🙏
.....(नमस्कार ...वाचकांनो.......🙏
.
.
मी तुमच्यासाठी...माझ्या लहानपणीच्या मी लिहिलेल्या कविता घेऊन आली आहे.....ह्या कविता मी लहान असताना लिहिलेल्या होत्या.....त्यामुळे काही चुकलं तर माफ करा...हं का.......! मी ह्या कवितांमध्ये बदल करणार होती....पण म्हटलं आपण ज्या चवीने...लहानपणी ह्या कविता लिहिल्या आहेत....त्याच चवीने ....आपल्या वाचकांना चाखायला देऊयात.... कृपया वाचकांना विनंती आहे की....कविता ह्या निरागस...अवखळ मनाने वाचाव्या......जेणे करून त्या तुमच्या काळजाला थेट भिडतील....🤗..अशी आशा करते....🤞
आणि हो....अजून एक...मी ह्या कविता माझ्या कल्पनेने....लिहल्या आहेत...मी कोणाचीही काॅपी केलेली नाहीये..आणि एखादी ओळ...किंवा शब्द सारखे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..... माझ्या कविता कोणीही काॅपी करण्याचा प्रयत्न करू नये... ❌...माझ्या कडे त्याचे Rights आहेत.....)
●माझे बाबा●
माझे बाबा म्हणजे अशी जंगलाची सफर....
जसे बघावे तसे नवीन गोष्टींच कुतुहल....
माझे बाबा म्हणजे जसे माठातील थंडगार
पाणी..
बाबांचा आदर्श समोर ठेवता यश मिळेल
जीवनी..
माझे बाबा म्हणजे जसे ताठातील मीठ....
नसेल ताटात तर चव नाही लागत नीट....
माझे बाबा म्हणजे व्यवहारीचातुर्याचा मोठा
पाठ..
कधीच न आटणारा सागराचा तो
अरुंद काठ....
माझे बाबा म्हणजे जणू प्रकाशमय...
दिव्याची वात..
कोणतेही संकट आले तर त्यावर ..
करायची मात..
माझे बाबा म्हणजे स्थिर स्वाभिमानाचा उंच कळस.........
बाबांचे व्यक्तीमत्तव देखील छान, स्वभाव सुंदर, साधा,सरळ...
कधीही काहीही झाले तरी संयम मात्र ठेवावे...
आणि हेच बाबांचे वाक्य संकटाक्षणी आठवावे..
प्रामाणिकपणा, धाडसी, समजुदारपणा या गुणांमध्ये असावा मेळ...
म्हणं त्यांच की, जेवढा अभ्यास तेवढेच रोज खेळ.....
माझे बाबा म्हणजे परिवारासाठीचा असलेला स्थिर खांब....
गोष्ट कशीही असो त्यामागचा दृष्टीकोन मात्र
लांब.....
प्रत्येकाचे बाबा देतात सर्वांना ...
संस्कारांची शिदोरी..
बाबा म्हणजे सशक्त विचारांची ..
लांबच-लांब दोरी...
माझे बाबा म्हणजे जेवणातला एक-एक घास...
दुरावले असता जिवाला लागते त्यांची आस...
कधीही काहीही झाले तरी आरोग्य चांगल ठेव, त्यासाठी व्यायाम कर सतत..
हेच घडी-घडी सांगत असता त्यांचे तोंड का
नाही दुखत...
बाबांनी मला आदर्श बनवण्या बरोबरच कृतज्ञ ही बनवले...
कितीही काही चुकले परी खोटं न बोलणे..
प्रत्येक गोष्टीत वाटते आता त्यांची तडफड ...
माझे मूल मोठे होऊन चांगली व्यक्ती बनवी एक हीच त्यांची धडपड....
त्यांची ही परिपूर्णता बघून विचार लागते करायला...
किती वर्ष लागतील रे बाबांसारखा बनायला..
किती वर्ष लागतील रे बाबांसारखा बनायला..!
●बालपण●
(
बालपण प्रत्येकानेच जगलेल आहे..ही कविता तुम्ही नक्कीच अनुभवाल..😌☺)
बालपणात मनमोकळेपणाने आणि मुक्तपणे खेळायचो......
हसत-खेळत भरपूर पार्ट्यांचा आनंद घ्यायचो...
बालपणी असायचा कमी अभ्यास...
मनसोक्त जगायचं हाच मनाचा ध्यास...
खेळून-खेळून दमून जायचो...
पाणी प्यायला घरात यायचो....
आईची बोलणेही खायचो....
मैत्रिणींचा आवाज येताच मैदानाच्या दिशेने पळत सुटायचो....
परीक्षा जवळ आली की अभ्यासाला लागायचो....
सर्व पेपर संपले की आनंदाने नाचायचो...
नोव्हेंबर च नाव घेताच दिवाळी असायची...
दोन सुट्ट्या घरी नंतर गावाला दिसायची....
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा व्हायची सुरू... उन्हाळ्याच्या सुट्टीचा विचार मनात लागायचा पोखरू....
दिवाळीनंतर सुरू व्हायच्या शाळेत क्रीडा स्पर्धा गॅदरिंग आणि सहल....
सहलींची ठिकाणे बघून मनात वाटायचं कुतूहल....
वार्षिक परीक्षा झाल्यानंतर लागायच्या उन्हाळ्याच्या भरपूर सुट्ट्या....
एक विचार यायचा मनात सुट्टीनंतर होऊन एक वर्ष मोठ्ठ्या...
अरे काय होतं ते बालपण... आणि काय होतं ते लहानपण....
हाच विचार करता करता आलं आता मोठेपण.... आलं आता मोठेपण....
●पतंग●
(
ही एक प्रेरणादायी कविता आहे यशाची आणि पतंगाची तुलना या कवितेत केली आहे.😇)
उंच उंच उडत जाते मधेच खाली दोन खाते...
आपलं ध्येय मोठं असावं असा सगळ्यांना संदेश देते....
उडता-उडता उंच झोपते कधी वाऱ्याने खाली जाते.....
एकदा विचार करा आणि बघा पतंग आपल्याला खूप काही शिकवून जाते...
पतंग सोबत खेळावे असे वाटते सगळ्यांना.... यश असेल जीवनी तर साथ मिळेल आनंदांना........
पतंग खेळत असताना पैज लागते सगळ्यांशी......
याच प्रमाणे जिवनाची दोरी असते सूत्रधाराच्या हाताशी .....
पतंग कापल्यावर जमतो सगळ्यांचा घोळका.......
यशाची मिळालेली साथ तर जीवनाचा प्रत्येक क्षण मोकळा......
खरं सांगू हवेहवेसे वाटणारे क्षण कधीतरी जीवनात पण...
पतंग उडवत असताना आनंदी जास्त सगळे जण.........
.
.
.(
मी पुन्हा एकदा सांगत आहे.... ह्या कविता कोणीही कॉपी करू नये... त्याचे राईट्स माझ्याकडे आहेत ....❌.
.
कविता कशा वाटल्या प्रतिक्रियांमध्ये सांगायला विसरू नका कविता वाचून जाताना एक शब्द का होईना प्रतिक्रिया द्या ...... खूप वाचक येतात वाचून जातात..... पण एक शब्द सुद्धा प्रतिक्रिया करत नाही... ऍटलिस्ट एक शब्द तर आपण लिहूच शकतो ना...यावेळी तुम्ही प्रतिक्रिया द्याल....अशी आशा करते.....🤞 )
....
...
..
.■□■
♡लेखकाचे मनोगत♡
(नमस्कार वाचकांनो🙏 .....I hope तुम्ही सर्व छान असाल...
मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होत .....पण मला संधी भेटत नव्हती....."कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा" या कथेला तुम्ही खूप प्रेम आणि प्रतिसाद दिलातं.....त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद....🙏... खूप जणांनी विचारलं मला की, आपण कथेचे भाग लवकर का प्रकाशित करत नाही.... Actually मला पण लवकरात लवकर कथेचे भाग लिहायचे आहेत....पण आता माझा Academic year सुरू झालयं...त्यामुळे मला अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागतं... आणि लिहायला फारसा वेळ जमत नाही....
तर माझं मनोगत व्यक्त करणे मागचं कारण हे होतं की काही अजून काही दिवस मी या कथेचे भाग प्रकाशित करू शकत नाही..I hope.. की तुम्ही मला समजून घ्याल....
एकीकडे लिहिणे, अभ्यास करणे हे दोघी काम सोबत करणं खरंच द्वंद्व स्थिती घेऊन जाते..... त्यामुळे एकदा की माझं Academic year कम्प्लीट झालं तर मी तुमच्यासाठी नक्की लवकरात लवकर भाग टाकण्याचा प्रयत्न करेल.... नुसता भागच नाही टाकणार तर ही कथा लाईव्ह मध्ये जोडील.... जेणेकरून तुम्हाला दर दिवसाआड नवीन भाग वाचायला मिळतील..... प्लीज.... तुम्ही मला आता समजून घ्या अशी आशा करते ....थोडक्यात मला हे सांगायचे की... काही ठराविक काळासाठी मी माझी ...कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा... स्थगित करत आहे .... कृपया मला समजून घ्या.... पण मी जेव्हा ही कथा पुन्हा सुरुवात करेल... तुम्हाला मी तेव्हा तक्रारीची एकही संधी देणार नाही ....सर्वे भाग लवकरात लवकर पोस्ट करेन... हे मात्र नक्की..! चला तर भेटूया मग एका ठराविक कालावधीनंतर...
काळजी घ्या🤗...) -ज्ञानेश्वरी ह्याळीज