घरी आल्या नंतर तनु खुप आनंदी होती तिच्या चेहऱ्या वर हास्य मावत नव्हत कारण तनुने जसा विचार केला होता. अगदी तिच्या मना सारखं झालं होत तिला वाटत होत श्री ने प्रेमाची मांगणी घालावी श्री ने त्याच्या मनात काय आहे हे सांगावं आणि श्री ने सांगितलं पण तेवढं क्लिअर अजून सुद्धा तो बोललेला नव्हता. त्या मुळे तनुने त्याला तिच्या मनात काय आहे हे नाही सांगितलं घरी आल्या नंतर तनुने फोन बघितला तर पहिला मॅसेज श्री चा होता.
त्याच फक्त नाव बघितलं तर तिच्या चेहऱ्या वर एक स्माईल आली तिने मॅसेज ओपन केला आणि वाचायला लागली.
त्यात श्री ने असं लिहलं होत तनु तुला जेव्हा पासून बघितलं तेव्हा पासून तु मला खुप आवडायला लागली या अगोदर मी तुला आपल्या कॉलेज मध्ये कधीच नाही बघितलं एकाच कॉलेज मध्ये असुन सुद्धा कधीच तु मला दिसली नाही त्या दिवशी मी तुला पहिल्यांदा बघितलं तुला एक खरं सांगू मला हे नाटक करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. मी तर त्या दिवशी येऊन सांगणार होतो मला करायचं नाही म्हणून माझी तिथे यायची सुद्धा इच्छा नव्हती म्हणून मी उशिरा आलो पण जेव्हा मनाली ने सांगितलं नाटक मध्ये तू माझी हिरोईन आहे तेव्हा मला वाटलं कि नाही मला हे नाटक करायचं त्याच दिवसा पासुन माझं मन बदलून गेलं आणि मी वेळेत सरावा साठी यायचो पण जस जस दिवस गेले मला तुझ्या बद्दल खुप काही वाटायला लागलं पण मी तुला आज माझ्या मनातलं सांगतो समजा मी जर तुला प्रपोज केलं तर तुझं उत्तर काय असेल तुला माझ्या बद्दल काय वाटते.
हे सर्व वाचून तनुने सरळ उत्तर दिल तुला जे वाटते तेच मला पण वाटते मी हि तुला या अगोदर कॉलेज मध्ये नाही बघितलं पण जेव्हा तुला त्या रूम मध्ये बघितलं पहिल्यांदा त्या नंतर सर्व बदलून गेलं जिथे तिथे तूच दिसायला लागला तुला माहिते प्रेम या शब्दा वर माझा विश्वास नाही मला हे सर्व टाईमपास वाटतो पण जेव्हा पासून तुला बघितलं तु माझी किती काळजी घायचा मला हवं नको ते बघायचं खूप काही करायचा माझ्या साठी मला अजुन सुद्दा प्रेम नाही वाटत पण हे प्रेम नाही तर काय आहे कधीच दुसऱ्या साठी मी असं फील नाही करत पण तुझ्याच साठी का होते असे देखील प्रश्न येतात पण मला समजल खरच लोक प्रेमात एवढी का पागल असतात तनुने तिच्या मनात काय आहे हे श्री ला सर्व सांगितलं आणि दोघे हि नाटका मधले आत्ता खरो खरं हिरो आणि हिरोईन झाले होते. खुप साऱ्या गप्पा करून शेवटी श्री ने तनुला म्हणाला उद्या आपण भेटायचं का मी उद्या कॉलेज मध्ये येईल पण तनुने नकार दिला नको उद्या माझं महत्वाचं लेक्चर आहे उद्या नाही होणार नंतर कधी बघु पण श्री म्हणत होता बर ठीक आहे पण मला एकदा उद्या तुझे दर्शन होतील का मी तुला बोलणार नाही फक्त दुरून बघेल आणि निघून जाईल. ती हसत बोलत होती काय श्री तु पण ना तूला काय मी एखादी देवी दिसते का तुला माझे दर्शन घायचे असं म्हणतोस. ठीक आहे चल ये उद्या एवढं बोलून तनुने फोन बाजूला ठेवला आणि झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कॉलेज ला जायची तयारी करत होती पण आज तयारी करण्या साठी तिला खूप वेळ लागत होता कुठला ड्रेस घालू मी ह्या ड्रेस मध्ये छान दिसेल ना आज श्री ला माझ्यात काहीतरी नवीन दिसलं पाहिजे असेच विचार करत शेवटी तिने तयारी केली काही जास्त नाही डार्क ब्लू कलर ची जीन्स आणि काळ्या रंगाची टि शर्ट घातली पूर्ण केस एका रबर नि बांधून घेतले एकदम फिक्की अशी लिपस्टिक लावली आणि तिच्या मोठ्या अश्या डोळ्यात काजळ लावलं एवढा साधा मेकअप नि तीच रूप अगदी खुलुन आलं.
ती स्वतःच आरश्यात बघून स्वतःचीच तारीफ करायला लागली वाह तनु नॉट बॅड तुझे भी मेकअप कारण आ गया आरश्या बाय बोलत निघून गेली ती.
निघाल्या नंतर तिने मॅसेज केला श्री ला गुड मॉर्निंग मी निघाले श्री ये तू पण लवकर ये थोडं माझं लेक्चर आहे लगेच श्री ने मॅसेज केला हा मी निघालो दोघेही कॉलेज मध्ये आले तनु कॉलेज च्या गेट मधून जातेस वेळेस तिला समोर श्री दिसला निवांत बसला होता तो तिला बघताच तो उठुन उभा राहिला आणि काही बोलले नाही दोघे फक्त बघुन एकमेकांना स्माईल देऊन निघुन गेले.
प्रेमाची खरंच काही व्याख्या नाही प्रेम हे निस्वार्थ मनाने करायला पाहिजे वय कुठलाही असो प्रेम हे होतेच कोणी स्वतहा पेक्षा दुसऱ्याला महत्तव दिल किंव्हा काळजी घेतली तर आपल्याला त्या व्यक्ती बद्दल काही तरी वाटायला लागते ते काहीतरी नसुन प्रेम असते
तसंच तनुलाही प्रेम या शब्दाचा राग यायचा नको वाटायचं पण तिच्या आयुष्यात श्री आला आणि सर्व बदलून गेलं बघुयात अजून समोर या दोघात काय काय होईल तर सुरुवातीला सर्वांचं चांगलं असते पण ते शेवट पर्यंत तसंच टिकवून ठेवण्या साठी खुप काही करावं लागते या दोघान मध्ये भरपूर काही झालं बघुयात आपण समोर काय होते तर असच वाचत राहा आणि काही चुका झाल्या असतील तर सांगा कारण मी काही लेखक नाही पण सुरुवात करत आहे तुमचा असाच सहकार्य असू द्या द्यन्यवाद....