कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३४ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३४ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग- ३४ वा

-----------------------------------------------------------------------------

आपल्या वर्कशॉपमध्ये -ग्यारेजमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक –पापभिरू नारायणकाकांच्या

जग्गू या जावयाची सगळीकडे चांगलीच लबाडी , चलाखी सुरु होती. सगळ्यांच्या डोळ्यात अशी धूळफेक करणारा

बदमाश जग्गू आपल्या उद्योगात .स्वताच्या मामाचा –जो आता त्याचा सासरा झाला होता

त्या नारायणकाकांना पुढे करून, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतो आहे हे कळल्यापासून यश

खूपच गोंधळून गेला होता .

लंचनंतर त्याने चौधरीकाका आणि सोबत मधुरा , दुसरी स्टाफ –सोनाली ..या तिघांना दुपारच्या वेळी केबिनमध्ये बोलवून घेतले .

आणि मार्केटमधल्या दोन मोठ्या सेठ लोकांनी –जग्गू हा इसम काय काय करतो आहे ,

कसे कसे करतो आहे “, हे या तिघांच्या सोबत शेअर केले.

चौधरीकाका म्हणाले- यश , वरवर पाहता खरेच आम्हाला शंका ,कधीच आली नाही ,त्यामुळे

नाही म्हटले तरी.. गंभीरतेने मी नारयणकाका आणि या जग्गूकडे पहिले नाही “,

ही माझी चूक झालीय “ असे म्हटले तरी हरकत नाही.

मी माझी चुकी कबुल करतो.

सोनाली म्हणाली- यश सर,

मला इथे येऊन सहा महिने होत आहेत .. कामाचा अनुभव फारसा नाहीये ..

मला दिलेले कॅशचे काम चौधरीकाकांच्या मदतीने त्यांना विचारून मी करीत असते .

मी नवी असले तरी , काम करीत असतांना एक गोष्ट मात्र मला खटकली आहे..

ती म्हणजे ..

नारयणकाका क्रेडिटवर आणलेल्या वस्तूंचे बिल पेमेंट घेत असतात ,तेव्हा ..

बाहेर उभा असलेला जग्गू आत असलेल्या नारायणकाकाकडे पहात असतो ,

त्याचे लक्ष ..माझ्या हातातील बिलाकडे असते ,

मी पेमेंट करेन की नाही ? बिलाबद्दल काही शंका घेईल की काय ? अधिक चौकशी करते की काय ?

अशी भीती त्याच्या मनात असली पाहिजे , “

आज तुम्ही सांगितल्यवर मला सारे आठवते आहे.

विशेष म्हणजे ..अशी सगळी बिलं नेहमीच ..खूप कमी रकमेची, किरकोळ असतात ..

त्यामुळे “ही बिले खोटी असतील , बोगस असतील ?

अशी शंका ..समोर उभे असलेल्या नारायणकाकाकडे पाहून येतच नाहीये.

मी सगळ्यांकडून काकांच्याबद्दल ऐकले आहे , ते एकटेच असे व्यवहार आपल्या ओफिसाठी करू शकतात ,

हे ही मला चौध्रीकाकांनी सांगितले आहे. त्यामुळे दर्शनीतरी –यात काही गैर असेल .

.हे शंका कशी घेणार मी.?

पण, यश सर , हे असे किरकोळ शंभर –दोनशे रुपये ..हिशेब केला तर महिना भरात चांगले पाच –दहा हजार पर्यंत जातात ...

काहीच न करता जर , या ज्ग्गुला असे पैसे मिळत असतील तर, तो डोकेबाज माणूस संधी सोडणार नाही.

तसे पाहिले तर सगळे नियम पाळून , ठराविक रकमेच्या आत असतात ही बिलं ,

ठरवून दिलेल्या लिमिट प्रमाणे होणारा हा खर्च आहे, त्यामुळे या पेमेंटला कधी अडवण्याची वेळ आली नाही.

.काकांच्या हातात पैसे पडले आहेत की नाही, हे जग्गू पहात असतो आणि जेव्हा

पैसे घेऊन काका बाहेर पडतात ,तेव्हा तो सुटकेचा निश्वास सोडतो , वर आकाशाकडे पाहत हात

जोडून ..झाले रे !आजचे काम बाबा ! असे म्हणत असावा .असे मला त्याच्याकडे पाहून वाटते .

सोनालीचा हा अनुभव ऐकून ..चौधरीकाका ,यश आणि मधुराच्या चेहेर्यावर हसू उमटले ..

यश म्हणाला – सोनाली – तू जे पाहिले आहेस , ते नेहमीपेक्षा वेगळे आहे “ हे जाणवल्यावर ,

तू ही गोष्ट शेअर करायला हवी होती ..

आमच्याशी शेअर नाही केलीस ..तरी ..तुझी कलीग ..मधुरा ..आहे , तिला तर नक्कीच सांगायला हवे होते .

मधुरा म्हणाली – यश सर , सोनालीने मला सांगायला हवे होते हे खरे आहे , पण सहा

महिने झालेला नवा स्टाफ मेंबर ..आपल्या ऑफिसातल्या जुन्या माणसाबद्दल शंका –कुशंका .

बोलून कशा दाखवायच्या ? ही भीती तिला नक्कीच वाटत असणार .

सोनाली म्हणाली- हो मधुरा – अगदी असेच वाटायचे मला ..!

तरी पण मी शेअरिंग नाही केले याबद्दल

सॉरी म्हणते सर , तुम्हा सगळ्यांना .

चौधरीकाका म्हणाले – यश ,या सगळ्या गोंधळाची शंका आलेली फक्त एकच व्यक्ती आपल्या ऑफिसात

आहे,

आणि ती म्हणजे – ही मधुरा ..

मागच्या महिन्यात ..तिने ..आपल्याला जुने रेकॉर्ड्स काढून दाखवले ,आणि तिला आलेली शंका ,आणि

कुणीतरी नक्कीच आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन गैर –कामं करीत आहे ., अशी काळजी व्यक्त केली होती.

आणि त्या दिवसापासून ..आपण या दृष्टीने विचार करू लागलो ..

मधुरा – तुझ्या चौकस दृष्टीचे खरेच खूप कौतुक आहे. तुझ्यामुळे जग्गूचे हे कारनामे उजेडात

आले आहेत . चौधरीकाकांना सहमती दाखवत -

यश म्हणाला – होय चौधरीकाका .. जग्गूने मोठे घबाड वगरे असे काही जरी लुटले नाहीये

तरी ..पण..शेवटी त्याने मोठाच विश्वासघात केलाय ..नारायणकाकांचा आणि आपला सुद्धा .

या बदमाश जग्गुने ..नारायणकाकांचा गैरवापर करतांना ..माझ्या नावाचा सुद्धा बाहेर काही ठिकाणी

गैरवापर केला आहे.. अशी मला शंका येते आहे.त्यामुळे याचा बंदोबस्त ताबडतोब करणे गरजेचे आहे .

मधुरा म्हणाली- यश सर , अहो आपण थोडक्यात सुटलो आहोत असे मानले तरी ..

मार्केटमधील इतर लोकांना , आणि ओळखी-पालखीच्या लोकांना या माणसाने किती त्रास

दिला असेल ? याची कल्पना देखील भयंकर आहे.

चौधरीकाका म्हणाले – यश ,मधुराचा हा मुद्दा महत्वाचा आहे.

आपण आपल्यापरीने या माणसाचा बंदोबस्त करणे “ आपल्या हिताचे आहे..

नारयणकाकांना त्रास सहन करावा लागेल ..तरी पण आपण कठोरपणे कारवाई केली पाहिजे .

यश म्हणाला –

चौधरीकाका , सोनाली आणि मधुरा – तुम्हा तिघांना एक सुचना आणि विनंती आहे ती लक्षात

ठेवा –

ही गोष्ट फक्त – आपल्या चौघात राहील . याची चर्चा कुठेच ,कधीच करायची नाहीये.

एकदम गोपनीय स्वरूप आहे या कारवाईचे .

हो यश सर , आम्ही लक्षात ठेवतो ही सुचना .तिघांनी कबुल केले .

एक महत्वाचा निर्णय घेऊन झाल्यामुळे ..यशला टेन्शन कमी झाल्यासारखे वाटत होते.

त्यांनंतरचा बाकीचा वेळ नारयणकाकांनी घेतलेल्या बिलांची तपासणी करण्यात गेला .

या वेळी केबिनमध्ये सगळ्या फाईली घेऊन बसलेली मधुरा मदतीला होती.

ऑफिसवेळ संपत आलेली पाहून .. यश मधुराला म्हणाला ,

मधुरा , चौधरीकाकां आता घरी निघतील , त्या आधी जाऊन त्यांना सांग

आपण दोघे बाहेर जाणार आहोत . नेहमी प्रमाणे मी आणून सोडेन तुला घरी.

यशची ही इच्छा ऐकून ..मधुरा मनातून खूप सुखावली .

म्हणजे स्वारी ..ऑफिसच्या टेन्शन मध्ये नाहीये ,

जग्गू प्रकरण मुळे तो थोडा disturb झाला आहे.

जाऊ दे, या गोष्टीचा आता विचार करणे नकोच.

आता मस्त त्याच्या सोबत फिरायचे , त्याला खुश करायचे “ , मधुराला आता कळाले होते

की त्याला कसे खुश ठेवायचे.

मधुरा केबिन बाहेर आली..तिने पाहिले ..

सोनालीचे काम आटोपले होते ,आणि चौधरीकाका निघण्याच्या तयारीत होते.

सोनाली आणि मधुराचे सूर छान जुळले होते. सोनाली खूप अभ्यासु आणि मेहनती स्वभावाची मुलगी

मधुरा तिच्या पेक्षा फार मोठी नव्हती .तरी .पण सोनाली तिला मान देत असते.

मधुरा देखील मोठ्या आदबीने तिच्याशी बोलत असते ..

सोनाली म्हणते – मधुरा – मी तुझी छोटी मैत्रीण आहे, तू असे मोठेपणा देऊन वागते, बोलते

मला फार संकोच वाटतो . असे नको करू ..आपण छान मैत्रिणी म्हणूनच सोबत करीत जाऊ या .

मधुराला सोनालीच्या स्वभावातला निर्मळपणा खूप आवडला होता.

चौधरीकाकांनी बहुतेक करून सोनालीला ..

यश आणि मधुराबद्दल काय चालले आहे ,याची कल्पना दिलेली असावी .

त्यामुळे ..सोनाली या विषयवार आपल्याशी चुकून ही बोलत नसावी.

अशी शंका मधुराला आली होती.

त्यामुळे ..सोनाली तिच्यात आणि मधुरातील मैत्रीच्या नात्यात एक मर्यादा, सन्मानपूर्वक पाळते आहे “ हे मधुराला जाणवले होते.

मधुराने यशचा निरोप चौधरीकाकांना सांगितला – तो ऐकून ..

ते म्हणाले – ओके ..घरी गेल्यवर तुझ्या रूममेट्सना आणि तुझ्या काकूंना हा निरोप सांगतो.

ऑफिस बंद करून ..यशने मधुराची दुचाकी मागे नेऊन ठवली ..आणि स्वतःची बाईक काढीत

तिला म्हणाले –

चला ,राणी सरकार – हवाखोरी करून येऊ , फार दिवस झाले ..तू आलेली नाहीस माझ्यासोबत.

बाईकच्या मागे बसत ..मधुराने यशच्या खांद्यावर हात ठेवीत म्हटले –

अहो राजे – तुम्ही तुमच्या ऑफिस कामात, इतर सार्वजनिक कामात इतके गुंतवून घेतात की ,

या तुमच्या राणीला “ वाट पाहत बसावे लागते .

मी तर वाट पाहत असते ..तू कधी म्हणतो मला ..

चला मधुरा ..फिरून येऊ..

हे ऐकून यश म्हाणाला – मधुरा , मला काय हौस आहे का कामात असे अडकून राहण्याची ?

काय करू..लोकांना माझी सवय आणि मला लोकांची इतकी सवय झालेली आहे ..की मी

अडचणीच्या वेळी “ आपल्या लोकांना “नाही “म्हणूच शकत नाही.

बाईक सिटीच्या बाहेर आलेली आहे हे पाहून ..मधुरा म्हणाली ..

यश – थोडी स्लो कर ना बाईक ..मी नीट बसते , तुला आवडते तसे ..

यशने स्पीड कमी केली , तशी मधुरा ..यशला बिलगून बसली , त्याच्या पाठीभोवती

तिच्या हाताचा विळखा .टाकला ..जणू मधुराने यशला मिठीत घेतले होते . त्याच्या पाठीवर मधुराने

तिच्या बहारदार देहाचा सारा भार टाकला होता .

मधुराच्या छातीचा ,तिच्या स्तनांचा होणार उबदार स्पर्श ..यशला खूप सुखद वाटतो ,म्हणून ती

घट्ट बिलगून बसते . तिचा आजचा ड्रेस ..तिच्या शरीराचे आकर्षक उभार दाखवणारा

आहे “, हे यशला जाणवले आहे ..याचा आनंद मधुराला झाला होता..

अहो माझे लाडके राजे –

तुझ्या आवडीचे ड्रेस ,साडी , जीन्स आणि टोप घालणे सुरु केले आहे, तेव्हा पासून माझ्या रूममधल्या

मैत्रिणी सारखं चिडवत असतात . म्हणतात ..

मधुरा – यश तुझ्या प्रेमात पडल्या पासून ..तू जरा जास्तच देखणी आणि सुंदर दिसायला लागली आहेस.

यश – तुला मी आवडते , तुझ्या मनात माझ्या विषयी खूप प्रेम आहे ..ही जाणीव मला मनातून

उत्साह देणारी आहे ..मी मनोमन ..तुला माझा जोडीदार मानले आहे , माझ्या जीवनात तुझ्याशिवाय

आता दुसरा पुरुष ..येऊ शकणार नाही.

मी फक्त आणि फक्त तुझीच आहे, तुझीच असेल राजा ..

मेरा दिल , मेरी जान , मेरी जिदंगी , सब तेरा है..

समोर आलेल्या मंदिरा समोर यशने बाईक थांबवली .. मंदिर परिसर आणि भोवतालीची बाग ..

येथे येऊन बसणे अगदी सुरक्षित असते “,

चौधरीकाका आज ही म्हणाले होते ..दूर ,रहदारी, निर्मनुष्य जागी जात जाऊ नका .

मधुरा आणि यशने आधी दर्शन घेतले ..आणि मग ..त्यांचा नेहमीचा कोपरा ,सगळ्यात असून

एकांत देणारा असा कोपरा दोघांचा आवडता झाला होता.

यशला बिलगून बसलेय मधुराच्या डोळ्यात पहात यश म्हणाला –

मधुरा – तुझ्या आणि माझ्याबद्दल आजी-आजोबांच्या इच्छा मला आता ते दोघे सूचकपणाने

बोलून दाखवत आहेत .

परवाच अंजलीवाहिनी तर उघडपणे –स्पष्टपाने म्हणल्या –

आहो आजी-आजोबा ..ही मधुरा ,मला पण आता खूप आवडू लागली आहे. ती आपल्या घरात

यावी “ही तुमची इच्छा .आता माझी पण इच्छा आहे.

यशच्या आई-बाबांची ,आणि त्याच्या बंधूंची – सुधीरभाऊ या तिघांची काय इच्छा आणि अपेक्षा

आहेत भावी सुनबाई बद्दलच्या ?

हे मी जाणून घेते आणि तुम्हाला सांगते..आजी –आजोबा ..

मी आज पासून तुमच्या पार्टीची मेम्बर आहे.

यशचे बोलणे ऐकून..मधुराला ..खूप आनंद झाला ..

एकूणच ..यश सुद्धा मनातून आपल्या बद्दलच सतत विचार करीत असतो ..ही गोष्ट तिच्या मनाला

आनंद देणारीच होती.

यशच्या जवळ सरकत ..ती म्हणाली ..

फक्त बोलत काय बसलास रे राजा –

तुझ्या राणीचे ओठ कोरडे पडलेत ..घे ना जवळ ..किस मी ..डियर ...!

यशने आवेगाने मधुराला अधिक जवळ ओढले ..आणि तिच्या गुलाबी ओठावर ओठ टेकवीत

तिचे चुंबन घेत म्हटले ..मधुरा ,लव्ह यू ..!

मधुराने ..त्याचा चेहरा स्वतःच्या छातीवर ठेवीत म्हटले ..

यश ..ऐक माझ्या काळजात तुझ्या नावाचे ठोके चालू आहेत ..

त्या वेळी यशचे ओठे ..तिच्या टोकदार ,मासल स्तनांवर टेकले आहेत हे पाहून ,

त्याच्याकडे नशिल्या नजरेने जणू ती म्हणत होती ..छान वाटतंय न माझ्या राजा

तिने त्याला तिच्या छातीशी अधिकच घट्ट धरले -

यश – तुझ्या मधुराच्या मिठीत असा कायम रहा ..लव्ह यु ..!

---------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढील भागात –

भाग – ३५ वा ,लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि. देशपांडे – पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------