लग्नानंतर च आयुष्य.... - 4 shraddha gavankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नानंतर च आयुष्य.... - 4

मी रात्र भर विचार केला मला कळत नव्हतं काही. कारण तर मला लग्न करायचं नव्हतं आई वडिलांना सोडुन नव्हतं जायचं.पण घरट्याला सर्वाना मुलगा पसंद होता शेवटी वडिलांना पण तो पसंद होता पण माझ्या मुळे ते स्वतःच मत सांगत नव्हते त्यांना वाटायचं हिच्या वर जबरदस्ती नको करायला त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी ऐकल्या आणि सकाळी उठल्या नंतर फ्रेश होऊन ऑफिसला जायची तयारी केली. अजुन सुद्धा माझं मन झालं नव्हतं ऑफिस ला जायचं म्हणून आईने टिफिन बनवून दिला आणि माझ्या समोर नाश्त्याची प्लेट ठेवली खाऊन घे पटकन नाहीतर उशीर होईल दिवस भर वेळ मिळत नाही आई मला किती प्रेमाने सांगत होती.


"आई पप्पा कुठेत ग मला त्यांच्याशी बोलायचं असं मी विचारलं आईला
येतीलच तु मला बोल ना बाळा काय झाल काही परेशानी आहे का
अग नाही येउदे पप्पाला मी सांगते
तेवढ्यात माझे वडील आले आई सांगत होती बाळाला तुमच्याशी बोलायचं पण मी म्हणले काही नाही असच विचारलं मी काही नाही बोलायचं आणि घरा बाहेर निघाले बॅग घेतली शूज घातले आणि थोडं दरवाज्याच्या बाजुने आल्या वर मी पप्पाला म्हणाले


त्यांना फोन करून कळवा आपण तयार आहे म्हणून लग्नासाठी

आई वडील माझं बोलणं ऐकुन खूष झाले आणि मी माझं ऑफिस ला निघुन गेले नंतर घरी माझे वडील मुलाच्या मामाला बोलले आम्ही तयार आहे लग्ना साठी पण लगेच नाही करायचं लग्न एक वर्ष वेळ आहे अजुन तुम्ही एक वर्ष थांबु शकता का. मुलाचे मामा म्हणले हो थांबु ना पण साखरपुडा करून घेऊ म्हणजे कस पक्क झालं सारखं वाटेल

हो काही हरकत नाही पण एकदा आम्हाला तुमचं घर बघु द्या कोण कोण आहे कसं आहे हे सर्व बघितल्या नंतर आम्हाला खात्री होईल आमची मुलगी एका चांगल्या घरी जाते म्हणून.

मुला कडचे तयार झाले आणि माझ्या घरचे निघाले माझे वडील आज्जी आणि मोठे काका सर्व जण गेले बघितल्या नंतर तिथे काही देवाण घेवाण चा विषय निघाला पणमाझ्या घरचे हुंड्याच्या विरोधात होते त्यांनी सरळ सांगितलं आमच्या कडे काही प्रथा नाही करायचं असेल तर बिन हुंड्याच करू आणि तुम्ही तुमच्या मुलाचे कपडे बघा आम्ही आमच्या मुलीचं पण लग्न मात्र खुप थाटामाटात करू सर्व जण ह्या गोष्टीला तयार झाले. मुलाचे मामा म्हणले काही हरकत नाही पण साखरपुडा करून घेऊ आत्ता सर्व बोलुन झालं होत तर साखरपुडा करण्या साठी काही हरकत नव्हती. तारीख पण ठरवली २६ जानेवारी आणि माझ्या घरचे सर्व घरी परतले..घरी आल्या नंतर सर्वाना हि बातमी सांगितली आणि घरात तयारी सुरू करायचा विषय निघाला पण काही कारणा मुळे तारीख समोर टाकली. २६ च्या ऐवजी आत्ता १४ फेबुवारी फिक्स केली. घरात दुप्पट तयारी चालू झाली कारण तर माझ्या काकाच्या मोठ्या मुलीचं लग्न होत १६ फेबुवारीला सर्व घरातले मोठे तयारी करण्या मध्ये व्यस्त होते आणि मी माझं ऑफिस मध्ये दिवस एका पाठोपाठ जात होते. थोडे दिवसा नंतर मला मुलांनी फेसबुक वर मॅसेज टाकला हॅलो असा होता. मी खुप घाबरले आणि वडिलांना सांगितलं मला त्यांचा मॅसेज आला ते पण साखरपुडा होण्या अगोदरच मी काय करू आत्ता काय बोलु . वडील म्हणले सोडुन दे बोलु नको. पण मला आई म्हणाली अग बोलत जा बोल्या नंतर समोरच्या चा स्वभाव कळतो. त्यांनी मला रात्री मॅसेज केला पण मी दुसऱ्या दिवशी रिप्लाय केला आणि हॅलो ला फक्त शॉर्ट हाय पाठवले जसं मॅसेज गेला तसंच मला रिटर्न रिप्लाय आला

"आपण जर बोललो तर तुम्हाला काही हरकत तर नाही ना मुलगा म्हणाला
मी म्हणाले हरकत नाही पण अजुन साखरपुडा झाला नाही कस बोलायचं
मला तुमचे फोटो पाठवता का माझ्या घरच्यांना दाखवायचे तुमचा फक्त एकच फोटो आहे तुम्हाला योग्य वाटत असेल तर पाठवा नाहीतर नको मुलगा खुप किळवळीने म्हणत होत.. मी त्याच्या बोलण्या वर फोटो पाठवले
त्यांनी मला त्या नंतर एक साधा प्रश्न विचारला

तुम्ही तुमच्या मर्जीने लग्न करताय ना घरचे जबरदस्ती तर करत नाही ना असं असेल तर तुम्ही मला सरळ सर्व खरं सांगा बर अजुन एक आपण बोलतोय हि गोष्ट घरात कोणालाही नका सांगु वेळ आल्या नंतर मी स्वताहा सांगेल.

नाही नाही मला कोणीच फोर्स करत नाही लग्ना साठी मी असं बोलुन गोष्ट खतम केली आणि नंतर ऑफ गेले. मी त्यांना बोलते हि गोष्ट मी फक्त माझ्या ताईला सांगितली होती कारण कोणाला तरी माहित असायला पाहिजे म्हणून त्या नंतर माझ्या वडिलांना मुलाच्या मामाचा फोन आला ते सांगत होते मुलीला बघण्या साठी मुलाचा मोठा भाऊ आणि वाहिनी येणार माझे वडील म्हणाले ठीक आहे आणि २ दिवसांनी ते दोघे त्यांचा मुलगा आला आत्ता परत मला त्यांच्या समोर तयारी करून जायला सांगितलं मी माझ्या आईला अगोदरच सांगितलं होत मी काही साडी वगैरे नसणार नाही जशी साधी आहे ड्रेस वर तशीच जाईल बर बाई तुझी इच्छा रागात म्हणाली माझी आई तुम्ही आज कालच्या पोरी कोणाचं ऐकतात का नको जाऊ त्यांनी तुला बघितलं नाही पहिल्यांदा बघणार तर साडी नको नेसायला पण जाऊदे तुला बोलून अर्थ नाही आणि आई निघुन गेली स्वयंपाक घरात मी माझी तयारी केली साधा ड्रेस पांढऱ्या कलर चा आणि केस मोकळे सोडले छोटे छोटे कानातले घातले बस बाकी काही केलं नाही नंतर मि त्यांच्या समोर गेले माझ्या होणाऱ्या जाऊबाई ला बोलले गप्पा झाल्या त्या नंतर मी जेवण वाढून दिल त्यांनी माझा नंबर घेतला मी विचार सासूबाईंचा स्वभाव कसा आहे तर म्हणे खुप कडक आहेत तस समझून घेतात पण आपल्याला लक्ष देऊन करावी लागतात सर्व काम मला तर टेन्शन येत होत कारण सासूबाई माझ्या सोबत राहणार आणि मला तर काहीच काम येत नाही कस होईल माझं आणि सर्व बोलुन झालं कि पाहुणे निघून गेले जाऊबाई सोबत बोलून असं वाटल मला अजुन एक बहीण मिळाली आणि एक चांगला असा छोटा पाटणार जाऊ चा मुलगा मला अँटी म्हणत होता ह्या अगोदर कोणीच असं बोललं नव्हतं दीदी ताई हे शब्द ऐकायची सवय होती पण तेव्हा तें ऐकून जरा वेगळी भावना आली

त्या नंतर आमचं फोन वर बोलणं सुरू झालं त्या मला माझ्या बद्दल विचारत होत्या आणि मी त्यांच्या देरा बद्दल विचारत होते तस मला सर्व माहित असायचं अगोदर कारण आम्ही दोघ बोलत होतो फक्त हि गोष्ट कोणाला माहित नव्हती तस आत्ता माझं सर्वाशी बोलणं व्हायचं सासू जाऊ त्यांचा मुलगा आणि माझा मोठा भाया ते पण मला लहान बहिणी सारखं समजायचे त्या मुळे जरा जास्तच बोलत होतो आम्ही असच बोलून बोलुन मला सर्व माहित ह्यायला लागलं सर्वांचे स्वभाव समजायला लागले असं वाटायचं हे कुटुंब किती छान आहे माझ्या आई वडिलांनी घेतलेला निर्णय खूप चांगला आहे आत्ता दोन्ही कडे तयारी चालू झाली साखरपुड्याची मी माझी सर्व शॉपिंग केली आईने घरात काय लागते त्यांना काय काय द्यायच हे सर्व बघितलं वडिलांनी मुलाच्या अंगठी च बघितलं दिवस जवळ जवळ येत होता १४ फेबुवारी ला साखरपुडा होता आणि १३ ला माझ्या मोठ्या काकाच्या मुलीची हळद होती त्या मुळे आम्ही सर्व आमच्या मोठ्या घरी तिच्या लग्नाची घाई होती सर्व पाहुणे येत होते त्या मधेच माझा साखरपुडा आला आत्ता मला लग्नासाठी आलेले पाहुणे प्रश्न करायचे कुठं दिल मुलगा काय करतो किती पेमेंट आहे घरात कोण कोण आहे मी सर्वाना सांगून सांगून परेशान झाले घरात हळद होती सर्व व्यस्त आणि उद्या माझा साखरपुडा त्या मध्ये आई पप्पा व्यस्त सगळी कडे धावपळ होती. आत्ता उद्या १४ फेबुवारी.......सांगेल पुढच्या भागात १४ फेबुवारीला काय झालं तर
धन्यवाद...........