Shevtacha Kshan - 1 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 1

आज गार्गी खूप छान तयार होत होती.. पुन्हा पुन्हा आरश्यात स्वतःलाच बघून कधी लाजत होती तर कधी तिच्या या वेडेपणावर हसतही होती.. नेहमी अगदी साधी राहणारी गार्गी आज मात्र पूर्ण मेकअप करत होती.. कारणही तसंच होतं.. तिच्या बालमैत्रिणीच आज लग्न होतं.. घरच्यांनाही तिला चांगली तयार हो म्हणूनच सांगितलं कारण आता गार्गीच ही लग्न करायचं होतं आणि अश्या लग्नातच लोक बघतात आणि मग संबंध जुळतात असा त्यांचा विश्वास होता.. पण गार्गी तयार होत होती त्याला मात्र कारण काही वेगळाच होतं...

आज या लग्नात तिचे सगळे जुन्या कॉलोणीमधले मित्र मैत्रिणी परिवार सोबत तिथे येणार होते.. त्यात प्रतिकही असणार होता... प्रतीक तिचा बालपणीचा मित्र तर होताच पण तीच पाहिलं प्रेमही होता.. आणि त्याच्यासाठीच ती आज एवढी सुंदर तयार झाली होती.. प्रतिकच्या विचारानेच तिच्या चेहऱ्यावर आज लाली चढली होती..

गार्गी आणि तिचे आई बाबा लग्नात पोहोचले.. लग्न लागायला वेळ होता... तसच मग गार्गी गीतला भेटायला म्हणून गेली आणि आई बाबा त्यांच्या मित्रा परिवारामध्ये रमले.. गीत नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती.. तिच्याशी बोलून गार्गी बाहेर आली तेव्हा तिथेच सगळे तिचे मित्रमैत्रिणी मस्ती करत बसले होते.. अमित, प्रिया, प्राची, विवेक, सोनू, संदेश, पल्लवी, आरव .. त्यात प्रतिकही होता.. त्याला बघून ती उगाच स्वतःशीच लाजली.. आणि त्या सगळ्यांमध्ये जाऊन बसली.. तिला बघून तर प्रतिकची विकेटच उडाली.. मोरपंखी साडी अर्धी सॅटिन तर अर्धी जाळीच्या कपड्याची, गळ्यात नाजूक नेकलेस, थोडं मोत्यातले पण मोहक असे कानातले, बांगड्या सगळं साज शृंगार... तिला बघून प्रतीक 2 क्षण तीलाच बघत राहिला.. तिच्याही ते लक्षात आलं आणि ती हलकेच लाजली.. पण तिथे सगळे होते त्यामुळे दोघेही काही बोलू शकले नाही... तिला सगळ्यांनीच खूप छान दिसतेयस म्हणून सांगितलं पण प्रतीक काही बोलला नाही.. तिला त्याच्याकडूनही अपेक्षा होती.. खर तर त्याचीच कंमेंट तीला हवी होती.. आणि त्याच नजरेणी ती त्याच्याकडे बघू लागली पण प्रतीक ने स्वतःला लगेच सावरलं, तो काहीच बोलला नाही. गार्गी मनातच थोडी नाराज झाली पण तस तिने कुणाला लक्षात येऊ दिल नाही..

अमित - गार्गी तू आज खूपच सुंदर दिसतेय नक्कीच या लग्नात कुणीतरी तुला मिळणार अस दिसतंय..

प्राची - हो ताई तू खूप छान दिसतेय..

आरव - बरं बस इथे इथून सगळे स्पष्ट दिसतात, तुला कुणी आवडत का ते सांग मग आम्ही तुझी सेटिंग करून देतो..

गार्गी प्रतीक कडे बघत होती आणि सगळे तिच्याशी बोलत होते..

गार्गी - काय लावलं रे तुम्ही मी काय मुलगा शोधायला नाही आली इथे.. तुम्हीच शोधा मुली.. तुमचं पण लगनाच वय झालंय आता..

आता प्रतीक बोलला..

प्रतीक - अच्छा, मग एवढं नटून थटून आलीस, आणि ही मच्छरदाणी घालून आली ते कशासाठी??

प्रतीक बोलला आणि मच्छरदाणी म्हंटलं म्हणून सगळे हसायला लागले.. प्रतिकने स्तुती तर केलीच नाही पण खिल्ली मात्र उडवली आणि तीच एवढ्या वेळापासून उत्सुक मन क्षणातच नाराज झालं.. डोळ्यात पाणी आलं पण लगेच स्वतःला सावरत आणि त्याला उत्तर देण्यासाठी ती बोलायला गेली तर प्रिया मध्ये पडली..

प्रिया - जा रे तुम्हाला काय कळते, किती भारी साडी आहे ती आणि त्याला मच्छरदाणी नाही नेट म्हणतात.. येड्या.. गार्गी तू खरंच खूप सुंदर दिसतेय.. या येड्यांचं नको ऐकू यांना काय कळते..

आता गार्गी थोडी धीराने प्रतीकला उत्तर देत बोलली..

गार्गी - तुला डास चावले की सांगशील मला, हीच मच्छरदाणी तुझ्या कामात येईल ना.. पण आज नाही हा आज मी घातली आहे..

प्रतीक - नको ठेव ती तुझ्याच कडे, मला नको, आहे माझ्याकडे दुसरी पण आम्ही घालून नाही फिरत..

गार्गी - तू मुलगा आहे ना मग कसा घालून फिरशील ही मुलींची फॅशन आहे..

अशीच दोघांची तू तू मै मै सुरू झाली तेवढ्यात समोरून गीतची लांबची नातेवाईक श्रावणी आली.. ती गार्गीलाही ओळखत होती कारण ती गार्गीच्या आत्याचीच पुतणी होती.. दिसायला अतिशय सुंदर गौर वर्ण रेखीव चेहरा, लांब मोकळे केस, आणि अगदी साधी पण अतीव सुंदर.. तिला बघून संदेश ओरडला..

संदेश - अरे आपला शोध संपला.. ते पहा समोर अप्सरा...

आणि सगळे तो दाखवतोय तिकडे बघू लागले.. आणि तिथेच बसलेल्या विवेकला म्हणजेच गीतच्या भावाला विचारू लागले "कोण आहे ती, आमची सेटिंग लावून दे.."

विवेक - अरे , माझ्या आईच्या दूरच्या आते का मावस बहिणीची मुलगी आहे ती, तिच्यावर नजर नको ठेवा माझी बहिण लागते ती..

सोनू - अरे दूरच्या आहे ना मग जाऊ दे ना.. किती सुंदर आहे ती..

विवेक - आधी माझा तर नंबर लागू दे मग पाहतो तुमच्याकडे..

संदेश - ओये, तुझी बहीण आहे ना ती मग तू कशाला नंबर लावतो, आमचा कोणाचा नंबर लाव ना..

विवेक - अरे तिच्याकडे नाही मी दुसरीकडे नंबर लावायचं बोलतोय लेका.. माझं झालं की मग तुम्ही..

प्रतीक - अरे ए विवड्या, तू नंतर पहा ना आता आम्हाला दिसली तर आमचा नंबर लाव ना..

प्रिया, प्राची, गार्गी, पल्लवी त्या ऐकत होत्या..

पल्लवी - आरशात पहा तुमची तोंडं, ती तुम्हाला घास टाकणार आहे का?

गार्गी फक्त ऐकत होती, त्यांची मस्ती पाहून हसत होती.. तेवढ्यात श्रावणी गार्गीकडे यायला निघाली..

प्रतीक - अरे ते पहा ते पहा!! ती आपल्याच कडे येतेय..

सगळे मूलं एकदम केस वगैरे हात फिरवून नीट करून आवरून बसले... ती गार्गी जवळ आली..

श्रावणी - हाय, गार्गी दी... मी तुलाच शोधत होती, आईसोबत एकटीच बोर झाली मी तू चल ना आपण सोबत बसू..

गार्गीला तिच्याशी बोलावं तर लागणारच होतं.. तिने एक नजर तिच्या ग्रुप च्या मुलांवर टाकली, ते सगळे श्रावणीकडे आणि गार्गीकडेच बघत होते, श्रावणीकडे प्रेमाने आणि गार्गीकडे रागाने.. रागाने यासाठी की ते इतक्या वेळापासून तिच्याबद्दल बोलत होते आणि गार्गीनी एक शब्दाने म्हटल नाही की ती तिला ओळखते.. आणि संदेश तिला डोळ्यांनी खुणावत होता की " जाऊ नको इथेच थांब."

गार्गी - श्रावणी ,अग ये ना आपण इथेच बसू, हे माझे बालपणीचे मित्र मैत्रिणी आहेत मी तुझी ओळख करून देते.

श्रावणी - मी विवेक दादाला तर ओळखते, हॅलो दादा..

गार्गी - हो आणि हे सगळे त्याचेच मित्र, हा सोनू, आदेश, अमित, आरव.. आणि ही प्रिया, प्राची, पल्लवी..

श्रावणी - हाय!!!!

गार्गी मुद्दामच प्रतिकची ओळख करून देत नाही, तिला त्याच्या आधीच्या बोलण्याचा राग आला असतो .. आणि ती प्रतीक वर प्रेमही करत असते..म्हणून कदाचित...

प्रतीक - अग गार्गी , तू मला विसरलीस ना, हाय श्रावणी मी प्रतीक.. कस वाटलं तुला आम्हाला भेटून.. आता आमच्यातच राहा म्हणजे तुला एकटं वाटणार नाही..

श्रावणी - अत्यंत निरागसपणे, मला छान वाटलं तुम्हाला भेटून.. हो मी लग्नात आहे तोपर्यंत गार्गी दि सोबतच राहणार आता...

गार्गी - श्रावणी तू मामा, मामीला भेटली का?

श्रावणी - नाही दि कुठे आहेत ते?? मला दिसलेच नाही...

गार्गी - चल भेटून येऊ, आणि मी पण आत्याला भेटून घेते...

आरव - अग, नंतर भेट ना, म्हणजे अजून लग्नच लागलं नाहीय, बराच वेळ मिळणार आहे नंतर पण भेटायला.. आता आमच्याशी भेट झाली तर आमच्याशी बोलून घे.. नंतर आपण सोबतच भेटू तुझ्या आईला, हिच्या आईला, माझ्या आईला!!

श्रावणीला त्याच शेवटचं बोलणं जर विचित्रच वाटलं ती जरा शेंकेच्या नजरेने त्याच्या कडे बघत होती.. तसाच थोडी सावरा सावर करत

आरव - अग म्हणजे आमचे सगळ्यांचे आई आणि बाबा एकाच ठिकाणी असणार म्हणून तस म्हंटल.. ते पण फ्रेंड्स आहेत ना म्हणून.. थांब ना नंतर भेट..

श्रावणी - नाही आरव दादा.. आम्ही लग्न लागलं की लगेच निघू बहुतेक मग वेळ नाही मिळणार.. आताच वेळ आहे तर भेटून येतो आम्ही..

श्रावणीनी दादा म्हंटल आणि पुढे कुणीच काही बोलला नाही, आपल्यालाही दादा म्हणायची ही म्हणून..!😝😝 , आरावच्या चेहऱ्यावरचे भाव तर अगदी बघण्यासारखे झाले होते..😅

गार्गी तिला घेऊन निघून जाते...

थोडावेळातच लग्न लागण्याची वेळ झाली , वरात आली आणि गीत ला घेऊन सगळे मंडपाच्या दाराशी पोचले.. तिथे फोटो काढण्यासाठी सगळ्यांची एकाच गडबड.. त्यातच गार्गीला प्रतिकचा धक्का लागला.. ती पडणार तेवढ्यात त्यानी तिला एका हाताने तिच्या खांद्याला पकडून सावरलं..दोघांची नजरानजर झाली आणि दोघही क्षणभर एकमेकांत गुंतले.. जे प्रतिकनी बोलून दाखवलं नाही ते त्याचे डोळे सांगत होते.. त्याच तिच्यावरच आजही कायम असलेलं प्रेम आणि ती आज खूप सुंदर दिसतेय ते.. पण प्रियाच्या आवाजाने ते भानावर आले..

प्रिया - गार्गी लवकर ये आपल्याला गीतसोबत या पोज मध्ये फोटो काढायचा आहे..

गीत आणि तिचा होणार नवरा अमोल यांच्याबरोबर एकच घोळका करून त्यांनी फोटो काढलेत..

पुढे लग्न मंडपात गेले आणि लग्नाच्या विधी सुरू झाल्यात..

-------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED