#तू_ही_रे_माझा_मितवा...💖💖💖💖
#भाग_३
आज तनु आणि प्रियाने कामानिमित्त रात्री उशिरा येण्याची परवानगी घेतली असल्याने ऋतू एकटीच होती रूमवर.
फ्रेश होऊन ती बाल्कनीत कॉफी घेऊन बसली.रेवाच्या वाक्याने तिचं मन दुखावलं गेलं होतं,डोळे पाणावले होते. तनु आणि प्रिया कामात असल्याने त्यांना फोन करायचा प्रश्नच नव्हता. मनातलं सांगावं इतकं जवळ आतापर्यंत बाकी इतर मित्रमैत्रिणी असं कुणीच नव्हतं...रूममधली शांतता अंगावर येत होती. खालून फक्त काही लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज शांततेवर ओरखडा पाडत होता, एरवी दंगामस्ती करत ही कातरवेळ कशी निघून जाते ते कळतही नसे पण आज जणू संध्याकाळ अंगावर येत होती.
खोल खोल काहीतरी दुखावलं आहे आणि नेमकं सल काय आहे हे न कळल्याने अजूनच तिचे डोळे भरून येत होते.
‘आम्ही नाही ना सिनियर्सला पटवलं” हे रेवाचं वाक्य तिला जास्त छळत होतं...
“हलकट !!!..काय मूर्ख मुलगी आहे रेवा...डंब...प्लास्टिक फेस डॉल...स्वतःचं काही डोकं चालत नाही तरी समोरच्याला असं काही म्हणायची हिंमत ठेवते...मूर्ख !!! त्या तिच्या दोन बॉडीगार्डच्या जोरावर उडत असते...एक तर तो ...सा..ज..ना ..ब्लडी साक्षात जयराज नाईक, साक्षात म्हणे !! साक्षात तर उल्लू,जोकर आहे आणि दुसरा तो ......”
रागात गरम कॉफीचा अंदाज न आल्याने तिचं पहिल्याच घोटाला तोंड जरासं पोळलं..तिने पटकन कप बाजूला ठेवला.
“see...त्याचं नावच काढायचा अवकाश आणि काहीतरी बिनसतच...खडूस...पक्का खडूस!!! का आहे तो असा..? त्याचं वागणं काही कळतच नाही...काहीतरी ठरवून मला त्रास द्यायचा असतो त्याला..., नेहमी त्याच्या नजरेत माझ्यासाठी राग असतो पण मग कधी कधी अचानक अगदी समोर येतो तेव्हा त्याचे डोळे कुठल्या भाषेत बोलतात,की तेव्हा ते खरं बोलतात? लिफ्टमध्ये त्या काही क्षणांत काय घडलं होतं...मला नव्हतं असं त्याच्या त्या नजरेत आणि ...आणि ..आणि त्या त्याच्या शुगरी डिम्पलमध्ये अडकायचं. मग का नाही अडवलं मी स्वतःला...? आणि तो तरी कुठे हटवत होता त्याची नजर...काय शोधत होता माझ्या डोळ्यात? रागाशिवाय असं काय वेगळं बोलत होते माझे डोळे? अश्यावेळी तो कुणी भलताच वाटतो....कदाचित हवाहवासा.....!
stupid writer…स्वतःच एक दुर्बोध कवितेसारखा आहे. पण मग नंतर बसला होताच ना त्याच्या त्या “रेवूला” रडायला खांदा देत.....मंद,स्टुपिड,खडूस....all boys are same !!! ”
ह्या विचारासरशी मात्र तिची तंद्री भंगली...हृदयाची वाढलेली धडधड जाणवायला लागली तशी ती सावरून बसली.... एक दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं.
“ऋतू ...calm down….काहीही विचार करू नकोस...तो तुला जस्ट कलीग समजतो, rather स्ट्रॉंग कॉम्पिटीटर,...ती बेअक्कल मुलगी मला इतकं वाईट बोलली तरी हा फक्त म्हणतो... “मी रेवूला सांगतो....” .... ‘रेवू’ माय फुट!!”
डोळ्यातून गालावर ओघळलेल्या अश्रूला तिने टिचकीसरशी उडवलं.
‘ .....अरे तुमचं प्रेम घरी ठेवा ना.... म्हणे रेवूसोबत बोलून सॉर्ट आऊट कर, ब्लडी हेल!! आणि काय सांगू तिला हे बघ रेवू मी काही आरुष पटवलं वैगरे नाहीये बरं.... !! आणि हा दुसरा मूर्ख आरुष ..उगाच भाव देतो,क्लोज यायचा प्रयत्न करतो...शी..!! नाही कम्फर्टेबल वाटत मला त्याची सोबत,सुरवातीला हँडसम आहे..सिनियर आहे,आपल्या कामावर इम्प्रेसेड आहे म्हणून जाम भारी वाटायचं पण नाही यार...त्याची नजर नाही आवडत मला. त्याच्या अश्या वागण्याने त्याची ती सलोनीसुद्धा कावून असते माझ्यावर..आणि ह्या रेवासारख्या डम्बोजला तर आयता गॉसिप टॉपिक मिळतो...काय प्रॉब्लेम आहे यार आयुष्यात...काय होतंय..किती गुंता,काम कमी इतर लफडेच जास्त..”
सगळं प्रकरण खूप गुंतागुंतीच होतंय हा विचार करून तिच्या डोळ्यातून आता टपटप आसवे गळायला लागली होती.
मागे रेलून तिने गच्च डोळे मिटले..काही वेळाने हलकेच जणू गालावर एक बोट फिरला आणि ओघळत आलेल्या आसवाला बाजूला करत एक अस्पष्ट आवाज आला-
“प्लिज डोंट क्राय...!!!!!”
वेद???????
तिने झटकन डोळे उघडून बघितलं...बाहेर अंधारून आलं होतं..मघाची शांतता जाऊन दूरवरून येणारे गाड्यांचे आवाज वाढले होते.कुंडीत उमललेल्या गुलबक्षीच्या फुलांचा मंद गोडसर गंध हळूहळू पसरत होता..मनात नुकत्याच येऊन गेलेल्या विचाराचं तिला हसू आलं...नकळत समोरच्या गुलबक्षीच्या फुलांचा गुलाबी रंग हलका हलका तिच्याही गालावर चढला होता... दिवसाला अलगद रात्रीशी जोडत संध्याकाळ विरघळून गेली...आणि त्याचावरचा तिचा रागही....!!
*******************
आजचा दिवस अगदीच खराब गेला म्हणून वेद जरा नाराजच होता. आज गाडी त्याने बालगंधर्वकडे न वळवता थोडं पुढं जाऊन संभाजी उद्यानाच्या पार्किंगला लावली. एक छान मोकळी जागा पाहून तो झाडाच्या बुंध्याला टेकून बसला.डायरी बाहेर काढून त्याने उगाचच पाने चाळली आणि पुन्हा बंद केली.आज त्याला काही सुचत नव्हतं...डोळे मिटून तो मागे टेकला ..मग मनावरच विचारांची लेखणी झरझर उतरवू लागली-
“डायरीत काय लिहू? कसा होता आजचा दिवस? जयराज आणि रेवा खूप दुखावले गेलेत खरे पण ही कॉम्पिटिशन आहे हार-जीत चालूच राहणार,इतकं मनाला लावायची खरं तर काहीच गरज नव्हती.कॉन्सेप्ट जरी थोडीफार सारखी असली तरी ऋतूच्या प्रेसेंटेशनला तोड नव्हती हे मात्र १००% खरं.
“ ऋतू..?? ...कुणी हक्क दिला आपल्याला तिला ऋतू म्हणायचा ? तिचे इतर फ्रेंड्स म्हणतातच ना… मग? आमची तर साधी मैत्रीही नाही..अगदी पहिल्या दिवसापासून तिला प्रत्येक गोष्टीत विरोध होतोय माझ्याकडून..पण का? खरं तर माझ्याकडे ही उत्तर नाहीये. आज तीसुद्धा दुखावली गेली.रेवाने तिला इतकं टोकाचं बोलायला नको होतं, आरुष ह्यात काय विषय?
पण खरंच तिला आरुष आवडत असेल का?...वेद……..वेद .. वेद..come on yaar chill…मला काय फरक पडतोय त्याने... रियली? माहित नाही!
पण माझ्यातल्या लेखकाला कायम तिचे डोळे वाचायचे असतात...डोळ्यांच्या गहिऱ्या,गडद कॉफी रंगाने मनावर अशी काय प्राचीन,अगम्य लिपी कोरते की ते वाचतांना काही अर्थच लागत नाही.
आज लिफ्टमध्येही तेच झालं अचानक तिला समोर बघितलं आणि सगळे विचार गोठले.तिचा चेहराच शेक्सपिअरियन सोनेट,कितीही वाचा दरवेळी नवा अर्थ, वारा प्यायलेले केस आणि गुलकंदी ओठ..! आरुष काय कुणीही प्रेमात पडेल...मग म्हणून मलाही असच काहीस वाटतंय का तिच्याबद्दल?.... माहित नाही!!
आणि तसं होऊ नये म्हणून हा तिच्याशी नेहमी खुन्नस घ्यायचा सोयीस्कर मार्ग तर नाही ना निवडलाय? माहित नाही........!! आणि तिचं काय? लिफ्टमध्ये ती सुद्धा जरावेळ ब्लँक झालीच होती ना? हो ना ? माहित नाही ...!!
Was it love at first sight in a different way , which I am trying to denying ? माहित नाही..!!
खाड्कन डोळे उघडत त्याने आजूबाजूला बघितले दूरवर मुलं खेळण्यात मग्न होती.त्याने हातातली डायरी आत ठेवली.हा भावनांचा गुंता सोडवायला म्हणून आलेला तो अधिकच गुरफटला गेला आणि त्या अस्वस्थेतच तो निघाला.
*******************
“ऋतू..पुन्हा विचार कर ....आज सुट्टी टाक..ताप होता रात्री तुला आणि विकनेस बघ किती आलाय, तरीही तुला ऑफिसला यायचाच होतं का?” ऋतूला कॅबमधून खाली उतरायला मदत करत तनु म्हणाली.
“तने नको काळजी करू ..बघ तू म्हटलीस म्हणून आज गाडी नाही आणली,आले न इथपर्यंत तुझ्यासोबत ...chill ..I will be fine.आज ऑफिशियली पहिला दिवस आहे..चिक्कार formalities पूर्ण करायच्या आहेत”
बळजबरी हसायचा प्रयत्न करत ऋतुजा म्हणाली.
तिचा निस्तेज चेहरा पाहून तनु गाडीतूनच म्हणाली-“ ऋतू जास्त त्रास झाला तर रूमवर निघून ये ओके?”
“ओके बॉस...चल बाय..”
ऑफिसमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त गडबड होती.
ट्रेनिंग संपल्यावर सर्व फ्रेशर्सला नवीन जागा,वर्कडेस्क,अलॉटमेंट यात बराच वेळ गेला.आज आरुष सुट्टीवर असल्याने ऋतूला जरा रिलॅक्स वाटत होतं पण त्यात तिला रेवाशेजारी जागा
मिळाल्याने ती वैतागली होती. त्यांना क्लायंट सर्विस रोल मिळाला होता तर वेद्ला क्रिएटिव्ह टीममध्ये अपॉइंट केलं होतं आणि जयराज आरुषच्या रिसर्च टीममध्ये होता.बाकीचे ही त्यांच्या परफॉर्मन्स आणि सिलेक्शननुसार फायनान्स,पीआर टीममध्ये निवडले गेले होते.सर्वांची सिटींग अरेंजमेंट त्या त्या सेक्शनमध्ये असल्याने ट्रेनिंगमध्ये झालेले ग्रुप विभागले गेले होते. नवीन आयकार्ड आणि सर्विसलेटर घेतांना सगळे एकत्र जमले होते आणि कमालीचे खुश दिसत होते.
वेदच्या खांद्यावर हात टाकत जयराज म्हणाला-
“ वेदभाऊ...डिपार्टमेंट फक्त बदललेय बाकी कॅन्टीनमध्ये नैवेद्य ग्रहण करायला एकत्र यायचं बरं,ही साक्षात जयराजची आज्ञा आहे.”
त्याला नमस्कार करत वेद म्हणाला-“जी महाराज...अमृततुल्य प्राशानाच्यावेळी ही भेटत जाऊ की त्यात काय ”
दोघांच्या बडबडीकडे लक्ष न देता दूरवर सौम्यासोबत बोलत उभ्या असलेल्या ऋतूकडे बघत रेवा वैतागत म्हणाली-
“तुम्हाला बरयं...तुमचे सेक्शन जवळ जवळ आहे पण यार मला त्या मूर्ख मुलीशेजारी का बसवलं...”
वेदने दुरूनच ऋतूकडे पाहिलं आणि कालच्या त्याच्या विचारांची आठवण होताच एक गोड हुरहूर उगाच दाटून आली आणि त्याला हसू आलं.त्याच्याकडे रागाने बघत रेवा म्हणाली-
“तुला तर हसू येणारच... तू तर सुटलास ना...त्या ओव्हरस्मार्टपासून मी मात्र अडकले यार...”
तिच्या डोक्यावर एक टपली मारत वेद म्हणाला-“ रेवू खरं तर मी तुला कालच मेसेज करणार होतो की तू ऋतुजाला सॉरी बोल.कसली वाईट बोललीस तू तिला काल..! we lost ..that’s it. तू तिला हर्ट होईल असं बोललीस.”
इतकं होऊनही वेद तिची बाजू घेतोय हे बघून मात्र रेवा अजूनच संतापली.
“वेद, तुला कळतंय का तू कुणाची बाजू घेतोय?..हीच ती मुलगी आहे जी तुला नेहमी क्रॉस करते.ट्रेनिंगमध्ये प्रत्येक टास्कला तुला अपोझ करायची ही.तिला मिळालेलं कॉम्पिटिशनचं प्राइझ पण आपलं होतं”
दोघांचा वादविवाद ऐकून मधेच जय म्हणाला –
“ये यार तुम्ही काय सारखं सारखं त्या अप्सरेच्या बाबतीत बोलत असता,बंद करा विषय नाहीतर मी गुप्त होईल.”
त्याच्या विनोदावर हसत वेद म्हणाला-“ मला नाही रेवाला सांग तिच त्या अप्सरेशी भांडते”
रागाने जयला चिमटा काढत रेवा म्हणाली-“अप्सरा- माय फुट...आणि वेद, सॉरी तर मी तिला कधीच म्हणणार नाही.I hate her.”
थोडावेळ उरलेल्या औपचारिकता पूर्ण करून सगळे आपापल्या जागेवर निघून गेले.
प्रत्येक डिपार्टमेंटच्या लीडरने मीटिंग घेऊन कामाचं स्वरूप समजावून सांगितल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तापाने बेजार झालेली ऋतू अधिकच नाराज झाली जेव्हा तिला कळलं की तिला सलोनीला रिपोर्ट करायचं आहे.आरुषच्या तोंडी नेहमी ऋतुजाचं नाव असतं म्हणून सलोनी तिच्यावर असंही चिडून असायची,आता तर ती सालोनीची रिपोर्टी होणार होती म्हणून ऋतूला जरा टेन्शन आलं होतं.
लंच ब्रेकनंतर लगेचच सलोनीचा मेल तिच्या पूर्ण टीमला मिळाला.सिस्टममध्ये त्यांचा ट्रेनिंग रिपोर्ट,जॉईनिंग रिपोर्ट आजच अपलोड करायचा होता. ट्रेनिंगमधल्या तब्बल ५० प्रश्नांची उत्तरं त्यात विचारपूर्वक लिहायची होती.काम वेळेत करून घरी जायची घाई सर्वांना झाली होती. ऑफिस सुटायची वेळ झाली तसे जवळपास सगळ्यांचे रिपोर्ट्स अपलोड झाले होते. तापामुळे ऋतुजाला मात्र आता बसणं देखील अवघड होतं होत. डोळ्यासमोर अंधारी येत होती.तिचे अजूनही काही उत्तरं बाकी होती.सलोनीला रिपोर्ट करून आल्यावर रेवा तिचा डेस्क आवरून जाण्याच्या तयारीत होती.
डेस्कवरची पाण्याची बॉटल रिकामी पाहून ऋतू नाईलाजाने उठत पाणी प्यायला गेली. रेवा ऋतूच्या डेस्क समोरून जात असतांना तिची नजर तिच्या सिस्टमच्या मॉनिटरवर गेली. ती ४५ व्या प्रश्नाचं उत्तर लिहित होती.एका पेजवर १० प्रश्न होते.तिने पटकन मॉनिटर वर ‘क्लिअर माय रिस्पोन्स’ बटन क्लिक केलं आणि बेमालूमपणे निघूनही गेली. ऋतू जागेवर आल्यावर तिला वरचे सगळे उत्तर ब्लाँक दिसल्याने तिला दरदरून घाम फुटला.आपल्याकडून चुकून उत्तरं क्लियर झाली असं समजून ती ती रडवेली झाली.एव्हाना सगळी निघून गेली होती. दूरवर सेक्शनच्या सगळ्यात पुढच्या एका टोकाला फक्त फायनान्सची २/३ मुलं-मुली काम करत बसली होती. तिने मागचे रिस्पोन्स पेजेस चेक केले, ती उत्तरं सेव्ह झाली होती,पण हे सगळ्यात मोठे आणि किचकट उत्तरं डिलीट झाले होते. ती धावत सालोनीच्या केबिनकडे गेली,सलोनी निघायच्या बेतात होती. ऋतूने घडलेला प्रकार सांगितला तशी ती अजून चिडली-
“please don’t tell me such a foolish reasons…you are the so called best trainee aren’t you? go and complete, I want it today only ...जास्त काही वेळ लागणार नाहीये १० प्रश्नांना”.
असं म्हणून ती निघूनही गेली. ऋतूने कसबस स्वतःला सावरलं आणि ती जागेवर आली,तिला टाईप करायला ही तिला जड जात होतं. इतका मोठा शांत,रिकामा हॉल पाहून तिला भीतीने धडधडत होतं.
इकडे, ऋतुजाला चांगला धडा शिकवला म्हणून रेवा खूप खुश होती.पार्किंगमध्ये बोलत असलेल्या जयराज आणि वेदला पाहून ती जवळपास धावतच त्यांच्याकडे गेली.
“गाईज...ohh my god ,I am very happy ...!!!” जागेवरच आनंदाने उडी मारत ती म्हणाली.
“काय झालं एवढं खुश व्हायला..” जॅकेट ची चेन लावत वेद म्हणाला.
“ वेद त्या मूर्ख,स्टुपिड,ओव्हरस्मार्ट मुलीच्या रिपोर्टमधली शेवटच्या पेजवरची उत्तरं क्लियर करून आले मी,गपचूप ....बसेल आता बोंबलत एकटी..बदला फिनिश” जयराजला टाळीसाठी हात देत ती म्हणाली.
तिला टाळी देत जय म्हणाला.-“ये बाई, ती माता cctv बघेल कुणी केलं हे शोधायला.”
“you know what jay माझ्या हे सकाळीच लक्षात आलं होत की आमचा भाग cctv च्या श्याडो सेक्शनमध्ये आहे...म्हणून मी इतकी खुश आहे आणि असंही आज काहीतरी बिनसलंय तिचं, लो वाटतेय जरा...by the way who cares!!” बेफिकरीने खांदे उडवत ती म्हटली.
त्या दोघांकडे अविश्वासाने बघत वेद म्हणाला-
“रेवा this is not done yaar, हा असा बदल घ्यायचा असतो? Come on, you are a girl too…ती एकटी असेल आता,केवढा मोठा सेक्शन आहे तो.it is not safe. कळतंय का तुला?”
रागाने गाडी स्टार्ट करत रेवा म्हणाली-
“वेद इतकी काळजी करायची गरज नाहीये.सलोनी आहे ऑफिसमध्ये.तेवढं कळतं मला... आणि तू आज जरा जास्तच तिची बाजू घेतोय असं नाही वाटत का तुला?”
“ये यार, चला आता तिच्यावरून भांडू नका...गेली उडत ती,चलो बाय मी निघतो” दोघांना बाय करत जयराज निघूनही गेला.
“चल, निघतोय ना...” गाडी थांबवून ती म्हणाली.
“ हो..चल” म्हणून त्याने गाडी बाहेर काढली.तेवढ्यात फोन आला म्हणून त्याने गाडी थांबवली आणि बाजूला घेतली.थोडावेळ फोनवर बोलल्यावर तो निघला, गेटपर्यंत आला तसं त्याला सलोनी जातांना दिसली.
“ohh god म्हणजे आता क्लायंट सेक्शनला ऋतूजा एकटी असेल.”
त्याच्या डोक्यात लगेच विचार आला.रेवा निघून गेली होती.त्याने गाडी मागे फिरवली.गाडी पार्किंगला लावून तो धावतच लिफ्टकडे आला.वर आल्यावर तो क्लायंट सेक्शनला धापा टाकत पोहचला. शांततेच्या पार्श्वभूमीवर तिच्या दिशेने येणाऱ्या त्याच्या बुटांच्या आवाजाने ती दचकून जागेवर उभी राहिली. रडून तिचे डोळे लाल झाले होते आणि घाबरल्यामुळे चेहरा घामेजला होता.ब्लॅक शॉर्ट स्लीवज इनशर्ट, ब्लू फॉर्मल जीन्स..आणि कधी नव्हे तो निस्तेज झालेला चेहरा..त्याला वाईट वाटलं. वेदला समोर पाहून खरंतर तिला खूप हायसं वाटलं पण चेहऱ्यावर तसं न दखवता ती उभी होती. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. तिला बघून बोलण्यात उगाच सहजता आणत तो म्हणाला-
“ Excuse me ,sorry to disturb you पण रेवाचा डेस्क कुठला आहे सांगते का मला,माझे हेडफोन तिच्या ड्रॉवर मध्ये आहेत.”
उभ्या उभ्या स्क्रीनवर नजर टाकत फक्त हाताने तिने डेस्क दाखवला.
“Ok thanks ..” म्हणून त्याने उगाच जरावेळ रेवाच्या ड्रॉवरजवळ टाईमपास केला आणि तो ऋतूच्या मागून बाहेर जायला निघाला,तसं तिला वाटलं याने अजून थोडा वेळ थांबवं !
ती खुर्चीत जरा मागे टेकून बसली. तिचे डोळे अजूनही पाणावलेले होते.
पुढे जाऊन पुन्हा थोडं मागे येत तो म्हणाला-
“actually मी जरा वेळ बसू का इथे? धावत पळत आल्याने दम लागलाय.”
तिला हायसं वाटलं,चेहऱ्यावरचा आनंद लपवत तिने फक्त मान होकारार्थी हलवली आणि ती कामाला लागली. तो जरा मागे बसला आणि फोनमध्ये लक्ष घातल्यासारखं दाखवलं.मनावरचं खूप मोठं दडपण गेल्यासारखं तिला झालं होतं.बराच वेळ ती टाईप करत होती,आता मात्र तिचा ताप वाढत चालता होता आणि तिला प्रचंड थकवा जाणवत होता. ती पुन्हा थोडावेळ डोळे मिटून मागे टेकली.
जरा हिंमत करून वेद म्हणाला-“ ऋतुजा..काही मदत हवीय का?”
“शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जो डेटा पाहिजे तो नेमका नाहीये माझ्याकडे, सलोनीकडे हार्डकॉपी होती,ती गेली घरी.” कुणीतरी जवळचं भेटल्यासारखं डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत नाईलाजाने ती म्हणाली.
तिची समजूत काढत तो म्हणाला-“heyyyy relax ..हा शेवटचा प्रश्न ना?...माझ्याकडे आहे ह्याची फाईल मेलच्या ड्राफ्टमध्ये.ती कॉपी कर आणि त्यातला डेटा दे चिकटवून इथे. नो चीपचीप नो झिगझिग....चल जीमेल ओपन कर बघू”
तिला जरा हायसं वाटलं.तापामुळे तिला ग्लानी येत होती.तिने लॉगीन विंडो उघडली.वेदने त्याचा आयडी सांगितला. तो टाईप करून होत नाही तोच मागून तिच्या थोडं जवळ येत, तिला ऐकू येईल अश्या आवाजात म्हणाला-
“ I love you”
तिच्या हृदयाची धडधड अधिकच वाढली.तिने अविश्वासाने झटकन मागे फिरून त्याच्याकडे बघितलं ..तिची नजर त्याच्या डोळ्यात आरपार बघत होती.......हा तोच खडूस आहे का? भांडणारा..?? तिच्या डोळ्यातले प्रश्न वाचून तो गोड हसला.गालावरची खळी खुलली.
तिच्या थोडं कानाजवळ जाऊन तो म्हणाला-
“माझा पासवर्ड...I mean, # iloveyou , instead of O put 0 ..thats my password.”
ती पटकन भानावर आली आणि ओशाळली देखील,
“हा आहेच खडूस...” झालेल्या फजितीने खजील होत तिने मनात त्याला अजून शिव्या घातल्या.
थोडं बाजूला होत आणि उसनं अवसान आणत म्हणाली-
“Yes of course ….तूच टाक तुझा पासवर्ड आणि हा ‘असा’ पासवर्ड किती लोकांना सांगत फिरतोस?
“actually count नाही केलंय कधी, no problem,आता तुला माहीतच आहे तर टाक तूच, don’t worry चेंज करेन मी रात्री,just कॅज्युअल आयडी आहे. ”
त्याच्या ह्या मस्करीने तिला अजूनही धडधडत होतं. थोड्यावेळाने रिपोर्ट सबमिट झाल्यावर तिला हायसं वाटलं.आता ती पार गळाली होती. तिचा डेस्क आवरून ती स्वतःला सावरत उभी राहिली.हात पुढे करत वेदला म्हणाली-
“thanks,तू सोबत होतास म्हणून रिपोर्ट सबमिट झाला. …friends?”
तिच्याशी handshake करत तो म्हणाला- “of course” पण त्याला तिचा उष्ण स्पर्श जाणवला.न रहावून तिच्या कपाळावर हात ठेवत तो ओरडलाच तिच्यावर -
“तू वेडीय का? किती ताप आहे तुला,तरीही काम करत बसलीस?”.
तिची ही अवस्था पाहून त्याला रेवाचा खूप राग आला.
त्याच्याकडे बघत इवलंस तोंड करत ती म्हणाली-“ओरडू नकोस ना,झालं ना आता काम”
तिच्या निस्तेज,मलूल पण मोहक चेहऱ्याकडे बघत तो म्हणाला-“झालंय ना आता काम,आता डॉक्टरकडे चलायचं,लगेच..!!”
“वेद,मला फक्त आता रूमवर जायचय ...आमचे नेहमीचे डॉक्टर आहेत,मी त्यांच्याकडेच जाणार ”
ती मोठ्या कष्टाने,अगदी क्षीण आवाजात म्हणाली.
“अगं पण गाडी कशी चालवणार तू?” तो काळजीने म्हणाला.
“आज गाडी नाही आणलीय..कॅब करेन मी don’t worry.” दोन पावलं मोठ्या मुश्किलीने टाकत ती म्हणाली. तिला मधूनच थंडी वाजून अंगावर काटा येत होता. त्याने त्याच जॅकेट काढून बळजबरीने तिला घातलं.
तिला आधार देत,सावरत त्याने तिला खाली आणलं आणि गेटजवळ असलेल्या बेंचवर बसवलं.
ती मागे टेकून डोळे मिटून बसली होती.
तिच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवत तो म्हणाला-
“ऋतूजा अड्रेस सांग,मी कॅब बुक करतोय..”
तिने गुंगीतच,सरावाने लॉक ओपन करून मोबाईल त्याच्या हातात दिला-
“प्लीज कॉल रिसेंट नंबर.”
त्याने कॉललिस्ट उघडली रिसेंट नंबर होता-“स्वीटहार्ट”
वेद जरा चक्रावला-“कोण असेल हा स्वीटहार्ट” असाही विचार क्षणभर त्याच्या मनात डोकावला.त्याने नंबर डायल केला आणि पलीकडून कोण बोलेल ह्याची धाकधूक त्याला लागून राहिली.फोन उचलला गेला.
“हेल्लो...ऋत्या कुठेय तू? पोहचली का नाही अजून...काय झालं,कॅब मिळाली नाही का?”
पलीकडून नॉनस्टॉप प्रश्न विचारले गेले.एकतर पलीकडून मुलीचा आवाज आल्याने वेदला जरा आनंद झाला,आणि आपल्याला का आनंद होतोय ह्याचं आश्चर्य देखील वाटलं.
तो पलीकडच्या प्रश्नांना ब्रेक लावत म्हणाला-
“ हेय्य्य्य...sorry to interrupt ,I am her colleague.. she is not feeling well. मी कॅब बुक करतोय, मला प्लीज पत्ता सांगतात का?”
तो नंबर तनुचा होता आणि ती अगोदर मुलाचा आवाज ऐकून चपापली पण ऋतू इतकी आजारी म्हटल्यावर ती त्याला म्हणाली-“ओके, पण प्लीज एकदा तिला फोन द्या...”
त्याने ऋतूला थोडं जागं करत तिच्या कानाला फोन लावला-
“तने पत्ता दे,मला काहीच सुधरत नाहीये.”
एवढं बोलून ती पुन्हा डोळे मिटून पडली.
तनुने पत्ता सांगितला. वेद ने कॅब बुक केली आणि कॅब आल्यावर तिला आत व्यवस्थित बसवल्यावर तो देखील आत बसला.थोडं डोळे उघडत ती म्हणाली-
“वेद thanks but I will manage, no need to come.”
दोघांच्या मध्ये तिची पर्स आणि त्याची बॅग व्यवस्थित ठेवत तो म्हणाला-
“झोप शांतपणे... तुला ‘मी येऊ का’ असं विचारलंच नाहीये”
वाद घालायच्या परिस्थितीत नसल्याने ती गप्प बसली आणि तिने मागे डोकं टेकलं,थोड्या वेळाने तिलाही कळलं नाही केव्हा एका साईडला ती वेद्च्या बॅगचा आधार घेऊन झोपली. बॅग सारखी घसरत असल्याने तिची चुळबुळ होत होती. वेदने बॅग हळूच बाजूला केली आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांततेत झोपी गेली.त्याने एक नजर तिच्याकडे बघितलं,-
“कालपरवापर्यंत अगदी दूर असलेली ही मुलगी,जिच्याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं हे देखील आपल्याला कळत नाही ती आज इतक्या जवळ आहे? पण ह्याक्षणी त्या अनामिक हुरहूरपेक्षा काळजी नक्कीच जास्त वाटतेय हे मात्र खरं...”
तिला जाग येऊ नये म्हणून शक्य तितकं व्यवस्थित बसायचा प्रयत्न तो करत राहिला.
गाडी थांबली ती सरळ त्यांच्या डॉक्टरच्या क्लिनिकसमोर बाहेर प्रिया आणि तनु वाट पाहत होत्या.
कॅब आली तसं पुढे होऊन त्यांनी ऋतूला बाहेर पडायला मदत केली.प्रिया ऋतूला क्लिनिकमध्ये घेऊन गेली.
वेदने तिची पर्स तनुच्या हातात देत म्हटलं-
“hello ...I am Ved Inamdar, her colleague ...तिला इतक्या खराब अवस्थेत एकटं सोडणं योग्य वाटलं नाही म्हणून आलो,sorry for that.”
“ohh that was really needed ,तिला तापामध्ये चक्कर सुद्धा येतात. Thanks a lot, by the way I am Tanuja and she is Priya.” तनु त्याचे आभार मनात म्हणाली.
क्लिनिकच्या आत जरा नजर टाकून ऋतूला शोधत तो काळजीने म्हणाला-“ मी थांबू का,काही मदत लागली तर? तिला खूप त्रास होत होता मघाशी.”
त्याच्या डोळ्यातली काळजी वाचत ती म्हणाली-“अरे ,खूप उशीर झालाय,तुलाही लेट होईल,काळजी करू नको..she will be fine.तिला जरा बरं वाटलं की तुला फोन करायला सांगते,ok? and one more thing अगदी पहिल्या दिवसापासून तुझ्याशीच भांडण चालूय ना तिचं?”
ओशाळून,थोडंस मिश्कील हसत तो म्हणाला-“yaaa ….तसच काहीसं...!”
त्याला असं गोंधळलेलं पाहून तिला हसू आलं. शॉर्ट स्लीवज,स्लिमफीट शर्ट अन ट्राउजर मध्ये तो कमालीचा रुबाबदार दिसत होता.
पुन्हा एकदा शेवटचं आत डोकावत तो म्हणाला-“Are you sure,मी जाऊ?”
“yes sure, We will update you. Thanks a lot”
थोडं नाईलाजानेच त्याने कॅब बुक केली आणि तो गाडी घ्यायला पुन्हा ऑफिसला निघाला.त्याच्या शर्टच्या शोल्डरवर हलकासा लागलेला तिच्या परफ्युमचा वास त्याला मागच्या काही तासांची जाणीव करून देत होता.
आपण काय करतोय...आपल्यासोबत काय होतंय...याला काय म्हणायचं? की ह्या फिलिंगला काही नावच नाहीये ह्या विचाराने तो अजून गोंधळला.मनात प्रश्नांची असंख्य वादळं उठत होती.
ही फक्त काळजी आहे की अजून काही........मनातून एकच उत्तर आलं----
“माहित नाही !!”
क्रमशः
©हर्षदा