Galati Se Mistake - 1 books and stories free download online pdf in Marathi

गलती से मिस्टेक - 1

अमित एकेदिवशी असच त्याच काम करत बसला होता. मोबाइलला मस्त पैकी गाणी चालू होती. नेहमी प्रमाणे whatsapp च्या मेसेज ची tune वाजली. पण वैभवने लक्ष दिल नाही रोज असे ढीग भर मेसेज येत असतात थोडीच प्रत्येक मॅसेज लगेच बघून चालेल. मग थोड्या वेळाने गाणे चांगले करण्यासाठी मोबईलची स्क्रीन ऑन केली आणि नोटिफिकेशन मध्ये whatsapp एक unknown नंबर वरून मेसेज आला. मग त्याला वाटलं कोणी तरी कामासाठी काहीतरी मेसेज केला असेल.

मेसेज पहिला

"hi " असा मेसेज आला

लगेच त्यांने रिप्लाय दिला.
"बोला"

मग तिकडून रिप्लाय आला
"अरे बोला काय मी बोलतेय वर्षा"

अमित : "माफ करा काहीतरी गैरसमज होतोय."
वर्षा : ए चल काहीही फालतू बोलू नकोस.
अमित : (चिडून) हे बघा मॅडम please confirm करा मी नाही तुम्हाला ओळखत infact माझी ओळख कुठल्याच मुलीशी नाही कि जी माझ्याशी chatting करेल.
वर्षा : ok सॉरी. फक्त हा नंबर कन्फर्म करणार का? ९७६५१९८०१५
अमित : हो हा माझाच नंबर आहे. पण तुमच्याकडे कसा ?
वर्षा : तुझं नाव अमितच आहे ना ?
अमित : हो.
वर्षा : I AM SO SORRY . मी आता जस्ट कन्फर्म केलं माझ्याकडे चुकून दुसरा नंबर माझ्या फ्रेंड ने दिला. आणि मला ज्याचा नंबर पाहिजे आहे तो दुसरा माणूस आहे ज्याचं नाव सुद्धा अमित आहे.
अमित : ok no issue . but be carefull नेक्स्ट time . कारण बाकीचं कोणी कसं असेल सांगता येत नाही म्हणजे काही राग येणारे पण आणि काही गैरफायदा घेणारे पण असतील. बर चल by मी जेवतो.

(एवढं बोलून अमित पुन्हा नेट बंद करून स्क्रीन बंद करून मोबईल चार्जिंग लावला आणि जेवायला बसला, मग असाच तो किस्सा त्यातून अजून गुंग होता. मग झाले त्याचे जेवण करून. आणि त्याने पुन्हा एकदा मोबईल बघायला घेतला, तर सहा मेसेज आले होते त्या नंबर वरून.)

वर्षा : (मेसेज-1) nice to meet you खूप बर वाटलं तुझ्याशी बोलून.
(मेसेज-२) मला तुझा नंबर त्या आकाश निकम ने दिला होता. तो तुझा पण मित्र आहे म्हणे.
(मेसेज-३) अरे बोल ना किती वेळ लावतोस रिप्लाय द्यायला.
(मेसेज-४) ठीक आहे आपण कधी तरी एकत्र नक्कीच भेटू आकाश ला बोललेय मी.
(मेसेज-५) तू मुलींशी फारसा बोलत नाही म्हणे. का रे?
(मेसेज-६) फक्त एवढंच सांग बास बाकी काही नको.

अमित : नाही अगदी तसं काही पण मुलींशी बोलायला घाबरतो. म्हणजे मुलींशी काही बोलायचं म्हंटल तर त्यांना वाटत की आम्ही जास्त भाव देतोय.

वर्षा : म्हणायचं काय आहे तुला ?

अमित : काही नाही तुम्ही नको लक्ष देऊ. मी मुलींचा खूप रिस्पेक्ट करतो. पण त्या मुलांच्या बाबतीत जे वागतात त्याचा राग येतो फक्त.
वर्षा : ओक thats इंटरेस्टिंग. असेल कदाचित पण मुलं तस वागतात ना,
अमित : अरे पण सगळीच मुलं तशी असतील असं नाही ना.
वर्षा : same here. मुली पण सगळ्याच अशा नसतात ना.
अमित : हो मान्य आहे पण ते ओळखायची अक्कल माझ्यात नाही. त्यामुळे त्यांच्या नादाला लागतच नाही.
वर्षा : your so different. माझ्याशी मैत्री करणार का ? एक मुलगी म्हणून राहूदे मुलगा समजून मैत्री करून बघ.
अमित : सॉरी पण मला थोडा वेळ लागेल. इतक्यात तरी नक्कीच नाही आणि ८-१० दिवस ओळख तयार होउदे मग.

(वर्षा मनातल्या मनात बोलू लागली, काय बिनडोक माणूस आहे. मुलगी स्वतः विचारते मैत्री साठी आणि हा इग्नोर करतोय. पण ठीक आहे आवडलं मला त्याच हे वागणं. त्यानंतर दोन दिवस झाले आणि वर्षा अमित बद्दल आकाश सोबत चर्चा करत होती.)

आकाश : अरे नको यार तो फार साधा माणूस आहे. म्हणजे इंजिनिअर आहे आणि हुशार पण खूप आहे. पण नॉर्मली its व्हेरी सिम्पल मॅन.
वर्षा : पण त्याला मुलींशी काय प्रॉब्लेम आहे.
आकाश : प्रॉब्लेम नाही, फक्त मुलींच्या नादाला लागण्याची भीती वाटते.
वर्षा : ओक अजून explain कर.
आकाश : अरे म्हणजे फार हलक्या मनाचा आहे, अगदी सहज कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडेल. आणि मग त्याला वाटत की चुकून कोणत्या मुली कडून अपमान झाला तर काय. पण मला एक सांग तू का एवढी चौकशी करतेस. तू काय आवडला का काय तो ?
वर्षा : माहित नाही, पण कदाचित थोडा आवडला.

( वर्षा ला आता अमितचा हेवा वाटू लागला. आणि रोज त्याच्याशी chatting करता करता अमित रिप्लाय दिला की मैत्री मान्य आहे मला. पण वर्षा आता त्याच्या प्रेमात आहे.)

To be continued.......

इतर रसदार पर्याय