लग्नानंतर च आयुष्य.... - 2 shraddha gavankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नानंतर च आयुष्य.... - 2

मी तयार झाले होते लग्ना साठी कारण घरातले सर्व जण म्हणत होते.मुलगा छान आहे फक्त त्याला बघून जाऊदे सर्वाना मुलगा खुप आवडला होता फोटो बघुन कारण मुलगा दिसायला सुंदर होता चांगल्या घरचा जॉब देखील होती.पण माझं अजुन सुद्धा मन नव्हतं. खरं तर मला करायचं नव्हतं पण काय करणार या दुनियेची रीत आहे प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून जावं लागते.मला फक्त एवढंच माहित होत कि मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं मी माझ्या परिवारपासून कस दूर राहायचं कधी त्यांच्या पासून एक दिवस दुर न राहणारी मुलगी आत्ता कस राहील हेच मनात विचार येत होते.
माझे काही वेगळे विचार होते तर माझ्या परिवारयांचे काही वेगळे विचार होते सर्व खूप आनंदी होते.घरात दोन दिवसा पासुन तयारी चालु झाली पाहुणे येणार त्यांच्या साथी काय बनवायचं काय करायचं हेच चालु होत.पण बाकी मुलीनं सारखं माझं काही नव्हतं येणार येउद्या असच होत बाकी मुलींचं कस असते ना उद्या पाहुणे येणार माझी तयारी बाकी आहे मी कुठली साडी नेसू त्या वर सर्व सारखं सामान मिळेल का मला ब्युटी पार्लर मला जायचं राहील मी छान दिसेल का मला उद्या काय विचारतील त्यांच्या समोर येईल का सर्व सांगता हेच विचार करून मुली परेशान असतात.पण खरंच ह्या गोष्टी पासुन खुप दुर होते.मला पाहुणे बघायला येणार मी असं ऑफिस मध्ये सांगितलं आणि एक दिवसाची सुट्टी घेतली.ना कुठली तयारी केली ना पार्लर ला गेले.शेवटी तो दिवस आला डिसेंबर महिना होता.डिसेंबर च्या शेवटच्या तारखे ला मला बघायला आले जास्त कोणी नव्हतं पण नवरदेव मुलगा त्याचे मामा आणि त्याचा जिवलग मित्र सोबत आला होता. जस साधे पणाने होईल तस आम्ही त्यांचं स्वागत केलं आपल्या महाराष्ट्रा मध्ये कस पाहुणे आल्या नंतर पाय धुण्यासाठी पाणी देतात अगदी तसच केलं.पाहुणे थोडं दूरचे होते त्या मुळे घरात आल्या नंतर सर्वांन शी ओळख केली आणि पाणी पायला देऊन थोडं चहा पीत गप्पा झाल्या.त्या गप्पा मध्ये माझ्या घरचे सर्व मोठे नवऱ्या मुलाला प्रश्न विचारत होते त्या प्रश्ना मध्ये फक्त त्या मुलाचा स्वभाव ओळखण्याचा प्रयन्त करत होते.जस फोटो मध्ये मुलाला बघितलं त्या पेक्षा हि तो दिसायला रुबाबदार होता. चांगल्या पोस्ट वर होता काय म्हणतात त्याला वेल एज्युकेट होता.त्याच्या बोलण्याची पद्धत हे सर्व बघून घरचे खुश झाले त्यांना मोठा जावई मिळाला तसाच छोटा पण मिळाला त्याला बघून सर्वाना वाटलं हाच आपल्या मुली साथी योग्य आहे.गप्पा चालूच होत्या मग जेवणाची तयारी केली ताट वाढायला घेतली स्वयंपाक असा माझ्या आईने अगदी रुचकर केला होता वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर पापड, लोणचे आणि सोबतच १,२ चटण्या आणि थोडं गोड म्हणजे लाडु सर्वाना जेवण वाढून दिलं.

तशी माझी आई आत्या मोठी आई आजी ह्या सर्व जन वाढत होत्या जेवण जस जस होत आल मग मला शेवटी लाडु वाढायला सांगितलं मी सर्वाना वाढून आले जेवण झाले आणि सर्व जण बसले मुलीला बोलवा असं मुलाचे मामा बोलले तस मी समोर आले मेकअप असा काही नव्हता केला साधी लाल रंगाची साडी नेसली आणि आले समोर.जस मुलीला एखादा पेपर दायचं असे प्रश्न विचारण्या साठी सुरुवात झाली नाव सांगायला सांगितलं मी सांगितलं नावापासून सुरुवात केली त्यांनी मी हि सांगत गेले.मला विचारलं तुला परिवार कसा पाहिजे मी सांगितलं सहकुटुंब पाहिजे मला असा मोठा परिवार माझं हे वाक्य एकूण त्यांना छान वाटलं खुश झाले सर्व आत्ता मुलाची बारी होती तो मला प्रश्न विचारणार होता.......त्यांनी तसे काही प्रश्न विचारले नाही पण होहोते.सांगेल पुढच्या भागात असच वाचत राहा आणि मला असच प्रोसाहित करा .......



धन्यवाद..............