प्रेमाची पहिली नजर - 1 tejal mohite द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमाची पहिली नजर - 1

सानिका ही एकत्र कुटुंबात लहानची मोठी झालेली होती. तिचे तीच्या कुटुंबावर अत्यंत प्रेम होत.तिच्यासाठी घरच्याचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असे. सानिका स्वभावाने समजूतदार सगळ्यांन मध्ये मिसळून राहणारी होती.आपले विचार ठाम मांडणारी होती.
सानिका दिसायला सुंदर ,नाजूक, हरणा सारखे डोळे .कोणालाही आकर्षण वाटेल असे होते. ओठांवर नेहमी हसू. आपल्या बोलण्यातून कोणालाही आपलंस करणारी होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करून तीने चागंली नोकरी मिळाली होती.सानिकांचे सगळ अगदी आरामात आनंदी जीवन होते.
सानिकांचा दिवस सुरु झाला कि तिची नुसतीच गडबड चालू होत असे.आज पण तेच नेहमी प्रमाणे तिला उठायला उशीर झाला .तिची गडबड चालू होती .सानिका पटापट आवरू लागली.'काय सानिका लवकर उठायला काय होत ??,आई आवाज देत रूम मध्ये आली. सानिका 'अग आई आज झाला उशीर ,सोमवार पासून लवकर उठल'.अस म्हणत सानिका रूम मधून बाहेर आली."आई जाते गं" म्हणत ती घरा बाहेर पडली.
गाडी चालू करताना अचानक तीची नजर एक मुला वर येऊन थांबली. ह्याआधी तिने त्याला पाहिले नव्हते. गाडी चालू झाली सानिका तिथून निघून गेली. दिसायला तो हॅडसम,खूप शिक्षकलेला असा दिसत होता.
सानिका आता ऑफिस मध्ये पोचली .तिने कामाला सुरुवात केली पण राहून राहून तिच्या मनात एकच विचार येत होते 'कोण होता तो मुलगा ??ह्याआधी आपल्या काॅलनी मध्ये दिसला नाही. जाऊदे आपल्याला काय करायचंय असे वारंवार म्हणत सानिका विचार करणं टाळत होती.
काम संपल्यावर सानिका घरी निघते. गाडी चालवताना ती सकाळी दिसलेल्या मुलाच्या विचारात होती "तो परत दिसेल का"??? विचार करता करता सानिका घरी पोहचली.तीची नजर आता त्याला शोधू लागली. पण तो काही दिसला नाही. मग ती घरात निघून गेली.
रात्रीच्या जेवण्याच्या वेळी सगळे एकत्र जेवत असे. तिच वेळ होती सगळ एकत्र येऊन हसत खेळत दिवसभराचा थकवा घालवत.सानिका जेवन झाल्यानंतर रिया (सानिकाची चूलत बहिण )सोबत वर रूम मध्ये आली.दोघांही दिवसभर काय झालं ते शेअर करत होत्या . बोलता बोलता रिया झोपून जाते. पण सानिका जागी होती . सानिकाची आई काम उरकून रूम मध्ये येते .आई गप्पा मारत बसते. "अग सानिका आपल्या शेजारी नवीन शेजारी राहला आले".पण सानिकाच लक्षच नव्हत आईच्या बोलणाकडे.ती तिच्या विचारांत रमली होती.नंतर आई 'सानिका आता झोप शांत' बोलून लाईट बंद करून जाते
रविवारचा दिवस सगळ्याचा सुट्टीचा दिवस असल्याने सगळ आरामात चालू होत.सकाळचे 9 वाजले तरी सानिकाची सकाळ अजून झाली नव्हती. खिडकीतून ऊन सानिकाच्या तोंड वर पडत होत. सानिका एका कुशीवरून दुसर्या कुशीवर होत होती. पण काही उपयोग झाला नाही. ताई उठ..ताई उठ.. करत शेवटी रियाने सानिकाला उठवल." काय ग रिया आज तरी झोपू दे"..सानिका डोळे चोळत उठली.
सानिका आणि रिया आवरून खाली येत होत्या. सानिका समोर बघते तर काय काल बघितलेला मुलगा आणि स्वराज (सानिकाचा मोठा भाऊ) बोलत होते. सानिका आणि रिया समोर येताच स्वराज ने ओळख करून दिली ही सानिका आणि रिया माझ्या बहिणी .'सानिका हा तेजस आपले नवीन शेजारी'..तेजसने स्माईल देत hello बोला.सानिका च्या ओठांवर हसू उमलत होते.सानिका निशब्द होऊन तेजस कडे पाहत होती. तितक्याच आईने आवाज दिला.."हो आले गं आई" म्हणत सानिका ला तिथून जावे लागले.
सानिका आणि तेजस ची ती पहिली भेट.बोलता आले नाही पण ओळख तर झाली.



तेजस दिसायला हाॅडसम, स्मार्ट होता.इंजिनिअरींग पूर्ण करून नुकताच जाॅबला लागला होता. स्वभावाने बोलका, खोडकर, नेहमी मजा मस्ती करणारा होता. तेजसच्या घरी त्याची आई ,मोठा दादा राहत. तेजसच छोटे पण छान कुटुंब होते.
काही दिवसात तेजस आणि स्वराज यांची चागंली मैत्री झाली. तेजसचे आधी मधी सानिकाच्या घरी येणं जाणं चालू असत. दोघांच्या घरच्यांनाचे चागंले संबंध झाले होते. तेजस आणि सानिकाची छान ओळख झाली होती.तेजसच घरी येणं, स्माईल देणं सगळच सानिका आवडू लागल होत. तेजसला पण सानिकाच्या रूपांत चागंली मैत्रीण मिळाली होती. बघता बघता तेजस आणि सानिका मध्ये चागंली मैत्री झाली. ते एकमेकांना सगळे शेअर करू लागले होते.
सानिकाच्या ऑफिस मध्ये एक मुलगा सानिकाला रोज त्रास देत होता. सानिकाला काय कराव समजत नव्हतं जेणेकरून तो तिला त्रास देणार नाही. आज तर त्याने हाद पार केली. घरी येताना सानिकाचा हात धरा. सानिका खुप घाबरली कसा बसा हात सोडून पळून ती तिथून निसटली. सानिका रडत रडत घरी येत होती. तेजस चौकात मित्रांसोबत बोलत उभा होता. लांबून सानिकाची गाडी दिसली. हळूहळू गाडी जवळ येत होती तेजसच लक्ष सानिका कडे होते सानिकाची गाडी जवळून निघून गेली. (तेजसच्या मनात आज सानिकाने मला बघून न बघितला सारख का केल? )
तेजसला सानिकाचा पडलेला चेहरा डोळ्या समोरून जात नव्हता.त्याला राहवलं नाही.तेजस सानिकाच्या घरीकडे गेला.

तेजस- काकू स्वराज आहे का घरी?

सानिकाची काकू- नाही रे, काही काम होत का?

तेजस- (काही तरी बाहना करत) माझा पेन ड्राइव घेयचा होता.

सानिकाची काकू- सानिका आताच घरी आली.ती देईल. थांब घेऊन जा.

तेजसला सानिकाचे घरचे चागंले ओळखत असल्यामुळे त्याच अस घरी येणं कोणालाही खटकणार नव्हत.तेजस सानिकाच्या रूम कडे गेला.रूमचे दार आतून लावल होत. तेजसने दार वाजवल.आतून सानिकाचा अवाज आला कोण आहे?

तेजस- सानिका दार उघड मी आलो

सानिका- हळू आवाजात जा तेजस ,नंतर बोलू

तेजस - नाही तू आताच दार उघड,मला आताच बोलायच.

सानिका रडत रडत दार उडते. तेजसला समोर बघून तीला भावना अनावर होतात. सानिका रडताना बघून तेजसला काय करावे काही कळत नव्हतं. तीला शांत करत तेजस- सानिका काय झाल ? का रडती? आधी शांत हो.. आणि बोल

सानिका-आज..आज (सानिकाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.)

तेजस- हा आज? काय झाल?कोण काय बोललं का?

सानिकानी डोळ्यातून येणारे अश्रू पुसत तेजसला सगळी हकीकत सांगितली. सगळे ऐकून तेजसची तळ पायाची आग मस्तकात गेली.
सानिका -मी उद्या पासून ऑफिस नाही जाणार.

तेजस( रागात) -सानिका काही बोलू नकोस. मी आहे ना मग का घाबरते ? मी बघतो उद्या

सानिका- तेजस तू काय करणार?

तेजस-तू नको काळजी करू. मी बघतो उद्या

असे बोलून तेजस तिथून निघून जातो. दुसरा दिवशी तेजसनी समजावला मुळे सानिका ऑफीसला जाईला निघाली.हळूहळू घाबरत ती ऑफिसला पोहोचली. तेजस पण त्याच्या 2 मित्रान सोबत ऑफिसच्या खाली थांबला होता. सानिका गाडी पार्क करून तेजस जवळ गेली. तेजस तिला कोणता मुलगा दाखवाव म्हणला.
सानिका- तो बघ समोर उभा आहे तो, पण तू काय करणार आहेस? मला खूप भीती वाटते.

तेजस- अग काही करत नाही मी.फक्त मी नीट समजून सांगतो.,तू जा ऑफिस मध्ये..

सानिका- नक्की ना???

तेजसने मान हलवली ,आणि बाय करून जाणाचा ईशारा केला.सानिका ऑफीस मध्ये जात तोपर्यंत तो शांत होता.सानिका आत गेला वर तो अजून थोडावेळ पण राग कंटोल करू शकत नव्हता. तेजस आणि त्यांचा मित्राने त्या मुलाला बेदम मारले. सानिकापासून लांब राहिची ताकीद दिली.

(संध्याकाळी फोन वर)
सानिका -तेजस मला सगळ कळाले तू त्याला मारल

तेजस- हो ग बाई, मग काय करणार होतो , तुला कोणी येऊन त्रास देईल. मी गप्प बघत बसू का?

सानिका- पण.....

तेजस -पण बिन काही नाही. तुला त्रास झाला की मला पण काही तरी होत. आणि हयापुढे कसला पण प्रोब्लेम असू मला फोन कर.मी जिथे कुठे असेल तिथून तुझा 1मिस काॅल वर येईल.

तेजसच बोलने ऐकून सानिकाच मन भरून आले. आज तेजसच्या रूपांत तीच हक्काच माणूस भेटल होत. त्या दिवसा नंतर सगळ बदल होत. दोघांच्या मनात एकमेकांनची हक्काची जागा निर्माण झाली होती. तेजस काही कारण काढून सानिका च्या घरी जात.सानिकाला पण तेजस नाही दिसला तर ती बैचेन होत. तेजसला सानिका आवडू लागली.सानिका रोज तेजसच्या ऑफिसला जायच्या टाईम मध्ये खिडकीतून तेजस बघत असत.तेजस पण तिला बाय म्हणला शिवाय जात नसे. कधी सानिका खिडकीत दिसली नाही की हाॅन वाजवत. एकमेकांना बघतला शिवाय त्यांना करमत नसे. तेजसच्या आईचे पण सानियाच्या घरी येणं जाणं चालू असत. आईला बोलावण्याचा बाहना करून तेजस सानिका चा घरी येत.
न कळतच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होत गेल.दोघांनाही एकमेकांना भेटावंस,एकमेकांन सोबत वेळ घालवसा वाटतं. पण ऑफिस मुळे त्यांना तेही शक्य होत नसत. तेजसच ऑफिस सानिकाच्या ऑफिस पासून लांब होत. तरी तेजस ऑफिस मधून लवकर निघायचा आणि सानिकाच्या ऑफिस समोर थांबायचा. सानिकाच ऑफिस घरापासून 15 मिनिटं अंतरा असल्यामुळे रस्त्यावर थांबून तेजस सोबत बोलने शक्य नव्हते होत.पण दोघांनाही त्यावर पर्याय शोधून काढला होता. सानिकाची गाडी पुढे पुढे जात तेजस मागे मागे जात. तेवढेच सोबत म्हणून जो वेळ देता येईल तो एकमेकांना देत.प्रेम व्यक्त केले नव्हते तरी एकमेकांच्या मनाला ते मान्य होते.त्याना आता समजत होते. आपण एकमेकांन शिवाय राहू शकत नाही पण सांगणार कोण??पुढे काय? असंख्य प्रश्नाने दोघेही शांत होते.
रात्री जेवण झाल्यावर सानिका रूम मध्ये आली. फोन ची रिंग वाजली.
सानिका- 'Hello बोल ना तेजस'.

तेजस - उद्या येईशील का भेटायला?

सानिका-उद्या??पण ऑफिस??

तेजस -अग येना, उद्याच्या दिवस सुट्टी घेना.

सानिका-आरे पण??

तेजस-प्लिज सानिका माझ्या साठी एक दिवस .

सानिका-बर ठीक येते मी सकाळी 11वाजता

तेजस-ग्रेट, सकाळी 11 वाजता आपल्याला जवळच्या गणपती मंदिर जवळ ये.

सानिका-ओके,गुड नाईट

तेजस- गूड नाईट डिअर

फोन ठेवला. तेजस उद्याच्या दिवसाची तयारी करू लागला. सानिकाला कसा प्रपोज करायचा,काय बोलयच?सगळ्याची तो प्रॅक्टीस करत होता. काय बोल तर सानिका खुष होईल. तेजस आरशात बघून मनातला भावना व्यक्त करत होता. डोळे बंद केलावर सानिकाचा चेहरा डोळ्यासमोर येत मग तो हरवून जात . पुन्हा पुन्हा तो प्रॅक्टीस करत होता. रात्र पण तेजसला आज मोठी वाटतं होती. कधी सकाळ होते आणि मी सानिकाला भेटतो.असे त्याला झाल होत. घड्याळ कडे बघून सकाळीची वाट बघत बघत तेजसला कधी झोप लागली त्याच त्याला कळाल नाही. हीकडे तेजसचे हे हाल तिकडे तेजस सोबत पूर्ण दिवस राहतात येईल हया खूशीत सानिकाला झोप काही लागत नव्हती.
अखेर एक मोठया राञी नतंर तो दिवस आला.
क्रमशः


(प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येणार असतो जो पूर्ण आयुष्य बदलून टाकाणारा असतो.त्या क्षणाची आतुरतेने वाट बघण्याची पण वेगळीच मजा असते.....
पुढील भाग लवकरच तुमच्या समोर येईल)