अनुत्तरित मैत्री.....??? - ०५ Khushi Dhoke..️️️ द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुत्तरित मैत्री.....??? - ०५









नवीन महाविद्यालय...... प्रतीक्षा आता स्वच्छंद असते तिचे स्वतंत्र विचार ती जपणार असते तिला जे हवं ते ती मोकळेपणाने करणार असते....इथे कुणीही तिला फसवनारे नसल्याने ती खूप मन लाऊन अभ्यास करते....

तीची डेरिंग चांगलीच वाढली असते..... कुठल्याही मुलाने काही बोलू देत तोच ती त्याला प्रतीउत्तर देते.....🤬
एकदा असेच कुणी मुलगा तिला काही तरी बोलतो त्यावर........

प्रतीक्षा : "क्यू रे ज्यादा आंग मे आई क्या? तू बहार निकल देखती तुझे!"

चक्क पूर्ण वर्गासमोर ती त्याला अस बोलते.... कारण, तो तिला तिच्या आडनावावरून खोचक कमेंट करतो......

तिकडे काजल आपल्या महाविद्यालयात व्यस्त असते....... किंबहुना जास्तच व्यस्त झाली असते.... आता प्रतीक्षा आणि काजल आपल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमात असल्याने त्यांना सहसा भेटण्याचे जमत नसले...... तरी, त्या कधी तरी भेटत असतात......

एकदा काजलचा बॉय फ्रेंड असल्याचे प्रतीक्षाला काजल सांगते...... प्रतीक्षाला आश्चर्याचा धक्काच बसतो..... मग ती तिला विचारते.......

प्रतीक्षा : "कुठे मिळाला हा? कुठला आहे? आणि काय करतो? दिसतो कसा?..."

वगैरे श्वास न रोखता एका दमात विचारते....

काजल प्रतीक्षाला थांबवत.......

काजल : "अग हो हो....... थांबशिल जरा........आहे एक, संतोष नाव आहे त्याचं........ खूप छान दिसतो अग...... एकदम सलमान खान.😎...... आणि माहितीये तो मला एका मैत्रिणीच्या लग्नात मिळाला मला डायरेक्ट त्याने प्रपोज💕💌🌷 केला आणि मी माझा होकार सांगितला🥰......"

ती प्रतीक्षाला त्याचा फोटो दाखवते..... प्रतीक्षाला तर त्याचा खूप राग आलेला असतो....... पण, ती दाखवत नाही आणि छान आहे अस म्हणते.

मनात विचार करते

प्रतीक्षा : "आधी पूजा नंतर हा आमच्या मधात आला"

पण, तिला परत कळून चुकतं..... की, आता ही आपली मैत्रीण नाही.....आणि ती इथून पुढे तिच्याविषयी आधी सारखं आपलेपणा ठेवत नाही.....पण, अजूनही ती तिला स्वतःची मैत्रीण आहे असच समजते... फक्त ती आपुलकी नाहीशी झालेली असते....😒😒

जरी, प्रतीक्षा फक्त बोलण्या इतपत मैत्री ठेऊ अस ठरवते.......तरी, ती काजलला अजून विसरलेली नसते.... कारण, काजल कितीही केलं तरी तिची पहिली मैत्रीण असते..... तरीही काजलने तिचा वेळोवेळी अपमान केलेला असतो.......किंबहुना तिच्या मैत्रीतील विश्वास घालवलेला असतो...

त्यानंतर प्रतीक्षाचा अठरावा वाढदिवस २१ जानेवारीला येणार असतो...... त्यासाठी तिचा लहान भाऊ ठरवतो..... की, वाढदिवस जोरात करू...... मैत्रिणींना बोलाव म्हणून, तो प्रतिक्षाला सांगतो....... कारण, तेव्हा तो ही कामाला लागलेला असतो व म्हणूनच त्याला हे परवडणारे असते.....

काजलची सायंकाळची क्लास असल्याने, ती प्रतीक्षाला क्लास झाला की येईल अस फोनवरून सांगून ठेवते.... तिला यायला रात्री ०८:०० वाजतील हे माहीत असल्याने, तिच्या प्रतीक्षेत आपली, प्रतीक्षा केक कापण्यासाठी थांबलेली असते......इकडे सगळे तिला केक कापायचा आग्रह करत असतात...... पण, ती वाट बघत असते..... जरी ती म्हणत असली की, तिच्या आणि हिच्यात आता सगळ संपलं तरी आताही काजल हीच तिची जिवलग असते....... कारण, तिने कधीच तिचा अपमान किंवा तिला दूर केलेलं नसतं..... काजलच तशी वागलेली असते...

वाढदिवस चांगला साजरा होतो.🎉🎊🎈🎀🎁🎂...
सगळे आपापल्या घरी जातात.....

काही दिवसांनी काजलचा ही वाढदिवस येणार असतो.. पण, यावेळेस तिचा जिवलग बॉय फ्रेंड असणार असतो आणि पार्टी बाहेर एका ठिकाणी द्यायची अस ती प्लॅन करते....,. प्रतीक्षा आमंत्रित असतेच आणि पूजा सुध्दा.....😡..... संतोष आपल्या मित्रांसोबत येणार असतो..... काजल ने ही पार्टी जळवण्यासाठी दिलेली असते......तिला प्रतीक्षाला दाखवायचे असते...... की, तिचा बॉय फ्रेंड किती स्मार्ट आहे........

दिसायला जरी तो सलमान खान असला तरी त्याला डोकं मात्र नसतच......

प्रतीक्षा चा अजून बॉय फ्रेंड नाही आणि तिने जर संतोषला प्रतीक्षा सोबत भेटवले तर तिच्या मनात प्रेम भावना जागृत होईल आणि आपल्याला प्रतिक्षाच नवीन कुणाशी तरी जुडवण्याची संधी मिळेल.....🤬 पण, हा तिचा प्लॅन काही सक्सेस होणार नसतो..... कारण, प्रतीक्षा तशी मुळीच नसते.... तिला तर फक्त चांगलं करिअर हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते.... आणि ते पूर्णत्वास न्यायचे असते...म्हणून ती प्रयत्नरत असते.....

काही दिवसांनी.....

आली ती ११ मार्च तारीख..... ठरल्या प्रमाणे, सगळे काजल सोबत पोहचतात..... पण, तिच्या बॉय फ्रेंडचा काहीच थांगपत्ता नसतो...... ही कॉल करते तर येत आहोत अस सांगतात...... अर्धा ते पाऊण तासानंतर एक कार घेऊन काही लोक आलेले भासतात त्यातून हिचा बॉय फ्रेंड निघतो आणि ती त्यांना घेऊन यायचं सांगून जाते......

ती त्यांना घेऊन येत असते तेव्हा तिचा बॉय फ्रेंड प्रतीक्षाला मन लाऊन बघत असतो.....तिचा बॉय फ्रेंड खूप आगाऊ असतो आणि तितकाच ठरकी.......मुलींना घाण नजरेने बघणारा.......येऊन खुर्चीत येटाने बसतो...... एका पायावर दुसरे पाय ठेऊन........ त्याच्या हातात सलमान खान घालतो ना तसे ब्रसलेट असतो....... तर स्वतःला तो सलमान खान समजतो........जास्तच शहाणा असतो.... तो काजलच्या सगळ्या मैत्रिणींना आधीच भेटलेला असतो....... प्रतिक्षाला तो पहिल्यांदाच भेटतो........ त्यामुळे तो तिच्यावर नजर ठेऊनच असतो.... प्रतीक्षा आता दिसायला खूप छान दिसते...... त्यामुळे, तो अधिकच तिला बघत असतो...... ती आता प्रतिउत्तर देण्यास तयार असते....... कुणी काही बोललं की, त्यावर काय उत्तर द्यायचे हे तिला चांगलच माहित असते..... त्यामुळे तिला तो काही बोलला की, काय बोलावं याची चिंता नसतेच....😎.....

काजल आधी त्याची ओळख करून देते आणि प्रतीक्षाची ओळख करणार इतक्यातच तो अती शहाणपणा दाखवत.........

संतोष : "कोण ह्या मॅडम?"

काजल : "ही खुशी माझी मैत्रीण, तू आताच भेटतो आहेस हिला..."

तो चेहऱ्यावर एक घाण हास्य आणून

संतोष : "ओळखू तर खूप चांगल्या प्रकारे यांना आम्ही... हा.. हा...हा...😁😁😁😁"

सोबत त्याचे मित्र ही हसायला लागतात..

काजल आणि पूजा ऑर्डर द्यायला जातात.. त्यांना अर्धा तास लागणार असतो....... त्यामुळे प्रतीक्षा मेन्यू कार्ड वाचत बसलेली असते.......ती कुणालाही बघत नसते...... त्यामुळे, तिच्या बॉय फ्रेंडला स्वतःचा अपमान झाल्यासारखा वाटतो...... कारण, येणाऱ्या - जाणाऱ्या मुली त्याला बघत असतात आणि प्रतीक्षा नाही...... कारण, तिला समोर खरा - खुरा सलमान खान ही असता तरी फरक पडले नसते.....
तेवढ्यात..........

संतोष : "फिगर तर मस्तच आहे तुझा....... बॉय फ्रेंड वगैरे आहे की नाही तसं सांग...... नाहीतर, आम्ही आहोतच......हा..... हा..... हा ....😁😁😁"

प्रतीक्षा आधीच मुलांच्या लांब राहायची...... कारण, तिला मुलं किती अगाऊ असतात..... हे माहिती होतं....तिचा पारा चढलेला असतो व ती प्रतिउत्तर म्हणून त्याच्यावर चिडून.........🤬

प्रतीक्षा : "ये काळतोंड्या, थोबाळ बघ आधी तुझं..….. तुझी लायकी तरी आहे का? आलाय मोठा......जास्त डोळे ताणून बघितल ना डोळे काढून गोटी खेळायला ही आवडणार नाही कुणाला... अशी तुझ्या डोळ्यांची अवस्था करेल बघ.... म्हणून, सांगतेय माझ्यापासून दूरच रहा म्हणजे झालं...... समजल का ये फुकणीच्या.🤬😡..."

तो तर एकदम बघतच बसतो आणि त्याचे मित्र त्याच्यावर हसतात हे बघून तो आणखीच चिडतो....आणि तो प्रतीक्षाकडे आश्चर्यकारक नजरेने बघतो.....🙄🙄 कारण, काजलने, प्रतीक्षा किती साधी आहे...... हे सांगितले असते...... पण आज तो तिचं रौद्र😡🤬 रूप बघत असतो....

तितक्यात काजल आणि पूजा ऑर्डर देऊन येतात....

काजल : "काय मग झाली ओळख?"

संतोष : "हो झाली की, चांगलीच ओळख झाली.."

त्याच्या मनात कसला तरी राग असल्याचे भासत असते..... कारण, त्याचे मित्र आज पहिल्यांदाच त्याच्यावर हसले असतात...

तो मनात ठरवतो..........

संतोष : "हिचा तर काटा काजलच्या आयुष्यातून काढलाच पाहिजे पण कसा?"🤔

विचार करायला वेळ लागणार असतो...... तो प्लॅन बनवू लागतो...... त्याचं पूर्ण लक्ष आता फक्त प्रतीक्षाकडे असते...... तो तिला खूप रागात बघत असतो.... प्रतीक्षा तर त्याला बघत सुध्दा नसते....😏😏😏

सगळ्यांचं खाऊन आटोपतं.... नंतर, प्रतीक्षा आणि पूजाला दुसरीकडे बसायला सांगून काजल आणि संतोष दुसरीकडे बसतात...... काही वेळाने संतोष काजलच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपतो...... हे बघून प्रतीक्षाला विचित्र वाटू लागते व ती ताडकन उठून लवकर तिथून निघून घरी जाते.......तिला हे असले कारनामे पब्लिक प्लेसमध्ये कुणी केलेले आवडत नसते...... आणि करायचे तरी कशाला🤷🤦? तसही कुणी लहान मुलं त्या गार्डनमध्ये येतात, कुटुंब असतं आणि यांना हे असले धंदे तिथंच का करायचे असतात...?🤔🤔 ह्या विचारात असतानाच तिला खूप राग😡 येतो आणि ती तशीच घरी पोहोचते....

दुसऱ्या दिवशी काजल प्रतिक्षाला.......😡

काजल : "तू समजतेस काय ग स्वतःला माझ्या संतोषला काय वाकडं बोललीस तो माझ्याशी ब्रेक अप करायचं म्हणतोय फक्त तुझ्यामुळे........ मला ही मैत्री फक्त आता बोलण्यासाठी ठेवायची आहे या पुढे आता काहीही नाही "

प्रतीक्षा ला कळलेलं असतं...... की, हे शब्द तिच्या बॉय फ्रेंडचे असतील...... त्याचा प्लॅन काम करत असतो.... प्रतीक्षाला या प्रकारानंतर हे देखील कळलेलं असतं की इथून पुढे तिला काजलला गमवावं ही लागू शकतं....... पण, ती परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असते......

त्या नंतर खूप दिवस कुणीच कुणाशी बोलत नाही...... जवळ जवळ एक महिना..... कारण, त्याला प्लॅन बनवायचा असतो.... त्यात वेळ लागणार असतो......प्रतीक्षा तिच्या अभ्यासात गुंतलेली असते......😎😎

एक दिवस.......😕

काजल प्रतीक्षा च्या घरी येऊन......

काजल : "सॉरी अग.... मी तुला जरा जास्तच बोलली होती..."

प्रतीक्षाला वाटतं..... आपली मैत्रीण माफी मागते तिला एकदा माफ करायला पाहिजे.... म्हणून ती.....

प्रतीक्षा : "अग असू दे ग.......आपण दोघी नेहमी चांगल्या मैत्रिणी राहू अश्याच......."

आणि त्या आलिंगन करतात आणि प्रतीक्षा खूप रडते....😭 तिच्या तोंडून शब्द ही पडत नसतो.....

काजल दुसऱ्याच कामाने तिथं आलेली असते तिच्या येण्यामागचा उद्देश खूप वाईट असतो...... यापासून प्रतीक्षा अनभिज्ञ असते...... उद्देश प्रतीक्षाच्या जीवनाशी खेळणारा असतो आणि हा प्लॅन काजलच्या बॉय फ्रेंडचा असतो....🤬

काजल : "अग ऐक ना...... तुला माहितीये का त्यादिवशी संतोष सोबत एक मुलगा होता..... बघ, त्याच्या शेजारी बसला होता..... त्याच नाव आशिष...... त्याला तू आवडलीस बघ...... त्याने, तुझा नंबर मागितला आहे.......जर तुला द्यायचा असेल...... तर दे... हह्म्म् माझं काहीही म्हणणं नाही......पण, अग मुलगा चांगला आहे ग......संतोष म्हणत होता......"

तिचं हे बोलता क्षणीच प्रतीक्षाला सगळं कळून चुकलं....... की, आता ही आपली मैत्रीण मुळीच नाही ही तिच्या बॉय फ्रेंड ची भाषा बोलते आहे...... आता हिला गमावूनच स्वतःला आपण वाचवू शकतो.....😡😡

तिचं इतकं बोलणं ऐकून प्रतीक्षा सगळ समजून जाते...... की, त्याचा प्लॅन काय..! पण, काजल हे सर्व संतोषच्या प्रेमा पोटी करत असली....... तरी हे किती चुकीचं आहे आणि याचे काय दुष्परिणाम होणार हे तिलाही माहित नसते.... पण, काजल ने तर कधीच प्रतीक्षाला आपली जिवलग मानलेच नव्हते....... मग ती हे सर्व तिच्या जिवालगासाठी करत असली तर यात काय वाईट...? चुक तर प्रतीक्षाची होती तिने शेवट पर्यंत "काजल हीच माझी जिवलग" हे वाक्य जपलेलं होतं... तिला संतोष आणि प्रतीक्षामध्ये झालेलं संभाषणही चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आणि म्हणून ती प्रतिक्षावर रागावली होती........

प्रतीक्षा स्वतःची बाजू मांडणं महत्वाचं समजत नाही...... कारण, तिला कळून चुकतं आता ही आपली जिवलग नाही.. ती जागा दुसऱ्या कुणी👫 घेतली आहे....😒😒😟😟☹️

ज्याच्या बद्दल काजल प्रतिक्षाला चांगल्या गोष्टी सांगत असते........ तो एक दारुड्या मुलगा असतो.....🤬🤬 आणि हे प्रतीक्षाला तो वाढदिवसाला होता तेव्हाच कळले असते.........तो तेव्हाही खूप पिऊन असतो..... आणि काजल जे काही त्याच्या बाबतीत सांगत असते ते खोटं तिच्या सांगण्यावरून समजत असल्याने, संतोषचा प्लॅनही तिला कळतो........ त्या मुलाच्या मदतीने प्रतीक्षाची बदनामी करण्याचा तो प्लॅन असतो........ म्हणून, प्रतिक्षा एक प्लॅन करते आणि आपला नंबर त्या मुलाला आशिषला द्यायला सांगते....... इकडे काजल खुश होऊन घरी परतते...... कारण, जर तिने नंबर ची सकारात्मक बातमी त्याला कळवली नाही तर तो तिला ब्रेक अप म्हणणार असतो.....
प्रतीक्षाला दुसऱ्याच दिवशी त्या नंबर वरून कॉल येतो...

आशिष : "हॅलो...."

प्रतीक्षा : "हॅलो...."

आशिष : "मी आशिष, काजल ने तुला माझ्याबद्दल काल सांगितल असेलच....... मला तू खूप आवडतेस, तुला बघितल्या पासून आवडतेस..... माझं तुझ्यावर प्रेम आहे...... लग्न करशील माझ्याशी...?"

हे ऐकुन प्रतिक्षाचा पारा चढतो...... ती जे ठरवून असते बोलण्यास सुरुवात करते........ कारण, लग्नाचं आमिष दाखवून फसवणारे असतात........ याचा तिला चांगलाच अनुभव असतो....... कारण, तिच्या वर्गातील एका मुलीसोबत तसच झालेलं असतं....तिने अनोळखी मुलाशी मैत्री केल्याची शिक्षा म्हणून, ती स्वतःची आभ्रू गमावून बसलेली असते....त्यामुळे प्रतीक्षा हा प्लॅन करून स्वतःचे पिंड सोडवण्याचा विचार करतें..... त्यासाठी तिला आता तिची जिवलग गमवावी लागली..... तरी, चालणार असते...... कारण, आता ती तिची नसून दुसऱ्याच कुणाची झालेली असते.... 🤬😡😠

प्रतीक्षा : "ये डुक्कर तोंडाच्या, तुला काय वाटलं रे....... तुम्ही मिळून प्लॅन बनवणार आणि मी फसणार...... स्वतःच तोंड बदल आधी आणि तरीही मी तुला हो म्हणेल ही अपेक्षा ठेवण्याचं धाडस असेल तुझ्यात तर मला तुला सांगायचंय..... तुझी लायकी नाही कळलं ना........ आणि जा त्या संतोषला सांग मी फसणारी आहे, अस जर का त्याला वाटत असेल, तर तो चुकत आहे..🤬😡 त्याने माझ्या मैत्रिणीला तर फसवली........... पण, मला तो इतक्या सहजा सहजी फसवू शकणार नाही....कळतय काय ये भिकार्ड्या.. हॅलो... हॅलो... कापला वाटत दळभद्री साले...🤬🤬🤬.."

तिकडून फोन कट ......

ही रेकॉर्डिंग, संतोष काजलला ऐकवून भडकावतो...... ती बिचारी प्रेमात असते... प्रतीक्षाच्या घरी जाऊन तिला खूप काही बोलते

काजल : "तुला आमचं बघून नाही झालं..! तुला संतोषला इतकं बोलायची काय गरज होती? तो रागावला आहे तो मला म्हणाला, एकतर तुला किंवा त्याला निवड आणि तूच आशिषला नंबर दे बोलली होतीस....... आता तूच माझ्या संतोषला वाईट उलट सुलट बोललीस....... फोनवर मी सगळी रेकॉर्डिंग ऐकली आहे...... मला आता तुझ्याशी मैत्री ठेवण्यात काहीही इंटरेस्ट वाटत नाही..... तू मला अशीच जळणार कारण तुझा कुणी बॉय फ्रेंड नाही अजून..... मी जाते परत कधी माझ्याशी बोलू नकोस...."

काजल आनंदात जाते....... जरी, दाखवत असली तिला खूप दुःख झाले..... तरी, प्रतीक्षा ही तिला खूप आतून ओळखत असते....... कधी ती दुःखी आणि कधी खुश...........ती आनंदात असते.... कारण, तो तिला कायमचा मिळणार असतो.....पण, तिला मैत्रीण गमावण्याची जरा देखील मनात भीती नसते.....🤬

प्रतीक्षा सगळ ऐकते.... कारण, तिला प्रतिरोध करण्यात काहीही स्वारस्य वाटत नाही... काजल ने कितीतरीदा तिला जाणीव करून दिलेली असते की, काजलच्या जीवनातील प्रतीक्षाची जागा दुसऱ्या कुणी घेतलीय.... त्यामुळे प्रतीक्षा तिला थांबवत देखील नाही.....

नंतर असेच काही दिवस जातात प्रतीक्षला खूप वाईट वाटलं असतं.......ती काही दिवस रात्र - रात्र झोपत नाही............. एक दिवस तिला अनोळखी नंबर वरून कॉल येतो .....

संतोष : "हॅलो ....हा...हा.... हा....तू स्वतःला खूप शहाणी समजतेस ना! हे घे आता काजल ला तुझ्या पासून दूर केलं रहा आता एकटीच..... आणि हो आमचा प्लॅन तर होता तुझी इतकी घाण बदनामी करण्याचा....😁😁😁 पण, तू स्वतः जास्त हुशार म्हणून फसली नाहीस त्यात.... नाहीतर तुला तोंड दाखवण्याचा लायकीची नसते सोडले आम्ही... हा... हा....हा......"

तो संतोष असतो.....

त्यावर प्रतीक्षा त्याला खूप शांत डोक्याने उत्तर देते......

प्रतीक्षा : "तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा☺️ आणि तू काय तिला माझ्यापासून दूर करणार, तिची तशीही वैचारिक😎 पातळी माझ्या इतपत नाही..... जरी, तिने कितीही प्रयत्न केले...... तरीही होणार नाही....... तू तर एकदम गलिच्छ मानसिकतेचा😖 माणूस हे मी आधीच ओळखले होते रे.....आणि तू मला नको शिकवू, मी कशी आहे कळतय ना..... तुझ्या पेक्षा कितीतरी पटीने माझ्या विचारात प्रगल्भता आहे आणि ते पुरोगामी आहेत... दुसऱ्याचं वाईट मी ना कधी केलं ना कधी करेन म्हणून तू तर मला सांगूच नकोस.🤬😡......."

प्रतीक्षा हे सगळं बोलत होती... पण, त्याला काहीही समजत नव्हते त्यामुळे त्याने बोलणं अपूर्ण असताच फोन कट केलेला असतो....असच होतं जेव्हा "शिकलेले अशिक्षित" आपल्या संपर्कात येतात.....

प्रतीक्षा : "टुंग...... टूंग.....काय हे मूर्ख लोक यांना काही समजत नाही आणि म्हणून फोन कट करतात.....काय लोकांची मानसिकता आजकाल...शी.. दळभद्री साले..🤬. "

त्यानंतर ती कधीच कुणाशी मैत्री करणार नाही हा विचार करते ....

असेच दिवसामागून दिवस जातात आणि एक दिवस तिला काजल जाताना दिसते जेव्हा प्रतीक्षा तिच्या महाविद्यालय गाठण्याच्या रस्त्याने असते..... आणि मग तिचे विचारचक्र सुरू होते......

"का..... का तू अस केलंस? तुला कुणी दुसरा मिळाला तुझ्या आयुष्याचा जिवलग म्हणून तू आपली मैत्री विसरून त्याच्या सोबत गेलीस आणि गेलीस तर गेलीस माझ्यावर खोटे आरोप ठेवलेस की, मला तुझं सुख बघवत नाही.... अरे एक शब्द बोलली असतीस मी स्वतः तुझ्या आयुष्यातून निघून गेले असते...."


तर मित्रांनो या कथामालिकेचे नाव अनुत्तरित मैत्री याचसाठी ठेवण्यात आले...... कारण, प्रतीक्षा जे प्रेम, जो विश्वास काजलवर करत होती...... तिला त्याचा परतावा फक्त अपमान यातच मिळाला.... पण, ती करत असलेल्या प्रेमाला कधीच काजल समजू शकली नाही....आणि तिने प्रतीक्षा सोबत का मैत्री संपवली याचं उत्तरही तिच्याकडे नव्हते..... फक्त संतोष म्हणतो की, "तू तिला सोड नाहीतर मी तुला सोडून देईल" म्हणून तिने मैत्री संपवली होती....म्हणूनच ही अनुत्तरित मैत्री.......हा माझा स्वतःचा अनुभव, आपणास कसा वाटला नक्की कळवा.....
.
.
.
.
.
.
आता प्रतीक्षा च्या जीवनातही कुणी आहे...... पण त्या व्यक्तीने, कधीच तिच्या जिवनातील जवळच्या लोकांना दूर करण्याचा कट रचला नाही.... ही व्यक्ती कोण??.... हे आपण कधीतरी बघणारच आहोत..... कारण, सध्या त्या दोघांना हवाय थोडा वेळ त्यांच्या भविष्यात यश मिळवण्यासाठी.... त्यांचा संघर्ष यशस्वी झाला...... की, नक्कीच लिहते.......😊😊
.
.
.
कळवा....😊🥰😍😊☺️🤗🤗