लग्नानंतर च आयुष्य.... - 3 shraddha gavankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नानंतर च आयुष्य.... - 3

मुलगा तसा दिसायला साधा आणि सरळ होता. पण त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न होता शिक्षण किती झालं. त्यांनी माझ्या कडे हलकीशी नजर वर करून बोलत होता. मी हि त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिल. त्यांनी बर म्हणत दुसरा प्रश्न विचारला म्हणे मग समोर बाकीचं शिक्षण पुर्ण करायचं का मला समोर शिक्षण पुर्ण करायचं होत म्हणून मी हो म्हणाले. आणि सर्व परत शांत झाले पण माझ्या घरच्यांनी अगोदरच एक गोष्ट क्लिअर सांगितली आमच्या घरच्या सर्व मुली शिक्षित आहेत आणि त्या घरी राहून फक्त घरचे काम नाही करणार त्यांना त्यांची जॉब आणि शिक्षण पुर्ण करू दयायला पाहिजे.

ह्या गोष्टीला लगेच मुलगा म्हणाला हो हो मला काहीच हरकत नाही कारण मलाच असं वाटते माझी होणारी बायको शिक्षित आणि जॉब करणारी असावी. पण लगेच मुलाचे मामा मध्ये बोलले आणि म्हणाले मुलगी जर जॉब वर जाईल तर घरचे काम होतील का दोन्ही सांभाळता येईल का माझ्या कडे बघत बोलले मी म्हणाले हो मी करेल दोन्ही पण मॅनेज ठीक आहे म्हणत मग मला तिथून जायला सांगितलं आणि समोर सर्वांचं बोलणं सुरु होत. बोलणं झाल्या नंतर आत्ता त्यांना निघायचं होत त्या मुळे मला माझ्या वडिलांनी आवाज दिला तस मी बाहेर आले वडिलांनी सांगितलं सर्वांचे दर्शन घे तस मी केलं आपल्या इकडे पद्धत आहे मुलींनी पाया पडल्या तर त्यांना पैसे देतात तसे दर्शनाचे पैसे मिळाले मला आणि मुलाच्या मामानी मुलाला सांगितलं तु पण घे दर्शन तस त्यांनी केलं आणि निघते वेळेस मुलाच्या मामानी मुलाला विचारलं तुला मुलगी पसंद आहे का तर.
त्यांनी सर्वांन समोर सांगितलं हो मला मुलगी खुप पसंद आहे आणि लग्ना साठी पण तयार आहोत आम्ही माझ्या घरचे हसत म्हणाले बर ठीक आहे पण आम्ही तुम्हाला उद्या कळवतो आणि सर्वं जण बाहेर निघुन गेले. पाहुणे गेल्या नंतर सर्व जण घरात आले आणि आप आपलं मत सांगत होते.पण माझं ठरलं होत मला करायचं नव्हतं मी शांत होते माझी आई आणि मोठी आई दोघी म्हणत होत्या मुलगा खूपच शांत दिसतो त्याची वागणूक पण चांगली आहे आम्हाला मुलगा खुप आवडला. आत्ता घरात सर्वांचं एक मत झालं पण माझे वडील माझ्या बाजूने होते ते म्हणत होते तिला नाही करायचं तर कोणीही तिला जबरदस्ती नाही करणार हे वाक्य बोलल्या नंतर सर्वानी विषय बंद केला आणि सर्व जण झोपले. दुसऱ्या दिवशी मी उठल्या नंतर माझ्या आईने मला थोडं जवळ घेऊन डोक्यावर हाथ फेरून बोलत होती मुलगा खुप चांगला आहे तुमची जोडी पण भारी जमेल थोडं हसत म्हणाली तु रागीट तो शांत तुला पाहिजे तसा मुलगा आहे तो तु उठ म्हणाली तर आणि बस म्हणाली तर बसेल एवढा शांत दिसतो हो मन ना बेटा मी रागात आई कडे बघितलं आणि मी ओरडले तुझं काय ग तेच तेच नाही करायचं मला आत्ता पुन्हा हा विषय माझ्या समोर नको काढु मी असं बोलले आणि उठुन तयारी करून ऑफिस ला निघुन गेले टिफिन बनवला होता आईने पण मी घेऊन नाही गेले आईने आवाज दिला पण मी नाही ऐकलं आणि दिवस भर मनात एकच विचार होता मला वाईट वाटत होत मी आईला उगाच बोलले तिच्या वर विनाकारण चिडले तिला माझी काळजी आहे म्हणून मला बोलत होती समजावून सांगत होती आईला सॉरी असं तोंडून शब्द आले डोळे पाणावले पण काही अर्थ नव्हता आई समोर बोलले नाही ना मी विचार केला होता घरी गेल्या नंतर आईला घट्ट मिठी मारून सॉरी म्हणावं. लवकर लवकर ऑफिस च काम करून निघाले घरी.घरी आल्या नंतर बघते तर काय सर्व मंडळी अगोदरच जमलेली मला बघितलं आणि म्हणे चला आत्ता हि पण आली आत्ता बोलू सर्व जण मी त्यांच्या बोलण्या कडे लक्ष दिल नाही आणि निघुन गेले रूम मध्ये मी फ्रेश होत होते तर मला सारखे आवाज देत होते माझं डोकं आत्ता काम करत नव्हतं वाटत होत यांना का बर कळत नाही का माझ्या मागे लागले. तोंड खराब करून मी बाहेर गेले सर्वाना वाटलं आत्ता हि खुप चिडली आपण कोणीच नाही बोलायचं हिचे मोठे 'पपा हिला बोलतील आणि माझं कस होत मी त्यांना उलट बोलु शकत नव्हतें त्यांचा स्वभाव तसा खुप रागीट आणि प्रेमळ पण तेवढेच मी त्यांच्या समोर जाऊन बसले.
त्यांनी मला खुप प्रेमळ आवाजात सांगत होते हे बघ बाळा मुलगा खुप चांगला आणि ते चालून आपल्या कडे स्थळ घेऊन आले त्यांना तू आवडलीस आम्ही तुझ्या चांगल्या साठीच म्हणतोय ना त्यात जर काही वाईट असत तर आम्ही तुला म्हणत नव्हतो शेवटी बघ तुझी इच्छा. पण मला वाटते तु हो म्हणायला पाहिजे त्यांची माझ्या डोक्यावर हाथ फेऱ्यात म्हणत होते. मला काहीच कळत नव्हतं मी काय बोलु घरातील सर्व एका बाजूने आणि मी एका बाजूने सर्व जण माझ्या एका हो ची वाट बघत होते पण मी सांगितलं मला एक दिवस वेळ द्या तस त्यांनी मला एक दिवस दिला आणि मीटिंग बरखास्त झाली..


दुसऱ्या दिवशी परत तेच ऑफिस ला गेले आणि वेळेत घरी परतले फ्रेश झाले जेवण करून घेतलं मला वाटलं आज कोणी लग्ना बद्दल का मला बोलत नाही विषय सुद्धा काढला नाही मी माझ्या विचारात होते लगेच माझ्या वडिलांना फोन आला पाहुण्यांचा ते विचारत होते तुम्ही अजुन तुमचं उत्तर दिल नाही आम्ही वाट बघतोय आमच्या कडून हो आहे तुम्ही सांगा फक्त. आत्ता मात्र माझे वडील विचारत पडले काय सांगावं त्यांना कळत नव्हतं त्यांनी माझ्या कडे बघत. म्हणे मला थोडा वेळ देता का मी उद्या पर्यंत सांगतो आणि फोन ठेवून दिला. मला बिलकुल चांगलं नाही वाटलं माझ्या वडिलांना बघून कारण माझ्या मुळे त्यांना सरळ बोलता येत नाहीये. मग मी स्वतःहून त्यांच्या कडे गेले त्यांनी मला जवळ घेतलं डोक्यावर हाथ फेरत म्हणाले सांग तुला काय वाटते नाही करायचं नको करू तुला जबरदस्ती नाही करत मी पण मला एवढंच वाटते मुलगा चांगला आहे त्याला कुठलाच व्यसन नाही शिक्षित आहे चांगली जॉब आहे मोठ्यांचा मान ठेवतो आदर सम्मान आहे त्याच्या मध्ये सहसा असे मुलं मिळत नाही. नाहीतर मग तूला माहित आहे आपल्या च समाज मध्ये खुप मुलींना असे खराब नवरे मिळाले जिंदगी बरबाद झाली त्यांची पण शेवटी तुझी इच्छा पण तुला खरच सांगु मला वाटते तु या लग्ना हो म्हणावं तुला वाटते ना लवकर नाही करायचं लग्न नाही करू आपण एक वर्ष वेळ देऊ त्यांना आणि एका वर्षा नंतर लग्नाची तारीख काढू तो पर्यंत ते पाहुणे थांबले तर करू नाहीतर दुसरं बघू मग. कारण बेटा तुला माहित आहे का आपण असंच त्यांना लग्नाला नकार दिला तर लोक बदनामी करतात काही पण बोलतात मग कोनी पाहुणे पण येत नाहीत एवढं बोलुन त्यांनी मला झोपायला सांगितलं आणि मी गेले झोपायला पण मला झोप येत नव्हती मी खुप विचार केला आणि झोपले पण मी ठरवलं होत मी सकाळी ऊठल्या नंतर माझा निर्णय सांगणार.


(२ शब्द माझ्या मनातले )मुलींचं आयुष्य खुप कठीण असते सर्वांचा विचार करत स्वतःचा विचार करायला विसरून जातात सतत त्या दुसर्यान साठी जगतात. धन्यवाद