Last Moment - Part 2 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 2



शुभमंगल सावधान, सावधान, सावधान!! " करत लग्नाची मंगलाष्टके संपलीत.. आणि मंडपातील एकेक जण आता जेवणाकडे धावू लागलं, कुणाला लवकर जायची घाई होती तर कुणाला भूक अनावर झाली होती.. ही चांडाळ चौकडी मात्र तशीच मजा करत मंडपातच बसली होती.. आणि आईचा आणि बाबाचा ग्रुप ही तसाच या मुलांसारखा एकत्र अगदी मजेत वेळ घालवत होते...

मध्ये मध्ये प्रतीक उठून काहीतरी आणायला जात होता किंवा तस दाखवत होता, तर कधी विवेकला मदत करायच्या बहाण्याने जात होता.. आणि तिकडूनच खांबाच्या आडून चोरून लपून तो डोळेभरून गार्गीला बघून घेत होता.. कारण गार्गी त्याचही पहिलच एकमेव प्रेम होती... तो आजही तिच्यावर तेवढच प्रेम करत होता जेवढं आधी करायचा.. पण कुणाला कळू द्यायचं नव्हतं म्हणून तो सगळ्यांपुढे असा वागत असे.. मनातल्या उसळ्यांना अनुभवून पण बाहेरून अगदी नॉर्मल असल्यासारखं दाखवत असायचा.. पण गार्गीला मात्र काही कळत नव्हतं.. त्याच्या डोळ्यात एक आणि वागण्यात एक असा नेहमी दुहेरी व्यवहार ती अनुभवायची.. त्याच अस वागणं तिला कळतच नव्हतं..

पुढे सप्तपदी सुरू झाली.. लग्नाच्या विधी बघत असताना गार्गी गीत आणि अमोलच्या ठिकाणी कधी स्वतःला आणि प्रतिकला बघू लागली तीच तिलाही कळलं नाही त्या विधी बघण्यात ती एकदम गर्क झाली होती.. प्रतीक ही तिच्याकडे चोरून लपून, तिरप्या डोळ्यांनी बघतच होता ..

तेवढ्यात आईने आवाज दिला.. आईच्या आवाजाने ती भानावर आली आणि आईकडे निघून गेली..

गार्गी - काय म्हणते ग आई?? तू बोलावलस..

आई - अ... हो... तुला कुणाला तरी भेटवायच आहे..
ते तिकडे लांब उभे आहेत ना ते माझ्या बहिणीच्या नंदेचे नातेवाईक आहेत.. त्यांचा मुलगा पण सोबत आला आहे म्हणे.. चल तुला भेटवते ..

आईच्या बोलण्याचा रोख कळला आणि गार्गीच हृदयात अगदी चर्रर्रर्र झालं.. एक अनामिक भीती तिला स्पर्शून गेली.. ती आताच तर स्वतःला प्रतिकबरोबर कल्पनेत बघत होती आणि आता कुणी दुसरा मुलगा बघायचा...

गार्गी - आई , प्लीज तुला भेटायचं तर तू खुशाल भेट पण हे अस unofficial मी नाही कुणाला भेटणार हं.. मला नाही भेटायचं त्या मुलाला.. अस लग्नात कुणी मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम करतात का ? काही पण असत तुझं.. मी नाही भेटणार तू जा..

आई - अग तू एकदा फक्त भेटून तर बघ, मी थोडी बोलतेय की लग्नच कर त्याच्याशी.. आणि असा विचार कर की सहज भेटत आहे तो ओळखीचा आणि नात्यातला आहे म्हणून, लग्नासाठी वगैरे नको विचार करू म्हणजे तुला काही वाटणार नाही.. ठीक आहे.. चल आता..

गार्गी - आई अग .. आई...

आईने गार्गीच हात पकडून जवळ जवळ ओढतच नेलं... आणि क्षणातच त्यांच्याजवळ पोचलेही.. तिने बराच विरोध करायचा प्रयत्न केला पण आई पुढे तीच काही चाललं नाही..

आई - नमस्कार!!! अ... ओळखलंत का मला???

नातेवाईक - अरे हो.. तू विमालची लहान बहीण वैशाली आहे ना.. ओळखणार कस नाही!!! तू या लग्नाला कशी काय?

आई - हो.. ते मुलीचे बाबा यांच्या ऑफिसमध्ये सोबतच आहेत आणि नवरी मुलगी माझ्या मुलीची बालमैत्रिण पण आहे.. आमचा चांगला घरोबा आहे.. 😊

नातेवाईक - अरे वाह म्हणजे तुमचं जवळचच लग्न आहे..

आई - हो.. मग काय!! बरेच वर्ष झाले आम्ही सोबतच आहोत.. अ ... तुम्ही या लग्नाला??

नातेवाईक - ते मूलाकडचे ओळखीचे आहेत आमच्या.. म्हणून .. तू कुठे असते मग सद्धे??

आई - आम्ही इथेच राहतो म्हणजे याच शहरात.. लग्न आटोपलं की या ना घरी.. म्हणजे निवांत बोलायला मिळेल आपल्याला..

नातेवाईक - अ .. आता नाही जमणार बहुतेक... आम्ही लगेच निघणार आहोत.. ते गाडीने आलोय ना मग रात्र व्हायच्या आत घरी पोचलो की बरं होत जरा..

थोडं थांबून गार्गीकडे बघत ..

अ.. ही मुलगी तुझी आहे का??

आई - हो.. माझीच मुलगी आहे गार्गी.. तुम्हाला भेटवायला म्हणून तिला घेऊन आले आणि बोलण्याबोलण्यात विसरूनच गेले..

इच्छा नसतानाही गार्गीने त्यांना नमस्कार केला..

नातेवाईक - अरे वाह!! खूप सुंदर आहे..

गार्गी - थँक् यु.. 😊

नातेवाईक - अ.. माझा मुलगा पण आला आहे.. आता इथेच होता.. कुठे गेला काय माहिती?? इकडे तिकडे मुलाला शोधत त्या बोलल्या...

गार्गी मनातच " बरं झालं गेला ... " बोलत होतीच की त्यांना तो दिसला आणि त्यांनी त्याला आवाज दिला.. तसा तोही लगेच आला..

नातेवाईक - अरे .. रोहित.. ह्या विमल मामीच्या बहीण आहेत वैशाली मामी.. आणि ही त्यांची मुलगी गार्गी.. आणि हा माझा मुलगा रोहित.. त्याच्याकडे हात दाखवत त्या बोलल्या..

दोघांनीही एकमेकांना "हाय" केलं.. त्यानेही आईला नमस्कार केला.. आणि आईनी लगेच मुलाखती सारखे प्रश्न विचारायला सुरुवातही केली..

आई - अरे वाह.. छान हॅन्डसम दिसतोय तू .. कुठे असतो तू सद्धे आणि काय करतो??..

रोहित - मी सद्धे एक IT MNC मध्ये मॅनेजर आहे.. बँगलोरला असतो..

आई - अरे वाह उत्तम.. मग आता सुट्या घेतल्या आहेत का??

रोहित - हो म्हणजे, बऱ्याच दिवसांपासून घरी आलो नव्हतो, मग आई बाबांची आठवण पण येत होती आणि सद्धे जास्त काम पण नव्हतं कंपनीमध्ये.. म्हणून आलो 4 - 5 दिवसांच्या सुट्या घेऊन..

आई - अच्छा.. चांगलं आहे.. लांब असलं की आई वडिलांना आपल्या मुलांची काळजीच असते रे.. अस मध मधात येऊन भेट दिली की मग त्यांनाही चांगलं वाटतं.. असो कितिदिवस आहे मग इकडे??

रोहित - बस उद्या निघतोय..

नातेवाईक - आजच जाणार होता पण म्हंटल लग्न तेवढं करून जा म्हणून मग एक दिवस सुटी वाढवली आणि थांबला..

आई - चांगलं आहे... तिकडे सेट झाला का मग आता?? कारण नवीन ठिकाणी सुरवातीला जरा जड जात ना..

नातेवाईक - हो .. सुरुवातीला काही दिवस गेलं थोडं जड कारण कधी घर सोडून राहिला नव्हता ना.. शिकत असताना पण घरीच होता आणि नंतर पहिली नोकरी पण त्याच शहरात मिळाली होती नंतर कंपनी बदलली आणि त्याला बँग्लोरला जावं लागलं.. पण आता झालाय चांगला सेट..
(आणि लगेच मोर्चा गार्गीकडे वळवत.. )
गार्गी तू काय करते बेटा..??

गार्गीला अपेक्षित होतच.. आणि तसच झालं.. पण बोलावं तर लागणारच आणि तेही खरच कारण आई होती तिथे..

गार्गी - मी सद्धे मास्टर्स करतेय IT मध्ये....

कसनुस तिने उत्तर दिलं.. आणि आईने आणखी त्यात भर पाडायला सुरुवात केली..

आई - हो यावर्षीच ऍडमिशन झालंय तीच .. पुण्याला शिकायचं म्हणत होती पण आम्हीच नाही म्हंटल, आधी पण अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी बाहेरच होती आणि आता पण बाहेर राहणार मग पुढे लग्न झाल्यावर सासरी जाणार तेव्हा घरी आमच्याबरोबर कधी राहायचं ना.. आणि आता तिच्या लग्नाचंही बघतोय आम्ही .. शिक्षण होते तोपर्यंत जुळून येतील योग्य आणि मग लगेच लग्न करून टाकूयात..

नातेवाईक - अच्छा.. आम्ही पण रोहितचा लग्न करायचं विचार करतोय.. इतके दिवस तो तयार नव्हता , settle होऊ दे अस त्याच सुरू होत पण आता झालाय तर मग लग्नाला पण तयार झाला..

आई - हो हो चांगल आहे .. गार्गी पण म्हणत होती तिला शिकल्यावर नोकरी करायची आहे मग लग्न वगैरे.. पण मग वय किती होतं.. काही गोष्टी योग्य वयातच व्हायला हव्या ना.. मुलांना थोडं उशीर चालतो पण मुलीच वय जास्त झालं की अवघड होतं ना.. आम्ही म्हंटल तुला जे करायचं ते कर पण लग्न झाल्यावर..

नातेवाईक - हो अगदी बरोबर.. आजकाल अस कुणी म्हणत नाही की नोकरी वगैरे करू नको म्हणून.. एवढं शिक्षण घेऊन घरी बसायला लावतील असे लोक आता तरी राहिले नाहीत आपल्यात.. सगळी सवलत असते मुलींना लग्न झाल्यावर पण...

आई - आम्ही पण तेच सांगतो हिला..

आईच आणि त्यांचं बोलणं सुरू होत पण गार्गी जरा अवघडली होती.. तिला तिथे 1 मिनीटही थांबायचं नव्हतं आणि त्या सगळ्या गप्पा तर अजिबातच ऐकायच्या नव्हत्या.. रोहितचही तसच असेल कदाचित.. पण तो गार्गीकडे एकसारखं बघत होता.. त्याला गार्गी आवडली असावी कदाचित.. त्याला तिच्याशी बोलावसं वाटत होतं पण गार्गीकडून काहीच प्रतिसाद नव्हता, ती त्याच्याकडे साधं बघतही नव्हती.. इकडे तिकडे बघत असतानाच तिच्याकडे लपून बघणारा प्रतीक तिला दिसला आणि तिच्या मनात जणू फुलपाखरू उडाले.. हलकसं स्मित तिच्या चेहऱ्यावर पसरलं..

...

....
....

....
आई - हो हो चला.. आणि पुढच्या वेळी आले की मात्र नक्की घरी यायचं हं..

नातेवाइक - हो हो चालेल.. नक्की😊 चल येते .. चल ग बेटा गार्गी .. भेटू मग नंतर..

गार्गी - हो हो नक्की.. बाय.. 😊
......

गार्गी - "हुश्शश" सुटले एकदाचे 🙄.. आई तुला नको बोलली होती ना मी लग्नाच्या विषयवार बोलायला.. तरी पण काय ग तुमचं सुरू होत.. किती awkward वाटत होतं मला तिथे.. मी चालले माझ्या circle मध्ये आणि आता पुन्हा मी कुणाला भेटणार नाहीय आधीच सांगते.. हे असं मला नाही पटत ग..

आई - अग पण असच होत असते.. ठीक आहे आता नाही भेटवत कुणाशी.. आता माझा शोध संपला कदाचित...( ती तिच्याच विश्वात बोलत होती..)

गार्गी - अग काय शोध संपला.. काहीही काय बोलतेस.. अस काही होणार नाहीय आधीच सांगतेय मी तुला.. अस एका भेटीत शोध संपला म्हणे.. जाऊ दे मी चालली..

ती निघून सरळ तिच्या ग्रुपमध्ये येऊन बसली आणि पुन्हा मस्ती करू लागली..

------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED