रीण काजलकडून होणाऱ्या "त्या" वागणुकीत जी🙄🙄....

बाबा : "कुठे आहेस पोरी जरा पाणी दे ग्लास भर"🤗

बाबांच्या आवाजाने तिची तंद्री तुटली😒....आणि ती काहीच विचार करत नव्हती...... असा आव आणून पाण्याचा ग्लास देत.......

प्रतीक्षा : "काय हो आज काम जास्त नाही का दुकानात..? की गिऱ्हाईक नाहीत..? बसलाय मगापासून..?"

प्रतीक्षा त्यांच्या बाबांची एकटीच मुलगी आणि तिच्या दोन भावांना असणारी एकुलती एक बहिण तीही लहान..बाबांचा स्वतःचा व्यवसाय होता केश कर्तनालयाचा आणि आई होत्या गृहिणी.... बाबा होते साधे, मात्र आईंचा स्वभाव तापट असला तरी होत्या हलक्या मनाच्या..

बाबा : "नाही बघ आज सोमवार, आज कसले आलेत गिऱ्हाईक त्यातल्या त्यात आज दिवस जरा बोवारा वाटतोय.🥴.."

आई : "काय या माणसाचं सांगाव नाही लागत रोजच धंदा नाही म्हणत असतो... इथ घरात मला बघावं लागतं सर्व तेल - मीठ ते भांडे धुण्या पर्यंत यांना काय लागतं गिळायला?.😠."

प्रतीक्षा : "राहुदे ना गप बसतेस का आता...देतात ना झाला की धंदा...... नको आता तुझी बडबड...🙏😒😒 मला अभ्यास करायचंय शांत बस तू जरा.....माझा पेपर आहे उद्या.....तसा स्वयंपाक मीच करेल..😣.... पण, आता थांब जरा, थोड्या वेळाने करते फक्त तमाशा नको मांडू म्हणजे झालं बघ.😓...."

सगळे काम प्रतीक्षा करून सुध्दा तिच्या आईची तक्रार असायची हे नाही केलं, ते नाही केलं.... वगैरे - वगैरे... हे सर्व करून सुध्दा ती, स्वतःचा अभ्यास अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करायची....अर्थात ती शाळेत तिसरी हुशार मुलगी होती..... असणारच की मग.🤗

आई : "बंद कर तो टीव्ही आणि अभ्यासाला बस "तो" आला की रागावेल बघ तुला..😥!"

आई तिच्या मोठ्या भावाबद्दल बोलत होती. इथे एक संशय हा असू शकतो की, तिचे पेपर आहेत असे तिने आईला सांगितले..... मग टीव्ही का लावलाय???🤦🤔🤔 तर मित्रांनो ती, तीच डोकं खराब असलं की गाणी ऐकायची... त्यामुळे लावलेला.....

मोठा भाऊ अतिशय तापट स्वभावाचा होता... पण, अगदी त्याच्या उलट स्वभावाचा तिचा लहान भाऊ होता.. अगदी तिचा जवळचा मित्र म्हणून तिच्यासोबत खेळायचा.. पण, कुणी त्याच्या बहिणीला बघितलेले, तो खपवून घेत नव्हता...... घरी दोघांपैकी कुणीच त्यांच्या मित्रांना आणायचे नाहीत. बहीण घरी असते म्हणून त्यांना कुणी मुलगा घरी आलेला आवडायचा नाही.. प्रतिक्षाला सुध्दा कुणी परका मुलगा घरी आलेला ती खपवून घेत नसे. जो कुणी यायचा त्याला ती रागात बघायची....... आता हे तिच्या मूळ स्वभावातच होते.. मुलांची जवळीक तिला आवडायची नाही..

मोठा भाऊ : "झाला का स्वयंपाक🤨🤨?"

एक अगदी कडक कटाक्ष प्रतीक्षा अभ्यास करते की नाही हे बघायला तिच्यावर टाकून, मोठ्या भावाने आईला विचारले.

आई : "झालच आहे बघ वाढते😥😥"

लगबगीने आईने वाढायला घेतलं.. आणि लहान अजून का आला नाही या काळजीत ती होती.. तसा तिचा लहान भाऊ खूप बदमाश्या करायचा, बाहेर हिंदाळायचा, कुणासोबतही हाणामाऱ्या करायचा....... त्यामुळे आईला त्याची काळजी जास्तच लागून असायची..☺️☺️

लहान भाऊ : "ये आई जेवायला वाढ की ग..खूप भूक लागली आहे🤪🤪.."

थोडा थट्टा करतच आईला जेवायला मागायचा...😂😂

आई : "आलाय बघा पराक्रम करून.....😠 वाढा त्याला खायला...... कुठे गेला होतास दिवसभर...... गिळायला यायला बर आठवतं रे तुला घर....नाहीतर दिवसभर बाहेर असतोस.....लाज वाटते का जरा......फुकट गिळायला.😖😖.."

मोठा भाऊ स्वतःचा शिक्षणाचा खर्च भागावा.., म्हणून, एका जुत्यांच्या शोरूममध्ये कामाला होता आणि लहान बाहेर उन्हाळक्या करत फिरत असे त्यामुळेच आईला त्याचं काय होईल याची काळजी लागून असायची.. मोठा अतिशय हुशार होता त्यामुळे तो भविष्यात काहीतरी करेलच हा सगळ्यांचा विश्वास होता..... प्रतीक्षा तर होतीच हुशार आणि दिसायला जरी सावळ्या रंगाची असली...., तरी, चेहऱ्यावर एक तेज असायचा नेहमी..... पण, तिला तिच्या सौंदर्याची जाणीव अजून तरी कुणी करून दिलेली नव्हती कारण तिचं लक्ष यापेक्षा अभ्यासात जास्त असायचे..😎

बाबा : "जेवायला दे रे😓😓.."

आईंचा पारा नेहमी बाबांवर चढलेला...😂😂 म्हणून, बाबा नेहमी प्रतीक्षाला वाढायला सांगत....... दुकान फारसं चालत नसल्याने, तितकी कमाई नव्हती....... पण, तडजोड करून आई सर्व व्यवस्थित सांभाळायची..... रोजची वेगवेगळ्या कामांसाठी बचत करायची.... म्हणून, बाबांकडून आई पैसे मागायची..... पण, दिले नाहीत तर, मात्र घरी महाभारत होतं असे.😥👉🤬🤬..

सगळ्यांचे रात्रीचे जेवण आटोपले.... नंतर अंथरूण टाकण्याची तयारी.... तेही प्रतिक्षानेच टाकले...... सर्व तीच्याचकडेच असायचे...... तिच्या बाबांचं दुकान आधी चौकात असल्याने कमाई होत होती.... पण, नंतर अतिक्रमण म्हणून तिथून ते हटवण्यात आल्याने घरीच ते शिफ्ट केलं गेलं....... तिच्याच मोठ्या भावाच्या मेहनतीने ते दुकान नव्याने उभे होऊ शकले..... जेव्हा पासून घरी दुकान आले एकच रूम होती ज्यात स्वयंपाक आणि झोपण्याचा कार्यक्रम असायचा त्यामुळेच घरी जास्त मित्र मंडळी बोलावणं होत नव्हते...... प्रतीक्षा तिच्या मैत्रिणींना घरी बोलवत नसल्याने, त्यांच्यात ती वेगळी आहे...... असच त्यांना सतत भासत होतं....... ती कुणाला घरी बोलवत नाही, कुणाला खायला विचारत नाही अश्याच सतत तिच्या विषयी त्यांना तक्रारी असायच्या....... प्रतिक्षाचं सुध्दा बरोबर होतं, एकच कमावणारा व्यक्ती घरी असला...... की, असले चोचले कसे पूर्ण करू शकणार ती..?......😠 ती सहसा त्यांच्यात मिसळत नव्हतीच..... एकच मैत्रीण होती तिची..... ती म्हणजे, काजल....☺️ जी होती म्हणायला जिवलग..... पण, आज तिच्याच विचारांनी प्रतीक्षा च्या मनाची काहीली झालेली...😕😕😒😔😏😏

सगळे अंथरुणावर पडले... सगळे झोपी गेले मात्र प्रतीक्षाला काही झोप लागत नव्हती..... तिला सतत एकच गोष्ट आठवत होती.......ती म्हणजे, का तिच्या इतक्या जवळच्या मैत्रिणीने तिच्यावर एका तिसऱ्या कुणासाठी.....? आरोप केलेत..... जरी, तो काहीच दिवसांपूर्वी तिच्या आयुष्यात आला असला...... तरी, प्रतीक्षा मात्र काजलची अगदी पहिल्या वर्गापासूनची मैत्रीण होती......जरी त्या दोघी पाचवीनंतर एकत्र आल्या असल्या....... पण, आधीही दोघी जवळ रहायला असल्याने बोलायच्या..

"तिने अस का केलं असेल?" याच प्रश्नात ती होती.... आणि आधीचे दिवस तिच्या डोळ्यासमोर आलेत...

आता नेमकी काय भानगड ते आपण बघणार आहोत...
म्हणून भेटूया पुढच्या भागात......🙏