तिचं Heart beat..... - 2 प्रिया... द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तिचं Heart beat..... - 2


💕तिचं Heartbeat....भाग(२)💕

अनंतला सुगंधाचा चेहरा, तिचे ते हवेवर उडणारे केस,काळेभोर डोळे सतत डोळ्यासमोर येत होते......काही करावं सुचत नव्हतं..... अरे,त्या तर मॅम आहेत......सोड त्यांचा विचार.... त्याचं मन सांगत होतं...... तो या सगळ्या विचारातून बाहेर आला.....
कालचा सांगितलेला प्रोजेक्ट अनंतने लगेच करायला घेतला त्याला आता risk नको होतं......चांगले मार्क पडायला हवेत......प्रोजेक्ट करून झाला.....असेच दोन दिवस गेले.....मॅम आल्या नव्हत्या काही कारणास्तव 2 दिवस........ अनंतच मन कशातच रमत नव्हतं....काय झालं होतं ते त्यालाच कळत नव्हतं..... गेले दोन दिवस तो कुठेही गेला नाही,कॉलेज सोडून..... नाही party,नाही pub,कुठेही नाही.......
तिसऱ्या दिवशी तो प्रोजेक्ट घेऊन कॉलेजला गेला....आज सबमिट करून टाकतो म्हणजे tension खल्लास!.....असं म्हणून lecture आटोपून स्टाफरूम मध्ये गेला.......समोर सुगंधा मॅम ला पाहून पाहतच राहिला......
बहुदा आज त्यांचा birthday होता....त्यांचे सहकारी त्यांना wish करत होते......आज तर त्या एकदम अप्सरेहून सुंदर दिसत होत्या......लई भारी!....
black रंग अगदीच उठून दिसत होता त्यांच्यावर.......
black रंगाची साडी,लटकते हेअरिंग्ज, काळेभोर केस,क्लचरने अर्धवट अडकवलेले,light असा मेकअप.......
बघताच क्षणी हृदय अडकलं तिच्यात त्याचं.......... तो विसरला कशासाठी आला होता ते!.......

."काय काम आहे?...
"हे प्रोजेक्ट सुगंधा मॅमला द्यायचे आहे!..."
peon ने ते प्रोजेक्ट घेऊन मॅम ला दिलं पण अनंत गेला
नाही तिथून......."आता काय?.."peon म्हणाला.....
"सुगंधा मॅम, Happy birthday💐💐🎂🎂!.."
मॅम ने thanks म्हंटल्यावर अनंत निघाला......
अरे त्या मॅम आहेत मी कसा वागतोय!......असा विचार करत करत तो निघाला.........घरी गेला.....त्याला सुचलं ते त्यानं कागदावर लिहलं.........

" तुला पाहिलं जेव्हा,हृदयात झालं वॉर,
का खरं झालाय मला सच्चावाला प्यार,
आता आहे मला बस तुझाच इंतजार,
कधी करशील का,तू त्याचा इकरार?...."

अरे हे काय मी चक्क कविता केली....अनंत स्वतःशीच म्हणाला......असं म्हणून तो स्वतःत हरवून गेला.....
इकडं सुगंधाला याची लेशमात्र जाणीव नव्हती....ती,तीच घर,तीच काम,तिची मुलं यातच busy असायची......घर आणि कॉलेज सोडून तीने कधी कोणाचा विचार केला नाही......
सुगंधा एक दिवस स्टाफरूम मध्ये बसलेली असते.....अचानक अनंत येतो..
"...may. I come in?..."
"yes, please."
" मॅम,मला ******प्रोजेक्ट करण्यासाठी काही माहिती हवी आहे,माझा**** चा सेमिनार पण आहे पण मला गूगलवर त्या वेबसाईट सापडत नाहीत.....can u help me?...."

"थांब,माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्यात सापडते का काही पाहूया....."
"हम्मम,हे बघ,मी मार्किंग करते,ते तू नक्की बघ,तुला याचा उपयोग होईल......"अनंत तर फक्त तिच्याकडे,तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करतो...
ती तर तिच्या कामात गुंग असते....
."कळलं का तुला?...काही प्रॉब्लेम असेल तर उद्या मला विचार.......ok......"
अनंत भानावर येतो.....हो म्हणतो......निघतो...... सुगंधा मॅम ला पाहून मला काय होतं,कळतंच नाही.......असे मनातल्या मनात बोलतो.......चला book उघडून पाहुयात....थोडे काम करूयात.........book उघडल्या बरोबर एक पान खाली पडतं, त्यात तो वाचतो......

वाटे पुन्हा एकदा

वाटे पुन्हा एकदा,
मंद झुळूक मी व्हावे,
जाऊनि सखीच्या गावा,
आठवणींच्या हिंदोळ्यावर बसावे,,

करावी विचारपूस तिची,
काही गुज मनीचे सांगावे,,
त्याच त्या नदीच्या तीरावर,
मनसोक्त चिंब बागडावे,,

नको ती कर्तव्य,
नको कोणत्या जबाबदारी,
बेधुंद होऊन जरा,
खेळू सगरगोट्यांची एक एक बारी,,

न जाणो कधी हे होईल,
भेट केव्हा होईल,,
दोन जिवलग मैत्रिणी,
एक जेव्हा होईल!......

"miss u my dear friend"

सुगंधा

अरे म्हणजे हे तर मॅम ने लिहलय....... अरे वा!.....कविता पण करतात......उद्या विचारेन मी नक्कीच......असं म्हणून तो आपल्या कामाला लागतो.......
इकडे सुगंधा विचार करते......आज तो आलेला मुलगा....काय नाव.......हा....अनंत....माझ्याकडे कसा पाहत होता.....असं पाहिलं तर ........रागवायला हवं त्याला......आता आला ना,चांगली ओरडते त्याला......
हम्मम,नक्कीच.उद्या बघते.असं म्हणून आपले काम करते....

. क्रमशः

(अजून पुढे काय झाले ते आपण लवकरच पाहू,पुढील भागात......... पहिल्या भागाच्या प्रतिक्रियेबाबत धन्यवाद, हा भाग कसा वाटला नक्की कळवा.....)

....Heartsaver...