अनुत्तरित मैत्री.....??? - ०२ Khushi Dhoke..️️️ द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुत्तरित मैत्री.....??? - ०२











प्रतीक्षा एक सडपातळ , सावळी👩🏽 आणि थोडी चुलबुली😁, खूप बोलणारी जरी लहानपणी नसली तरी मोठी झाल्यावर तर गप्पच बसत नव्हती...

तिची मैत्रीण काजल, दिसायला तितकी नाही.... सामान्य मुली असतात तशी...... पण, नेहमीच स्वतःची छाप दुसऱ्या कुणावर पाडण्यात पटाईत.😎.

छाप पडण्यासारखे नसूनही हे काम ती चोख करायची......😂😂😂😂

प्रातिक्षाला नेहमी ती कमीच लेखायची😑....... चौथीपर्यंत काजल - प्रतीक्षा सोबत नव्हत्या....... त्या एकत्र आल्या, ते पाचवी पासूनच......... कारण, नंतर काजल जवळ फक्त "प्रतीक्षा" हीच एक पर्याय होती.. ज्या चौथीपर्यंत तिच्या सोबत होत्या...... त्याच जर, पुढेही असत्या..... तर, कदाचित.......😒😒😒 ही कथा लिहली गेली नसती...😏

एकता आणि सुनीता या दोन काजलच्या मैत्रिणी होत्या...... पण, एकता चे बाबा सरकारी कर्मचारी असल्याने त्यांची बदली झाली आणि एकताने दुसरीकडे एडमिशन घेतली... आणि सुनीता तर चक्क एक वर्ष शाळेत न आल्यामुळे मागच्या वर्गात गेली...... त्यामुळे, आता काजलकडे प्रतीक्षावाचून पर्याय नव्हता......... आणि ती तिच्यासोबत राहू लागली..

दिवस मजेत जात होते प्रतिक्षाला वाटले आता काजलच तिची जिवलग मैत्रीण.....☺️☺️.. कारण, या आधी तिने कुणाशीच इतकी जवळची मैत्री केली नव्हती..

शाळेत सोबत कुणाशी जर, एकीचं भांडण झाले तर, दोघीही त्याच्या सोबत भांडायच्या.. एकीला लागलं की दुसरीला दुःखायच.😢..

अश्यातच एकदा काजलच्या पायावरून मोटार सायकल गेल्याने तिचा फ्रॅक्चर निघाला...... प्रतिक्षाला खूप दुखून आलं मनात......☹️ रात्रभर ती झोपली नव्हती आणि दुसऱ्याच दिवशी काजलच्या घरी प्रतीक्षा हजर........ दिवसभर तिच्याच घरी असल्याने तिला घरी मार👊👊🤛 देखील खावा लागला होता....... तसही प्रतीक्षाच्या घरी बाहेर जास्त वेळ मुलीने थांबलेले चालत नव्हतेच...

एकदा काजल ची वही परत द्यायला म्हणून, प्रतीक्षा तिच्या घरी गेलेली..... पण, तितक्यातच तिची ओळखीची चुलत बहीण राहायला असल्याने ती तिच्याच घरी खेळायला थांबली आणि दोन - तीन तासांनी घरी गेली..... तिकडे तिच्या आईचे तोंड रागात लाल😡 झाले होते आणि सगळे घरी आले होते......धपाटे बसण्याची तिला कल्पना आलेली..... दारात पाय ठेवत नाही तोच एक पाठीत धापकन 🤛 बसली........ "आई ग!😢😩😫" म्हणत ती खाली पडली पण तिने घराबाहेर राहण्याची चूक केली म्हणून कुणीच तिच्यावर दया केली नाही आणि सगळे निघून गेले.... तिला घरच्यांचा खूप राग आला आणि ती स्वतःशीच पुटपुटत............

प्रतीक्षा : "अस वाटते ना......😠 इथे रहावच नाही😠...... निघून जावं आणि एकट रहावं..... बाहेर कुणी काही बोलणार नाही आपल्याला....... बाहेर आपण स्वच्छंद असू फिरायला मोकळेपणाने..."

इकडे काजल घरच्यांविरोधी तिला नेहमी भडकवायची...... तुझ्या घरचे असेच आहेत बाहेर नाही पडू देत वगैरे....... प्रतिक्षाला घरच्यांचा खूप राग यायचा....... ते स्वाभाविकही होते...... पण, ती घरच्यांच्या शब्दापलिकडे नव्हती........ म्हणून, कधीच चुकीचा निर्णय तिने घेतला नाही........आणि एकदा काजलला ठणकावले..............😠

प्रतीक्षा : "ते माझ्या घरचे आहेत कधीच माझ्या बाबतीत चुकीचं ठरवणार नाहीत..... कितीही केलं तरी......... मी, माझ्या घरचे....... जे म्हणतील, तेच करणार.......आपण फक्त बाहेर फिरूनच स्वतंत्र आहोत अस नसतं.... तर, स्वतःचे विचार स्वतंत्र असावेत..."

यावर काजल काहीच न बोलता रागात निघून गेली.......

असेच दिवस जात होते वेळोवेळी काजल हीच प्रतीक्षा ची जिवलग असल्याचा ढोंग करत होती आणि प्रतीक्षाला ती हेच पटवून देत होती की, ती प्रतिक्षाला खूप चांगली मैत्रीण मानते आणि सगळ्यांना हे दाखवून देण्यात ही पटाईत होती..

मात्र, जेव्हा निबंध लिहायचा विषय असायचा "My Best Friend" त्यात नाव मात्र काजल दुसऱ्याच मुलीचं लिहायची. ती स्वतःची जवळची मैत्रीण पूजा म्हणून लिहायची मात्र प्रतीक्षा ने तर काजल लिहले होते आणि जेव्हा तिला कळले की, काजल ने पूजा चे नाव लिहले तेव्हा मात्र तिला खूप दुखावले😢.. रात्री झोपही आली नाही...

सहसा प्रतीक्षाच्या मनाला दुखावणारी गोष्ट घडली की ती झोपायची नाही रात्रभर..

आता प्रतीक्षा च्या मनात पूजा विषयी राग😡 यायला सुरुवात झाली आणि तो स्वाभाविक होता. ती मनात विचार करायची........

प्रतीक्षा : "आपली इतकी चांगली फक्त एकच मैत्रीण असूनही...... का....ती पूजा आपल्यात येते आहे......"

तिने काजल व्यतिरिक्त कधीच कुणाचा विचारही केला नव्हता........ पण आता इथून सुरुवात झाली ती दोघींमध्ये येणाऱ्या दुराव्याची☹️ ...

नववीत असताना काजलचा वाढदिवस आला..... ११ मार्च तो दिवस असायचा... प्रतीक्षाच्या घरी कधीच वाढदिवस साजरे होत नव्हते..... त्यामुळे, ती स्वतःचा वाढदिवस कधीच लक्षात ठेवत नसायची.....

काजलच्या वाढदिवसाला काय द्यायचे आपल्या कडे पैसे ही नाहीत जेणेकरून आपण काही चांगलं गिफ्ट तिला देऊ..... त्यामुळे प्रतीक्षा ने एक पेन विकत घेतले......... ज्याचे पैसे तिने साठवले होते....... १०/-₹ ला एक पेन घेतले ते प्रतीक्षाच्या मानाने खूप महाग होते. असणारही २००९ ला १० ₹/- सुध्दा खूप मोठी गोष्ट असायची.......

प्रतीक्षा ते पैसे स्वतःच्या ड्रॉइंगच्या साहित्यासाठी साठवत होती....ती सुंदर चित्र काढायची........ स्नायू चित्र, नैसर्गिक चित्र, रंगसंगती अश्या सर्वच कला होत्या तिच्यात........


इथून पुढे आपण बघणार दोघींमध्ये परत किती दूरावे येतात.... भेटूया पुढच्या भागात....