Big Boss - 1 books and stories free download online pdf in Marathi

बिग बॉस - अनटोल्डमिस्ट्री (भाग 1)

पाच वर्षांपूर्वी...
दशपुत्रेंच्या घरात...
वेळ संध्याकाळी 6 वाजताची..
आस्था "मुगू (मुग्धा), झालं का बेटा आवरून बर्थडे गर्लच बर्थडेत उशिरा पोहोचली तर कस होणार चल आवर पटकन (मनाशीच) हा आतिश देखील कुठे राहिला देव जाणे लवकर येतो म्हणून सांगून गेलाय अजून पत्ता नाही याचा."
मुग्धाचा 12वा वाढदिवस म्हणून आज दशपुत्रेंच्या घरात नुसती लगबग सुरू होती त्यातून आतिशचा ही पत्ता लागत न्हवता म्हणून आस्था आणखीनच काळजीत होती. खर तर आस्थाच आतिशच उशिरा येणं हे काळजी मागचं मेन कारण न्हवतच तर तिच्या काळजी मेन कारण होत सारख्या आतिशला मिळणाऱ्या धमक्या.
मागच्या काही दिवसांपासून आतिशला वारंवार धमक्या मिळत होत्या. त्यामुळे आतिशच्या घरातले सर्वचजण अस्वस्थ होते. तरीही घरातल्या सगळ्यात लहानगीचा आणि एकुलत्या एक मुलीचा वाढदिवस. म्हणून जरा वातावरणात बदल होईल या विचाराने आस्था आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करायचा विचार करते.
पण घरी आतिश लवकर येतो हे सांगून बाहेर पडलेला असतो. संध्याकाळचे 6 वाजतात तरीही आतिश घरी परत येत नाही. एरवी आतिशला कितीही उशीर झाला तरी आस्थाला कळवायचा पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवस असून देखील आतिशने आस्थाला एक फोन सुद्धा केला नाही म्हणून आस्था जरा जास्तच चिंतीत होती एरवी दिवसातून पंधरा ते वीस कॉल करणारा आतिश साधं एक कॉल करत नाही त्यातून या त्याला मिळणाऱ्या धमक्या या विचाराने आस्थाला आतिशची काळजी वाटू लागते तीच सगळं लक्ष घराच्या दरवाज्या कडेच लागलेलं असत.
आतिशचा फोन येत नाही या विचाराने आस्था सतत फोन करू लागते.
इकडे...
मुग्धाही रुसून बसलेली असते. तिला आतिशला भेटायचं असत म्हणून आस्था आतिशला सारख फोन करू लागते पण फोन नॉटरीचेबल लागत असतो. तेवढ्यात आतिशचा लहान भाऊ अमित बाहेरून येतो आणि आस्थाला काळजीत बघून विचारतो. "वहिनी, काय झालं? आज मुगू चा वाढदिवस आहे आणि तू काळजीत दिसतेस सगळं ठीक आहे न." फोन बाजूला ठेवत जरा चिंतेतच आस्था सांगते. "ह्या आतिशच काय करू तेच समजत नाहीये मला. आता आपल्या मुलीचा आज वाढदिवस आहे आता लोक यायला सुरुवात होईल पण याचा अजून पत्ता नाहीये मला तर आता काळजी वाटू लागली आहे याची सकाळचा बाहेर पडलाय साधा एक फोन नाही." आस्थाची समजूत काढत अमित बोलतो. "वहिनी, काळजी करू नकोस कामात अडकला असेल तो मी त्याला फोन करून बघतो तु मुगू ला तयार कर डोन्ट वरी ओके."
आस्था म्हणते. "ठीक आहे तु लावून एकदा फोन निदान. तुझ्याकडून तरी लागतोय का? मी मुगूला तयार करते." अमितशी बोलून आस्था मुग्धाच्या खोलीत तीच आवरून द्यायला जाते.
इकडे...
अमित आतिशला फोन करण्यासाठी आपला फोन खिशातून बाहेर काढतो तेवढ्यात आतिशचाच अमितला फोन येतो आणि अमित फोन उचलतो.
अमित. "हॅलो, अरे दादा आहेस कुठे तु? इकडे तुझी सगळे वाट बघत आहेत तु ठीक आहेस न?"
आतिश घाबरत घाबरत बोलतो. "अमित हेल्प मी मला मला माहित नाहीये ही कोणती जागा आहे. प्लिज मला वाचावं." अमितला आतिशच बोलणं ऐकू येत नाही तो जरा वरच्या आवाजात बोलतो. "हॅलो, हॅलो दादा मला तुझा आवाज ऐकू येत नाहीये थांब मी बाहेर येऊन बोलतो. हॅलो तुला माझा आवाज ऐकू येतोय का?" अचानक आतिशच्या मोबाईल ची बॅटरी संपते आणि त्याचा मोबाईल बंद पडतो. अमित परत आतिशला फोन लावायचा प्रयत्न करतो पण त्याचा फोन स्विच ऑफ होतो.
इकडे...
मुग्धाच्या खोलीत मुग्धा आवरायला तयार होत नाही त्यामुळे आस्थाची जरा जास्तच चिडचिड होते. तेवढ्यात अमित मुग्धाच्या खोलीत येतो तो जरा काळजीतच असतो पण आस्थाला तस जाणवू देत नाही. जरा आनंदूनच आस्थाला विचारतो. "अरे! आमची मुगू अजून तयार नाही झाली कुणीतरी रुसलय वाटतंय आमच्यावर. (थोडस थांबत) वहिनी तु हॉलकडे जा मी तिची समजूत घालून राग दूर करतो. ती येईल तीच आवरून तु बाहेर जा." थोडस चिडक्या आवाजात आस्था बोलते. "बघ बाबा हिला तुझं तरी ऐकते का? आज वाढदिवस मोठं व्हायचं सोडून दिवसेंदिवस लहान होत चालली आहे. बर फोन केलास का?" अमित मध्येच थांबवत बोलतो. "वहिनी या विषयावर आपण नंतर बोलुत गेस्ट येऊ लागले आहेत त्यांच्या कडे लक्ष दे मी मुग्धाशी बोलतो." हे ऐकल्यावर आस्था काळजीत पडते पण अमित बाजू सांभाळून घेतो आणि आस्थाला हॉलकडे पाठवतो. आस्था आलेल्या पाहुण्यांच बघू लागते पण तीच सगळं लक्ष दाराकडे असते. काही वेळाने अमित सुद्धा हॉलमध्ये येतो आणि आस्थाची मदत करू लागतो.
इकडे...
मुग्धाच्या खोलीत मुग्धा आवरत असते आणि आपलं आवरून पंधरा मिनिटात बाहेर येते तिला बघून सगळे खूप खुश होतात पण तिच्या चेहऱ्यावर मात्र तो आनंद नसतो. शेवटी आतिशची वाट बघून सगळे मुग्धाचा वाढदिवस साजरा करतात.
सगळे मुग्धाचा वाढदिवस साजरा करण्यात मग्न असतात. तेवढ्यात घरी एक कुरियर येत.
कुरियरवाला कुरियर घ्यायला कुणीतरी येईल याची दारात वाट बघत असतो. तेवढ्यात अमितच कुरियरवाल्या कडे लक्ष जात तो दरवाज्या जवळ येतो आणि काही बोलणार तेवढ्यात कुरियरवाला अमितला म्हणतो. "साहेब, तुमच कुरियर." कुरियरवाला अमितच्या हातात कुरियर देऊन निघून जातो. अमित हातातलं एनवलप उघडतो तर त्यात आतिशचा एक फोटो असतो तो फोटो बघून अमितची एकदम किंचाळीच निघते. तो कोलमडून पडतो ते बघून सगळे त्याच्याकडे धाव घेतात आस्था काळजीने अमितला विचारते. "अमित काय झालं? आता कोण आलं होतं?"
अमित तिच्याकडे न बघताच तिला फोटो दाखवतो. फोटो बघून आस्थाही कोलमडून पडते तिचा धीर सुटतो तिची अवस्था बघून काही जण तिला सावरायला पुढे सरकतात. ती मनात पुटपुटू लागते. "मला माहित होतं हे अस होणार होत ते आतिश कुठं गेलास तु आम्हाला सोडून." आस्था मध्येच थांबून एकदम जोरजोरात रडू लागते. तीच रडणं ऐकून सगळे पाहुणे निघून जातात आणि घर एकदम शांत होत.
काही वेळानंतर...
अमित आपला मित्र 'इन्स्पेक्टर हार्दिक' ला फोन करतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो. "हं, यार हार्दिक लवकर घरी ये दादा बराच वेळ झालाय तरी घरी परतला नाहीये यार आणि आता तर कुणीतरी त्याचा फोटो पाठवलाय रक्ताने माखलेल्या ड्रेस मधला मला काहीच कळत नाहीये यार."
हार्दिक अमितला धीर देत म्हणतो. "रिलॅक्स अमित अस धीर नको सोडुस काळजी करू नकोस मी आलोच तु फक्त वहिनीला बघ." हार्दिक फोन ठेवतो आणि अमितच्या घराकडे निघतो.
काही वेळानंतर...
अमित आणि आस्था हार्दिकची वाट बघत असतात तेवढ्यात हार्दिक घरी पोहोचतो. आणि दोघांची विचारपूस करू लागतो.
"हाय, आधी जरा शांत व्हा आणि मला नीट सगळं व्यवस्थित सांगा नेमकं काय झालं? अगदी कुठलीही गोष्ट न लपवता." अमित सांगू लागतो. "खर तर दादाला काही दिवसांपासून धमक्या मिळत होत्या पण दादानी याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही बऱ्याच वेळा बोललो त्याला आपण यात हार्दिकची मदत घेऊत. पण "तो एक जनतेचा रक्षणकर्ता आहे आपल्या छोट्याश्या कामासाठी आपण त्याला का त्रास द्यायचा." अस बोलून तो नेहमी आम्हाला टाळत आला. आमचंच चुकलं त्याला सांगण्यापेक्षा मीच आलो असतो तुझ्याकडे तर ही वेळच आली नसती. आणि आज मुग्धाचा वाढदिवस म्हणून घरी सांगून गेला मी घरी लवकर येतो. सकाळचा बाहेर गेलाय आता 9 वाजलेत तरी पत्ता नाहीये त्याचा त्यातून हा कुणीतरी फोटो पाठवलाय हे बघ काय करावं तेच सुचत नाहीये." हार्दिक अमितला धीर देतो आणि विचारतो. "हे बघ काळजी करू नकोस होईल सगळं ठीक हं, बर मला सांग दादाचा कोणी शत्रू आहे का?"
विचार करून अमित सांगतो. "तुला तर माहीतच आहे यार दादा किती साधा आहे ते त्यानी आयुष्यात कुणाकडे नजर वर करून पाहिलं नाहीये आपल्या कामातच व्यस्थ राहतो त्याच शत्रू कोण असेल नाही कुणी नाहीये." हार्दिक अमितला बोलतो . "नाही अमित, अस होण शक्यच नाही पाणी नक्कीच कुठेतरी मुरतंय. बर मला सांगा तुम्हाला कुणाचा किडनॅपर्सचा फोन आला होता का? खंडणी साठी?"
आस्था हार्दिकला चहाचा कप देत सांगते. "अजून तरी नाही. पण आतिश दाखवत नसला तरी काही दिवसा पासून आतिश खूप काळजीत होता. त्याला हे एक लेटर देखील आलं होतं."
लेटर हातात घेत हार्दिक बोलतो. "बघू" आणि मनातल्या मनात वाचू लागतो.
काही वेळा नंतर..
लेटरची घडी घालत हार्दिक दोघांना विचारतो. "हं, तर अश्यात दादानी कुठल प्रोजेक्ट घेतलं आहे का हातात? जे कुणाला आवडलं नाही?"
अमित सांगू लागतो. "हो एक घर आहे. बिग बॉस नावाचं त्या घराची आर्किटेक्चरिंगची फाईल दादाकडे आली होती. पण ती फाईल दादाकडे कशी पोहोचली ते नाही माहीत."
हार्दिक पुढे बोलतो. "बर, मला दादाचा एक फोटो द्या. मी दादाचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करतो." आस्था हार्दिकला फोटो आणून देते. हार्दिक त्याच्या कॉन्स्टेबल्सना बोलतो. "तुम्ही एक काम करा. ह्यांचे नंबर्स घ्या आणि टॅपिंगला टाका." तसेच दोघांना धीर देत बोलतो. "आता तुम्ही काळजी करू नका. काही होणार नाही दादाला. आपण ते सगळं करुत जे आपल्या हातात आहे. घाबरू नका मी कायम तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्हाला अजून काही समजलं तर मला लगेच कळवा. येऊ मी आता." दोघांना सिऑफ करून हार्दिक निघून जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी...
हार्दिक तपास करायला सुरुवात करतो.

इतर रसदार पर्याय