Traffic and she .... books and stories free download online pdf in Marathi

ट्राफिक आणि ती....

चौकातला लाल सिग्नल लागला आणि निशांत ने ब्रेक दाबून कार थांबवली .पण कार मात्र झेब्रा क्रोसिंग च्याही पुढे गेली होती .तोच नव्हे तर बाकीच्या सगळ्यांनीही त्यांची कृती केली होती .ट्राफिक पोलीस करड्या नजरेने त्या सगळ्यांकडे बघत होते पण त्यांचं कोणालाच काही वाटल नाही .सगळे इतके घाईत होते की त्यांना आजूबाजूला पाहायला वेळच नव्हता .जणूकाही त्यांना मोठ्या युद्धावरच जायचं आहे . त्याला नियम पाळणाऱ्यांचा खूप राग येई .त्याला वाटे काय होणारे आपण नियम पाळून आणि आपण एकट्याने नियम पाळला तरच देश सुधारेल का ? निशांतला कामानिमित्त शहराबाहेर जायचं होतं .त्यासाठी तो खूप लवकर आवरून निघाला होता .त्याला माहित होतं की ट्राफिक मध्ये अडकलो तर खूप उशीर होईल .त्यासाठी तो घाईघाईने निघाला होता .शेवटी जे होयचं तेच झालं तो भवानी चौकातल्या ट्राफिक मध्ये अडकला .आता त्याचा रागाचा पारा तापमापी फोडून बाहेर निघायला लागला होता आणि तो या चुकीसाठी प्रशासनाला दोष देऊ लागला .तेवढ्यात ग्रीन सिग्नल लागला आणि निशांतचा पारा उतरला .मग कारची रेस करून गाडी सिग्नल सुटायच्या आतच वेगाने निघून गेला .ट्राफिक पोलिसाने मोठ्याने शिट्टी वाजवली पण थांबेल आणि नियमाचं पालन करेल तो निशांत कसला .
कार वेगाने कोकणच्या दिशेने निघाली होती .तो एकटाच होता त्यामुळे त्याला वेगाचं कसलाच भान उरलं नव्हतं .उशीर होईल की काय या भावनेने तो तुफान कार दामटत होता .त्यातच त्याने कार मध्ये गाणे लावले होते .गाण्याच्या प्रत्येक बीट सोबत त्याच स्पीड वाढत होतं .ताम्हिणी घाटात इंट्री करताच त्याला समोर मोठी कारची आणि बाईक ची मोठी लाइन दिसली तसा त्याचा रागाचा पारा थर्मामीटर फोडून बाहेर आला .रागारागात त्याने दोन तिन शिव्याही हासडून टाकल्या कारण त्याला कोकणात जाऊन पुन्हा माघारी यायचं होतं तेही आजच्या आज .कोकणात जाऊन लगेच माघारी यायचं ...कसला माणूस ना हा .कोकण म्हणजे स्वर्ग तिकडे गेलात आणि कोकण फिरण्याचा आनंद घेतलाच नाही तर तुमच्या प्रवासाचा काहीच उपयोग नाही .निशांत यावरून जरा ...जरा म्हणण्यापेक्षा खूपच अरसिक वाटत होता .तो घाटात त्या वाहनांच्या गर्दीजवळ जसजसा जात होता त्याला माणसं रस्त्यावर इतरत्र फिरताना ,खाली उतरून गप्पा मारताना तर नुकत्याच पडलेल्या पावसाने सगळीकडे हिरवी शाल पांघरलेल्या निसर्गाचा आनंद घेताना दिसत होते .ते पाहून त्याला पक्क समजलं की ते ट्राफिक जॅम खूप वेळ राहणार आहे कारण थोड्याच वेळापुरतं असत तर माणसं अशी रस्त्यावर फिरली नसती .रागाने विषारी नागासारखा फुफू करत होता .
रागाच्या भरात असतानाच पाठीमागून एक रेड स्कूटी आली आणि त्याच्या कारजवळ येऊन ड्राइव्हर साइडच्या विरुद्ध बाजूला उभी राहिली .त्याने कारच्या काचा खाली घेतल्या .कारण अगोदरच्या ट्राफिक मध्ये
ही स्कूटी ट्राफिक चे सगळे नियम पाळीत होती .पुढे असूनही झेब्रा क्रॉसिंग केल नव्हतं .सिग्नल सुटल्यावरच निघाली होती .पाठीमाघून तिला एक दोन शिव्याही पडल्या तरी ती हलली नाही .रायडींग जॅकेट ,हेल्मेट घातलं होतं .हॅन्डग्लोज सुद्धा होते .मला पाहून वाटल काय मिळालं नियम पाळून .पुरस्कार भेटला का ? तेवढ्यात त्यानं हेल्मेट काढलं मी तर अवाकच झालो कारण तो मुलगा नाही एक सुंदर मुलगी होती .हेल्मेट बाजूला काढताच तिने चिंगमचा फुगा ओठांभोवती फुगवला त्यात
जास्त हवा झाल्यामुळे तो फुटला देखील .काळा गॉगल वगैरे एकदम डॅशिंग मुलगी वाटतं होती ती .
निशांत चा राग तिला पाहून कुठल्या कुठे पळून गेला .निशांत आता तिझ्याकडे उत्सुकतेने पाहत होता .ती स्कूटी वरून खाली उतरली आणि सभोवतालच्या निसर्गाला पाहायला लागली .असं वाटत होतं की तिला ट्राफिक जॅम चा खूप आनंद झाला होता .घाटात ती हिरवीगार हिरवळ आणि ती दोघेही नैसर्गिक सौंदर्याची खाण वाटत होते .माझी नजर एक सेकंदही इकडे तिकडे बघायला तयार नव्हती .डोळ्यांना तर फक्त तिच हवी होती .दोन्ही हात पसरून वाऱ्याला गळाभेट देत होती. आता मलाही ट्राफिक जॅम चे आभार मानायला हवेत असं मनोमन वाटायला लागलं .निशांतही खाली उतरून ति काय करते ते पाहायला लागला .तिझे केस थोडे सोनेरी आणि थोडे काळे होते .सोनेरी केस कोवळ्या उन्हात चमकत होते . तिझा गोरा वर्ण तिला आणखी मोहक बनवत होता .ती निसर्गाला I LOVE NATURE अशी साद घालत होती तेही मोठ्याने जणू खरच निसर्ग तिझ्याशी बोलत आहे .आवाजही नाजूकच होता तिझ्यासारखा .बोलताना तिझे ते छोटे छोटे लाल ओठ एकमेकांना अलगद चिटकत होते .सरळ नाक .डोळे तर टपोरे पाणीदार होते .मी हे सौंदर्य जवळून पाहत होतो .तिला माझी चाहूल लागलेली नव्हती .भेटल तितकं निसर्ग सौंदर्य ति डोळ्यात भरून घेत होती आणि निशांतही .
निशांत तिला बघताक्षणी तिझ्या प्रेमात पडला होता .स्वतःला हरवून बसला होता .त्याला कधीच न आवडणार ट्राफिक जॅम आवडायला लागलं आणि ते आता उघडूच नये असं त्याला मनोमन वाटायला लागलं .तो तिला पाहण्यात दंग असतानाच ट्राफिक क्लिअर झालं आणि हॉर्न जोरजोरात वाजायला लागले तशी ति भानावर आली .निशांतला सावरताच आल नाही स्वतःला तो तिन नजर फिरवली तसं गरबडला .तिला समजलं की हा आपल्याला पाहत होता आणि तीही गोड लाजली .
काही क्षणातच ट्राफिक जॅम मधली ती आयुष्यभराची हुरहूर मनाला लावून गेली .


इतर रसदार पर्याय