कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -१७ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -१७ वा

कादंबरी -प्रेमाची जादू

भाग – १७ वा

------------------------------------------------

१.

------------------

अंजलीवहिनी घरी आल्या , सुधीरभाऊ आणि त्या ,दोघे ही फ्रेश झाले , तो पर्यत यशच्या आईने

सर्वांसाठी चहा तयार करून आणला ..

आणि पुन्हा एक चहा –मिटिंग टेबला भवती सुरु झाली .

तोच आजींना –यश गेटमधून येताना दिसला . त्या म्हणाल्या ..

घ्या चिरंजीव देखील कधी नव्हे तो आज लवकर आलेत घरी , आश्चर्यच म्हणयचे हे..

अंजलीवहिनी म्हणाल्या – असा सहजासहजी लवकर येणाऱ्यापैकी आपला यश नाहीये , नक्कीच काही

तरी ठरवून आले असणार महाराज .

सुधीरभाऊ म्हणाले – किती अंदाज करताय ? आलाय न तो घरात ,

चहा घेतांना विचार की ..सगळ्या शंका .

यश लगेच फ्रेश होऊन सगळ्यांच्या सोबत चहा साठी येऊन बसला .

यशची आई म्हणाली ..

अंजली ..तू ऑफिसातून निघतांना म्हणालीस ते आहे न लक्षात ..?

ते काम सगळ्यांच्या समोर करून टाकू या ..

म्हणजे .उद्याचा टाईम- टेबल फायनल करता येईल .

यशचे बाबा म्हणाले –

आता आणि काय ठरवताय उद्याच्या रविवारी ? एक रविवार फ्री ठेवत नाही आहात तुम्ही लोक .

हे ऐकून आज्जी म्हणाल्या –

अहो यशचे बाबा ..घरात लग्नाचा मुलगा असला की..असेच होत असते ..

तेव्हा शांतपणे जे जे होईल ते ते तुम्ही पाहत राहायचे .

आजोबा हसत हसत म्हणाले –

मुलानो . आपल्या घरात ..गृहमंत्री –राजवट आहे ..

तेव्हा ..आदेश ऐकायचे आणि त्याची अंमलबजावणी करायची ..हेच आपल्या सारख्या नागरिकांचे

कर्तव्य आहे . अनुभवाचे बोल लक्षात असू द्या .

हे सगळे बोलणे चालू असतांना – अंजलीवहिनीनी – पीसी सुरु केला आणि यशच्या प्रोफाईलवर

आज फोन आलेल्या गीतांजली नावाच्या मुलीचा इंटरेस्ट पाहिला आणि नंतर तिचे प्रोफाईल पाहिले ..

गीतांजली राजकीय वर्तुळात वावरणारी एक सोशल –वर्कर आहे हे दिसत होते . तिच्या कार्याचे स्वरूप

आणि त्याचा मोठ मोठ्या सामाजिक संस्थांशी असलेला संबंध ..यावरून गीतांजली आणि तिची फ्यामिली

मोनिकाच्या फ्यामिली सारखी हाय-प्रोफाईल वातावरणात राहणारी ,वावरणारी आहे .

गीतांजलीचे वैयक्तिक फोटो नव्हते , पण..नामवंत .मोठ्या व्यक्ती सोबत व्यासपीठावर असलेले तिचे

खुपसे फोटो या प्रोफाईलवर होते . विवाह –मंडळ ..म्हटले की जनरल प्रोफाईल ‘याचा एक ठराविक फॉर्म

असतो , पण, या गीतांजलीचे प्रोफाईल अपवादच आहे “ हे सगळ्यांना दिसले.

आजोबा म्हणाले –

मंडळी – ही फ्यामिली म्हणा किंवा .ही मुलगी गीतांजली .. यांनी आपला एक व्यक्ती म्हणून , यशचा

एक मुलगा म्हणून ..अजिबात विचार केलेला नाहीये “ असे माझे मत आहे.

आपल्या परिवाराच्या सार्वजनिक परिचयाचा फायदा ..गीतांजलीच्या एन्जीओ ला होऊ शकतो ,यश

स्वतहा एक सोशल वर्कर आहे “ याची माहिती तर गीतांजलीने नक्कीच मिळवली आहे.

म्हणूनच तिने आपणहून तिचा इंटरेस्ट पाठवला आहे..

प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे “ ! असा हिशेब या फ्यामिलीच्या मनात नक्कीच आहे.

हे ऐकून घेत आजी म्हणाल्या –

काय कम्माल म्हण्यची ही .. नवीनच ट्रेंड सुरु झालाय हा तर .

पण ,काय रे यश ..तू स्वतःला थोडा तरी प्रयत्न करा ..तू स्वतहा शोध यातून मुली .

.आणि तू पाठव तुझाइंटरेस्ट , मग आम्ही करतो ना संपर्क .मुलीच्या घरच्यांशी .

यश म्हणाला –

अहो आजी – आत्ता तर कुठे तुम्ही शोध मोहीम सुरु केली आहे .आणि लगेच ..मोनिकाशी

गाठ पडली , त्यातून सुटलो तर .आता ही गीतांजली ..

मी माझे काम सोडून ..यातच गुंतून पडायचे का ?

त्याला समजावीत सुधीरभाऊ म्हणाले –

असे वैतागून जाण्याचे काही कारण नाहीये यश. असे वळण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते .

मुलाचे असो की मुलीचे ..लग्न जमेपर्यंत ..त्यांच्या बद्दल चोहो बाजूनी कावकाव “ सुरु होते ..

एकदा का गळ्यात हार पडले रे पडले ..की नंतर ..त्याचे हाल आहेत की बेहाल ?

कुणी ढुंकून पहात नसते .

तेव्हा ..उद्या ही गीतांजली की कोण येते आहे ,तिला पाहणे, भेटणे , बोलणे ..हे होऊन जाऊ दे..

कारण ..आपण त्यांना “या “असा शब्द दिला आहे, तो व्यवस्थित पाळला पाहिजे ..नाही तर ..

हे लोक .बाहेर सगळीकडे आपल्या बद्दल ..अपप्रचार करतात ..

अजिबात जाऊ नका या स्थलां कडे ..चांगला अनुभव नाही आला आम्हाला ..!

यशची आई म्हणाली –

सुधीरभाऊ अगदी योग्य तेच सांगतो आहे . त्यामुळे अगदी शांतपणे उद्याच्या फ्यामिलीला आपण

सामोरे जाऊ या.

******************************

२.

दीदीच्या मधुराच्या मैत्रिणी आल्या होत्या ..त्यांच्या बोलण्यात दीदी पण सहभागी झाली होती.

या महिन्याखेर मैत्रिणींना त्या सध्या राहत असलेला flat रिकामा करावा लागणार होता .

आणि येत्या पंधरा दिवसांच्या आत नवीन जागेचा शोध पूर्ण व्हायलाच पाहिजे होता.

उद्याचा रविवार ..नो आराम .असे ठरवणे आवश्यक होते .

दीदी म्हणाली .. मधुरा ..

माझ्या परिचयाचे ब्रोकर आहेत ..त्यांना भेटा ..बघा तुमच्या सोयीचा flat मिळतो का ?

हे ऐकून मधुराच्या फ्रेंड्सना खूप बरे वाटले ..त्या म्हणाल्या ..

दीदी, तुम्ही हे एवढे आमच्यासाठी प्लीज कराच . असे कुणी लोकल ओळखीचे आमच्या सोबत

आहेत असे कळले की ,जागा दाखवणारे आणि, flat वाले जर व्यवस्थित बोलू लागतात ,

नाहीतर , कुणी रीस्पोंस पण देत नाहीत .

दीदी म्हणाली .. हे बघा ..तुम्ही अशा परेशान होऊ नका , थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल ,

तुमच्या सोयीच्या जागेसाठी , त्यात रेंट सुद्धा बजेटमध्ये बसायला हवा .

म्हणून म्हणते ..शांतपणाने करा सगळं ,

आणि या मधुराला मी आणखी एका फ्यामिली फ्रेंडची मदत घे असे सुचवले आहे ..

बघू या ..ती किती मनावर घेते माझी सुचना .

सगळ्या मैत्रिणी एका आवाजात मधुराला म्हणाल्या ..

काय ग मधुरा ..दीदी सांगते त्या प्रमाणे तू का करीत नाहीस ..?

आपली पायपीट वाचेल , आणि टेन्शन पण कमी होईल ..

हे ऐकून मधुराला वाटले ..आपण किती टाळायचा प्रयत्न करतो आहोत ..

पण, ही दीदी आणि आता आपल्या मैत्रिणी ..गप्प नाही बसणार ..

falt साठी आपल्याला यशची मदत घ्यावी लागणार ..

म्हणजे उद्याच्या रविवारी पुन्हा त्याच्या घरी जाणे आलेच...

दीदीला आणि मैत्रिणीला ती म्हणाली ..

काय हे - माझ्या नावाने शंख नका ना करू यार तुम्ही सगळे मिळून ..

मी उद्या फोन करून जाते .आणि सांगते आपला प्रोब्लेम ..

मधुराला थान्क्स म्हणून तिच्या मैत्रिणी गेल्या .

दीदी पण म्हणाली ..गुड गर्ल ..!

बघ ..तुझे काम नक्की होणार ..!

---------------------------------------------------------------------------------

३.

गेले काही दिवस यशला झोपच येत नव्हती . मनात अनेक शंका येत होत्या ,

अनेक प्रश्न मनात उभे राहिले होते ..आपल्या बाबतीत असे कधी होईल ?

अजिबात कल्पना केली नव्हती कधी ..यामुळेच

काही दिवसापासून यश जरा अपसेट झाला होता . त्याच्या क्लोजफ्रेंडने एक दिवस

फोन करून म्हटले ..

यश ,जसा असशील तसा मला येऊन भेट ..तुझ्या ग्यारेजमधल्या काही गोष्टी मला समजल्या आहेत

तुझ्या कानावर घालायच्या आहेत ..

वेळ निघून जाण्याआधी तू त्यात लक्ष घाल ..नाही तर प्रोब्लेम होईल ..

फोन आल्याबरोबर .हातातले काम सोडून यश त्याच्या मित्राकडे गेला . या मित्राचे छोटेसे

जनरल स्टोर होते . ठीकठाक चालणारे .

यशला आलेला पाहून ..मित्रांने त्याला स्वतःच्या जवळ बसवून घेत म्हटले ..

यश .. तू गेल्या पाच-सहा महिन्यात काही नवे कामगार तुझ्या ग्यारेज्मध्ये कामावर घेतले आहेस.

आधीच्या माणसाच्या ओळखीने ..विश्वास ठेवून तू या माणसांना घेतले आहे ..ते अगदी योग्य आहे.

ते चुकीचे आहे “असे माझे म्हणणे मुळीच नाहीये .

पण, या नव्या पाच सहा पैकी ..एक पक्का लफंगा ..आणि भुरटा असा माणूस आहे.

तो बेरकी ,हुशार आणि वागायला ,दिसायला .बोलायला एकदम जंटलमेन “ आहे .हाच मेन घोळ आहे.

त्यामुळे ज्याच्या ओळखीने तू याला तुझ्याकडे जॉब दिलास , त्या सज्जन माणसाला हा बदमाश

सहजपणे फसवतो आहे.

तुझ्या शो रूम मधले ओरीजनल पार्ट हा ..बाहेर परस्पर विकतो आहे .आणि स्वतःच्या जवळचे

ओरीजनल वाटावे असे दुप्लीकेत पार्ट तुझ्या ग्यारेज्माधल्या वाहनाना वापरतो आहे.

माझ्या काही मित्रांना याचा अनुभव आलाय .

आता तू एक कर ..

तुला हे माहिती झाले आहे ..असे अजिबात न दाखवता ..

तू स्वतः या मानसला एक्स्पोज कर ..चार चौघात याला उघडा केल्याशिवाय ,हे थांबणार नाहीये.

यश ..मला कल्पना आहे..की असे कठोर वागणे , बोलणे ..तुला सहजासहजी जमणार नाहीये..

कारण तुला अशा बदमाश लोकांचा अनुभव नाही आला ..पण..

आता तुला तुझ्या शो रुमच्या आणि ग्यारेज्च्या नाव-लौकिकाला धक्का पोन्चेल “अशी भीती

या व्यक्तीमुळे निर्माण झाली आहे .

यश – मित्र म्हणून मी माझे कर्तव्य केले ..

माझ्या बोलण्याची ,सांगण्याची तू स्वतः खात्री करून मग या माणसाचा बंदोबस्त कर ..

आणि हे करण्यास अजिबात उशीर लावू नकोस ..

प्लीज ...!

पुढच्या आठवड्यात या माणसाचा निकाल लावलाच पाहिजे ..

यश ने ठरवले ..तेव्हा कुठे त्याला झोप लागली ..

************

बाकी पुढच्या भागात

भाग – १८ वा लवकरच येतो आहे .

-----------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि. देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------